मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

नक्षत्रांचे देणे २६

‘भूमी सावंतांचा घरी सगळ्यांना आवडली होती. क्षितिजला ती आवडते, एवढंच नाही तर तो तिच्यावर प्रेम करतो, हे मेघाताईंना समजायला वेळ लागला नाही. त्यामुळे तिला लग्नाबद्दल विचार, असं त्या क्षितिजला सांगत होत्या. तिचे कोणी नातलग नाहीत, मानलेले कोणी जवळचे असतील तर त्यांच्या कानावर घालून आपण पुढची बोलणी करूया असेही त्या म्हणाल्या. क्षितिजला वाटत होते, एवढी घाई करण्याची काही गरज नाही. आधी दोघांनीही एकमेकांशी बोललं पाहिजे, तिच्या मनात नक्की काय आहे, हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर लग्नाचा विषय येतो.’

 

*****

 

निधीने क्षितिजला 'कालचा प्लॅन स्पॉईल झाला, त्यासाठी सॉरी.' असा मेसेज केला होता. क्षितिजला पार्टीमध्ये घडलेल्या प्रसंगबद्दल तिला विचारायचे होते.  त्याने तिला संध्याकाळी भेटण्यासाठी बोलावले. तिने 'ओके.' असा रिप्लाय केला आणि तो ऑफिसला जायला निघाला.

 

*****

 

'' मॅडम काही नवीन माहिती?'' मिस्टर सावंत सकाळी-सकाळी भूमीच्या केबिनमध्ये येऊन भूमीला विचारत होते.

 

''सर काही फाईल्स गायब आहेत त्या शोधतेय, एकदा का मिळाल्या, की मग केस सॉल्व व्हायला वेळ नाही लागणार.'' भूमी

 

''काही मदत लागली तर सांगा, पण लवकरात लवकर शोध घ्या.'' मिस्टर सावंत

 

''होय, सर मी पूर्णपणे प्रयत्न करते.'' भूमी

 

''किती वर्षे तो कंपनीची फसवणूक करतोय माहित आहे. एखादा का त्या फ्रॉडरची माहिती मिळालाय ना, मग मी फ्री होईन. सगळ्या कंपनीला पार्टी देतो का नाही बघा.'' मिस्टर सावंत

 

''फक्त पार्टी का सर?'' भूमी हसत-हसत म्हणाली.

 

''तुम्ही मागाल ते बक्षीस मिळेल तुम्हाला. हे प्रॉमिस आहे माझं.''  ठाम विश्वासाने बोलत ते बाय करून निघाले.

 

''सर मग प्रॉमिस लक्षात ठेवा हं, लवकरच ती वेळ येणार आहे.'' भूमी त्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणाली. आणि 'येस, येस...'म्हणत ते त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले.

 

*****

 

क्षितिजचा वाढदिवस जवळ आला होता. मेघाताई क्षितिजच्या वाढदिवसाची  जय्यत तयारी करत होत्या. मैथिली प्रकरणामुळे दोन वर्ष वाढदिवस साजरा झाला नाही. त्याला इच्छाही नव्हती. या वर्षी मात्र मेघाताईंनी काही खास सरप्राइज प्लॅनींग केले होते. तेही क्षितिजच्या नकळत. मिस्टर सावंत आणि आज्जो देखील त्यांच्या सरप्राइज प्लॅनमध्ये सामील झाले होते. 

 

*****

 

'' मॅडम काय शोधताय इकडे?'' संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ ती गुपचूप कोणीनाही ते पाहून फाइल्स शोधत होती, तेही कोणाची परवानगी न घेता.  कंपनीच्या गोडाऊनमधून अचानक आलेल्या आवाजाने भूमी घाबरली. मागे क्षितीज उभा होता. त्याला बघून तिला हायसे वाटले.

 

''काही महत्वाच्या फाइल्स मिळत नाहीत, त्या शोधते.'' भूमी

 

''इथे, आणि असं एकटीने.? कोणत्या फाईल्स सांगितले असते तर कोणीही केबिनमध्ये आणून दिल्या असत्या.'' क्षितिज

 

''तोच तर प्रॉब्लेम आहे, कोणत्या फाइल्स महत्वाच्या आहेत हे सांगितल्यावर त्या फाइल्सच गायब होतात.'' भूमी

 

''आता काय शिपाई वगैरे सगळेच या फ्रॉडमध्ये सामील आहेत कि काय?'' क्षितीज

 

''नक्की माहित नाही, पण बरेच एम्प्लॉई सामील आहेत एवढं मात्र नक्की, म्हणून तर मी गपचूप येऊन इथे शोधाशोध करतेय.'' भूमी काही फाइल्स हातात घेत म्हणाली.

 

''काही महत्वाचं मिळाल का?'' क्षितीज

 

''काही फाइल्स मिळाल्या आहेत, महत्वाच्या निघाल्या उद्याच हि केस संपून जाईल.'' भूमी ठाम विश्वासाने म्हणत होती.

 

''उद्या। मग मला एखादा फ्रॉड करावा लागेल असं दिसतंय.'' क्षितीज तिच्याकडे बघत बोलत होता.

 

''म्हणजे.'' ती न कळल्याने.

 

''हे काम संपले, तुम्हाला नवीन काहीतरी काम नको का? काम नसेल तर लगेच कंपनीला डच्यु द्याल ना.'' तो मस्कारी करत म्हणाला.

 

''तुमची कंपनी खूप फ्रॉडर आहे, अजूनही बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. त्या सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार का?'' भूमी

 

''तसही त्या केसेस सॉल्व्ह केल्यानंतरही नाही सोडणार.'' क्षितिज तिच्या हातातल्या फाइल्स बघत म्हणाला.

 

''आ?'' ती आ करून त्याच्याकडे बघत होती.

 

''आय मिन, माझ्या पर्सनल सुद्धा काही केसेस आहेत, फारच गुंतागुंतीच्या अश्या... कंपनीचे काम संपले की आपण दोघांनी त्या केसेस सोडवुया.'' क्षितीज

 

''एवढा गुंता करायचाच कशाला? काही गोष्टी अगदी सहज सोप्या असतात. दिसत तेवढ अवघड वगैरे नसत काही.'' भूमी

 

''मग कसं असतं? ती तुमची चैन माझ्या लॉकेटमध्ये गुंतली होती तसं का? अगदी सहजसोपा गुंता, पण सोडवणे अवघड.'' क्षितीज तिला चिडवत होता.

 

''झालं का? ऑफिसमध्ये प्रोफेशनल वागावं. आत्ताच तुम्ही म्हणालात ना, आधी कंपनीची केस सोडवायची. मग आपण सावकाश तुमच्या गुंतागुंतीच्या केसेस बघुयात.''  म्हणत तिने क्षितिजच्या हातातील दोन-तीन फाइल्स आपल्या हातात घेतल्या. त्या दिवशीचा प्रसंग आठवून तिच्याही नकळत तिच्या गालावर हसू उमटले होते. आणि ती गोडं लाजली. आपल्या चेहेरा त्याला दिसू नये म्हणून तिने क्षितिजकडे मुद्दामहून पाठ फिरवली होती. त्याला हे समजले होते.

 

 '' प्रोफेशनल वागतोय म्हणून तर मॅडम म्हणालो ना.  बाय द वे, त्यादिवशी सांगायचं राहून गेलं, ती साडी सुंदर दिसत होती. आणि तू पण...'' म्हणत तो हसून तिथून बाहेर पडला. ती अजूनही तशीच उभी होती. क्षितीज गेला त्या दिशेने बघून तिने खात्री केली आणि आपल्या गोऱ्यागोबऱ्या गालावर पसरलेली लाजेची लाली लपवत ती तिच्या केबिनकडे निघाली.

 

*****

हातातल्या फाइल्स एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी आणि स्वतःची पर्स भूमीने उचलली. ड्रॉव्हर लॉक करून ती घरी जायला निघाली. आज लेट होईल असे निधीने सांगितले होते. त्यामुळे ओला बुक करून ती वाट बघत उभी होती. हातातील फाइल्सची जड पिशवी लपवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला पण बाजूने जाणाऱ्या मुखर्जीच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही. वर त्यांनी संध्याकाळी भूमीला तळमजल्याकडे जाताना पहिले होते. पिशवीत भरलेल्या फाइल्सचे टोक वरती आल्याने त्यांनी ओळखले कि, या ऑफिसच्या फाइल्स आहेत. मॅडम घरी घेऊन जात आहेत म्हणजेच नक्की महत्वाचे काहीतरी असणार. त्यामुळे संध्याकाळपासून ते दुरूनच तिच्यावर लक्ष ठेवून होते. कोणालातरी मेसेज करून त्यांनी याची माहिती दिली आणि ते तिथून निसटले.

 

निधी गाडी घेऊन तिथे टच झाली होती. खरतर ती क्षितिजला गुपचूप भेटायला आली होती. भूमी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला समोरच कॅबची वाट बघत असलेली तिने पहिले आणि त्याच वेळी भूमीचे लक्ष तिच्याकडे गेले. तिथेच गाडी पार्क करून ती भूमीच्या जवळ आली. तोपर्यंत क्षितिजही खाली आला होता. निधी ऑफिसखाली आल्याचा मेसेज त्याने वाचला होता. दोघींनाही समोर बघून त्याचा गोंधळ उडाला, आपली गाडी बाजूला उभी करून तो उभा राहिला.


नक्षत्रांचे देणे २४

          ‘बारीक नेट फ्रॅब्रिक असलेली पार्टी विअर ब्ल्यू-गोल्ड साडी आणि त्यावर मॅचिंग असे कानात हिऱ्याचे हँगिंग हुक, असा तिचा लूक अगदीच उठून दिसत हित. हातात छोटास स्टाइलिश पाकीट घेऊन ती निघाली.  ती नको नको म्हणत असताना निधीने तिला आडवले आणि तिच्या केसांचा हाफ क्लच काढला, केस थोडे सेट करून ते असेच खुले सोडले. तिच्या लेअर कट मुळे काही सिल्की केस कपाळावरून पुढे कानावर रुळले  होते, वाऱ्याच्या वेगाबरोबर ते मागे पुढे करत होते,  बाकीचे मस्त मागे कमरेपर्यंत हेलकावे घेत होते. तिच्या ओठावर  हलकीशी चेरी लिपस्टिक लावून निधी तिला घेऊन पार्टीसाठी निघाली.

निधी मात्र फारच अपसेट होती. भूमीसाठी ती तयार झाली, नाहीतर त्या पार्टीला जायचा तिचा अज्जीबात मूड नव्हता. ती निल आणि संजनाच्या लग्नाला सुद्धा भूमीच्या आग्रहमुळे गेली होती.  भूमीला काहीही समजणार नाही असे वागत असली तरीही ती आतून खूपच नर्व्हस होती. गाडी चालवताना तिच्या मनात कायकाय चालू होतं, हे तिलाच माहित.’

 

******

आलिशान हॉटेलच्या मस्त ओपन टेरेसवर पार्टी रंगात आली होती. चमचम करणाऱ्या कलरफून लाइट्स, महागडे शोपिसेस आणि फुलांचे डेकोरेशन होते. संजना खूपच खुश होती. निल येणाऱ्या जाणाऱ्याकडे लक्ष देत होता. सगळे दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव करत होते. सगळंच हाय प्रोफाइल. क्षितीज आज्जो आणि आई बरोबर जाऊन निल अँड फॅमिलीला भेटून आला. शुभेच्छाही देऊन झाल्या. बिझनेसमन द संजय सावंत यांचा मुलगा त्यामुळे  काही मुलींच्या नजरा त्याच्याकडे होत्या, हे लक्षात आल्यावर त्याला थोडं ऑकवर्ड फील झालं.  नेहमीप्रमाणे आज्जो आपल्या समवइ मित्रांशी बोलण्यात गुंतलेली होती. आणि मेघाताई नीलच्या फॅमिलीशी बोलत होत्या. 

