शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

नक्षत्रांचे देणे ३६

 


 

'कोण बरे असेल ती व्यक्ती? एवढ्या तातडीने मला का बरे बोलावून घेतले असेल? आणि कोणती महत्वाची माहिती सांगणार आहे?' या विचारात मेघाताई हॉटेलमध्ये आल्या. मोबाइलवर त्यांनी तो निनावी नंबर डाइल केला. पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. थोडावेळ त्या तिथेच बसून राहिल्या, आणि काही वेळातच  एक गोरागोमटा तरुण येऊन त्यांच्यासमोर बसला.

''हाय मी विभास... विभास. मीच आपल्याला फोन करून इथे यायला सांगितलं होतं.'' विभास मेघाताईं पर्यंत पोहोचला होता. भूमी आणि क्षितिजच्या सुरु होणाऱ्या नात्यामध्ये कटूपणाचे बीज पेरण्यासाठी त्याने जय्यत तयारी केली होती.

 

''होय, पण आपण? आणि कोणत्या महत्वाच्या कामासाठी मला इथे बोलावलं आहे.'' मिसेस सावंत त्याला आश्चर्याने विचारात होत्या.

 

''तुमच्या होणाऱ्या भावी सुनेचा मी नवरा आहे. हा आता तुम्हाला काहीच माहित नसेल. हे फोटेज पहा मग लक्षात येईल.'' म्हणत त्याने भूमी आणि त्याच्या लग्नाचे काही फोटो मेघाताईसमोर धरले. ते पाहून त्या अवाक झाल्या. काय बोलावं त्यांना सुचेना.

 

''हे कस काय शक्य आहे. तिच लग्न आधीच झालेले आहे. तिने हि गोष्ट आमच्या पासून लपवून ठेवली. आणि क्षितीज, त्याला समजलं तर?'' त्या ते फोटोज पुन्हा पुन्हा चेक करत होत्या.

 

''होय, तिने तुम्हा सगळ्यांना फसवले आहे. आणि हे फोटोज अगदी खरे आहेत. आमच्या लग्नातील प्रसिद्ध फोटोग्राफरचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही खात्री करून घेऊ शकता.'' त्याने एका फोटोग्राफरचे व्हिसीटिंग कार्ड त्यांना दिले. ''भूमी मला फसवून इकडे निघून आली. माझ्याशी तिला काहीही संबंध ठेवायचे नाहीत, म्हणून तिने क्षितिजला तिच्या जाळ्यात ओढलं असणार. फक्त तुम्हाला सतर्क करण्यासाठी मी इथे आलो होतो.''  तो पुढे बोलत होता. मेघाताई मात्र तटस्थ राहून ते फोटो बघत राहिल्या. 'एवढी मोठी फसवणूक, तेही एका बिझनेसमॅनच्या मुलाची, आमच्या भावनांशी खेळली ती मुलगी, आणि आम्हाला काहीही पत्ता लागू दिला नाही.'  त्यांच्या मनात नुसता जळफळाट उठला होता. त्या 'थँक्स.' बोलून तिथून तडक निघाल्या. आधी साठेकाकांना फोन लावून त्यांनी भूमीची चौकशी केली. भूमी ही आपली दुरचे नातलग नानांची सून आणि विभासची बायको आहेअसे साठेकाकांनी त्यांना सांगितले. आता त्यांच्या संशयाला पुरावा मिळाला होता. विभासने सांगितलेले सत्य आहे, असे समजून त्या भूमीच्या याचा जाब विचारण्यासाठी निघाल्या.

विभास पुन्हा आपल्या आयुष्यात येऊन आपल्यासाठी  एवढं मोठं संकट निर्माण करेल याची भूमीला कल्पना सुद्धा नव्हती.

 

*****

 

'ऑफिसमध्ये मिटिंग सुरु होती. भूमी आठवड्याच्या सुट्टी नंतर आज हजर झाली होती. चंदिगढ प्रकरणी ऑफिस कर्मचारी आणि बाकी सगळ्यांचे हस्ताक्षर तपासणीसाठी दिले गेली होते. त्यांचा प्रतिसाद आला होता. एवढ्या सगळ्यांचे हस्ताक्षर तपासून अहवाल द्यायचा तर त्यासाठी सहा महिने तरी लागणार होते. यावर सगळ्यांनी डोक्याला हात लावला. एवढा वेळ एका केससाठी दिला तर  उशीर  होणार होता. हि केस सहा महिने थांबवणे किर्लोस्करांना शक्य नव्हते. त्यांनी तसे स्पष्ट सांगितले. मिस्टर सावंत शांतपणे मीटिंगचे परीक्षण करत होते. भूमी सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे टिपत होती. क्षितीज काहीतरी विचार करत म्हणाला.

