गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

नक्षत्रांचे देणे ५३ (शेवटचा भाग)

 ''मैथिली शुद्धीवर आली आहे? कशी आहे ती?'' भूमी त्यांना विचारत होती.

 

''मी अगदी व्यवस्थित आहे. फक्त चालत येत नाही. एवढंच. पण ती माझ्या कर्माची फळ आहेत. क्षितिजला फसवलं होत, आता भोगतोय.'' म्हणत व्हील चेअर वर बसून एक मदतनिसांच्या साहाय्याने मैथिली आतमध्ये लग्न मंडपात येत होती. तिला बघून क्षितीज आणि भूमी दोघेही स्टेजवरून उतरून तिच्या जवळ आले.

 

''तू बरी झालेस. विश्वास बसत नाही.'' भूमी

 

''मैथिली पुन्हा तुला बोलताना पाहून माझ्या मनातील गिल्ट कमी झालाय. लवकर स्वतःच्या पायावर उभी राहा.'' क्षितीज

 

''होय, नक्कीच. सॉरी क्षितीज. सॉरी तुझ्याशी खोटं प्रेमाचं नाटक करण्यासाठी. तुला फसवण्यासाठी, आणि कंपनी म्हणशील तर ती भूमीने तुझी तुला परत केली आहे. तुझ्या आई जवळ सगळे पेपर्स आम्ही रिटर्न केले आहेत.'' बोलताना मैथिलीचे डोळे पाण्याने भरले.

 

''तू तुझी काळजी घे, सगळ्यांच्या काही नाकाही चुका झाल्या होत्या. सगळ्यांनी एकमेकांना समजावून घेऊ आणि पुढे जाऊ.'' क्षितीज

 

'आता इथे तुमच्या दोन्ही कुटुंबाचे सगळे नातेवाईक जमा झाले असतील तर सप्तपदी राहिल्या आहेत. त्या पूर्ण करूया का? म्हणजे कस आहे,लग्न पूर्ण होईल आणि तुम्ही गप्पा मारायला मोकळे.''  साठे काका मध्येच हसत हसत म्हणाले. आणि सगळे हसायला लागले.

आणि पुन्हा भूमी क्षितिज स्टेजवर आले. सप्तपदीला सुरुवात झाली. सप्तपदी पार पडून क्षितिजने भुईच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. सगळ्यांनी त्यांच्यावर सुमनांचा वर्षाव केला आणि खऱ्याअर्थाने आज दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने हा विवाह सोहळा पार पडला होता.

 

रिसिप्शन पार पडले आणि किर्लोस्कर कुटुंब भूमी क्षितिजला शुभेच्छा देऊन घरी परतले. नाना आणि माई सुद्धा त्यांच्या सोबत घरी परतले. क्षितिजच्या आईने त्याला त्यांच्या राहत्या घरी परतून येण्याचा खूप आग्रह केला पण त्याने नकार दिला. त्याला भूमीचा गृहप्रवेश त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरात करायचा होता. त्याने तशी व्यवस्थाही केली होती. उलट त्याने आई आणि पप्पाना काही दिवसासाठी त्याच्या बंगल्यावर राहायला बोलावले. आणि नवीन सुनेचे स्वागत करण्यासाठी ते दोघे क्षितिजच्या घराकडे निघाले. मागच्या गाडीने क्षितिज भूमीला घेऊन त्याच्या घरी निघाला. फुलांनी सजलेली गाडी समोर आली. ड्राइव्हरने दार उघडले आणि भूमी आत जाऊन बसली. क्षितीज दुसऱ्या बाजूने आत बसला आणि गाडी घरच्या दिशेने निघाली.

 

 क्षितिजच्या बंगल्यावर गेल्यावर मेन गेटमधून आत प्रवेश करताना भूमीला फार आनंद झाला. कारण त्याचा संपूर्ण बंगला संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता. एवढी लाइटिंग केली गेली होती. ठिकठिकाणी फुलांची सजावट केली गेली होती.

क्षितिजच्या आईने तिची आरती केली. दारात पोहोचताच घरातील काकू पुढे आल्या, त्यांनी फुलांच्या नक्षीच्या मधोमध एक मोठे मापं भरून धान्य दारात ठेवले. आणि भूमीने माप ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. आरती करून तिला आत घेण्यात आले.  तिची पाऊले खाली लादीवर उठली होती. तर हातचे निशाण संपूर्ण घराच्या भिंतीवर छाप छाप म्हणून उठवले गेले. एवढे मस्त स्वागत होईल याची तिला अपेक्षा हि नव्हती.  ती खूपच खुश होती. अखेर तिचा एकटीचा  वनवास संपून तिला तिच्या प्रेमाची साथ मिळाली होती. आणि तिला मिळालेलं हे नक्षत्रांच देणं तिला तिच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत जपून ठेवायचं होत.



