मंगळवार, १ मार्च, २०२२

नक्षत्रांचे देणे ३९

 


''तू माझ्या आयुष्यात येण्याआधी मैथिली होती. ती खूप चुकीचं वागली तरीही मी तिच्याशी प्रामाणिक होतो, कारण माझ्यासाठी प्रेमाची व्याख्याच वेगळी आहे. त्यात मी माझं कर्तव्य सोडत नाही. तू मागितलं नाहीस तरीही माझं वचन आहे तुला. काहीही झालं तरीही, जिथे असू तिथे आपण एकत्रच असू.''  क्षितीज

 

''थँक्स. माझी आई म्हणायची, 'दूर कुठून, त्या नक्षत्रातून तुला न्यायला कोणी राजकुमार येणार.'  तू आमच्या सोबत आल्यावर तो काय एकटाच राहणार इथे. तू त्याच्या सोबत राहा.' विभास आयुष्यात आल्यावर आईच्या गोष्टी स्वप्नवत वाटायला लागल्या. पण आज वाटतं, त्या दूरवरच्या नक्षत्रांनी तुला माझ्यासाठी बनवलं  असणार किंवा मला तुझ्यासाठी.'' भूमी वर आभाळाकडे बघत म्हणाली.

 

''नक्षत्रांचा माहित नाही, माझा तेवढासा विश्वास नाहीय, पण योगायोग मात्र आहे. आपल्या बाबतीत सगळं योगायोगाने जुळून आलं आहे. तो अपघात, तुझं ऑफिस जॉइनिंग आणि काइट्स माऊंटनला आईने ठरवलेली आपली भेट. माझ्या आईचा यात खूप महत्वाचा वाट होता.'' क्षितीज

 

''विभास आणि नंतर साठे काकांनी त्यांना जे सांगितलं त्यामुळे तुझ्या आईचं खूप मोठा गैरसमज झालाय. इथे गावी आणि आमच्या नातलगांना खरं काय हे काहीच माहित नाहीय त्यामुले असं झालं.'' भूमी

 

''फोटोग्राफरने सुद्धा पुरावे दिले म्हणून आई चिडली.'' क्षितीज

 

''होय, पण ते खरच आहे ना. पुरावे खरे आहेत. समाजाच्या दृष्टीने अजूनही मी नानांची सून आणि विभासची पत्नी आहे. हे नाकारता येत नाही.'' भूमी

 

''त्यांना खरं काय ते सांगायला हवं ना मग. नाहीतर हे असेच प्रॉब्लेम्स पुन्हा-पुन्हा होत राहतील.'' क्षितीज

 

''हो. नाना सगळ्यांना सांगणार आहेत.'' भूमी

 

''मला आधी समजलं असत कि तुला या सगळ्या गोष्टी माहित आहेत, तर मी एवढ्या तातडीने इकडे आले नसते.'' भूमी पुढे बोलत होती.

 

''यासाठी कॉम्युनिकेशन असावं लागत, तू काहीही न सांगता निघून आलीस, प्रॉमिस यापुढे असं करणार नाहीस.'' क्षितीज तिच्या हात आपल्या हातात घेत म्हणाला.

 

''प्रॉमिस.'' म्हणत ती हसली. कितीतरी वेळाने तिला असं हसताना पाहून त्याला बरं वाटलं.

 

''तू अशीच खुश राहा, हसत राहा. बाकी घरी आईला वेगैरे काय समजवायचं ते मी बघतो.'' क्षितीज

 

त्या दोघांच्या काही वेळ गप्पा रंगल्या होत्या. मध्यरात्र केव्हा उलटून गेली दोघांनाही माहित नव्हतं. ते दोघे बोलत असतानाच नाना उठून बाहेर आले होते. त्याच्याकडे पाहून नानांनी ओळखले कि तो क्षितीज सावंत आहे. ज्याच्याबद्दल भूमीने त्यांना सांगितले होते. तरीही भूमीने नाना आणि क्षितीज यांची ओळख करून दिली. विभास बद्दल सकाळी झालेला प्रकार भूमीने क्षितिजच्या कानावर घातला होता. थोडक्यात विभासची प्रतिमा क्षितिजच्या डोळ्यासमोर उभी राहिली.