''हस्ताक्षर तपासणी पेक्षा दुसरा काही पर्याय नाही आहे का? ज्यामुळे आपल्याला त्या गुन्हेगारापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल.''

 

''सध्यातरी दुसरा काहीच पर्याय नाही. मैथिली मॅडम शुद्धीवर आल्या तर मात्र त्या आपल्याला डायरेक्ट सहकार्य करतील.'' भूमी म्हणाली.

 

''सावंत दुसरा पर्याय शोधा. मी एवढे दिवस वाट पाहू शकत नाही. आधीच माझा खूप लॉस झालेला आहे.'' म्हणत किरालोस्कर उठून मिटिंग रुम बाहेर पडले.

 

सोबत मुखार्जी आणि वेदांतही मिटिंग संपल्याचे घोषित झाल्यावर  बाहेर पडले. मिटिंग संपल्याचे जाहीर करूनही मिस्टर सावंत, भूमी आणि क्षितीज तिथेच थांबले होते. सगळे निघून गेल्यावर भूमीने एक कार्ड मिस्टर सावंतांकडे दिले.

''सर, हे आपली मदत करणार आहेत. बोलणं झालं आहे, आपली काही मोजकी माणस हिडन कॅमेरे घेऊन त्या लॅबमध्ये कामासाठी ठेवण्यात आलेली आहेत. काहीही संशयास्पद हालचाल आढळली तर ते लगेचच  आपल्याला कळवतील.''

 

''म्हणजे.'' क्षितीज तिच्याकडे बघत म्हणाला.

 

''मी सांगतो.'' मिस्टर सावंत त्याला समजावत म्हणाले.  ''ज्या लॅबमध्ये हस्ताक्षर तपासणी होणार आहे, तिथे आपली काही माणसे काम करतायत. तपासणीचा रिपोर्ट यायला सहा महिने लागतील. पण ज्याने हा फ्रॉड केला आहे, तो सहा महिने शांत बसणार नाही. तो लगेचच हालचाल करून त्या लॅबमधले त्याचे हस्ताक्षराचे पेपर्स किंवा रिपोर्ट्स गायब करण्याचे प्रयत्न करणार.  त्या लॅम मधल्या अधिकाऱ्याला पैश्याचे किंवा इतर कसलेही अमिश दाखवून रिपोर्ट्स परस्पर बदलण्याचा किंवा चुकीचे रिपोर्ट्स तयार करून  देण्याचा  प्रयत्न केला जाईल. आतापासूनच त्यांची हालचाल सुरु होईल.   तेथिल काही  वरिष्ठ अधिकारी वर्गाशी बोलून   आपण तिथे ठेवलेल्या कॅमेराबद्ध माणसांकडून आपल्याला त्याची माहिती मिळेल आणि आपण फ्रॉडर पर्यंत पोहोचू, तेही काही दिवसात. सहा महिने थांबण्याची गरज नाही. ''

 

''सर, पण हि गोष्ट आपल्या व्यतिरिक्त कोणाच्याही कानावर जायला नको. याची गुप्तता बाळगायला पाहिजे.''  भूमी बोलत होती. क्षितिजला आत्ता प्लान समजला होता. ''नाईस आयडिया.'' म्हणत तो हसला.

 

''डोन्टवरी कोणाला काहीही कळणार नाही. पुढचे हस्ताक्षर कागद तिकडे पाठवण्याची तयारी करा. निघतो मी.'' म्हणत मिस्टर सावंत उठले आणि बाहेर निघाले. भूमीही त्यांच्या पाठोपाठ निघाली. क्षितीज तिच्या मागून तिच्या केबीनमध्ये आला होता.

 

''पप्पांबरोबर राहून बिझनेस शिकलात हा मॅडम.'' म्हणत तो खुर्चीवर बसला.

 

'' सर, तुम्हाला काही काम नाहीय का? '' भूमी

 

''मी काय बिनकामाचा वाटतो का तुला? कामासाठीच आलोय इथे.'' तो नाटक्या रागाने म्हणाला.