 

भूमी कुठे दिसत नव्हती मग थोडं कॉर्नरला जाऊन त्याने निधी ला मेसेज केला. पण काहीही रिप्लाय आला नाही. थोड्याच वेळात मॅडमची एंट्री झाली होती आणि सोबत त्यांची सगळी गॅंग स्टेजवर आली. निल संजना आणि बाकी मित्र मैत्रिणी तिथे मस्ती आणि धमाल करत होत्या. दोन मिनिट त्याची नजर भूमीवर स्थिर झाली. अगदी साधीसुधी पण फार सुंदर दिसत होती ती. मेघाताईंची तर नजर हटेना.'' किती गोड दिसते हि, निव्वळ अप्रतिम.'' म्हणत त्यांनी क्षितिजकडे पहिले आणि त्या हसल्या. तो हि त्यांच्याकडे बघून हसला. एवढ्यात बाजूने येऊन कोणीतरी त्याला 'हॅलो.' केले होते. ती निधी होती.

''हॅलो, नाइस तू मीट यु.'' क्षितीज

 

''सेम या...'' निधी

 

 

''कसा आहेस?'' निधी

 

''मस्त... तू?'' क्षितीज

 

''मी पण.'' निधी

 

''तू स्टेजवर नाही गेली?'' क्षितीज

 

''मूड नाही, आमच्या भूमी मॅडम बघा कशा गळा भेट घेत आहेत. सगळी कॉलेज गॅंग आहे ना.'' निधी

 

''थँक्स निधी, तिला घेऊन आल्याबद्दल.'' क्षितीज

 

''दोस्तीमें नो थँक्स नो सॉरी. बाय द वे... मॅटर काय आहे? यु लाइक शी?'' निधी

 

''नॉट ओन्ली लाईक, आय लव्ह हर.''  क्षणाचाही विचार न करत तो बोलून गेला होता. आणि निधी अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिली.

 

''माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. तू सिरिअस आहेस कि नुसतं असच?'' निधी तिने परत प्रश्न केला.

 

''अगदी सिरिअस. मनापासून... तिच्याशी बोलायचं होत. पण माहित नाही वेळ नाही मिळत.'' क्षितीज

 

''ओह, तिचा काही पास्ट  वगैरे असेल तर?'' निधी

 

''डझन्ट मॅटर. प्रेसेंट  काही नाहीय, कदाचित मी सोडून. '' क्षितीज

 

''तुला कस माहित?'' निधी

 

''बऱ्यापैकी ओळखायला लागलोय तिला. डोळेझाकुन विश्वास ठेवू शकतो.'' क्षितीज अगदी ठाम विश्वासाने बोलत होता.

 

''गुड, आय लाइक इट. काय हेल्प पाहिजे सांग?'' निधी

 

''काही गोष्टी सांगायच्या आहेत. लवकरात लवकर आमची एक भेट अरेंज कर ना... प्लिज..'' क्षितीज

 

''आजच करते. त्याबदल्यात मला काय मिळणार ? '' निधी

 

''आजच, रिअली... बोल ना काय पाहिजे? आय एम रेडी.'' क्षितीज

 

''पार्टी द्यायची...'' निधी

 

''तिघे मिळून पार्टी करू, चालेल.'' क्षितीज

 

''पळेल...  मी फोन करेन, आणि पुढचं प्लॅनिंग सांगेन. पार्टी नंतर तू घरी जाऊ नको, रेडी राहा. ओके ?'' निधी

 

''ओके बॉस.'' क्षितीज

 

निधीने प्लॅनींग करायला सुरुवात केली होती. आणि आज फायनली तो दिवस आला आहे, म्हणून क्षितीज खूप खुश होता. 

*****

 

बरीच रात्र झाली होती, क्षितीज इथे रमलाय हे मेघाताईंच्या लक्षात आलं. भूमी आणि त्याच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या होत्या. त्याचे सुद्धा काही जुने मित्र मिळाले होते, त्यामुळे त्या आज्जोसोबत घरी निघून गेल्या. क्षितीज निधीच्या फोनची वाट बघत होता. पण निधी कुठे गायब झाली काही कळेना. भूमी निघण्याच्या तयारीत होती. ती सुद्धा निधीला शोधत होती.

''मी निघते, खूप उशीर झालाय. निधी कुठे दिसत नाही.'' भूमी

 

 

''मी सुद्धा तिलाच शोधतोय.'' क्षितीज

 

 

''का?'' भूमी

 

 

''दोघी एकत्र जाणार ना? म्हणून.''  क्षितीजने काहीतरी बोलून वेळ टाळून नेली. तरीही तिचा अजूनही मेसेज किंवा फोन कसा आला नाही? याचे त्याला नवल वाटले.

 

 

''मी बघून येते. असेल ती इथेच कुठे...'' म्हणत भूमी उठून तिला शोधायला लागली.

 

''ओके, मी सुद्धा येतो...''  क्षितीज

 

निधी जवळपास कुठे दिसलीच नाही. तिला शोधत-शोधत भूमी पार्टी हॉलच्या बाहेर आली. हि गेली कुठे तिला कळेना. दोघी सोबत आलोय, जायचंच होत तर न सांगता का बर गेली? फोन करते तर तोही उचलत नाही?  भूमीला काही कळेना. गाडी तरी जागेवर आहे का? कि घरी गेली, हे बघण्यासाठी ते दोघे पार्किंगमध्ये आले.  तर गाडी जागच्या जागीच होती. तिला काही कळेना. पुन्हा फोन ट्राय करून बघूया म्हणत क्षितिजने तिचा नंबर डायल केला. जवळपास कुठूनतरी रिंग वाजल्याचा आवाज आला. तिच्याच फोनची रिंग वाजत होती, म्हणजे ती इथेच कुठेतरी आहे हे भूमीने ओळखले. ''ट्राय अगेन.''म्हणत तिने क्षितिजला पुन्हा फोन लावायला सांगितले. आणि ती आवाजाच्या जाऊ लागली. थोड्याच अंतरावर पुढे फोन वाजत होता. एक झटका लागावा तशी ती मागच्यामागे वळली. २०-२५ पावलावर निधी-नीलच्या गळ्यात पडून ओक्सबोकसी रडताना तिने पहिले. निल सुद्दा रडत होता. निधीला समजावत होता. क्षितिजसाठी सुद्दा हा जबरदस्त झटका होता. निल ज्याच्या लग्नाचं वरती रिसेप्शन सुरु आहे, संजना वरती मस्त एन्जॉय करतेय, तो इथे निधी बरोबर...का?  हे समजण्याच्या पलीकडचे होते.

 

 'त्या दोघांच्या बोलण्यावरून तरी भूमी आणि क्षितिजने ओळखले कि त्यांचे अफेअर होते आणि आत्ताही त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. घरच्यांनी पैशासाठी संजनाशी जबरदस्तीने लावून दिलेले लग्न आता नीलच्या पचनी पडत नाही. त्यामुळे तो हवालदिल होऊन निधीची माफ़ी मागत होता. यात तो किती खरं बोलतोय, हा तर एक प्रश्नच होता.'


नक्षत्रांचे देणे २२

 'काही दिवस भूमी केसही रिलेटेड माहिती गोळाकरत होती. संबंधित माणसांना आणि स्टाफला भेटत होती. चंदीगढच्या कम्प्युटर सिस्टीममधील काही डेटा मागवून तिने त्यावरही काम केले. बरेचसे कागद चाळून झाले होते. आणि आज अचानक तिने एका खाजगी मीटिंगचा मेल टाकला.'

 

'मिटिंग रूममध्ये राउंड टेबलजवळ सगळे उपस्थित होते. मिस्टर सावंत आणि क्षितीज, आधीच येऊन बसले होते. लीगल टीमचे काही मेम्बर आणि मुखर्जीना मेल पाठवला होता. सगळे त्यांची वाट बघत बसले होते. बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे भूमी देखील प्रोजेक्टर जवळ उभी राहून मुखर्जींची वाट बघत होती. तिने मांडलेल्या डायग्राम वरून बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या.'

 

''भूमी तुम्ही कन्टीन्यु करा. मुखर्जीची वाट बघत बसण्यात काही पॉईंट नाही. ते आल्यावर जॉईन होतील.'' मिस्टर सावंत

 

''ते आल्याशिवाय पुढे जात येणे शक्य नाही. सर काही गोष्टी फक्त तेच एक्सप्लेन करू शकतात.'' भूमी

 

''एक्झाम्पल?'' मिस्टर सावंत

 

''चंदिगढ प्रोजेक्ट्च्या प्रोसेस रिलेटेड जे इश्यू आले होते, आणि त्यानंतर कंपनीवर फसवणुकीची केस झाली. या सेम प्रोजेक्ट्चे टेंडर बजेट आणि प्रपोजल बजेट दोन्ही वेगवेगळे आहे. असं का? आणि या दोन्ही फिगर वेगळ्या असूनही अप्रूव्हल  साइन कोणी केली होती? यात जवळपास कोटी रूपयांचा फरक आहे.''

म्हणत भूमीने हातातले पेपर्स त्यांच्यापुढे सरकवले.

 

दोन मिनिट पेपर्स पाहुन त्यांनी लगबगीने फोन डाइल केला. 'हॅलो, मुखर्जींना सांगा मिटिंग पोस्पोनेड केली आहे. उद्या मेल मिळेल.'

म्हणत त्यांनी फोन कट केला. भूमी आणि क्षितीज त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते. शेवटी क्षितिजने विचारले.

''पप्पा? का ?''

 

''मिटिंग आजच होणार. पण मुखर्जीच्या अनुपस्थितीत. आणि यापुढे चंदिगढ प्रोजेक्त इशूज च्या मिटिंग मध्ये मुखर्जींना बोलवायचं  नाही. मिटिंग पूर्ण झाल्यावर यातील काही गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या. इस इट ओक.''मिस्टर सावंत

 

आता भूमीच्या लक्षात आलं. कि मुखर्जींवरती संशयाची सुई वळललेली आहे. तिने पुढचे काही पेपर्स दाखवले.

''सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यावेळी तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टसाठी लंडनला गेला होतात. इथे नॉमिनी म्हणून कोणी होते का? कि किर्लोस्कर सर हे सगळं बघत होते?''

 

''हो किर्लोस्कर आणि त्यांची मुलगी मैथिली हे काम बघत होते. क्षितीज येऊन जाऊन असायचा.'' मिस्टर सावंत

 

''ओरिजनल पेपर्स मी बसत असलेल्या केबिनमध्ये सापडलेलं, तिथे आधी मैथिली मॅडम बसायच्या असं समजलंय. त्यांच्या काही चिट्स आणि डायरीज मध्ये हे सापडलं आहे.'' भूमी

 

 

''काय आहे... एक्सप्लेन करू शकता?'' क्षितीज

 

 

''बजेटमध्ये काहीतरी गडबड आहे, आणि लीगल प्रॉब्लेम्स त्यामुळेच येत आहेत. हे त्यांना समजलं होत. तेव्हा त्यांनी या प्रॉजेक्टच्या रिलेटेड स्टडी केला. यात त्यांनी एक्झॅक्ट्ली मिसिंग फिगर किती आहे ते दाखवलं आहे.  मी यावर स्टडी केला, तर असं समजलं कि हि सेम अमाउंट काही बिलांशी जुळतेय, जे  बिल्स फेक बिल्स म्हणून जाहीर करून काही कंपनीनी  आपल्यावर लीगल फ्रॉड ची केस केली आहे.'' भूमी

 

''एस, आणि त्यांचं असं म्हणणं आहे कि, हे फेक बिल दाखवून कंपनीने एक्सपेन्सेस वाढलेला दाखवला आहे. आणि ती अमाउंट परस्पर गायब करण्यात आलेली आहे.'' क्षितीज

 

 

''पण आपल्याला अशी कोणतीही रक्कम मिळालेली नाही. उलट हा आपला टोटल लॉस मध्ये अडकलेला प्रोजेक्ट  म्हणून अजूनही अपूर्ण  आहे. '' मिस्टर सावंत

 

''सर महत्वाची बाब हि आहे, कि तो प्रोजेक्ट नफ्यात होता. जवळपास १ कोटी नफ्याचा प्रोजेक्ट तेवढ्याच रकमेने तोट्यात दाखवून २ कोटी रूपये गायब केले गेले आहेत. तेथील कामकाज मुखर्जी बघू लागले आणि तिथे प्रॉब्लेम्स येऊ लागले. जस कि गुणवत्ता, कायदेशीर बाबी, स्टाफ मेम्बर्स वरच्यावर सोडून जाऊ लागले.'' भूमी

 

''क्षितीज आणि मैथिली यांचा अपघात  तिथेच झाला होता. सुदैवाने क्षितीज वाचला. आणि मैथिली अजून कोमामध्ये आहे.'' मिस्टर सावंत अचानक बोलून गेले आणि भूमी सावध झाली.