 

'लहान असताना साठे कुटुंबीयांनी आश्रमातून भूमीला दत्तक घेतले होते. त्यामुळे तिच्या नावापुढे साठे हे आडनाव लागले. तिने अर्धवेळ काम करून स्वतःचे   शिक्षण पूर्ण केले होते. डिग्री पूर्ण करून चांगलया नोकरीला लागली. माई-नानांचा तिच्यावर एवढा जीव होता कि, नंतर परदेशी असलेल्या आपल्याच मुलाच्या म्हणजेच  विभासच्या लग्नाचा विचार करताना त्यांनी भूमी पहिली पसंती दिली. आणि तिचे विभास बरोबर लग्न लावून दिले. पण हे लग्न होताच कायद्याच्या दृष्टीने अमान्य ठरलं. कारण विभास आधी पासून विवाहित होता. तिची झालेली फसवणूक आणि नंतर तिने आपल्या भविष्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल.'या क्षितिजला समजल्या होत्या. सगळ्या गोष्टी क्षितिजला समजल्या होत्या.'

नानांनी त्याला महत्वाचे असे सगळेच सांगितले होते. थोडंफार बोलणं झाल्यावर त्या दोघांनाही झोपायला सांगून नाना त्यांच्या रुममध्ये निघून गेले. 

 

'भूमिकची डोकेदुखी, मध्येच होणारी चिडचिड आणि बदलणारा स्वभाव कशामुळे आहे हे क्षितिजच्या लक्षात आले होते. सकाळी घरी आई-पपांना फोन करून सगळ्या गोष्टी कानावर घालायच्या असे त्यांनी ठरवले. पाहुण्यांसाठी असलेल्या खोलीत त्याच्या झोपण्याची सोया करून भूमी झोपायला निघून गेली.

 

*****

'सकाळी क्षितिजने घरी फोन करून सगळे इत्यंभूत कानावर घातले होते. नानांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल सांगितल्यानंतर बऱ्यापैकी गैरसमज दूर झाला होता.'

'नाही म्हंटल तरीही मेघाताईंना हे लग्नाचे कोडे पटलेले नव्हते. विभास आधी लग्न झालेले असले तरीही भूमीचे आणि विभासाचे लग्न झाले ना. मग लग्नाच्या विधी तर असणारच, मग कायद्याच्या दृष्टीने त्याला मान्यता दिली तरीही लग्न ते लग्नच. उघडपणे त्या क्षितिजला काहीही बोलत नसल्या तरीही त्यांचे संस्कारी आणि प्रतिगामी विचाराचे डोके हे लग्न अमान्य आहे हे मानायला तयार नव्हते. विभास आणि भूमीचा नवरा-बायको म्हणून काही संबंध आला असेल तर? अशी मुलगी आमच्यासारख्या घरंदाज लोकांची सून म्हणून येणार? ती अनाथ असणे वैगरे ठीक होत पण हे लग्नाचं गूढ त्यांना पटलेले नव्हतं. असल्या नको त्या विचाराने त्यांच्या मनात भूमीविषयी दूषित विचाराने जागा घेतली होती.   'उगाच आपण पुढाकार घेऊन त्या दोघांनाही काइट्स माऊंटनला भेट घडवून आणली. नाहीतर हे पुढे काही घडलेच नसते.' असे त्यांना वाटू लागले. पण आत्ता क्षितिजच्या पुढे त्यांचे काही चालेना.'

'विभासने कालवलेले विष भूमीच्या आयुष्यात पसरायला लागले होते. ती ठिणगी वणव्याची रूप धारण करायला पुरेशी होती.'

 

'आत्ता भूमीच्या दृष्टीने नाना-माईनाइथे गावी ठेवणे योग्य नव्हते. विभास इथे येऊन त्यांना त्रास देण्याची शक्यता होती. त्यांच्या जीवाला धोका आहे हे ओळखून भूमी त्या दोघांना घेऊन शहरात यायला निघाली. क्षितिजही सोबत होता.