 ''ताई वरती रूममध्ये तुमचे सामान नेऊन ठेवलेले आहे.  करा.'' काकू येऊन सांगून गेल्या आणि भूमी वरच्या रूमकडे वळली. क्षितिजचा बेडरूम... जो आजपासून तिचा सुद्धा बेडरूम असणार होता. तिने वर येऊन रूमचा दरवाजा उघडला. आतमध्ये खूपच काळोख होता. आता लाईटचे बटन कुठे असेल ते ती शोधू लागली. पण तिला बटन सापडले नाही. एवढ्या काळोखात तिला भीती वाटू लागली. आणि काहीतरी वस्तू पायाला लागून ती धडपडून खाली पडली. आता आपल्याला मार लागणार या भीतीने तिने डोळे मिटून घेतले. पण... पण ती बेडवर पडलेली होती. आणि ती पडताच क्षणी रूमची लाइट लागलेली होती. फुलांनी सजवलेल्या बेडवर पडल्यापडल्या तिच्यावर वरून फुलांचा वर्षाव झाला. गुलाबाच्या असंख्य पाकळ्या तिच्या डोक्यावर, अंगावर आणि बेडवर सगळीकडे पडलेल्या होता. ती बघतच राहिली. रूममध्ये लावलेल्या नाजूक लाइटिंग मधून तिने पहिले क्षितीज तिच्याच दिशेने येत होता. तो येऊन तिच्या बाजूला बसला. आणि त्याने तिच्या हात हातात घेतला.

''कस वाटलं सरप्राइज?''

 

''क्षितीज थँक्स, तू अजून किती सरप्राइज करणार आहेस मला? आधीच काय कमी केलस का माझ्यासाठी.'' भूमी त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली.

 

''माय प्लेजर. तू एवढ्या मोठ्या कंपनीची पार्टनरशिप एक मिनिटात सोडू शकतेस, तर मी सुद्धा तुझ्या आनंद साठी काहीही करू शकतो.''

 

''ते गरजेचं होत, नाहीतर तुझ्या आईला माझ्यावर विश्वास बसला नासता, आणि त्यांच्या गैरहजेरीत आपलं लग्न होऊ शकाल नसत. तेव्हडा तर मी नक्कीच करू शकते.''

 

''लव्ह यु हनी.'' म्हणत त्याने मैत्रीला मिठी मारली.

 

''लव्ह यु टू. आणि असाच आयुष्यभर माझ्यासोबत राहा. आज मी खरच खूप खुश आहे.  विभासने दिलेल्या दुःखापेक्षा तू केलेलं प्रेम कितीतरी पटीने मोठं आहे, माझ विखुरलेलं आयुष्य तू पुन्हा मार्गी लावला आहेस.''

 

''बाय द वे, तू आज खूप छान दिसतेस. आणि नवरीच्या वेशात तर अगदी सुंदर. मिसेस भूमी क्षितीज सावंत.''

 

''एस, आज मी खऱ्या अर्थाने तुझी झाले. माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे हा क्षितीज.''

 

''खऱ्या अर्थाने नाही म्हणत येणार हा. अजून काहीतरी बाकी आहे ना?'' म्हणत क्षितिजने तिला आपल्याकडे ओढले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव सुरु केला. ती लाजून अगदी चूर झाली होती.

 

''आपल्या नात्याला पूर्ण करायचं का मग? काय म्हणते? अर्थात तुझी परमिशन असेल तर?'' तिला डोक्यावर ओठ टेकवत तो म्हणाला. आणि तिने डोळ्यांनीच त्याला होकार दिला.

 

त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ अलगद टेकवले आणि एक दीर्घ चुम्बन घेतले. पाण्यात खडीसार विरघळावी तशी ती हळूहळू त्याच्या मिठीत विरघळत गेली. तिच्या ओठांवर, मानेवर, कमरेवर त्याने आपल्या ओठांनी किस करायला सुरुवात केली. अगंणावरील वस्त्रांचा अडसर दूर झाला होता. श्वासाची अडखळती लय दर सेकंदाला वाढू लागली. आणि तिच्या गोर्यापान देहाला तिने क्षितिजच्या स्वाधीन केले. दोन्ही शरीर खऱ्या अर्थाने तन आणि मनाने एक झाली होती. प्रणयाच्या शेवटच्या क्षणी एक अस्फुट हुंकार तिच्या ओठातून बाहेर पडला. आणि तो तिच्यापासून दूर झाला. एक थंडीची लाट खिडकीतून आत आली. आणि थंडीने कुडकुडून ती तशीच विवस्त्र शरीराने क्षितिजच्या कुशीत शिरली. अंगावरच ब्लँकेट तिच्या भोवती गुंडाळून क्षितिजने ''लव्ह यु हानी'' म्हणत तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं.