 

''सर मला मिळालेल्या माहितीनुसार मैथिली मॅडम इथून तिथे त्याच प्रोजेक्टच्या डिस्कशनसाठी गेल्या होत्या.'' भूमी

 

''होय. पण त्याच इथे काय?''  मध्येच क्षितीज तिला म्हणाला.

 

''अचानक जाणं झालं होत कि, प्लानेड मीट होती?'' भूमी

 

''प्लानेड. आम्ही दोघेही सोबतच गेलो होते. त्याचा इथे काय संबंध आहे का?'' क्षितिज जवळजवळ ओरडलाच. त्याला कसला राग आला आहे हे भूमीला कळेना. असा चिडका चेहेरा बघून भूमी शांत झाली. तिने पुढे काहीही विचाराले नाही.

हे पाहून मिस्टर सावंत म्हणाले.''भूमी नक्की काय विचारायचं आहे? या प्रोजेक्ट संबंधी महत्वाची काही गोष्ट आहे का?''

 

''इट्स ओक सर. काही नाही. '' म्हणत तिने मान खाली घातली. क्षितिजच हे वागणं तिच्यासाठी नवीन होत. काही दिवस ऑफिसमध्ये मैथिली आणि त्याच्या बद्दल कानावर पडत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत, असं तिला वाटू लागलं. ती थोडी नर्व्हस झाली होती. हि गोष्ट क्षितिजच्या लक्षात आल्यावर त्याला वाईट वाटले, बी प्रोफेशनल असं स्वतःला समजावत तो म्हणाल.

 

'सॉरी, काय माहिती हवे?''

 

''गुड, मी इथे प्रोफेशनल वागण्याची अपेक्षा ठेवेन. एकमेकाला कॉपरेट करा.'' मिस्टर सावंत

 

''इफ तू डोन्ट माइंड, या मिटचा थोडा पास्ट कळू शकतो का?'' भूमी

 

''मैथिलीने अचानक हि मिट अरेंज केली, इमर्जनी तिकीट बुक करून आम्ही चंदीगढला गेलो. तिथे आम्ही जात असल्याची कोणालाही काहीही कल्पना द्यायची नाही असं ठरलं होत. त्याच्या आधी काही दिवस मैथिलीने अकाउंट्स आणि बजेटच्या काही लोकांना मेल पाठवला होता. कोणत्याही परिस्थिती चंदीगढला उपस्थित राहायला सांगितले होते. एअरपोर्ट वरून आम्ही सरळ टॅक्सी करून कंपनीत पोहोचणार होतो. पण मध्येच आमची टॅक्सी बिघडली, आणि चंदिगढच्या कंपनीने अरेंज केलेली गाडी घेऊन आम्ही पुढे जायला निघालो.'' क्षितिजने सगळी माहिती सांगितली होती.

 

''त्यानंतर त्यांचा कार अपघात झाला आणि ती मिट रद्द झाली.'' मिस्टर सावंत

 

'' त्या आधी मैथिली मॅडमनी तुम्हाला या प्रॉजेक्ट काही सांगितली होते? काही विशेष... नेहेमीपेक्षा वेगळे.''  भूमी

 

'' तिथे काय काम आहे?’’ असं मी तिला खूपदा विचारलं होत. सगळ्याच गोष्टी इतरांशी शेअर करायला तिला नाही आवडायचं. ' पोहोचल्यावर सांगते. असे विषय गाडीमध्ये बोलता नाही येत.’या पलीकडे तिने काहीही सांगितले नाही.  ' पण '२ कोटींचा प्रश्न आहे. आजच त्याला नोकरी सोडायला नाही लावली तर बघ.' असं काहीतरी ती सारखं बोलत होती. तिची डायरी आणि काही फोल्डर्स तिने सोबत घेतले होते.'' क्षितीज

 

''२ कोटींचा प्रश्न... म्हणजे नक्कीच त्यांनी या फ्रॉड करणाऱ्या टीमला पकडलं असणार. त्यांच्याकडे त्याच वेळी पुरावे उपलब्ध होते.  म्णून तर त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला.'' भूमी डॅम शुअर होत म्हणाली.

 

''खून?'' क्षितीज ताडकन उठून बसला.

 

''एस खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. that was not an अक्ससिडेन्ट.'' मिस्टर सावंत भूमीच वाक्य रिपीट करत म्हणाले.

 

''होय सर. आपली लीगल टीम शोध घेते त्यानुसार चंदिगढ कंपनीने अशी कोणतीही पर्सनल कार पाठवलेली नव्हती. आपल्याकडे सगळ्या ट्रॅव्हल एक्सपेन्ससच सिस्टीम बुकींग होत. जी कार मैथिली आणि क्षितिजसाठी बुक केली गेली होती. तो कोणीतरी मुद्दामहून पाठवली होती. सिस्टीममध्ये असे कुठेही काहीही रेकॉर्ड आढळलेले  नाही.'' भूमी

 

'' यु मिन मैथिलीने फ्रॉडला शोधून काढला हे चंदिगढ ऑफिसमध्ये त्या लोकांना माहित झालं होत. आणि त्यामुळे त्यांनी ऑफिसमध्ये पोहोचण्याआधीच आमच्यावर हल्ला केला.'' क्षितीज

 

थोड्यावेळासाठी संपूर्ण मिटिंगरूममध्ये शांतता पसरली. आत्ता क्षितिजच्या लक्षात आलं होता. कि काही दिवसांपूर्वी पप्पा असं का म्हणाले, ' तिच्या सेप्टीसाठी भूमीला लाइमलाइटमध्ये आणू नकोस, पडद्याआड राहून तिला काम करू दे.'

 

''म्हणजे 'पप्पा हे तुम्हाला आधीपासूनच माहित हो?'' त्याने मिस्टर सावंतांना प्रसन्न केला.

 

''नाही, मला फक्त संशय होता. भूमीने पुरावे सादर केले त्यामुळे आत्ता खात्री झाली.'' मिस्टर सावंत म्हणाले.

 

थोडं डिस्कशन होऊन मिटिंग संपली. त्यानंतर भूमी तडक आपल्या केबिनमध्ये निघून गेली. क्षितिजने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती थोडी नाराज होती.

नक्षत्रांचे देणे २१



 ''भूमीला कळवायचं का हो?'' माई नानांना विचारत होत्या.

 

''नाही, कोणतीही गोष्ट सांगण्याची काहीही गरज नाही. ती तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय. आता या मुलाचं रडगाणं ऐकवून तिला का त्रास द्यायचा?''

नाना

 

''ते बरोबर आहे हो. पण विभास तिला फोन करून सांगणार आहे, त्याआधी आपण थोडी कल्पना देऊ म्हणते.'' माई

 

''काय गरज आहे? तिला फसवताना त्याने काही कल्पना दिली होती का? आता ती फॉरेनर त्याला सोडून गेली, त्याला भूमी काय करणार. याच्या सुखदुःखाशी भूमीचा काडीमात्र संबंध नाही.'' नाना फार चिडले होते. त्यांनी माईना ताकीद दिली, भूमीला विभासच्या कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही कळवायचं नाही. माईंना विभास बद्दल वाईट वाटत होते. शेवटी पोटचा मुलगा.

 

‘नानांना मात्र वेगळाच संशय होता. ते आपल्या मुलाला खूप चांगलं ओळखत होते. 'आपण प्रॉपर्टीमधून त्याचे नाव काढून टाकले... ती परत मिळवण्यासाठी त्याने हा डाव रचला असावा. सहानुभूती मिळवण्यासाठी तो हे मुद्दाम करत असणार. लग्न करताना त्याने इकडे आईबापाला अजिबात कळवले नाही. आता ती मुलगी सोडून गेल्यावर याला भारतात यावेसे वाटावे. का? आणि जिला आम्ही पाहिलंही नाही, ना आमची पसंती होती. ती सोडून गेल्याच दुःख आम्ही का करत बसावं?' काहीतरी विचार करून त्यांनी भूमीला मेसेज केला.

‘विभास भारतात परत आला आहे, त्याचा फोन वेगैरे आला तर घेत जाऊ नकोस. काळजी घे.'

 

'हा आपली दुःख कहाणी ऐकवत बसेल, साधी भोळी मुलगी आहे. तिला खरं वाटेल याच सगळं. संपत्तीसाठी किंवा कशासाठीही असो, पण हा मुलगा तिच्याबरोबर परत संसाराची स्वप्न बघत असेल, तर मी तसे होऊ देणार नाही. तेवढी पात्रता नाही त्याची. पुन्हा लग्नाचा  विचारच करू नये त्याने.'  नाना स्वतःशीच बोलत होते.

 

*****

 

ऑफिसमध्ये मुखर्जी आणि वेदांत यांच्यामध्ये गुपचूप विषय रंगला होता. भूमी वरती बारीक लक्ष ठेवून असलेले मुखर्जी चिंतेचं होते. त्यांना या गोष्टीची भनक लागली होती कि, फ्रॉडच्या मागच्या काही केस बद्दल भूमी शोधाशोध करतेय. वेदांत देखील तिच्यावर नजर ठेवून होता. शिपायाला पाठवून तिची केबिन साफ करण्याचा डाव क्षितिजने हाणून पडला होता. त्यानंतर मात्र मुखर्जी आणि वेदांतला काहीही करणे शक्य झाले नाही.

''सर आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून भूमीची नेमणूक झाली असती तर आपण तो बॉण्ड साइन करून घेतला असता. आणि तिला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागलं असत, पण गोष्टी आपल्या विरुद्ध घडत आहेत.'' वेदांत

 

''पागल हो क्या. आबा वो मॅडम डायटेक्ट सावंतने अँपॉईंट कि है. बॉण्ड का नाम भी मत निकाल. किसीने सुना तो गडबड हो जायेगा. अब उलटा-सिधा कुछ मत करो.'' मुखर्जी

 

''पण सर काहीतरी केलं पाहिजे. वरना सब हातसे निकल जायेगा.'' वेदांत

 

''कुछ नही होगा. उस मॅडम के खिलाफ ऐसा कुछ धुंडो कि हम उसका इस्तेमाल करके उसको ब्लॅकमेल कर सकेंगे.'' मुखर्जी

 

''सर आजकाल क्षितिज बरोबर जास्त दिसतात त्या मॅडम. ऑफिस मधून येता-जाता एकत्र असतात. मला तर दाट संशय आहे, समथिंग इस फिशी.'' वेदांत

 

''मैथिली और क्षितीज के बारेमे थोडा गॉसिप चालू कर दो. ये बात भूमी मॅडम तक पाहूचादो... देखो कहाणीने ट्विस्ट आयेगा.''   मुखर्जी

 

''बडीया सर जी. आजच कामाला लागतो.'' वेदांत

 

''बाकी मेरे कुछ लोग भूमी मॅडम के पिछे है... देखते है, कुछ इंटरेस्टिंग बात हात लगती है तो मजा आजाएगा.'' म्हणत मुखर्जींनी हसून वेदांतील टाळी दिली.