 

'गोष्टी सावरत आहेत. असे वाटत असतानाच विभासने अजून एक कारस्थान रचले. त्याच्या सांगण्यावरून सकाळच्या न्यूज पेपरला त्याचे आणि भूमीचे लग्नाचे फोटो छापून आले होते. 'बिझनेसमॅन संजय सावंतांची होणारी सून आधीपासूनच विवाहित.' अश्या हेडींगने अनेकांचे लक्ष वेधले. SK ग्रुपच्या  शत्रूंना आयतेच कोलीत सापडले होते. त्यामुळे सर्वत्र सावंत फॅमिली आणि भूमीवर चिखलफेक सुरु झाली होती. भूमी शहरात पोहोचे पर्यंत या बातमीने गोंधळ उडाला होता.'

 

'संध्याकाळी घरी आल्यावर मेघाताईंनी क्षितिजला हि बातमी दाखवली. त्याला धक्का बसला. न्यूजवाल्यांशी संपर्क साधून त्याने माहिती काढायला सुरुवात केली. साहजिकच त्याने ओळखले विभास शिवाय हे कोण करणार?'

 

'हे भूमीला समजल्यावर तिचे अवसान गळून पडले. एक गोष्ट सावरली तर विभासने नवीन डाव रचला होता. नानांची संपत्ती मिळवण्यासाठी तो वाट्टेल त्या थराला जायला तयार होता.'

 

'भूमीबद्दल आधीच शासंक असलेल्या मेघाताईंच्या मनात अजून नकारात्मक भावना निर्माण झाली. लग्नाच्या आधीच या मुलीने आमच्या आयुष्यात वादळ निर्माण केले आहे, नंतर काय होईल? खरंखोटं काहीही असो, पण हि मुलगी क्षितिजच्या आयुष्यात यायला नको. असे त्यांनी मनाशी  पक्के ठरवले.

 

*****

 

 

''हॅलो भूमी कुठे आहेस? काल ठरल्याप्रमाणे नाना-माईंना घेऊन तू इथे होतीस.'' क्षितीज भूमीला फोनवर विचारत होता. पत्रकार आलेले होते. भूमीच्या लग्नाचे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी नाना आणि माई तिथे उपस्थित राहणार होते. पण भूमी अजूनही तिथे पोहोचलेली नव्हती.

नक्षत्रांचे देणे ३८



 'संध्याकाळ झाली तेव्हा निधीने नानांच्या मोबाइलवर फोन केला होता. क्षितीज भूमीला शोधात गावी येईल निघाला आहे, हे समजल्यावर नानांनी ताबडतोप भूमीला त्याला फोन करण्यासाठी सांगितले. भूमीचा फोन अजूनही बंद होता. तिने तो चालू केला आणि क्षितिजला फोन लावला. आता त्याचा फोन बंद येत होता.'

 

काय करावे हे भूमीला कळेना. 'तिथून निघताना मी फोन करत होते, तो त्याने उचलला नाही. आणि आता तो गावी का येतोय? त्याला जर विभास बद्दल सगळे कळले आहे तर त्याचा गैरसमज होणे साहजिकच आहे. मग एवढ्या लांब येण्याचे कारण काय? मला जाब विचारायला?'  एक ना अनेक प्रश्नांची सरमिसर तिच्या मनात सुरु होती. त्याच्या घरी कोणाला फोन करणे आता शक्य नव्हते. ते लोक रिप्लाय करतील असे तिला वाटत नव्हते.  आधीच विभासमुळे घरी घडून गेलेला प्रसंग आणि आता हे, त्यामुळे ते तिघेही चिंतेत होते.'