 

''काय काम आहे, बोला?'' भूमी

 

''सकाळपासून दिसली नव्हतीस. लेट आलीस का?'' क्षितीज

 

''होय, हे काम होत का?'' भूमी

 

''नाही. महत्वाचं काम आहे.'' म्हणत त्याने उठून तिच्या कपाळावर  किस केले. ''झालं महत्वाचं काम.'' म्हणत तो दारा उघडून बाहेर निघूनही गेला. भूमी गालातच हसत तो गेला त्या दिशेने बघत  राहिली.  तिच्या आयुष्यातील ते अगदी सुंदर दिवस होते. प्रेमात पाडण्याचे, फुलण्याचे, उगाचच रागावण्याचे आणि रुसून बसण्याचे. पण याला विभासने प्लॅन करून गालबोट लावले होते हे तिला उशिरा समजले.

 

*****

 

'भांबावले मुखर्जी सारखे येरझाऱ्या घालत होते. ''वेदांत कुछ करो. वरना सब कुछ हातसे निकल जायेगा.'' ते वेदांतील सांगत होते. वेदांतही काहीतरी विचार करत होता.

''सर, त्या लॅब वाल्याला मॅनेज करायचं. मी करतो सगळं, तुम्ही काळजी करू नका.'' वेदांत शुअर होत म्हणाला.

 

''एक बात याद राखना. अगर हम मेसे कोईभी पकडा गया तो, दुसरे का नाम नाही बतायेंगे. एक अंदरसे और एक बहरसे मिलके कंपनीका बेंड बजायेंगे.'' मुखर्जी

 

''नहीं सर, कोई पकडा नही जायेगा. मैं अभीसे  सेटिंग लागता हू.'' म्हणत वेदांत उठून त्याच्या केबिनमध्ये आला. मुखार्फी आपल्या गोलमटोल पोटावरून हात फिरवत येरझाऱ्या घालत होते.

 

*****

 

मेघाताई भूमीला भेटायला तिच्या रूमवर गेल्या. तिचं काहीही ऐकून न घेता त्यांनी तिला क्षितीज पासून दूर राहण्याची ताकीद दिली. आपल्या लग्नाचे सत्य आणि असत्य काय? हे त्यांना सांगण्यासाठी भूमीने खूप धडपड केली, पण त्या तिच्याकडून एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हत्या.  आपल्याला साठे काका आणि विभास यांच्याकडून सगळी माहिती मिळाली आहे, त्यामुळे 'तुझ्यासारख्या फसव्या मुलीला मी माझ्या घराची सूर करून घेणार नाही. आमचा पैसे बघून क्षितिजची फसवणूक केल्यामुळे तो हि तुला माफ करणार नाही. 'असे सांगून त्या तडक तिथून निघाल्या.

 

भूमीसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. हि गोष्ट अश्या प्रकारे बाहेर येणे तिला अपेक्षित नव्हते. तिने माई-नानांना फोन करून या प्रकरणी कानावर घातले. तसेच क्षितीज आणि तिच्यामध्ये असणाऱ्या नात्याबद्दलही कळवले. त्या दोघांनाही झाल्या गोष्टीवर विश्वास बसेना. विभास तिलाच शोधतोय, हे नानांनी तिला कळवले. तेव्हा ती सावध झाली. काय करावे तिला कळेना. ''मी विभासला समजावतो, तू तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात कर. आमची काहीही हरकत नाही. आता विभास इथे नाही आहे. जमल तर एकदा इथे येऊन जा. आम्हाला प्रत्यक्ष भेटून सगळं सविस्तर सांग. इथल्या काही महत्वाच्या गोष्टी देखील तुझ्या कानावर घालेन.'' असे तिला नानांनी सांगितले. झालेला गैरसमज कसा निस्तराव? हे तिला कळेना. आता हि गोष्ट क्षितिजला कळल्यावर तो काय म्हणेल? या विचारात ती होती.