 

*****

 

''साठे काकांना फोन केला तर उचलत नाहीत ग. आजकाल येत पण नाहीत इकडे.'' मेघाताई बाल्कनीत येरझाऱ्या घालत होत्या. नेलपेंट लावणार्या आज्जो वरती न बघताच ''हू.'' म्हणाल्या.

 

''मम्मा तू पार्टीला जाण्याची तयारी करत आहेस का?'' आज्जोकडे बघत मेघाताईंनी विचारले.

 

''होय, आणि तू पण स्टाइलिश वनपीस घालून येणार आहेस. झाली का तयारी? कि रोजची महाराणी आपली पैठणी काढून ठेवलेस? '' आज्जो

 

''माझं काय चाललं आहे. आणि तुला काय पार्टीची पडलीय. मी नाही येत. जा तूच.'' मेघाताई त्यांच्या आईना म्हणाल्या.

 

''मी जाणार आहेच आणि तू पण येतेस. तुझ्या स्मार्ट यंग मॅनला घेऊन.'' आज्जो

 

''संजय नाही येणार.'' मेघाताई

 

''संजय अंग्री यंग मॅन आहे ग. मी क्षितीज बद्दल बोलतेय.''  आज्जो

 

''क्षितिजला या पार्टीज आणि ते लाऊड म्युझिक नाही आवडत. तुला माहित आहे तो नाही येणार.'' मेघाताई

 

''येणार तो. मला माहित आहे. तू तयारी कर. नाहीतर मी आहेस तशी तुला घेऊन जाईन.'' आज्जो

 

''ते व्यंकटेश काका येणार असतील ना. जा त्यांच्या बरोबर.'' मेघाताई

 

''ए वेंकी बोल. व्यंकटेश काका काय? हि इस यंग.'' म्हणत आज्जो एखाद्या अल्लड वयाच्या तरुणी सारखं लाजली.

 

मेघाताईंनी कपाळाला हात लावला. ‘’या वयात नातवाच्या मुलांना खेळवायचं तर मित्र गोळा करतेय.'' मेघाताई

 

''गप ग तू. मैत्रीला वय नसत. तुला हे समजलं असत तर संजय सारख्या अरसिक माणसाशी लग्न केलं नसतस म्हणा.'' आज्जो

 

'' संसारात अरसिक असला तरी हाडाचा बिझनेसमन आहे. मला पाहिजे ते न मागताच हजार असत. अजून काय पाहिजे.'' मेघाताई

 

''हे मात्र खर बोललंयस. मला असा कोण मिळाला असता तर कश्याला हे मित्र गोळा करत बसले असते. तुझा बाबा माहिते ना... नुसता घुम्या होता. घुम्या.'' आज्जो थोडी रागावली होती.

 

''मम्मा पुरे. तुझं म्हणणं खर करायला बाबाला मध्ये आणू नको. क्षितिजच माहित नाही, आपण जाऊया पार्टीला, मग तर झालं. तू तरी कधी एन्जॉय करणार म्हणा. बाबाच्या राज्यात नाही जमाल, जावयाच्या राज्यात मजा कर.''   मेघाताई हसत हसत आपल्या आईला समजावत म्हणाल्या.

 

''आता कसं. क्षितीज पण येणार, बघच तू. मी तशी सेटिंग लावून आलेय.'' आज्जो

 

''म्हणजे?'' मेघाताईंनी आश्चर्याने विचारले.

 

'' कळेल लवकरच….'' म्हणत आज्जो उठून खाली हॉलमध्ये आल्या. मेघाताई मात्र साठेकाकांशी काही कॉन्टॅक्ट होत का यासाठी प्रयत्न करत होत्या.

 

*****

 

कंपनीमध्ये काही लोग क्षितीज आणि मैथिली बद्दल गॉसिप करत आहेत, असं भूमीला जाणवत होत. ती जातायेता काहींना काही ऐकत होती. त्यामुळे ती थोडी डिस्टर्ब् होती.

नक्षत्रांचे देणे २०



 ''संजय रिसेप्शन पार्टी आहे, निल आणि संजनाच्या लग्नाची. आपल्या फॅमिलीला खास इन्व्हेटेशन आहे.'' आज्जो गाडीमध्ये बसून आपल्या जावयाला सांगत होती.

 

''जोशी कुटुंब चंदिगढ वरून आले का इकडे?'' संजय (मिस्टर सावंत)

 

''होय, केव्हाच... क्षितीज गेला होता त्या लग्नाला म्हणून त्यांना बरं वाटलं.'' आज्जो

 

''ओह, मला जमेल असं वाटत नाही. तुम्ही दोघी रिसेप्शनला जाऊन या.'' संजय

 

''क्षितिजला सांग आमच्या सोबत यायला. तू सांगितलंस तर येईल तो.'' आज्जो

 

''सांगतो. मी पुढे एका कामासाठी जातोय. रात्र घरी येईन. तुम्हाला कुठे सोडू? '' संजय

 

''मला फिनिक्स मॉलला सोड. थोडी शॉपिंग करेन म्हणते.'' आज्जो एकदम आनंदी होत म्हणाली.

 

''ओके. झालं कि घरी फोन करा. ड्राइवर येईल न्यायला.'' संजय.

 

''एस माय सन.'' म्हणत आज्जो गाडीतून बाहेर आली होती. त्यांनी हात करून संजयना बाय केले. आणि मिस्टर सावंत गाडी घेऊन पुढे निघून गेले.

 

*****

 

'आज पाऊस नव्हता. क्षितिजची गाडी भरधाव वेगाने निघाली होती. ऑफिसचा एखादा विषय किंवा इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या.

भूमीच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू होते. 'विभास जर घरी आला असेल तर? माझ्यामुळे नाना आणि माईंबरोबर त्याच भांडण वेगैरे व्हायला नको. ते दोघेही एकटेच असतात. मी सुद्धा तिथे नाही आहे. रूमवर पोहोचल्यावर आधी त्यांना फोन करून चोकशी करते. किआत्ता फोन करू?' असा काही ना काही साचार तिच्या मनात येत होता. दोन वेळा हातातील फोनवर नजर फिरवून तिने तो पुन्हा पर्समध्ये ठेवला. ती आपल्याशी बोलत असली तरी तीच लक्ष फोनमध्ये आहे. हे क्षितिजच्या  लक्षात आलं होत.

 

''डोन्ट वरी मी नाही ऐकणारं... तुम्ही फोन करू शकता.'' तो म्हणाला.

 

''नॉट लाइक दॅट. माईंना फोन करायचा होता. पण कन्फ्युज आहे. आत्ता करू का नंतर?''  भूमी

 

''एनी टाइम. गाडी थांबवतो, महत्वाचं काही असेल तर बाहेर जाऊन बोला. '' क्षितिज

 

''नाही. घरी जाऊन बोलेन... तसंही पाच-दहा मिनिटांत पोहोचू आपण.'' भूमी

 

''नाही थोडा उशीर होईल. चालेल ना?'' क्षितीज

 

''काही काम आहे का?'' भूमी

 

''काम असं नाही, कॉफी घेणार?'' क्षितिज

 

''कॉफी।'' भूमी आश्चर्याने त्याच्याकडे बघत विचारात होती.

 

''चालेले ना?'' क्षितिज

 

भूमी मानेनेच हो म्हणाली. काय बोलावं तिला कळेना. नाही म्हणता येत नाही, आणि हो म्हणावंसं वाटतही नाही. या माणसाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय, हे तिने ओळखलं होत. तिच्याही मनात क्षितीज बद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. त्यात विश्वासही होता, आणि अजून बरेच काही.

 

''मी मघापासून बघतोय, तुम्ही कसलातरी विचार करताय. एनी प्रॉब्लेम?'' तिच्याकडे गाडीच्या समोरच्या आरशातून पाहत क्षितिजने विचारले.

 

गोंधळलेली ती लगेच मन डोलावून 'नाही'म्हणाली. पण चेहऱ्यावरचे हावभाव लपवणे शक्य नव्हते. तिने नजर खिडली बाहेर वळवली. एवढ्यात तिचा फोन वाजला. पलीकडून माई बोलत होत्या. ''भूमी, इथे सगळ ठीक आहे, काळजी करू नको.''

''ओक माई... घरी जाऊन फोन करते.'' असं म्हणत तिने फोन ठेवला. थोड्यावेळापूर्वी तिने पाठवलेला मेसेज माईंनी पहिले होता. म्हणून त्यांनी फोन करून तिला सगळ व्यवस्थित असल्याच सांगितले. त्यांची काळजी करण्याचे कारण नाही, समजल्यावर भूमी रिलॅक्स झाली.

 

''कामाचा जास्तच विचार करताय असं दिसतय.'' क्षितीज

 

''नाही, जस्ट सुरुवात केली आहे.'' भूमी

 

''फार सिरिअस होऊ नका. काम सुद्धा एन्जॉय कर ता  आलं पाहिजे.'' क्षितिज

 

'' होय. एन्जॉय करतेय, हि केस फार किचकट आहे. आणि बरेच पेपर्स गहाळ आहेत. त्यामुळे खूप शोधाशोध करावी लागते.'' भूमी

 

''ऑफिसमध्ये बाकी स्टाफ कसा आहे? ऑल ओके ना?'' क्षितीज

 

''ऑल ओके, मुखार्जी जरा ओव्हर वागतात. कंपनीचे दोन्हीही मालक जेवढी ढवळाढवळ करत नाही ता त्यापेक्षा जास्त ऍक्टिव्हेन्स आहे त्यांचा.'' भूमी

 

''ते आधीपासून ओव्हर कॉन्फिडन्ट आहेत. त्यांना जास्त इंटरटेन करू नका.'' गाडी एका कॅफेच्या समोर थांबवत क्षितीज उतरला. तीन बाजूंनी ओपन असणारे कॉफी शॉप होते. गर्दी तशी तुरळक होती.

 

''होय.'' म्हणत  भूमी दुसऱ्या बाजूने उतरली होती. 

 

''उद्या एक मिटिंग अरेंज केलीय. पास्टच्या काही गोष्टी क्लिअर होत नाहीत. सो एकदा आधीच्या टीम बरोबर आणि सरांबरोबर बोलून घेईन.'' भूमी

 

''गुड.'' क्षितीज

 

दोन कॉफीची ऑर्डर देऊन ते दोघेही एका  टेबलपाशी बसले. बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. हवा बऱ्यापैकी थंड होती. मोबाइलवर आलेल्या फोनवर बोलत असताना अचानक येणाऱ्या हवेच्या जोराने भूमीचे केस तिच्या चेहेऱ्यावरून मागे हेलकावे घेत होते. त्यांना पुन्हा-पुन्हा हातानेच व्यवस्थित करत तो फोनवर बोलत होती. दोन कॉफी मग समोर ठेवून वेटर निघून गेला. फोन कट करून भूमीने क्षितिजकडे पहिले, खरतर ती त्याला काहीतरी सांगणं होती. पण तो आपल्याकडेच बघतोय हे लक्षात आल्यावर ती शांत राहिली. 'सर अजून काही?' समोर उभा असलेला  एक वेटर विचारत होता. त्या आवाजाने क्षितीज भानावर आला. ''नो.''  म्हणत तिने एक कॉफी मग उचलला.