 

'नाना-माईना बळेच थोडं जेवायला देऊन ते झोपले, तिला काही खाण्याची इच्छा होईना. रात्र झाली तरीही क्षितिजचा फोन लागेना. झोप उडाली होती. आपण घाई करून निघायला नको होत. क्षितिजला सांगायला पाहिजे होत. असं तिला वाटू लागलं. तो आता कुठे असे? एवढ्या लांब शहर सोडून गावी एकटाच येतोय. तेही नवीन ठिकाणी. अजून का पोहोचला नाही? तिला कळेना. तिने पुन्हा फोन ट्राय केला. रिंग वाजत होती. पण कोणताही रिस्पॉन्स नव्हता. तिने पुन्हा-पुन्हा ट्राय केले. जवळपास अर्ध्या तासाने पलीकडून क्षितिजने फोन उचलला होता. ''दार उघड, मी बाहेर आहे.'' एवढेच बोलून त्याने फोन ठेवला. भूमीने धावत  जाऊन दरवाजा उघडला. पाहते तर गाडी बाहेर लावून क्षितीज तिच्याच दिशेने येत होता. त्याला बघून तिला हायसे वाटले.'

 

तो शांतपणे येऊन तिच्यासमोर उभा राहिला. काय बोलावं तिला सुचेना. तो सुखरूप आहे, आणि व्यवस्थित घरी पोहोचलाय हेच तिच्यासाठी फार होते. तोंडातून एकही शब्द फुटतं नव्हता. ती फक्त समोर बघत तशीच उभी राहिली.

''मी अगदी व्यवस्थित आहे. रस्त्यामध्ये गाडी दोन वेळा पंक्चर झाली, त्यामुळे लेट झालं.''  भूमीने न विचारातही क्षितिजने तिच्या अबोल प्रश्नांची उत्तरे दिली होती.

 

''सॉरी. कितीदा फोन ट्राय केला. का उचलला नाहीस?'' भूमी 

 

''तुझ्यासारखं फोन बंद करून तरी नाही ठेवत ना? आता समजलं फोन कशासाठी असतो ते.'' क्षितीज

 

''निघण्यापूर्वी मी तुला फोन ट्राय केला होता. तू नाही घेतलास.'' भूमी त्याला समजावत होती.

 

''ड्राइविंग करत होतो. अशावेळी मी फोन नाही घेत. तुला माहित आहे. मग फोन स्विचऑफ करण्याची काय गरज होती?'' क्षितीज

 

 

''तेव्हा घडलेल्या प्रकारामूळे काय करावं मला सुचेना. मी डिस्टर्ब होते. आणि मला वाटलं तू पण माझ्यावर रागावला असशील. सो.... '' बोलताना भूमीच्या पाणी जमा झालं होत. अगदी निकराने प्रयत्न करूनही तिला ते लपवता आलं नाही. क्षितिजच्या  गोष्ट सुटलीही नाही.  तिच्या चेहेरा स्वतःच्या ओंजळणीत घेतला. ओघळणारे अश्रू पुसून त्याने तिला जवळ घेतलं. '' शांत हो. मी का रागवेन तुझ्यावर? तुझी यात काहीच चूक नाही. तिचा गैरसमज झाला. कारण तिच्यासमोर पुरावे होते.''

 

 

''मी हि गोष्ट आधी सांगायला पाहिजे होती. आधी तुझ्या कानावर घालायला पाहिजे होती. मी प्रयत्नही केला होता पण राहून गेलं.'' भूमी

 

 

''काही राहून गेलं नाही. मला सगळं आधीपासूनच माहित होत. आत जाऊया, एवढ्या रात्री इथे बाहेर बरं दिसत नाही.'' क्षितीज तिला म्हणाला.

 

 

''सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. तू आत ये ना. फ्रेश हो, मग बोलूया आपण.'' भूमी त्याला घेऊन आतमध्ये आली.

 

 

''नको इथेच अंगणात थांबतो, तुझे नाना- माई असतील ना?'' क्षितीज

 

''त्यांना कल्पना आहे तू येणार ते. आत्ताच ते झोपालेत, नाही उठवलं तरी चालेले, ये आत. मो पाणी आणते.'' म्हणत भूमी आत जायला वळली. क्षितिजही आतमध्ये गेला.  