बाहेरचा चंद्रमा आणि त्याच्या संख्या सोबती त्या तारका म्हणजेच भूमीचे आवडते नक्षत्र आत बेडरूममध्ये डोकावून पाहत होते. कारण आज ते दोघेही एक झाले होते. कायमचे. एकमेकांपासून कधीही विलग न होण्यासाठी. तिच्या नक्षत्रांनी तिच्या साठी पाठवलेला राजकुमार आज तिचा झाला होता आणि ती त्याची. या देण्यासाठी ती त्या नक्षत्रांनची नेहेमीच ऋणी असेल.

 

 

कथा वाचकांचे मनापासून आभार.कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

 इथे मी आज या कथेचा शेवट करत आहे. पर्व २ च्या विचारात आहे. वाचकांनी कळवावे, आपल्याला वाचायला आनंद होत असेल तर मी पर्व दोन अवश्य लिहायला घेईन आणि रोज तुम्हाला नवीन भाग वाचायला मिळेल.


नक्षत्रांचे देणे ५२

 'पदरावर जरतारी मोर आणि हिरव्या रंगाची जरीकाठ असलेली साडी नेसून भूमी तयार होती. नाकात नथ घालून तिने ओठांवर लाल  चुटुक लिपस्टिक लावली. मेकअप आर्टिस्टने तिच्या गळ्यात एक सोन्याचा हेवी असा हार घातला आणि त्यावर मॅचिंग असे मोठे कानातले कानात घातले. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला त्याच्या मध्ये मध्ये क्षितिजने पाठवलेल्या जाड पाटल्या घालून भूमीला तयार केले. ती सुंदर दिसत होती. केसात एका बाजूला खेवलेली केवड्याची आणि जरबेरिया ची लाल फुले तिच्या कानावर येऊन तिच्या चेहेर्याची सुंदरता अजूनच वाढवत होती. एक चंद्रकोर कपाळावर लावून भूमीने आरशात पहिले. खाली मंत्र पठन करायला सुरुवात झाली होती. लग्नघटिका जवळ आली होती. निधी तिला न्यायला वरती आली आणि निधी तिला नवरीच्या वेशात बघून खुश झाली. कधी नाही ते निधीच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.'

 

'मोरपंखी आणि सोनेरी शेरवानी सूट घालून क्षितीज तयार होता. डोक्यावरचा फेटा व्यवस्थित करत त्याने आरश्यात पहिले. आपला लूक परफ़ेकत आहे हे समजताच तो खाली लग्न मंडपाकडे निघाला. तो अगदी नवरदेव म्हणून शोभून दिसत होता. त्यात त्याने परिधान केलेला मोरपंखी शेरवानी त्यात तो अगदी राजबिंडा दिसत होता.'

 

'लग्न घटिका जवळ आली आहे, नवरा नवरीच्या हजर व्हावे.' म्हणत पंडितजी पाटावर येऊन बसले. मिस्टर सावंत त्याच्या जवळ आले. क्षितिजला मिठी मारून त्यांनी शुभेच्या दिल्या. आज्जो सुध्या त्यांच्या नवीन जोडीदाराशी लग्नाला उपस्थित होत्या. त्या देखील क्षितिजला येऊन भेटल्या.  भूमीचे नाना व्हीलचेअर वर बसून आले होते आणि त्यांच्या सोबत माई उपस्थित होत्या, तसेच निधीचा नवरा निल देखील त्याच्या बॉस च्या लग्नाला म्हणजेच क्षितिजच्या लग्नाला आला होता. सगळयांना भेटून झाल्यावर क्षितिजने बाहेरच्या दाराकडे पहिले अजूनही त्याची आई आलेली नव्हती. त्याला अशा होती कि त्या येतीलच. म्हणून तो वाट बघत होता. एवढ्यात भूमीला घेऊन निधी वरच्या मजल्यावरून जिन्याने खाली येताना सगळ्यांनी पहिले. ती अतिशय सुंदर सजली होती. क्षितीज ची नजर तिच्यावर होती. आणि तिच्या निरागस सौंदर्यावर तो हवी झाला होता.  

आज एवढ्या वर्षांनी तिला पुन्हा नवरीच्या वेशात पाहून नाना आणि माईंच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. नानांनी तिला आशीर्वाद दिला.