''काय झालं?'' ती क्षितिजकडे बघत विचारात होती. काहीही न बोलता तो फक्त स्माईल दिली. भूमीच्या चेहऱ्यावर सुद्धा हलकेसे हसू उमटले. आणि ती किंचितशी लाजली. अगदी अनपेक्षित होतं ते, का ते तिलाच कळेना. तिच्याकडे बघून 'हाऊ क्युट...' तो मनातच म्हणाला.  

 

काय बोलावं ते भूमीला कळेना, कॉफी संपावेपर्यंत फक्त स्माईल देत बसायचं का इथे, नको त्यापेक्षा ऑफीस विषयी बोलूया, असा विचार करून भूमीने हातात घेतलेल्या कामाबद्दल आणि येणाऱ्या प्रॉब्लेम्स बद्दल सांगायला सुरुवात केली. क्षितीज फक्त तिला पाहत होता. ऐकतोय असं दाखवण्यासाठी मधेच तो एखादा शब्द बोलत असे. थोड्यावेळाने हि गोष्ट भूमीच्या लक्षात आली.

''क्षितीज बोर झालं का? मी ऑफिसचा विषय काढला म्हणून.'' भूमी

 

''रिपीट अगेन?'' आश्चर्याने त्याने तिला मध्येच थांबवत अचानक प्रश्न केला होता.

 

''कंटाळलात का? माझं लेक्चर ऐकून.'' भूमी

 

''आधी काय बोललात ते रिपीट करा. सेम सेन्टेन्स.''  क्षितीज

 

आता भूमीची ट्यूबलाइट पेटली होती. आपण याच क्षितीज असं एकेरी नाव घेतलं. म्हणून हा रिपीट अगेन म्हणतॊय तर. आता काय करावं? विचार करत ''काही नाही. जाऊदे. निघायचं का आपण?'' म्हणत ती कॉफी संपवून उठली.

क्षितीज असं भूमीने उच्चरलेलं एकेरी नाव त्याला आवडलं होत. तिच्या तोंडून ते परत ऐकण्याचा मोह त्याला आवरेना. भूमी उठून बाहेर जायला निघाली होती. तो हि नाइलाजाने तिच्यामागून बाहेर निघाला. दोघेही गाडीमध्ये बसून निघालेही. नंतर कोणीही एकही अक्षर काढले नाही. बिल्डिंग  जवळ आल्यावर उतरताना,'' थँक्स.'' एवढं बोलून भूमी गेटकडे जायला वळली.

''भूमी यापुढे क्षितिज अस नाव घेत जा. ऐकायला छान वाटत.'' असं म्हणून क्षितिजने गाडी स्टार्ट केली.

 

''तुम्हीसुद्धा उद्यापासून भूमी याच नावाने माझ्याशी बोललात तर मला सुद्धा बर वाटेल. अहोजाओ  करण्याची काय गरज आहे ना...'' भूमी

 

''मी आजपासूनच सुरुवात केली.'' क्षितीज

 

 डोळे मिचकावून, मंद स्मित करत ती 'बाय' बोलून निघूनही गेली. आणि आपण भूमीच्या प्रेमात पडलोय याची कबुली स्वतःलाच देत क्षितीज त्याच्या घराकडे निघाला.

नक्षत्रांचे देणे १९


 

माईंचा फोन येऊन गेल्यापासून भूमीचे चित्त थाऱ्यावर नव्हते.

' त्या म्हणाल्या काही दिवसांनी विभास भारतात येणार आहे. पण का? नाना आणि माईंनी त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. माझ्याशी तर त्याचा काही संबंध आलाच नाही.  मग सगळी सत्य परिस्थिती डोळयासमोर असूनही तो कुणासाठी येतोय इकडे?'  याचा विचार करत ती बसली होती. एवढ्यात दाराची बेल वाजली. पाहते तर निधी दारात उभी होती. सकाळीच तिचा फोन आला होता. आज येणार आहे म्हणून.

 

''हाय. कशी आहेस?'' तिला मिठी मारत भूमी म्हणाली.

 

''मी मस्त ग. तू?'' निधी खुर्चीवर बसत भूमीला विचारत होती.

 

''मी मजेत. बस मी पाणी आणते.'' म्हणत भूमी आता गेली किचन मधून एक पाण्याचा ग्लास भरून तिने तो निधीला दिला. '' काय ग पाण्यावर भागवणार. चहा-कॉफी काही देणारेस का?'' निधी

 

''सगळं देते. अगदी जेवण पण तयार आहे. आधी पाणी तर घेशील?'' भूमी

 

''गंमत केली ग. बाय द वे... तुला आवडेल ना, काही दिवस मी तुझ्यासोबत राहिली तर?'' निधी

 

''ए असं का विचारते ग. होस्टेलला आपण दोघी रूममेट होते ना. मग आता का नाही आवडणार, आणि तू झाली एकुलती एक बेस्टी आहेस.'' भूमी

 

''ओह थँक्स डिअर.'' निधी उठून फ्रेश व्हायला गेली. भूमीला फार बर वाटलं. एवढे दिवस एकट राहण्याचा कंटाळा आला होता. आता निधी देखील तिच्या सोबतीला असणार होती. मस्त पैकी फ्रेश होऊन दोघीही घराबाहेर बाहेर पडल्या. भूमी ऑफिसला निघाली तर निधी तिच्या क्लासला.

*****

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर क्षितीजने भूमीच्या केबिनकडे नजर टाकली. बरेच दिवस तो जाणून बुजून तिथे जायला अव्हॉइड करत होता. पण भूमी देखील आपल्याला कशी काय भेटायला आली नाही. याचे त्याला नवल वाटत होते. तिच्या केबिनमध्ये कोणीतरी शिपाई साफसफाई करत होते हे पाहून क्षितीज तिथे पोहोचला. ''काय चाललंय हे?'' त्याने प्रश्न केला.

''सर, ते मॅडमची केबिन व्यवस्थित लावायला सांगितली आहे,  जुन्या फाइल्स बाहेर काढत होतो. खाली फाईल हाऊसमध्ये ठेवून देतो.'' तो शिपाई हातातील काही फाइल्सचा गठ्ठा उचलत म्हणाला.

 

''कोणी सांगितलं हे तुम्हला? मॅडमनी?'' क्षितीज

 

''नाही. मुखर्जी साहेबांनी.'' शिपाई

 

''ज्यांची केबिन आहे त्यांना विचारा, आणि मग काय ते चेंजेस करा. आधी त्या फाइल्स होत्या तिथे ठेवा.'' क्षितीज जवळ जवळ ओरडलाच आणि घाबरून तो शिपाई बाहेर काढलेल्या ढीगभर फाइल्स पुन्हा आतमध्ये कपाटात ठेवू लागला. एवढ्यात भूमी तिथे हजार झाली होती.

 

''मॉर्निंग.'' भूमी

 

''गुड मॉर्निंग.'' क्षितीज

 

''काय चाललं आहे हे? काही कळेल का मला ?'' तिने त्या शिपाईकडे बघत विचारले.

 

''ते कपाट साफ करत होतो. बाकी काही नाही. झुरळ वगैरे होऊ नये म्हणून.'' तो शिपाई चाचरत म्हणाला.

 

'’ काही झुरळ वगैरे नाही इथे, आणि मला विचारल्या शिवाय एकही वस्तू इथून हलवायची नाही.'' भूमी त्याच्यावर चिडलीच होती. तिला तसे बघून क्षितिजलाही आश्चर्य वाटले. शिपाई निघून गेल्यावर दार ओढून घेत तिने आधी ड्रॉवरमधील एक पिवळी फाइल काढून भराभर तिची आतील  पाने चेक केली. पुन्हा फाइल आत ठेवून  त्या ड्रॉवरला लॉक करून ती चावी आपल्याकडे ठेवून घेतली.

 

''काही प्रॉब्लेम झाला आहे का?'' तिच्याकडे बघत उभ्या असलेल्या क्षितिजने तिला विचारले.

 

''नाही, पण मी काही दिवस पाहते आहे, काहीही शुल्लक कारण देऊन मला न विचारता ही केबिन का साफ केली जाते.? काही कळत नाही. नक्की काय प्रकार आहे?'' भूमी त्याच्याकडे बघत म्हणाली.

 

''तुम्ही त्या लीगलच्या फ्रॉड बद्दल शोध घ्यायला सुरुवात केली?'' क्षितीज

 

''होय, पण इथे त्याच काय?'' भूमी

 

''बी केअरफूल, तुम्हाला हवे असलेले महत्वाचे पेपर्स आणि फाइल्स लॉकर मध्ये ठेवत जा.'' क्षितीज

 

''ओह, हे माझ्या लक्षात कसं आलं नाही.  हि गोष्ट सरांच्या कानावर घातली पाहिजे. कारण इथल्या बर्याचश्या जुन्या फाइल्स मला लागणार आहेत. त्या कुठेही जात काम नयेत. नाहीतर मला त्या केसच्या पाहणीमध्ये पुढे जाता येणार नाही.'' भूमी

 

''मी सांगतो.'' क्षितिज

 

''आधी या केबिनमध्ये कोण बसायचं? आय मिन आधी कोणीतरी या केसशी निगडित स्टडी करत होते ना.. त्यांची काही माहिती मिळू शकते. भेटता आलं तर बर होईल. ''  भूमी

 

''मैथिली बघायची सगळं. ती इथेच बसायची, तिला भेटता येन शक्य नाही.'' तो क्षणाचाही विलंब न करत बोलला.

 

''का नाही? त्यांनी बरेच डायग्रॅम्स तयार केले आहेत, त्यांची जुळवणी मला जमत नाही, आयमीन लक्षात येत नाहीय. त्यांच्याशी बोलता आले तरीही पुष्कळ. हि केस एका चुटकीसरशी सॉल्व होईल.'' भूमी

 

''शी इस इन कोमा. बोलता येणेही शक्य नाही.'' क्षितीज

 

''ओह, सो ब्याड. एनी वे हे घ्या.''  म्हणत भूमी आपल्या पर्समध्ये काहीतरी शोधू लागली. सापडल्यावर तिने क्षितिजचे लॉकेट त्याच्या समोर धरले.''कामाच्या गडबडीत खूप दिवस आपली भेट झाली नाही. त्यामुळे हे माझ्याकडेच राहील होत.''

लॉकेट हातात घेऊन क्षितिजने ते खिशात टाकलं. ''इट्स ओक. कॅरी ऑन, काही मदत लागली तर सांगा.'' म्हणत तो केबिन बाहेर पडला. तो निघत असताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे भूमी बघत होती. तिने जाणून बुजून ऑफिस व्यतिरिक्त कोणताही विषय काढला नव्हता. सध्या फक्त कामाकडे लक्ष द्यायचं, बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. असं तिने ठरवलं होत. पण क्षितिजही आपल्याशी कामाव्यतिरिक्त  जास्त काही बोलला नाही. याच तिला नवल वाटलं.

 

*****

दिवसभर ती बऱ्याच फाइल्स चेक करत होती. तिने आज लंच सुद्धा केले नाही. सकाळी जो शिपाई कपाट साफ करत होता, त्याने कपाटातून काढलेल्या काही फाइल्स टेबलवर तश्याच राहिलेला होत्या. भूमीच्या मनात काहीतरी शंका आली आणि तिने त्या फाइल्स चेक करायला सुरुवात केली. हवी असणारी बरीच माहिती तिला मिळाली होती. तिने तडक जाऊन पॅन्ट्री हाऊसमध्ये त्या शिपाईला शोधून काढले.  'माझी केबिन साफ करण्याची ऑर्डर तुम्हाला कोणी दिली?' असे विचारल्यावर त्या शिपाई काकांनी मुखर्जींचे नाव घेतले. आता तिच्या शोधला एक दिशा मिळाली होती. संध्याकाळचे सहा वाजून गेले तरीही ती त्या फाइल्स आणि मैथिलीने काढलेल्या बजेट अँड प्रपोजल च्या डायग्रॅमची RND करत बसली होती. दोन-तीन वेळा क्षितीज केबिन बाहेरून येऊन गेला. काचेतुनच तिला काम करताना पाहून तो आत आला नाही. भूमी उशिरा पर्यंत ऑफिस मध्ये आहे हे लक्षात आल्यावर क्षितिजही त्याचे काम करत थांबून होता.