 

*****

 

फ्रेश होऊन, थोडं खाऊन ते दोघेही अंगणात बसून बोलत होते.

''तुला माझ्या आणि विभासच्या लग्नाबद्दल कसं काय माहित?'' भूमी विचारत होती.

 

''चंदीगढला असताना तुझ्या अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मी तुझ्या रूममध्ये आलो होतो, तेव्हा तू फोनवर माईंशी बोलत होतीस. आठवतंय? रूमचा दरवाजा चुकून उघडच राहिला होता. फोनवर बोलून झाल्यावर तू स्वतःशीच बडबड करत राहिलीस. आणि तुझ्या आणि विभास बद्दल सगळं बोलून गेलीस. तेव्हाच मी हे ऐकलं होत.'' क्षितीज

 

''तुला आधीपासूनच माहित होत हे?'' क्षितीज

 

''होय, पण माझ्यासाठी हि गोष्ट फार महत्वाची कधीच नव्हती. त्यामुळे मी तो विषय तुझ्यासमोर काढला नाही. आणि तुला याचा किती त्रास होत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे  तू सांगण्याचा प्रयत्न केलास तेव्हा टाळाटाळ केली.'' क्षितीज

 

''आणि तरीही तू ...''

भूमी काय बोलणार हे क्षितिजला माहित होत तिला थांबवत तो म्हणाला. ''बघ, लग्न म्हणजे एक टॅग असतो, त्यापलीकडे काहीही नाही. मग ते लग्न करून त्या नवरा-बायकोमध्ये काय नातं आहे? काय गोष्टी घडतात? का लग्न होऊनही ते विभक्त आयुष्य जगतात? याचा विचार लोक करत नाहीत. लग्न झाल्यावरही काही नवरा-बायकोमध्ये लग्नाचा कोणताही संबंध नसतो. तरीही लोकांच्या दृष्टीने ते लग्नच. आणि त्याच्या उलट लग्न न करता एखाद प्रेमी जोडप आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडून जवळ आलेले असतं. लग्न न करताही त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचे संबंध असतात. पण लोकांना हि गोष्ट माहीतच नसते. भविष्यात तो मुलगा किंवा मुलगी दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करून आपापले वेगळे मार्ग निवडता. पण यावर कोणीही  आक्षेप घेत नाही. कारण हा आपला समाज आहे.''

 

''बरोबर, पण या गोष्टीचा तुझ्यासारखा अश्या वेगळ्या पद्धतीने विचार करणारे खूप कमी असतात.'' भूमी

 

''असतात ना. पण बोलून दाखवण्याचं किंवा काबुल करण्याचं धाडस कोणामध्ये नसत. माझं आणि मैथिलीच्या अफेअर होत. आमच्यामध्ये काय गोष्टी घडल्यात किंवा आम्ही किती मर्यादा ओलांडल्या होत्या. यावर तू मला कधीच काहीही प्रश्न विचारला नाहीस. तुला आपलं नातं सुरु करताना माझा भूतकाळ मध्ये आणावा असं नाही वाटलं. त्याला तू तेवढं महत्व नाही दिलंस. म्हणजेच असा वेगळा विचार करणारी माणस असतात.'' क्षितीज

 

''लग्न होऊनही विभासची बायको न झालेली मी, आणि लग्न न करत मैथिलीच्या जोडीदार झालेला तू, काय भूतकाळ आहे ना आपला. किती फरक असतो ना नात्यांमध्ये. दोन वेगळ्या नात्यांची वेगळी भाषा आहेत.'' भूमी

 

''राग मनू नको पण, मला लग्न वगैरेवर काही विश्वास नाहीय. आयुष्यभर एकमेकांची साथ महत्वाची, एकनिष्ठता महत्वाची आणि विश्वास महत्वाचा. नाहीतर तीन वेळा लग्न करूनही एकटीच राहणारी माझी आज्जो बघ. तिच्या आयुष्यात कधीच खुश नाही. तरीही अजून चोथ्या लग्नाच्या तयारीत आहे.'' क्षितीज