 

*****

नक्षत्रांचे देणे ३५

 


आतलं यावरून ती बाहेर येईपर्यंत क्षितीज तिथेच सोफ्यावर आडवा झाला होता. टाय-कोट बाजूला ठेवून तो शांत झोपला होता. त्याच्या निरागस चेहेऱ्याकडे बघून तिने ओळखले, कि दिवसभरच्या धावपळीने आणि मेंटली स्ट्रेसने तो खूप थकला आहे. अगदीच न राहवून ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या केसांवर हात फिरवत ती तिथेच शेजारी बसली. तिने दोनवेळा त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो झोपलेलाच होता. 'खूप थकलाय वाटत, झोपूदेत इथेच.'  म्हणत तिने त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले, आणि ती उठणार एवढ्यात त्याने डोळे उघडले होते. तिच्या हाताला पकडून स्वतःकडे ओढत त्याने 'काय' म्हणून विचारले. त्याच्या एवढ्या जवळ जाऊन ती थोडी लाजली. ''इथेच झोपणार आहेस का?'' 

 

''मग कुठे झोपू? आत एकच बेड आहे.''  तिच्या कपाळावरून खाली ओघळणारे केस बाजूला करत तो म्हणाला.

 

''मी झोपते इथे. तू आत झोप.'' त्याच्या हात सोडवून ती उठली.

 

''नको. जा तू झोप.'' क्षितीज

 

''नाही, नाहीतर मी इथेच समोरच्या सोफ्यावर झोपेत.'' भूमी हट्ट करत होती.

 

''ओके, चालेल, मग रात्रभर मी तुला बघत बसणार, आणि तू मला.'' क्षितीज

 

''चालेले.'' म्हणत ती समोरच्या सोफ्यावर तोंड फिरवून झोपी गेली.

 

''भूमी, जा ना आत झोप. मी इथे ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही.'' क्षितीज तिला समजावत होता. पण ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी तो सोफ्यावरून उठला. ती झोपलेली होती तिथे जाऊन तिला दोन्ही हातांनी उचलून तो बेडरूमकडे वळला. तिला काही कळायच्या आत त्याने तिला आतल्या बेडवर ठेवले. आणि तो जायला उठला. भूमीचे दोन्ही हात त्याच्या भोवती तसेच गुंफलेले होते. तो तिच्या अगदी जवळ होता. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तोही तिच्या नजरेत स्वतःला हरवून बसला. त्याच्या छातीवर रुळलेल्या तिच्या हाताला त्याच्या हृदयाचे वाढणारे ठोके स्पष्ट जाणवत होते. लाजून तिने तिची नजर खाली झुकवून हळुवार आपले डोळे बंद केली. क्षितिजला स्वतःला सावरणे आता शक्य नव्हते. भूमीच्या डोक्याखाली आपल्या हाताचा आधार देत त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. श्वासाचा वेग दर सेकंदाला वाढू लागला आणि त्याचा आवेगही वाढला. नाकावरून हळूच त्याचे ओठ तिच्या गुलाबी मऊसर ओठांवर येऊन थांबले. त्याचा उष्ण श्वास तिच्या चेहेऱ्यावर जाणवला. तिने डोळे उघडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत दोघांचेही ओठ एकमेकांच्या ओठात गुंतले होते. तिच्या तोकडा विरोध गळून त्याचे रूपांतर प्रतिसादात झाले होते. उघडलेले डोळे पुन्हा बंद करून ती कितीतरी वेळ शांत पडून राहिली. एकमेकांच्या आधीन झालेले ते ओठ खूप वेळानंतर विलग झाले. अस्ताव्यस्त चेहेर्यावर पसरलेले तिचे रेशमी केस बाजूला करून क्षितिजने तिच्या डोक्यावर पुन्हा आपले ओठ टेकवले. त्याच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. ''लव्ह यु, अँड सॉरी हनी, मी ठरवून काही केलं नाही. एनएक्सपेक्टेड होत ते. आय कूडनॉट कंट्रोल माय सेल्फ.''  हे ऐकून स्वतःला सावरत तिने डोळे उघडले होते. ''आपल्या बाबतीत सगळं अचानकच घडत.'' म्हणत  उठून तिने स्वतःला त्याच्या छातीवर झोकून दिले. ते दोघे आता एकमेकांच्या घट्ट मिठीत सामावले होते. ती काहीही न बोलता त्याच्या छातीवर डोकं ठेवून तशीच पडून राहिली. ''झोप तू, मी बाहेर जाऊ का?'' भूमीला स्वतःपासून थोडं दूर करत तो म्हणाला. ''थांब ना. झोप इथेच, चालेल मला.'' ती.

तिला ओढून आपल्या कुशीत घेत तो तिथेच बाजूला बेडवर झोपला. ती अजूनही शांतच होती.