 

तिचे डोळे फार थकले होते, डोकंही जड झालं होत. अगदीच कंटाळा आला तेव्हा भूमीने घड्याळाकडे पहिले. संध्याकाळचे आठ वाजले होते. आपल्याला फार उशीर झाला आहे. निघायला हवं. हे लक्षात आल्यावर तिने सगळे पेपर्स लॉक केले आणि आपली पर्स उचलली. रिसिप्शनवरती आऊट करून ती निघाली. क्षितिज तिच्या मागेच होता, हे तिच्या लक्षात आलं.

 

''आज लेट?'' भूमीने त्याला विचारले.

''तुम्ही पण?'' क्षितीज

''होय, कामाच्या गडबडीत लक्षात आलं नाही. आणि फार उशीर झाला.'' भूमी

''चला सोडतो.'' क्षितीज

''नको जाते ओला ने.'' भूमी

''मला द्या ओला चे पैसे, मग तर झालं.'' क्षितीज

त्याच्या वाक्यावर ती खूप हसली. ''ओके.'' म्हणत त्याच्याबरोबर निघालीही.

नक्षत्रांचे देणे १८


 

‘सकाळी मेघाताई हॉलमध्ये बसून tv बघत होत्या. आज्जो आपली योगासने आवरून फ्रेश व्हायला निघून गेली, ऑफिसला सुट्टी असल्याने क्षितिजही आरामात उठला होता.’

''गुड मॉर्निंग मेघा.'' म्हणत मिस्टर सावंत सकाळी सकाळी बाहेरून आत येत होते.

 

''मॉर्निंग. न झोपता तुझी मॉर्निंग एवढी फ्रेश असते.'' नवर्याच्या प्रसन्न चेहेऱ्याकडे बघत मेघाताई म्हणाल्या.

 

''काम असेल तर मला झोप लागत नाही. तुला माहित आहे. महत्वाची एक डील साइन करून आलोय.'' मिस्टर सावंत बोलता असतानाच क्षितीज त्यांच्या मैफिलीत सामील झाला होता.

 

''गुड मॉर्निंग आई, मॉर्निंग पप्पा.'' म्हणत तो किचनकडे वळला.

 

''नवीन मॅडम ना डायरेक्ट घरी सोडून आला का?'' मिस्टर सावंतांनी त्याला खोचक प्रश्न केला. आणि त्याचे पाय जागच्या जागीच खिळले.

 

''होय. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. ती रिसिप्शनिस्ट तेच काम करण्याचे पैसे घेते.'' क्षितिज

 

''कळायलाच पाहिजेत ना.'' मिस्टर सावंत

 

''मग मला सुद्धा एक गोष्ट कळायला हवी.'' क्षितिज

 

''बोल. काय विचारणार आहेस?'' मिस्टर सावंत

 

''भूमीच जॉइनिंग माझ्यापासून लपवण्याचे कारण?''  क्षितीज

 

''ओह म्हणजे तिने सुद्धा तुला ही गोष्ट सांगितली नव्हती?'' मिस्टर सावंत

 

''तुम्हीच तसे बजावले होते ना.'' क्षितिज

 

''गुड, आय लाईक इट, मला हेच हवं होत.'' मिस्टर सावंत

 

''म्हणजे? स्वतःच्या मुलापासून कंपनीच्या गोष्टी लपवणार आहेस का?'' मिस्टर सावंत आणि क्षितिजचे बोलणे शांतपणे ऐकत बसलेल्या मेघाताई विचारात होत्या.

 

''गोष्ट लपवण्याची नाही. विश्वासाची आहे. मागे ते लीगलाचे पेपर्स परत करून भूमीने आपल्या प्रामाणिकपणा दाखवून दिला. आपली खोटी केस खरी करून तिची हुषारीही आपण पहिली... पण मला हे चेक करायचं होत की, ती आपल्या विश्वासाच्या पात्र आहे का? त्यासाठी मी तिला तिच्या जॉइनिंग बद्दल क्षितिजला काहीही सांगू नको, असे सांगितले होते, आणि तिने कोणालाही काही सांगितलेले नाही. सो मी कोणत्याही गोष्टीसाठी तिच्यावर १००% विश्वास ठेवू शकतो.''  म्हणत त्यांनी प्रसन्न मुद्रेने टाळी वाजवली.

 

त्यांचं बोलणं शांतपणे ऐकणाऱ्या मेघाताई अवाक होऊन त्यांच्याकडे बघत होत्या. क्षितिजही काही वेळ विचारात पडला. एक दीर्घ श्वास घेऊन ते पुढे बोली लागले.

''क्षितीज आजपर्यंतच्या आयुष्यात उगाच करायचं म्हणून मी काहीही केलं नाही. किंवा कोणी वडिलोपार्जित संपत्ती माझ्यासाठी फुकटमध्ये ठेवली नव्हती. खूप कष्ट केलेत रे...  ही कंपनी आणि मिळालेला पैसे, ऐश्वर्य हे मी स्वतः कमावलं आहे. वयाच्या १० व्य वर्षी भंगार गोळा करून विकायचो, नंतर काही वेळाने त्याचंच गॅरेज टाकलं. आणि तिथूनच या SK ग्रुप ची  सुरुवात झाली. तुला सगळं रेडिमेड मिळतंय, त्याच चीज कर, प्रत्येक गोष्ट वाढवं. फक्त प्रेमाने पोट भरत नाही आणि चुकीच्या व्यक्तीची निवड केल्यावर पश्चातापाशिवाय काही मिळत नाही.''

तीक्ष्ण बाणाच्या टोकाप्रमाणे ते एकेक वाक्य बोलत होते. मेघाताई काहीक्षण अगदी स्तब्ध झाल्या.

 

''पप्पा चुकीची व्यक्ती म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस मैथिलीला का मध्ये आणता?'' शांतपणा  सोडून क्षितिजने त्यांना प्रश्न केला.

 

''तुला माहित आहे, ती आपल्या बापाला बिझेसमध्ये आणण्यासाठी तुझ्याबरोबर प्रेमाचे नाटक करत होती.'' मिस्टर सावंत

 

''असेलही पण तिनेच कंपनीमध्ये सुरु असलेला फ्रॉड शोधण्यासाठी प्रयन्त केले होते, आणि ती अल्मोस्ट यात सक्सेस झाली होती. पण तिचा अपघात झाला आणि सगळ्याच गोष्टी अर्धवट राहिल्या.'' क्षितिज

 

''आय अक्ससेप्ट इट, तिने फ्रॉड शोधण्यासाठी मदत केली, पण ते का माहित आहे?  तिचे बाबा, ते किर्लोस्कर ५०% चे मालक झाल्यावर कंपनीमध्ये आलेल्या नफ्याचा आणि तोट्याचा ५०% वाट त्यांचा होता. नफा मिळत होता तेव्हा सगळं ठीक होत. ती मस्त आराम करत होती. तुझ्याबरोबर फिरत होती. २ कोटींचा फ्रॉड झाला आणि त्यातले १ कोटी त्यांचे होते.  गोष्ट सरळ होती, आपाला आणि त्यांचा दोघांचाही अर्धा अर्धा  तोटा होता.  हे तिच्या लक्षात आलं होत. तो फ्रॉड शोधून काढला तर पुढे होणार नफाही किर्लोस्कर आणि मी आमच्या दोघांचाच होता. म्हणून ती त्या केसचा शोध लावत होती.''  मिस्टर सावंत

 

''त्या मागील हेतू काहीही असो, पण तिने कंपनीच्या हिताचा विचार केला होता ना. आणि कश्यावरुन तिच्या वडिलांनी तिला क्षितिजला फसवण्यासाठी फोर्स केला असेल. पण त्या वेळी गैव्यवहार वाढले असे म्हणणे अगदीच अयोग्य आहे. योगायोग असू शकतो. काही लॉजिक नाही यात. '' मेघाताई मध्येच बोलल्या.

 

''मेघा तुम्हा दोघांनाही हे चांगलेच माहित आहे, की कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय मी त्याबद्दल काहीही बोलत नाही, आणि कोणावर उगाचचे आरोप करणे हे माझं नेचर नाही. मध्यंतरीच्या या काळात बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला आहे.''  मिस्टर सावंत बोलत होते.

 

आता यावर  काय बोलावं हे मेघाताईना कळेना. उगाच क्षितिजला अजून वाईट वाटायला नको म्हणून त्या मैथिलीची बाजू घेत असल्या तरीही आपल्या नवऱ्याचा तोंडून आलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे. हे मेघाताईना माहित होते.

 

एवढे दिवस डोळ्यासमोर असणारे पण आपण पाहू न शकलेल काहीतरी सत्य अनपेक्षितपणे आपल्या समोर यावे असे क्षितिजला वाटत होते. खरं-खोटं त्याच त्याला समजेना. आतून मात्र तो फार दुखावला होता.  त्याच्या मनातील मैथिलीच्या प्रतिमेचे चित्र आता हळूहळू बदलत होते एवढे मात्र नक्की.

 

''काहीही असो, पप्पा आणि आई, मला यापुढे या घरी मैथिलीचा विषय नको. प्लिज रिक्वेस्ट आहे.'' म्हणत तो उठला आणि बेडरूमकडे वळला.

 

''भूमी आवडली आपल्याला... पण तिला सेफ ठेवायचं असेल तर तिच्यापासून थोडं लांब राहा.'' मिस्टर सावंत लांबूनच त्याला मोठ्या आवाजात ओरडले. आणि तो पुन्हा जागच्या जागी थांबला.

 

''व्हॉट डू यु मिन पप्पा?'' क्षितीज

 

 

''मैथिली बघत होती ती केस भूमी सांभाळतेय, जे लोक कंपनीला फसवत आहेत, ते फार चलाख आहेत आणि खतरनाकही. भूमी मागे राहून शक्यतो पडद्याआड हे काम करणार आहे. तुझ्यासोबत सगळ्यांच्या नजरेत आली तर लोक तिच्यावर फोकस करतील, तिच्या बद्दल कंपनीमध्ये बरच कुतूहल आहे लोकांना. त्यामुळे तिची आणि तिच्या कामाची माहिती काढण्याचा प्रयत्न होईल.... तू माझा मुलगा आहेस. कंपनीच्या लोकांच्या लक्षात येईल असं काहीही करू नकोस. समजतंय का मी काय बोलतोय?'' मिस्टर सावंत क्षितिजला सांगत होते. थोडी गोष्ट त्याच्याही लक्षात आली होती.

 

'''पप्पा आमच्यामध्ये तस काहीही नाही. तुम्हाला भीती वाटते का? कि मी भूमी बरोबर काहीतरी रिलेशन ठेवेन आणि ती सुद्धा आपल्याला फसवेल? किंवा दुसरे कोणीतरी तिच्यामार्फत आपल्याला नुकसान पोहोचवेल?'' क्षितिजने त्यांना उलट प्रश्न केला.

 

''नो माय बॉय. शी ईज प्युअर. ती नाही फसवणार कोणाला. मुळात कोणासाठी आपल्याला फसवायला तिचं  आहेच कोण या जगात? त्यामुळे जरा काळजी वाटते.'' मिस्टर सावंत खोलवर काहीतरी विचार करत म्हणाले.

 

''म्हणजे संजय? नेमकं काय म्हणायचं आहे तुला? भूमी एकटीच राहते का इथे?'' मेघाताई काळजीच्या सुरत विचारात होत्या.