 

''विश्वास माझा पण नाहीय, होता, विभासने त्याची व्याख्याच बदलून टाकली. पण होय, सगळ्यांच्या बाबतीत होत नसले तरीही, समाजात समाधानाने जगायचं असेल तर बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनून राहणं अवघड असत, लोक जगू देत नाहीत.  त्यापेक्षा रोज एकमेकांच्या चुका काढत, मर-झोड करत आला दिवस ढकलणाऱ्या नवरा-बायकोला जास्त मन मिळतो इथे.'' भूमी

 

''डोन्ट वरी, आय प्रॉमिस यु. आपलं लग्न झालं तरीही आणि नाही झालं तरीही हे असं काहीही आपल्यामध्ये होणार नाही.'' क्षितीज

 

''जे नशिबात असेल ते होईल. जन्मजात भाळी लिहिलेले नक्षत्रांचे देणे असते, ते आपल्याला मिळणारच. ना कोणते बंधन, ना कोणता करार, ना शपथ, मला फक्त तुझी साथ हवीय, मग ती कोणत्याही परिस्थितीत असो.'' भूमी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली. 

नक्षत्रांचे देणे ३७

 



इकडे संध्याकाळी मेघाताईंनी क्षितीज आणि घरी सगळ्यांचा कानावर भूमी बद्दल समजलेले सत्य सांगितले. त्यांना अपेक्षित होते कि क्षितीज चिडेल, पण तसे झाले नाही. तो ''आई आपण रात्री बोलू, मी आलोच.''  बोलून तिथून तडक बाहेर निघाला. एवढी मोठी गोष्ट समजूनही याची सौम्य प्रतिक्रिया कशी? हा भूमीला जाब विचारायला गेलाय का?'  हे मेघाताईंना समजेना. त्या आणि आज्जो झालेल्या प्रकाराने अगदी डिस्टर्ब झाल्या होत्या. यामधून क्षितीज कसा बाहेर  पडेल? कि मैथिली प्रकरण सारखंच तो स्वतःला त्रास करून घेईल? असे एक ना हजार प्रश्न त्यांना पडले होते.

 

*****

'मनाशी पक्का विचार करून भूमीने एक मेल ड्राफ्ट केला. तो कंपनीच्या HR ला पाठवून दिला. आपली बॅग भरत असताना तिने क्षितिजला कॉल करण्याचा प्रयत्न केला. त्याने तो उचलला नाही. मग शेवटी तिने ''सॉरी.'' असा एकच मेसेज पाठवून तिचा मोबाइल स्विचऑफ केला. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. हरलेल्या मनाने तिने रूमच्या मुख्य दाराला कुलूप लावले. आणि ती आपले सगळे सामान घेऊन निघाली.

 

*****

तिचा सॉरी मेसेज बघून क्षितिजला काही कळेना. गाडी चालवताना फोन उचलून कानाला लावणे शक्य नव्हते. त्याने नंतर तिचा फोन डाइल केला, पण तो बंद लागत होता. झाल्या प्रकाराने भूमी डिस्टर्ब असणार, आणि स्वतःला काहीतरी त्रास करून घेईल. याची त्याला काळजी होती. तिच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी शेवटी त्याने गाडीचा वाढवला. थोड्यावेळातच तो तिच्या रूमवर पोहोचला पण तोपर्यंत उशीर झाला होता. ती रूम सोडून तिथून निघून गेल्याचे त्याला समजलं. तो डोक्याला हात लावून तिथेच बसला. 'कुठे गेली असेल? आणि का?' हे त्याला कळेना. मोबाइलवर निधीचा नंबर डाइल  करून त्याने तिला विचारले. निधीला सुद्धा काहीच माहित नव्हते. ती खूप दिवस बाहेरगावी होती. 'एकतर आश्रमात, नाहीतर माई आणि नानांना भेटायला भूमी गेली असेल.' असे त्याला निधीने सांगितले.आश्रमाचा पत्ता त्याच्याकडे होताच. नानांच्या घराचा पत्ता निधीकडून घेऊन तो निघाला. आधी त्याने गाडी आश्रमाकडे वळवली. तिथे भूमी नसेल तर तो नानांच्या गावच्या घरी जाणार होता. कोणत्याही किमतीत त्याला भूमीला भेटायचं होतं. त्यासाठी वाट्टेल तिथे जाण्याची त्याची तयारी होती.