उपस्थित सगळ्या मोठ्या माणसांच्या पाय पडून ती स्टेजवर आली आणि क्षितिजच्या शेजारी उभी राहिली. 'छान दिसतेस.' अशी क्षितिजने तिला नजरेनेच पावती दिली. ती गोडं लाजली. ''पप्पा येणार आहेत ना?'' क्षितीज तिला विचारत होता.

''नाही, ते माझ्यावर फार रागावलात. काल मैथिलीची तब्येत अचानक बिघडली. पण लग्नाचा मुहूर्त आजच असल्याने मी सगळ्या गडबडीत हॉस्पिटल ला सुद्धा जाऊ शकले नाही.''

'''लग्न झाल्यावर संध्याकाळी जमलं तर जाऊन येऊया. मला काळजी आहे आईची. ती अजूनही आलेली नाही. ती नाही आली तर काहीच होऊ शकत नाही.'' क्षितीज पुन्हा पुन्हा दरवाज्याकडे बघत म्हणाला.

 

''येतील त्या. नक्कीच येतील. त्यांना यावंच लागेल.'' भूमीने त्याला समजावले.

 

''सावंत साहेब, मुहूर्त सुरु होतोय, सुरु करूया का?'' साठे काका मिस्टर सावंतांना विचारत होते. आणि क्षितिजने पुन्हा दाराकडे पहिले. क्षितिजच्या पप्पांनी मानेने त्याला नकार दिला. आज्जो पुढे आल्या होत्या.

 

''तुम्ही सुरुवात करा. ती नाही येणार.'' आज्जोने क्षितीज आणि भूमीला सांगितले. पण क्षितीज जागचा हलला नाही.

 

''पंडितजी त्याच्याकडे बघत बसले. भूमीचा चेहेरा साफ पडला होता. म्हणजे मी भेटून सुद्धा क्षितिजच्या आई येणार नाहीत तर? का? स्वतःच्या मूलाच्या सुखापेक्षा त्यांना त्यांचा ईमो महत्वाचं वाटतो तर?' तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला.

 'क्षितीज अजूनही येऊन पाटावर का बसत नाही?'असा प्रश्न खाली लग्न मंडपात जमलेल्या सगळ्या लोकांच्या मनात निर्माण झाला.

 

एवढ्यात दारातून मिसेस सावंत यांची इंट्री केली होती. त्यांना बघून कोण नव्हते तो आनंद क्षितीज आणि भूमीच्या चेहेऱ्यावर दिसत होता. त्या थेट क्षितीज च्या जवळ आल्या. क्षितीजला पाटावर बसवून त्या भूमीकडे वळल्या.  ''साठे काक सुरुवात करा.'' म्हणत त्यांनी हातातली शाल भूमीच्या अंगावर टाकली. आणि तिच्या हाताला धरून तिला पाटावर बसवले.

 

''आई, हे लग्न तुला नक्की मान्य आहे ना?'' क्षितिजने त्यांच्याकडे बघत त्यांना विचारले.

 

''होय, काल माझी होणारी सून मला भेटायला आली होती. ज्या कंपनीच्या पार्टनरशिप मुले किर्लोस्कर आणि आपले संबंध बिघडले होते ती कंपनीचं तिने आपल्याला परत केली आहे. तेही बेशर्त. पन्नास टक्के च्या पार्टनरशिप वर क्षणात लाथ मारून त्याबदल्यात तिने माझ्याकडे तुझी साथ मागितली. आणि मला इथे यायला भाग पाडलं. भूमीपेक्षा अजून कोणतीही निस्वार्थी मुलगी मला सून म्हणून मिळणे शक्य नाही. याव तर लागणार ना?''

 

''म्हणजे? भूमी काल तुला भेटायला आली होती?'' क्षितीज त्यांना पुन्हा विचारत होता.

 

''होय, पण आपण या विषयी नंतर बोलू, आधी लग्न मुहूर्त सुरु झाला आहे. काका तुम्ही सुरुवात करा.'' म्हणत त्या स्टेजवरून बाजूला झाल्या. आणि साठे काकांनी क्षितीज आणि भूमीच्या लग्नाला सुरुवात केली. क्षितिजच्या आत्ता लक्षात आले होते, कि भूमीमुळे आपली आई इथे लग्नाला आली आहे. त्याला खूप समाधान वाटले. भूमी मात्र काही न बोलता तशीच शांत बसून त्याच्याकडे बघून हसली.

लग्न अर्ध्यावर आले होते, सप्तपदीसाठी क्षितीज आणि भूमी दोघेही उभे राहिले. आणि दारातून कोणाची तरी चुळबुळ सुरु झालेली त्यांना ऐकायला आली.