 

''इथे कोणासोबत राहते हे माहित नाही. पण आपण आपल्या पेपर्ससाठी तिचा शोध घेत होतो तेव्हा मला माझ्या माणसांकडून तिची थोडी माहिती मिळाली होती. ती अनाथ आहे, लहानपची आई गेली. नाशिकला एका आश्रमात वाढली. शिक्षण वगैरे स्वतःच्याच हिमतीवर केलं. इथे मुंबईला येण्याआधी कोणीतरी श्याम साठे म्हणून आहेत त्यांच्यासोबत कोकणात राहत होती. त्यांचं तिच्याशी नातं काय? याची माहिती नाही मिळाली. असो ती आपल्यासाठी काम करतेय. तुझ्यासोबत राहून मैथिली जशी लाइमलाइट मध्ये आली तशी भूमीला फेमस करू नकोस... सध्यातरी एवढंच सांगेन. बाकीच्या गोष्टी वेळ आल्यावर समजतील तुला.''  मिस्टर सावंत सांगत होते. आणि मेघाताई ऐकून थक्क झाल्या.

 

''आहेच तशी रे ती. पहिल्या भेटीतच मनात भरणारी. अनाथ आहे... म्हणून तुला ती आवडली. बरोबर ना?  ''  मेघाताई

 

''होय, प्रामाणिक, कष्टाळू आणि अनाथ... माझ्यासारखी. अनाथ होण्याचं दुःख काय ते माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहित. '' हे बोलत असताना मिस्टर सावंतांच्या डोळ्यात किंचितसा ओलसरपणा आला होता. 

 

पप्पांच्या या वाक्यावर क्षितिजच्या डोळयात पाणी आले. मेघाताईही नर्व्हस झाल्या होत्या.

''सॉरी पप्पा.'' म्हणत क्षितिज वरती निघून  गेला.

आपले पप्पा, त्यांचे निर्णय आणि ते करत असलेली प्रत्येक कृती यामागे कितीतरी विचार दडलेले असतात. पुन्हा आज याची प्रचिती त्याला आली होती. आपल्यासाठी उभारलेले हे साम्राज्य सांभाळण्याची आता आपली जबाबदारी आहे हे त्याने मान्य  केले. भूमी विषयी समजलेल्या माहितीचे नवल होतेच, तरीही पप्पांनी बजावलेल्या गोष्टी मनाशी पक्क्या करून तो उठून लॅपटॉपवर कामाला बसला. 

नक्षत्रांचे देणे १७



चैन सोडवण्याचा प्रयत्न करत असलेली भूमी क्षितीजच्या अगदी जवळ आली होती. दोघांमधील होते नव्हते ते हि अंतर जवळजवळ मिटले.  त्याचा भिजून चिंब झालेला ओला व्हाइट शर्ट आणि तिला अजूनच चिपकून बसलेली तिची सुती साडी, वरून बरसणाऱ्या जलधारा… दुरून पाहणाऱ्याला नक्कीच काहीतरी वेगळा संशय आला असता.  हे लक्षात आल्यावर तिने चैनला जोराचा हिस्का दिला, त्यामुळे ती चैन अजूनच अडकली होती.  मान तिरकी करून उभ्या  असलेल्या तिला तिच्या नकळतं क्षितीज न्याहाळत होता. आज मौसम कुछ और हीं हैं। असं त्याला वाटलं. तिची मात्र वरती पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती.  एवढ्या जवळून त्याला पाह्ण्याच धाडस होतच कुठे म्हणा. तिच्या ओल्या झालेल्या अस्ताव्यस्त केसांच्या काही बाटा नाकावर आल्या होत्या. न राहवून क्षितिजने त्याला हलकेच कानामागे सारले, आणि नकळत हातातील चैन सोडून भूमी  त्याच्याकडे बघत बसली.'

 

अंगावर पडणाऱ्या जलधारा झेलत ते दोघे तसेच एकमेकांकडे बघत उभे होते. 'हम भले ही लाख परदे गिराये, पर नजरे किसी कीं कहा सुनती हैं. ' थोड्याच वेळात रस्ताच्या बाजूने जाणाऱ्या एका गाडीने मोठ्याने हॉर्न वाजवला आणि दोघेही भानावर आले. पटकन मान खाली घालत भूमी थोडी दूर झाली. पण ते अगदी किंचितसे, चैन अजूनही लॉकेटमधून सुटलेली नव्हती. 'कॅन आय' म्हणत क्षितिजने चैन आणि लॉकेट हातात घेतले. भूमीने मान खालीच झुकवलेली होती. हळूच आपले हात तिच्या गळ्यात गुंफून त्याने फासा लावला. तो काय करतोय हे भूमीच्या लक्षात आले नाही. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्यकडे पहिले, आणि तो हळूच तिला बाजूला करून गाडीच्या दुसऱ्या बाजूला वळला. गळ्यात पाहिल्यावर भूमीच्या लक्षात आलं. त्याच लॉकेट तिच्या गळयात होत आणि तिची चैन ही... पण अजूनही त्यांचा गुंता सुटलेला नव्हता. चैन सोडवणे शक्य नाही, हे समजल्यावर क्षितिजने फक्त आपलया गळ्यातील लॉकेटचा फास काढून ते भूमीच्या गळ्यात घातले होते. याला 'सोडवणे म्हणावे कि अजूनच गुंतणे'  हे भूमीला कळेना. गाडीच्या दुसऱ्या बाजूला दाराचे हान्डेलला पकडून तो तिलाच बघत होता.  हात वरती करून त्याने बाय केले आणि तो गाडीत जाऊन बसला. गाडी स्टार्ट करतानाही त्याची नजर तिच्याकडे लागलेली होती. आपला ओला पदर भोवताली लपेटून भिजलेली साडी सावरत भूमीने हलकेच बाय असे म्हंटले आणि ती बिल्डींगच्या गेटकडे वळली.  एकमेकांची चोरी एकमेकांनी पकडली होती. त्यामुळे  परत मागे बघण्याची हिम्मत होतीच कुठे.  गाडीला रिव्हर्स गिअर टाकून तोही निघाला. आरशातून मात्र ती गेली त्या दिशेने त्याचे डोळे वळले होते.  दिल संभल जा जरा, फिर महोबत करने चला हैं तू... अशी दोघांचीही अवस्था होती.

 

''माई आत्ताच घरी पोहोचले, आवरते आणि थोडं खाऊन घेते.''  भूमीने माईंना फोन करून पोहोचल्याचे कळवले. त्या तिच्याच फोनची वाट  होत्या.

 

''फार उशीर झालाय ग... जेवून झोप... उद्या सकाळी आठवणीने फोन कर.''  माई

 

''माई तुम्ही एवढ्या रात्रीपर्यंत जागे राहणे जाऊ नका... मी अगदी व्यवस्थित आहे, आणि शहर म्हंटल्यावर काहींना काही कारणाने लेट होत असतं.'' भूमी

 

''होय गं, काळजी घेत जा. फोन ठेवते मी.'' म्हणत माईंनी फोन कट केला.

 

 

******

इकडे घरी आलेल्या क्षितिजला पाहून मेघाताईना हायसे वाटले,  काय झालं, ते त्यांना थोडक्यात सांगून क्षितिज फ्रेश व्हायला निघून गेला. भिजून घरी आलेल्या क्षितिजला पाहून मेघाताई आश्चर्यचकित झाल्या होत्या. आशाकाकूंना जेवण लावायला सांगून त्या क्षितिजची वाट बघत बसल्या.

 

आवरून गॅलरीत येऊन बसलेली भूमी घडलेल्या गोष्टीचा विचार करत होती. गळ्यातील ते लॉकेट हाताने चेक करून तिने चैन आणि ते काढून हातात घेतले. तिच्या चैनध्ये ओवलेल्या बी अक्षराच्या पानावरचे छोटेसे गोल रिंग त्याच्या लॉकेटच्या साखळीमध्ये गुंतलेले होते. सावकाश सोडवले असते तर अगदी सहज सुटेल असा गुंता, पण काल ते सोडवण्याच्या धडपडीमध्ये अजून अडकून बसले. सावकाश सोडवून तिने आपली चैन पुन्हा गळ्यात घातली. हातातील क्षितिजच्या लॉकेटशी खेळत ती विचार करु लागली...  'माझ्यामुळे त्याला उशीर झाला... ऑफिसमध्ये थांबले असते तर बरं झालं असत. पोहोचला असेल का? फोन करून विचारावं का?' म्हणून तिने फोन हातात घेऊन नंबर डाइल केला, पण दुसऱ्याच क्षणी तो डिस्कनेक्ट केला. 'नको... बरं दिसत नाही ते.' म्हणत ती उठून आत आली. बेडवर पडूनही झोप लागत नव्हती. बाहेर पाऊसही अजून बराच होता. पुराच्या बातम्या बघून तिला सारखं वाटत होत की, त्याला फोन करून पोहोचला का हे विचारावे. एकदोन वेळा तिने फोन लावण्याचाही प्रयत्न केलाही, करू का नको, या विचारात असतानाच मोबाइलवर एक मेसेज ब्लिंक झालेला दिसला.

'जस्ट रिच्ड, आर यु ओक? '

-  क्षितीज

 

मेसेज बघून खरतर तिला खूप आनंद झाला होता. तिने लगेच रिप्लायही केला.

'येस, आय एम फाइन, गुड नाईट.'

 

'गुड नाईट.' असा पलीकडून आलेला रिप्लाय बघून तिने समाधानाने डोळे बंद केले. हाताच्या मुठीत पकडलेले ते लॉकेट बघताना झोप कधी लागली हे तिला समजलंही नाही.

*****

 

 

मैथिली आणि भूमी या दुहेरी पेचात अडकलेला क्षितीज मात्र नाईट लॅम्पची लाइट उघडझाप करत तसाच जागा होता. दारावर हळूच टकटक करत मेघाताई आत आल्या.

''क्षितीज. अजून झोपला नाहीस?''  मेघाताई

 

''तू जागी आहेस अजून?'' क्षितिज

 

''तू जागा असल्यावर मला कुठे झोप लागते म्हणा... काय झालं?'' मेघाताई त्याचा केसात मायेने हात फिरवत विचारात होत्या.

 

''काही नाही ग. झोप नाही लागत.'' क्षितिज

 

''का? तिचा विचार करतोयस ना?'' मेघाताई

 

''नाही, तसं काहीच नाहीय.'' क्षितीज

 

''मी कुठे म्हंटल, तस काही आहे.'' मेघाताई हसत त्याला चिडवत होत्या.

 

''आई... तू पण ना.'' क्षितीज

 

''बरं, आता सांगणार आहेस काय ते?'' मेघाताई सिरिअस होत म्हणाल्या.

 

''बऱ्याच दिवसापासून मैथिलीला बघायला जायचं जवळजवळ बंदच केलय. पण भूमीला भेटल्यावर डोक्यात काहीतरी वेगळेच विचार येतात. मला नाही समजत, नक्की काय ते सांगता सुद्धा येत नाही, बट देअर इज समथिंग बिटवीन अस.'' क्षितीज आईचा हात हातात घेऊन त्यांवर डोकं ठेवून झोपला होता.

 

''यु आर इन लव्ह... भूमी बद्दल बोलतेय मी.'' मेघाताई क्षणाचाही विलंब  न करता बोलल्या.