 

*****

'नाना-माईंच्या पा पडून भूमी आत घरात आली. थोडं फ्रेश होऊन तिने आराम केला. सारखं विचार करून तिचं डोकं पुन्हा दुखू लागलं होतं. सुदैवाने विभास घरी नव्हता. काही दिवसांपूर्वीच तो शहरात गेला होता. त्यामुळे ती  नाना-माईंशी मोकळेपणाने बोलू शकत होती. थोडं आराम करून झाल्यावर नानांनी विषय काढला आणि तिने सगळ्या गोष्टी सविस्तरपणे त्यांच्या कानावर घातल्या. क्षितीज आणि तिची अचानक झालेली एंगेजमेंट वेगैरे सगळं त्यांना सांगितलं.'

 

''खरंतर हे आधीच सांगायला पाहिजे होतं. पण कसं सांगावं कळेना. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगेन असं ठरवलं होत. त्यामुळे राहून गेलं. त्यासाठी मला माफ करा.'' तिने त्या दोघांनाही माफी मागीतली. दोघांनाही कसलीच तक्रार नव्हती.  कोणीतरी मनापासून प्रेम करणारा मुलगा तिच्या आयुष्यात आलाय. तिला सुद्धा लग्नाचे सुख मिळाले पाहिजे. तिने तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगावे, यात वावगे काय? नाना या विचाराचे होते.

 

'संपत्ती आपल्या नावावर का केली नाही म्हणून विभास नानांना त्रास देत होता. त्याला इथले सगळे विकून पुन्हा परदेशी जाऊन स्थाईक व्हायचं होत. त्यामुळे नाना त्याला काहीही द्यायला तयार नव्हते.' हे समजल्यावर भूमीचा संताप अनावर झाला. आपल्या आयुष्याशी खेळून त्याच पोट भरलं नाही तर तो माई-नानांना इथे बेघर करून वाऱ्यावर सोडून परदेशी पाहण्याची स्वप्न बघतोय. अजून किती खालच्या पातळीवर उतरणार आहे हा? त्याच्या आपमतलबी पानाचा तिला राग आला. खरतर ती प्रॉपर्टीच्या पेपर्सवरून आपले नाव काढून टाकणार होती. पण तसे केले तर माई-नानांसाठी मोठं संकट उभं राहील असतं. त्यामुळे नानांनी तिला तसे न करण्याचे बजावले. तिने तो विचार मनातून झटकून टाकला. आधी क्षितिजच्या आईचा झालेला गैरसमज दूर कर. असा सल्ला माईंनी तिला दिला. त्यासाठी लागणारी मदत ते दोघे करणार होते. काय करावं? या विचारात तो होती. आणि तेवढ्यात बाहेरची दाराची बेल वाजली.'

 

दार उघडताच नाना आश्चर्यचकित झाले. विभास समोर उभा होता. बाहेरगावी जातो सांगून तो निघून गेला होता. जवळपास आठवड्याने त्याने घरी पुन्हा हजेरी लावली. भूमीला बघून त्याने कुटूर हास्य केले.

''शेवटी भेटलीसच ना?'' विभास

 

''म्हणजे?'' नाना

 

''मी असा नाही डाव खेळलो कि हिला स्वतःच्या पायाने इथे यावे लागले. हेच तर अपेक्षित होते मला.'' विभास

 

''माझा तुझ्याशी काहीही संबंध नसताना तू का केलास हे सगळं? माझ्याबद्दल गैरसमज पसरवून काय मिळालं तुला?'' भूमी फार चिडली होती. तिने त्याला सरळसरळ जाब विचारला.