मिस्टर किर्लोस्कर आतमध्ये येण्यासाठी दारावरील शिपायावर ओरडत होते. आणि शिपाई त्यांना आत सोडायला तयार नव्हता. हे बघून क्षितिज आणि भूमी फेरे घेता घेता जागीच थांबले.

मिस्टर सावंतांनी पुढे होवून शिपायांना बाजूला केले आणि मिस्टर कोर्लोस्कर लगबगीने आत घुसले.

''माझ्या मुलीचे लग्न, आणि आमच्या शिवाय कसे काय होवू शकते?'' ते थेट जाऊन भूमीच्या शेजारी उभे राहिले आणि विचारू लागले.

 

''बाबा प्लिज शांत व्हा.'' भूमी त्यांना शांत करत होती.

 

''मला इथे कोणतीही गडबड नको आहे, लग्न होऊद्या. प्लिज.'' मिस्टर सावंत तिथे येत म्हणाले.

 

''मी आशीर्वाद द्यायला आलो आहे, काही गडबड होणार नाही.'' म्हणत त्यांनी भूमीला मिठी मारली. आणि त्यांचे डोळे अश्रुनी भरले.

 

''बाप म्हणून मी सपशेल हरलो, मला माफ कर, एका मुलीला फितवून सावन्तांची कंपनी अडकवली. आणि तुला लहानपणीच वाऱ्यावर सोडून बापाच्या नावाला काळिमा फसला.  आता मला माझं कर्तव्य करू देत. कन्यादान करू देत.'' ते भूमीला सांगून रडत होते.

 

''बाबा, काय म्हणताय तुम्ही ? आणि माफी कशाला?'' मैत्रीला काही सुचेना झाले होते.

 

''मैथिली पूर्णपणे शुद्धीवर आलेय, तिने मला सांगितलं कि क्षितीजमूळे तिचा अपघात नाही झाला. तर हे त्या मुखर्जी, वेदांत आणि इतर सहकाऱ्यांचा कारस्थान होत. मैथिलीला हे माहित झालं म्हणून त्यांनी चंदिगढला असताना त्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणला. मला सगळं समजलेले आहे, मी विनाकारण क्षितीज ला दोष देत राहिलो. क्षितीज मला माफ कर.'' ते क्षितिजला सांगत होते.

नक्षत्रांचे देणे ५१

 गाडी हमरस्त्याला लागली होती.

'नया कल चौखट पर है

आज उस पर एतबार कर

कब तक बीते कल में उलझेगा

चल आज एक नई शुरुआत कर..!'

 

म्युझिक प्लेअर वर लागलेली शायरी ऐकत क्षितीज गाडी चालवत होता. आणि भूमी नेहेमीप्रमाणे त्याच्या बाजूला सीटवर रेलून झोपलेली होती. गाडी शहराकडे भरधाव वेगाने निघाली होती.

तेव्हा भूमीला जाग आली. ''क्षितीज आपण पोहोचलो का?''

 

''नाही, दहा मिनिटात पोहोचू.''

 

'' माझं घर तर मागे गेलं ना, तू पुढे कुठे निघाला आहेस?'' भूमी बाहेर रोडकडे बघत म्हणाली. आणि क्षितिजने ब्रेक लावला, गाडी जागीच उभी झाली होती.

 

''आपण माझ्या घरी आलोय, माझ्या आई-पप्पांच्या घरी. त्यांना भेटायला.'' क्षितीज गाडीतून उतरत म्हणाला.

 

''का? तुझ्या आईने मला तुझ्यासोबत पाहिलं तर त्या खूप रागावतील.''

 

''आता तिला काय रागवायचं आहे, एकदाच रागावू दे. नंतर तिला नेहेमीच आपल्या दोघांना सोबत बघायचं आहे.'' क्षितीज तिच्या बाजूचा दरवाजा उघडत म्हणाला.

 

''म्हणजे?'' भूमी आश्यर्य आणि कुतूहलाने विचारत होती.

 

''लग्न करतोय आपण. लवकरच... तेच इथे कानावर घालायला आलोय आपण.'' क्षितीज तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.

 

''आर यु सिरिअस? एवढ्या लवकर डिसिजन घेऊन निकाल पण झालास?'' भूमी अजूनही आ वासून त्याच्याकडे बघत होती.

 

''होय, का तुला काय प्रॉब्लेम आहे का?'' क्षितीज

 

''नाही, पण त्यांना म्हणजेच तुझ्या आईला हे मान्य नाही. माहित आहे ना तुला.''