''एवढी शांत का झाली. काय झालं?''  क्षितीज

 

''काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा घडतात तेव्हा वेळ लागतो सावरायला.'' म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली. ''दोघांनी मिळून एकमेकांना सावरुया. अगदी आयुष्यभर, आयुष्याच्या अखेरपर्यंत.''  म्हणत  आपल्या दोन्ही हातानी तिला जवळ घेत, तिच्या कपाळावर आपली हनुवटी टेकून तो डोळे मिटून झोपी गेला. काही मिनिटातच भूमी देखील झोपेच्या आधीन झाली.

 

शेवटी दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा आदर करत एकमेकांना सावरलं. एक गोडं नातं अगदी हळुवार संयमाने फुलू पाहत होतं, आणि आपापला भूतकाळ मागे सोडून भविष्याच्या  स्वप्नाच्या झुल्यावर झुलू पाहत होतं.

 

कुठेतरी दूरवर गाण्याचे बोल हळुवार कानावर गुंजत होते.

 

धड़क रहा है दिल मेरा, झुकी-झुकी हैं पलकें यहाँ

जो दिल में हो, वो कह भी दो, रुकी-रुकी सी है ये दास्तां

जज़्बात माँगे ज़बां

और क्या..और क्या..और क्या..?

 

तुम आये तो हवाओं में एक नशा है

तुम आये तो फिज़ाओं में रंग सा है

ये रंग सारे, है बस तुम्हारे

और क्या, और क्या, और क्या?

 


नक्षत्रांचे देणे ३४




'मिस्टर सावंतांच्या सांगण्यावरून बाहेर टफ सिक्युरिटी ठेवण्यात आली होती. मीडिया आणि बाकीच्यांना चुकवून क्षितीज कसाबसा कंपनीत पोहोचला होता. त्याने पळत येऊन भूमीची केबिन गाठली.

''सॉरी, एक्सट्रीमली सॉरी. मला यायला उशीर झाला.'' क्षितीज

 

''मला घरी जायचं आहे. सो प्लिज तेवढी हेल्प पाहिजे.'' क्षितिजला पाहून हाताचा आधार देत भूमी सावकाश उठली. आपली बॅग आणि मोबाइल दुसऱ्या हाताने पकडून ती उभी राहिली. तिचा तोल जातोय हे क्षितिजला समजलं. त्याने आपल्या हाताचा आधार देत तिला पुन्हा बसवलं. ''तुला उठता येत नाहीय, थोडावेळ बस इथे. बरं वाटत नाहीय का?''

 

''मी ठीक आहे. मला घरी जायचं आहे.'' पुन्हा खुर्चीवर बसत भूमीने डोक्याला हात लावला. डोकं फारच दुखत होत. ताण तिच्याने सहन होईना. तिच्या हातातली पर्स आणि मोबाइल खाली गाळून पडला होता. तिने दोन्ही हातांनी आपलं दोन दाबून धरलं होत.

 

''तुला आरामाची गरज आहे, आणि डॉक्टरचीही. मी काहीतरी करतो. वेट.'' खुर्चीजवळ खाली बसत त्याने बाजूचा पाण्याचा ग्लास तिच्या तोंडाला लावून त्याने थोडं पाणी हाताने तिच्या चेहेऱ्यावर शिंपडलं. भूमीला काहीही जाणवत नव्हते. तिची शुद्ध हरपत गेली आणि दुसऱ्याच क्षणी ती खुर्चीतून खाली कोसळली. क्षितीज समोर होता, त्यामुळे ती पडता -पडता वाचली.  तिला उचलून त्याने बाजूच्या सोफ्यावर ठेवले. शिपाया सांगून तिची पर्स आणि इतर साहित्य खाली पार्किंगमध्ये असणाऱ्या गाडीमध्ये ठेवून घेतली. आणि तिला उचलून गाडीमध्ये घेऊन तो हॉस्पिटलकडे निघाला.'