 

''हे नाना मला तुझा नंबर देत नव्हते. तुझा पत्ता तर दूरच. असे केलर नसते तर तू इथे आलीच नसतीस.'' विभास

 

''मला लाज वाटते तुला माझा मुलगा म्हणण्याची.'' माई डोक्याला हात लावत मटकन जागच्याजागी खाली बसल्या.

 

''मग मला माझी वाटणी द्या. मी इथून कायमचा निघून जातो. परदेशातील माझं करिअर आणि सगळं उध्वस्त झालाय, त्यामुळे मला पैश्यांची गरज आहे.'' विभास रागारागाने बोलतं होता.

 

''माझ्या काष्ठाने मी हे सगळं कमावलं आहे, एक फुटकी कवडीही तुला मिळणार नाही.'' नानांनी त्याला खडे बोल सुनावले. त्याचा राग अनावर झाला आणि तो नानांवर धावून आला. भूमीने त्याला मागच्या मागे ढकलून सरळ पोलीस स्टेशनमध्ये फोन लावला होता. तेव्हा पोलिसांच्या भीतीने तो  थोडा शांत झाला. शेवटी माईनी त्याला तिथून निघून जायला सांगितले. ''आजपासून तू आमचा कोणीही लागत नाहीस. त्यामुळे इथे तुझं काहीही नाही. चालत हो.'' असे सांगून नानांनी त्याला घराबाहेर काढले.

''आत्ता मी इथून जातो, तुला मी सुखासमाधानाने जगू देणार नाही.'' असे भूमीला बजावून तो निघून गेला.

 

तो गेल्यानंतर घरात एक भयाण शांतता पसरली. आपला मुलगा या थराला जाऊ शकतो. आपल्या वडिलांवर धावून येऊ शकतो. हि गोष्ट माई-नानांच्या मनाला फार लागली. त्याला डावलून भूमीच्या नावे सगळे केल्याचे ऐकल्यावर तो फार चवताळला होता. तेव्हापासून त्याचे वागणे बदलले होते.  विभासचे वागणे त्यांच्या कल्पनेपलीकडचे होते. उद्या तो कोणाचेही बरेवाईट करायला मागेपुढे पाहणार नाही. त्याआधीच सावध झाले पाहिजे आणि काहीतरी निर्णय घेतला पाहिजे हे नानांनी ओळखले. पण काय ? हे त्यांना कळेना.

 

'आश्रमात भूमी नाही हे समजल्यावर क्षितिजने नानांच्या घरी जाण्याची तयारी केली. अर्ध्या  रस्त्यामध्ये त्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि तो तिथेच अडकला. जवळपासचे गॅरेज बघून त्याने गाडी रिपेअरिंगला दिली. आणि ती पूर्ववत झाल्यावर तो पुन्हा भूमीला भेटायला निघाला. सारखे  मेघाताईंचे फोन सुरु होते. तो कुठे आहे? आणि काय झालं? याची विचारपूस त्या करत होत्या. आत्ताच काहीही सांगणे योग्य नाही. भूमीला भेटून मग काय ते बघू, म्हणत तो आईला सांगणे टाळत होता.'

 

'भूमीचे असे अचानक रिझाइन मिळाल्याने मिस्टर सावंतही चिंतेत होते. तिचा फोन बंद असल्याने काही संभाषण  होऊ शकत नव्हते.  झालेला प्रकार त्यांच्या कानावर आला होता. पण यात काय खरे आणि काय खोटे हे त्यांना समजेना. या सगळ्याचा परिणाम आपल्या कंपनीवर होऊ नये म्हणून ते शक्य ती काळजी घेत होते.'

 

****

'चिडलेल्या विभासने घर सोडले होते. त्याची सगळी प्रॉपर्टी आयतीच भूमीला  मिळाली होते. त्यामुळे तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता. ला धडा शिकवण्याची योजना त्याने आखली आणि तो संधीची वाट पाहू लागला.'

 

*****

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...