 

''बघूया, चल आत.'' म्हणत त्याने बेल वाजवली आणि आणि आतून दार उघडले गेले. समोर हॉलमध्ये मिस्टर अँड मिसेस सावंत सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. समोर क्षितिजला आणि त्याच्या सोबत भूमीला बघून त्यांना आश्चर्य वाटले.

 

''क्षितीज तू कसा आहेस? आणि आज अचानक इथे?'' मिस्टर सावंत विचारत होते.

 

''मी मस्त, तुम्ही? आणि आज्जो?'' क्षितीज त्यांच्या शेजारी बसत म्हणाला.

 

''आम्ही सगळे ठीक, भूमी तू कशी आहेस?'' मिस्टर सावंत भूमीकडे बघून विचारत होते. आणि बाजूला बसलेल्या मिसेस सावंत डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होत्या.

 

''मी ठीक आहे.'' भूमी क्षितिजच्या शेजारी बसत म्हणाली.

 

''मी इथे तुम्हाला आमच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आलोय. लवकरच आम्ही लग्न करतोय.'' क्षितीज त्या दोघांकडे आळीपाळीने बघत म्हणाला.

 

''लग्न करतोय म्हणजे काय? तू तुझ्या मर्जीने लग्न करणार आहेस? तेही हिच्याशी? तर आम्हाला आमंत्रण कशाला देतोस?'' क्षितिजची आई ताडकन उठून उभी राहत म्हणाली.

 

''तुला माहित आहे, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. साखरपुडा झालेला आहे, तिचे काही पर्सनल प्रॉब्लेम होते. म्हणून ती परदेशी गेली होती. आता परत आली आहे, तर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आहे.'' क्षितीज एक दमात म्हणाला.

 

''कर लग्न, एक लग्न झालेल्या मुलीशी लग्न कर. आणि त्यात ती सहा-सात महिने बाहेरगावी जाऊन राहून आलेली आहे. परदेशी असताना ती तुझ्याशी कशी वागली, हे विसरलास का? तेव्हा तिला तुझी आठवण तरी होती का?'' मिसेस सावंतने अजूनच मोठ्याने ओरडत म्हणाल्या.

 

''आई ती काय आणि कसं वागली हे मला माहित आहे, त्यामागे बरीच कारण होती. त्यामुळे तू त्या विषयच भांडवल करू नकोस.'' क्षितीज त्यांना शांत करत म्हणाला.

 

''होय का, काय सांगितलं तिने तुला? आणि तू तिच्या बोलण्यावर  लगेचच विश्वास ठेवावा असा कोणता पुरावा तिने तुला दिला?'' क्षितिजची आई

 

''माझ्या आणि भूमीच्या नात्याला पुराव्याची काहीही गरज नव्हती. जिथे विश्वास असतो ना तिथे पुरावे आणि साक्षीदाराची गरज नसते.'' क्षितीज

 

''अरे या किर्लोस्करांच्या मुली फक्त फसवू शकतात. आणि तू तिच्यावर विश्वास ठेवून हे लग्न दरवुन मोकळा झालास? तर आम्हाला कशाला बोलावतोस?'' मिसेस सुभेदार म्हणजे क्षितिज ची आई

 

''घराच्या प्रतिष्ठेसाठी, कंपनीच्या हितासाठी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. तसाही लग्न झालाच पाहिजे असं काही नाही. आमचं लग्न झालं नाही तरीही आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर तुम्ही दोघे लग्नाला आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत तर हे लग्न होईल अन्यथा आणि असेच एकत्र राहू.  मला त्याचा काही फरक पडत नाही. तेव्हा तू ठराव तू येऊन आम्हाला आशीर्वाद देणार आहेस, कि आम्ही बिनलग्नाचे लिव्ह इन मध्ये राहू. हे तुझ्या हातात आहे.'' क्षितीज सरळ बोलून बाहेर पडला.

 

 ''तुम्ही येणार आहेत हे मला माहित आहे, पण दोघे सोबत याला अशी अपेक्षा करतो.'' निघताना तो पप्पांचा पाय पडला.  आणि बाहेर आला. भूमीला काय बोलावे सुचेना. तिला हे सगळे अनपेक्षित होते.

''क्षितीज घाई करू नकोस. असं आई-बाबांना तोडून चालत नाही.'' ती त्याला समजावत होती.

 

''आपण कोणालाही तोडायचं नाही, उलट या लग्नामुळे सगळे एकत्र येतील याची मला खात्री आहे. तू काळजी करू नकोस.''  क्षितीज तिला म्हणाला.