 

'हॉस्पिटलमध्ये चेकअप करून झाले होते. 'अतिताणामुळे डोकेदुखी असावी आणि जास्तवेळ उपाशी राहिल्यामुळे तिला अशक्तपणा जाणवत होता.' असे डॉक्टरने सांगितले. ती आता शुद्धीवर आली होती. क्षितीज तिच्याजवळ बसून होता. त्याच्या हातात असणाऱ्या तिच्या हाताची थोडी हालचाल झाली. तिने उठण्याचा प्रयन्त केला. डॉक्टरांनी थोडे दिवस आराम करायला सांगितले. 'आता तिची तब्ब्येत ठीक आहे. घरी जाऊ शकता. काही नॉर्मल टेस्ट केल्या आहेत. त्याचे रिपोर्ट काही दिवसात येतील, ते तेवढे न्यायला या.'  असे सांगून ते निघून गेले. तिला हाताचा आधार देऊन क्षितीज घरी जायला निघाला. तिची या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत. असे त्याला सारखे वाटत होते. भूमी मात्र गाडीमध्ये मागच्या सीटला डोकं टेकून शांत पडून राहिली होती.'

 

त्याचा केविलवाणा चेहेरा बघून तिला राहवेना. शेवटी आपला उजवा हात त्याच्या डाव्या हातावर हळुवारपणे ठेवून ती म्हणाली. ''क्षितीज मी ठीक आहे. जास्त ताण घेतला त्यामुळे चक्कर आली.''

 

''सॉरी हनी। खरंच, मला माहित नव्हतं असं काही होईल. SK ग्रुपचे मालक आहेत पप्पा. त्यांचं स्टेट्स आहे तसं. त्यामुळे हे लोक मागे लागलेले असतात.''  क्षितीज  म्हणाला.

 

''असो, आपली कोणाचीच काही चुकी नाही. अश्या बातम्या लीक होतात. पण ते मीडियावाले दिवसभर कंपनीच्या रिसिप्शनला बसून होते. त्यामुळे मला जास्त त्रास झाला.'' भूमी डोळे मिटून बोलत होती.

 

'' याबाबतीत माझ्या घरी थोडी काळजी घ्यायला पाहिजे होती. ते झालं नाही, म्हणून हा प्रॉब्लेम झाला.  सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. एवढा त्रास करून घेत जाऊ नकोस.'' क्षितीज

 

''होय, हे मीडिया, न्यूज आणि बाकी हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी, माझ्या बाबतची पहिलीच वेळ आहे. म्हणून जास्त त्रास झाला.'' भूमी

 

''प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ थोडी वेगळी ठेव. यापुढेही असं काही झालं तर ऑफिसला येत जाऊ नकोस. तसही आता पप्पांची होणारी सून आहेस तू, त्यामुळे ते काहीही बोलणार नाही.'' क्षितीज

 

''येस, एव्हाना सगळं जगजाहीर झालाय.'' भूमी

 

''दिवसभर तू काहीच खाल्लेलं नाहीस. असं डॉक्टर म्हणाले.'' क्षितीज

 

''मूड नव्हता. काही खायची इच्छा होईना.'' भूमी

 

''घरी गेल्यावर आधी खाऊन घे. घरी जेवण असेल कि खाली ऑर्डर करू?'' क्षितीज

 

''नाही, मावशी जेवण बनवून जातात.'' भूमी

 

''ओके, रिलॅक्स राहा. थोडावेळ डोकं टेकून  झोप आरामात. पोहोचल्यावर उठवतो मी.'' तिचा सीटबेल्ट लावत तो म्हणाला. आणि ''हो.'' बोलून ती तशीच डोळे मिटून झोपी गेली.

 

*****

 

''हॅलो क्षितीज कशी आहे ती आता?'' पलीकडून मेघाताई विचारत होत्या.

 

''आधीपेक्षा ठीक आहे. तिला घरी सोडून मी निघतोय.'' क्षितीज

 

''तिची ती मैत्रीण तिच्यासोबत आहे ना?'' मेघाताई

 

''नाही, ती बाहेरगावी गेली आहे.'' क्षितिज

 

''मग, तिला इकडे घेऊन ये ना. एकटीला सोडणं बरं नाही. पुन्हा चक्कर वेगैरे आली तर?'' मेघाताई

 

'' मला सुद्धा तेच टेंशन आलय. ती आपल्या घरी येईल असं वाटत नाही.''  क्षितीज

 

''तू तिथे थांबतोस का? बघ तिला विचारून. गरज असेल तर थांब, तुझ्या पप्पांना समजावते मी.'' मेघाताई

 

''बघतो, चल बाय.''