 

''तू काय म्हणाल होतास आठवतंय, आपलं लग्न होऊदेत अथवा नाही. त्याचा तुला काही फरक पडत नाही.'' भूमी

 

''म्हणालो होतो, पण आता मी आणि तू दोघेही एका नामांकित कंपनीचे CEO आहोत. सो जबाबदारी आणि प्रतिष्ठा दोन्हीही आहे. त्यात आपण दोघे  विना लग्नाचे एकत्र राहणार नाही, एवढी आपल्याला अक्कल आहे. त्यामुळे मी सगळं विचार करून हा निर्णय घेतलाय.'' क्षितीज

 

''आणि जर तुझी आई आपल्याला लग्नाच्या वेळी उपस्थित राहिली नाही तर? आपण हे लग्न भर मंडपात मोडायचं?'' भूमी

 

''तेवढी वेळ येणार नाही. म्हणूनच मी तिला सांगितलं कि, आम्ही बिनलग्नाचे लिव्ह इन मध्ये राहू शकतो. त्यावर ती नक्कीच विचार करेल.'' क्षितीज म्हणाला आणि भूमी शांतपणे काहीतरी विचार करू लागली.

नक्षत्रांचे देणे ५०

         'जवळपास तासाभराने भूमीला जाग आली, क्षितीजने गाडी थांबवली होती. आणि तो तिच्याकडे बघत होता. कदाचित तो तिच्या उठण्याची वाट बघत असावा. तिने समोर पहिले आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती चक्क आश्रमाच्या समोर होती. तिचा आश्रम लहानपणीच्या आठवणींचा आश्रम. कितीतरी महिने ती इकडे फिरकली सुद्धा नव्हती. आज क्षितिजमुळे ती पुन्हा तिथे आली होती. त्या लहान सवंगड्याना भेटायला.'

 

''क्षितीज विश्वास बसत नाही रे, थँक्स, थँक्यू सो मच.'' म्हणत उतरून ती आश्रमाच्या फाटकातून आत निघाली. क्षितीज गाडी पार्क करून तिच्या मागे आश्रमात जाऊ लागला. तेथील मुलांनी तिला बघून एकच गलका केला होता. ''भूमी दीदी आली.'' म्हणत सगळे तिच्या दिशेने आले. धावत येऊन सगळी मूळ तिला भेटली. आश्रमातील बाई, मदतनीस मंडळी त्या दोघांना भेटायला पुढे आले. क्षितीज आणि भूमी आश्रमात पोहोचले. आत हॉलमध्ये बसून त्यांच्या गप्पा रंगल्या. आपण इथे नसतानाही क्षितीज इथे येऊन जायचा. या मुलांना खाऊ आणि भेटवस्तू द्यायचा. तसेच SK गुओप कडून इथे दरवर्षी न चुकता डोनेशन हि येते. हे ऐकल्यावर भूमी फार बरं वाटलं. क्षितीजचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी होते. ती खूपच खुश झाली.  क्षितीज आणि भूमी दोघेही त्या मुलांमध्ये दंग होते. मस्ती आणि मज्जा सुरु होती. खानपान सगळं तिथेच झालं.  

''बाय द वे, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होत. वेळ आहेच आणि इथे कोणी डिस्टर्ब करणार नाही.'' क्षितिज भूमीला म्हणाला. आणि भूमीने आजूबाजूला नजर टाकली. आश्रमाच्या अंगणात असलेल्या बाकड्यावर दोघे बसलेले होते, मुलं खेळून दंवलेली होते, त्यामुळे ती आतमध्ये गेली होती. आजूबाजूला कोणीही नसल्याचे भूमीला जाणवले. तेव्हा तिने क्षितिजला तिची आपबिती सांगायला सुरुवात केली. आणि ऐकत असताना क्षितिजला आश्यर्य वाटत होते, त्याला माहित नसणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्याला तिच्याकडून माहित झाल्या.

 

'पहिली गोष्ट म्हणजे, ती मायग्रेन ट्रीटमेंट साठी परदेशी गेली नव्हती तर तिला ब्रेन ट्युमर होता, त्याच्या केमोथेरपीसाठी ती तिथे गेली होती. तिचे त्यातून वाचण्याचे चान्सेस फक्त १० टक्के होते, कारण तिने कॅन्सर ची दुसरी स्टेज क्रॉस केली होती. त्यामुळे तिला असे वाटले कि आपण काहीच दिवसाचे सोबती आहोत. क्षितीज च्या संपर्कात राहून आपण गेल्यानंतर त्याला त्याचा खूप त्रास होईल त्यापेक्षा आपण त्याच्याशी सर्व प्रकारचा संपर्क तोडावा, म्हणजे त्याच्या मनात आपल्या बद्दल राग उत्पन्न होईल. आणि तो आपल्याला विसरून जाईल. कमीत कमी आपण मेल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा एवढा त्रास होणार नाही. असा विचार करून तिने परदेशी जाताच आपला मोबाइल नंबर बदलला आणि इतर कोणत्याही प्रकारे क्षितीज शी संपर्क केला नाही.' 