 

''काहीतरी खाऊन घे. सकाळपासून उपाशी आहेस.'' मेघाताई

 

''होय. तू जेवून घे. माझी वाट बघत बसू नको.''  क्षितीज

 

''होय, बाय.'' म्हणत क्षितिजच्या आईने फोन ठेवला होता. फोन ठेवून क्षितीज मागे वळला. भूमी तिथेच मागे उभी होती. तिने दोघांचं सगळं बोलणं ऐकलं होतं.

 

''मी अगदी व्यवस्थित आहे पण रात्र खूप झाले. आपण जेवून घेऊया.'' म्हणत तिने जेवण वाढायला घेतले. प्लेट्स लावून झाल्यावर एक नॅपकिन हातात देत ती म्हणाली. ''फ्रेश होऊन ये.'' तो शांतपणे तिच्याकडे बघत होता. काय म्हणून तिने मानेने खून करून विचारल्यावर तो म्हणाला, ''एका क्षणासाठी तर पार घाबरलो होतो मी, नक्की तुला काय झालं होत ते कळेना. काय करावं ते हि कळेना.''

 

''मला सुद्धा नीटस काही आठवत नाहीय पण त्यावेळी माझ्यामध्ये उठण्याची अजिबात शक्ती नव्हती. अक्षरशः तू येईपयंत मी स्वतःला होल्डवर ठेवलं होत. असं सहसा केव्हा होत नाही.'' भूमी

 

''आता ठीक वाटतेस, जेवून आठवणीने मेडिसिन्स घे आणि शांत झोप. तुला काही दिवस आरामाची गरज आहे. सो, नो ऑफिस, नो काम, नो स्ट्रेस...  पप्पानाशी बोललोय मी.'' तो तिच्या डोक्यावर स्वतःच दोन टेकवत म्हणाला.   

 

''होय... होय. समजलं. आधी जेवून घेऊया का?'' भूमी

 

''तू जेव आरामात, मी निघतोय.'' क्षितीज

 

''जायलाच पाहिजे का?'' क्षितीज

 

''मला काही प्रॉब्लेम नाहीय, तुला कोणी काही बोलायला नको. सोसायटीमध्ये लोक चर्चा करतात.'' क्षितीज

 

''इथे कोणाला तेवढा वेळ नसतो, आणि आपली एंगेजमेंट झालीय. एवढा विचार करण्याची गरज नाहीय.'' म्हणत भूमी जेवण लावून खुर्चीवर बसली. काहीतरी विचार करून क्षितिजही फ्रेश होऊन जेवायला बसला. ''निधी केव्हा येणार आहे?'' क्षितीज

 

''तिचं काहीच कन्फर्म नसतं. लहरी खात आहे. हल्ली कशीही वागतेय ती, त्यामुळे मला काळजी वाटते तिची.'' भूमी

 

''ती कशीही वागली तरीही तिचं स्वतःच्या वागण्यावर कंट्रोल आहे. नाहीतर तू, विनाकारण गोष्टी मनाला लावून घेतेस आणि त्रास करून घेतेस. नको तिथे एवढा विचार करत बसू नको.  '' क्षितीज

 

''काय गोळी असते का? विचार न करण्यासाठी.'' भूमी

 

''कायपण.'' क्षितीज

 

''असणार. त्याशिवाय काही लोक एवढे शांत राहू शकतात. काहीही होवो. अगदी शेजारी भूकंप होऊदेत, हे आपलं गालातल्या गालात हसत बसायचं. कसं काय जमत असेल बुवा?'' भूमी त्याला चिडवत होती.

 

''तू मला बोलतेस ना. मला माझा मूड, माझ्या फिलिग्स चेहेऱ्यावर नाही दाखवता येत. शांत राहायची सवय झाले. पण ते फक्त वरवर असत.'' क्षितीज

 

''थँक्स...'' भूमी त्याच्याकडे बघत म्हणाली.

 

''जेवा मॅडम. नुसतं बघत बसणार आहेस का? माझं झालं.'' म्हणत तो उठून बाहेर निघून गेला. घरून फोन आला होता. विचारपूस करून त्याने तो ठेवला. भूमी किचनमध्ये जाऊन आवराआवर करू लागली. 'माई-नानांना भेटून आलं पाहिजे. नाहीतर फोन करून क्षितीज बद्दल कालावल पाहिजे. त्यांना अचानक आमच्या  एंगेजमेंट ची बातमी समजली तर वाईट वाटेल. त्याआधी त्यांच्या कानावर काही गोष्टी घालाव्या लागतील.' या विचारात ती होती.


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...