 

'दुसरी गोष्ट म्हणजे, मैथिली देखील भूमी बरोबर तिच्या ट्रीटमेंट साठी परदेशी गेली होती. मैथिली २४ तास भूमीच्या सोबत होती. स्मृती गेली असली तरीही तिला आजूबाजूला काय घडत आहे, हे समजत होत. महत्वाचं म्हणजे एकदा भूमीच्या मोबाइल मध्ये क्षितीज चा फोटो पाहून तिने त्याला ओळखलं होत, तिची तब्येत त्यानंतर खूपच बिघडली. आणि डॉक्टर ने तिला त्रास होणाऱ्या कोणत्याही गोष्टी, फोटो, आवाज किंवा इतर कोणीही व्यक्ती याना तिच्यासमोर आणण्यासाठी सक्त मनाई केली. त्यामुळे भूमीने क्षितीज ला आपल्या पासून लांब ठेवण्याचा निर्णय अगदी पक्का केला.'

‘परदेशी ट्रीटमेंट झाल्यावर भूमीच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि ती भारतात परतली. इथे आल्यावर तिला क्षितीज आणि S K ग्रुप यामध्ये झालेल्या बदल विषयी समजले. क्षितीज तीच तोंडही पाहायला तयार नाही हे समजल्यावर तिला काय करावे सुचेना, मग तिने तिच्या बाबानी तिच्या समोर ठेवलेला कंपनीचा प्रस्ताव स्वीकारला. आणि मिस्टर किर्लोस्करांच्या जागी कंपनीच्या पार्टनर पदी ती नियुक्त झाली. फक्त क्षितिजच्या जवळ राहता यावं आणि त्याला समजवावं या एकमेव हेतूने तिने हि जबाबदारी स्वीकारली होती.’

निधीला भूमीच्या आयुष्यात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती. पण भूमीने तिच्याकडून वचन घेतले होते, कि तिने हे कोणालाही सांगू नये. त्यामुळे निधी क्षितिजला याबद्दल काहीही कल्पना देऊ शकली नाही.

सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यावर भूमीला हलकं झाल्यासारखं वाटलं. तिने सुटकेचा एक निश्वास सोडला. क्षितीज अजूनही शून्यात नजर लावून बसलेला होता. अजाणतेपणी तो भूमीला बरेच काही बोलून गेला होता. आता शब्द माघार घेणे शक्य नव्हते. ''सॉरी.'' एवढेच बोलून त्याने आपले डोळे पुसले.

''दॅट्स फाईन, तुला याची काहीच कल्पना नव्हती. तू तुझ्या जागी माझ्यासाठी बेस्टच आहेस.'' भूमी बोलत होती.

''तू आता ठीक आहेस ना? कि अजून काही ट्रीटमेंट ची गरज आहे?'' क्षितीज काळजीच्या स्वरात म्हणाला.

''मी ठीक आहे, पण एकदा ट्रीटमेंट साठी जावं लागेल. थोडा त्रास अजूनही होतो. पण धोका पूर्णपणे टळलेला आहे.''

''गुड, पूर्णपणे बरी हो.  पुन्हा जावं लागलं तरीही चालेल.''

''थँक्स क्षितीज, तुझं माझ्यावरच निस्वार्थ प्रेम, नाना आणि माईंचा आशीर्वाद आणि मिस्टर किर्लोस्करांनी ट्रीटमेंट च्या खर्चासाठी केलेली मदत यामुळे मी आज इथे दिसते. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.''

''म्हणून तू कोर्लोस्करांचं ऐकतेस का? 'आणि त्यांच्या घरी राहतेस?'' क्षितीज

''होय, त्यांनी यावेळी खरंच खूप मदत केली. लहानपणी आई मला सोडून गेली, बाबांचा पत्ता नव्हता, माझ्यासाठी ते हयाद नव्हते, नंतर मोठी झाल्यावर विभास कडून झालेली फसवणूक यामुळे मी मेंटॅलि खूप स्ट्रेस होते. त्यातून हा आजार झाला. असं डॉक्टर म्हणाले. पण हे समजताच पप्पांनी मला खूप मदत केली. मानसिक आधारही दिला. '' भूमी

''दॅट्स गुड. आता तू माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नकोस. मी नेहेमीच तुझ्यासोबत असेन. बेशर्त.'' क्षितीज तिचा हात हातात घेत म्हणाला. आणि ती होकारार्थी मन डोलावून हसली.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...