 

''कसं काय शक्य आहे? मैथिलीला काय वाटेल, यु नो ना… तिला विसरणं मला शक्य नाही.'' क्षितिज

 

''विसरू नको, मी तुला तसं करायला सांगणारही नाही. पण डोळ्यावर पट्टी बांधून आंधळं प्रेम करत बसू नकोस, भावनांच्या आहारी जाण्यापेक्षा गोष्टी स्विकारायला शिक. त्याने तुझा त्रास कमी होईल.  मैथिलीने फक्त बिझनेससाठी तुझा वापर होता. हे सत्य नाकारता येत नाही.  आणि आता तू भूमीच्या प्रेमात पडला आहेस, हे सुद्धा तितकंच खरं आहे. ''   मेघाताई

 

''होय. पहिल्या भेटीतच भूमी आवडली मला. आणि कदाचित तिला देखील मी आवडतो.'' क्षितीज

 

''काय बोलतो, ते कशावरून?'' मेघाताई आनंद आणि कुतूहलाने विचारात होत्या.

 

''काल तिच्या वागण्यावरून मला जाणवलं ते. '' क्षितीज

 

''ही चांगली गोष्ट आहे, खरं असेल तर, यु कॅन थिंक अबाउट हर. मला ती अगदी साधी आणि प्रामाणिक वाटली. आवडली देखील...  फक्त तुझी आई म्हणून  नाही  तर एक मैत्रीण म्हणून काही मदत लागली तर सांग, मी आहेच नेहमीप्रमाणे.'' त्याच्या पाठीवर थोपटत त्या बोलत होत्या.

 

बोलता बोलता क्षितीज तिथेच झोपला, त्याच्या अंगावर चादर टाकून, लाइट बंद करून मेघाताई बाहेर निघून गेल्या. खूप दिवसानंतर...अगदी वर्षानंतर क्षितिज काहीतरी सकारात्मक विचार करतोय हे त्यांना जाणवले होते. त्यामुळे लवकरच साठे काकांना फोन करून भूमीची चौकशी करावी असे त्यांनी ठरवले.

नक्षत्रांचे देणे १५

 'पावसाचा जोर ओसरलेला नव्हता. त्यामुळे सगळीकडे पाणी भरलेले होते. कॅब सुद्दा मिळणे मुश्किल होते. काय करावं सुचेना. भूमी खूप वेळ वाट बघत कंपनीच्या बाहेरील एरियात थांबली होती. इथे तसे कोणीही विशेष ओळखीचे नसल्याने सांगणार तरी कोणाला? बराच वेळ ती इथे उभी असल्याने ऑफिस रिसेप्शनिस्टने हे ओळखलं असावा, तिने आत फोन केला आणि या बद्दल सांगितलं. ‘’मॅम सर येतायत, ते सोडतील तुम्हाला.’’


 

  असं म्हणत तिने हातातला फोन ठेवला, भूमी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती एवढ्यात मिस्टर सावंत आणि क्षितीज बाहेर आले होते.

''हेवी रेन सुरु आहे. सगळे रोड अल्मोस्ट ब्लॉक आहेत. शक्य असेल तर तुम्ही ऑफिस मध्ये वरती थांबू शकता. काही दूरच्या एम्प्लॉईज साठी तिथे इमर्जन्सी सर्विस दिलेली आहे.'' क्षितीज तिच्या दिशेने येत म्हणाला.

 

''नाही, मला थांबता येणार नाही.'' दिवसभर त्या साडीत अवघडलेली भूमी हे ऐकून फार वैतागली होती. 

 

''मी बघतो, काही करता येत का?''  म्हणत मिस्टर सावंत कॉन्फरंस रुमकडे वळले. हातातील मोबाइलवर नंबर लावून करून ते गाडीसाठी चोकशी करत होते.

ते बघून क्षितिजने परत भूमीला विचारले. ''जायलाच पाहिजे का? आज थांबू शकलात तर बघा. रोडवरती पाणी आहे खूप, अडकण्याची चान्सेस आहेत.''

 

''पण मी अशी इथे नाही थांबू शकत, आधीच मला खूप अवघडल्यासारखं वाटतंय. घरी गेलेलं बरं.'' आपली साडी सावरत ती म्हणाली.

 

काहीतरी विचार करत क्षितिजीने हातानेच रिसिप्शन वरती इशारा केला. आणि तो निघाला. ''ओके, मी निघालोच आहे, तर सोडतो तुम्हाला.''

आता हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्न उरला नव्हता. त्यामुळे भूमी त्याच्या बरोबर निघाली.

 

एड्रेस सांगण्यापलीकडे  बराच वेळ झाला कोणीही काही बोलले नाही. मुसळधार पाऊस सुरु होता. खूप ठिकाणी पाण्यामुळे गाडी मागे घ्यावी लागली. दुसऱ्या रोडने जायचं तर जवळपास सगळीकडेच पाणी भरलेले दिसत होतं. तरीही स्लो मोशनमध्ये गाडी पुढे घेत क्षितीज निघाला होता. त्यात दोन-तीन वेळा मेघाताईंचं फोन येऊन गेला पण क्षितिजचे त्याकडे लक्ष नव्हते. शेवटी न राहवून भूमीने फोन त्याच्याकडे देत तो घ्यायला सांगितले.

''आई, लेट होईल, पाण्यात फ़सलोय. सोबत भूमी आहे, तिला सोडून येतो.'' एका वाक्यात विषय संपवून त्याने फोन कट केला. एव्हाना त्याच्या चिडलेला अवतार भूमीच्या लक्षात आला होता.

 

''एक करत का? मला इथेच सोडा, मी रिक्षा वगैरे बघून जाईन.'' भूमी एवढं बोलली नसेल तोच कर्कशून ब्रेक लावून क्षितिजने गाडी जागच्या जागी थांबवली होती.

 

''रिक्षा मिळणार नाही इथे, हेलिकॉप्टर मिळेल, NDA ची एखादी बोट सुद्धा असेल इथे.  पूरग्रस्तांसाठी तातडीची सेवा सुरु आहे... चालेल?''  तिच्याकडे बघत तो म्हणाला.''

 

''सॉरी, मला माहित नव्हतं एव्हढं पाणी वाढलं असेल ते. माझ्यामुळे तुम्हाला उगाचच त्रास झाला.'' म्हणत नाराजीच्या सुरात भूमी दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा तयारीत होती. पण डोअर लॉक असल्याने तिला बाहेर पडत आले नाही.

 

''मॅम डोअर लॉक आहे, पुढचा रस्ता बंद केला गेला आहे, थोडं पाणी ओसरल्यावर निघू, बसा आरामात.'' म्हणत क्षितिज मस्त पाठीमागे रेलून बसला होता.

 

''दुसरा काही पर्याय?'' भूमी

 

''हा दुसराच पर्याय आहे. पहिला पर्याय हा कि पुढे जायचं आणि पुराच्या पाण्यात बुडून स्विमिंग करायचं. कोणता पर्याय ओक वाटतो?'' क्षितीज

 

''अश्या परिस्थिती तुम्ही एवढे रिलॅक्स कसे राहू शकता? पाऊस खूप आवडतो वाटतं?'' भूमी

 

''नाही, बाहेरचा पाऊस खिडकीतून पाहायला आवडत. मग ती गाडीची खिडकी का असेना. आणि सोबतीला कोणी असेल तर अजून काय पाहिजे.'' क्षितीज तिच्याकडे बघत बोलत होता, हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होत. आपली नजर खिडकी बाहेर वाळवून भूमी शांत बसली.

 

''किती लिटर?'' क्षितिजने पुन्हा तिला गमतीने विचारले. तिने काय असं मानेनेच विचारल्यावर, 'केव्हापासून बघतोय, तुम्ही बाहेर एकटक पाऊस मोजताय, म्हणून विचारलं किती लिटर आहे?' तो पुढे म्हणाला.

 

''खूप पडून गेलाय पाऊस आयुष्यात... समजण्याच्या आणि मोजण्याच्या अगदी पलीकडे. पण आजचा पाऊस वेगळा वाटतो, तो मोजता नाही येत पण समजून घेण्याचा प्रयत्न करते.''  भूमी एकटक बाहेर बघत बोलत होती.

 

''म्हणजे?'' काहीही न समजल्याने त्याने पुन्हा प्रश्न केला.

 

''पाऊस दरवर्षी पडतो, तेच थेंब, तेच पाणी पण पाऊस वेगळा असतो.'' भूमी

 

''ते कस काय?'' क्षितिज

 

''आज तुमचा मूड चांगला असलं तर आजचा पाऊस आनंदी आहे, उद्या तुम्हाला काही वाईट बातमी मिळाली तर, उद्याचा पाऊस तुमच्यासाठी वाईट असणार. म्हणजे आपापल्या मूड नुसार आपण पावसाला अनुभवत असतो.''

 

''माहित नाही, पण आज खरतर माझा मूड मस्त आहे, आणि बाहेर पडणारा पाऊस सुद्धा मस्त, प्रसन्न वाटतोय. तोच पाऊस काही वेळापूर्वी चिडचिडा वाटत होता. आता अगदी धुंद वाटतो. हवाहवासा... ''   बाहेर बघणारा क्षितीज एकटक तिच्याकडे बघत म्हणाला. ती मात्र अजूनही बाहेर डोळे लावून आपल्याच विचारात गढून गेली होती. हळूच म्युझिक प्लेअर ऑन करून क्षितिजने रेडिओ सुरु केला. रस्ताच्या कडेला उभी असणारी गाडी, बाहेर दुतर्फा पसरलेले पाणी आणि आतमध्ये वाट बघत बसलेले ते दोघे, यातच रेडिओवर मस्त मंद म्युझिक वाजत होते.

 

महफ़िल में कैसे कह दें किसी से,

दिल बंध रहा है किस अजनबी से

हाय करे अब क्या जतन,  सुलग सुलग जाए मन

भीगे आज इस मौसम मेंलगी कैसी ये अगन

रिम-झिम गिरे सावन ...

नक्षत्रांचे देणे १४


 'ऑफिसमध्ये आज फार गडबड चालू होती. न्यू प्रोजेक्ट लॉन्चिंग त्यामुळे बरेचसे नवीन लोक आले होते. न्यू प्रोजेक्ट्ची अक्खी टीम खूपच बिझी दिसत होती.

एवढ्या सकाळी सकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थितपने हॅण्डल करण्यात रिसिप्शनिस्टची दमछाक झाली होती. भूमीने एंट्री केली तेव्हा 'आपण?' असा चेहेरा करून तिने भुवया उंचावल्या होत्या. नवीन जॉइनिंग तीही सावंत सरांनी डायरेक्ट अपॉईंट केलेली एम्प्लोइ. हे समजल्यावर तर ती अजूनच शॉक झाली. अवधी सुंदर दिसत होती ती कि, तिच्याबरोबर त्या एरियात आजूबाजूला असणारे इतर लोकही शॉक्ड होते. भूमीला बघून... कित्त्येकांच्या नजरा तिथे उंचावल्या होत्या. '' मोस्ट वेलकम मॅम.'' असं म्हणत रिसिप्शनिस्टने भूमीला तिच्या केबिनच्या रूट सांगितलं आणि भूमी आतमध्ये वळली. खरतरं तिला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. घरात साडी घालून वावरायची सवय नव्हती.  इथे ऑफिस मध्ये तर शक्यच नव्हतं. त्यात पहिला दिवस, कित्त्येक एम्प्लॉई तिच्याकडे निरखून बघत होते, हे जाणवल्याने तर ती अजूनच अस्वस्थ झाली. ती कोणाशी काहीही न बोलता सरळ केबिनमध्ये घुसली. 'मॅम तुम्ही बसा,


सावंत सर अजून मीटिंगमध्ये आहेत, ते स्वतः तुम्हाला पुढच्या इंस्ट्रक्शन्स देतील,' असं म्हणून एक माणूस निघून गेला.

 

बऱ्यापैकी मोठी केबिन होती ती. एक मध्यम आकाराचे काचेचे टेबल त्यावर PC बाजूला लागणाऱ्या स्टेशनरीच्या साहित्य आणि काही फाइल्स अगदी  व्यवस्थितपणे  लावून ठेवण्यात आल्या होत्या.  समोर असणाऱ्या चेअरवर बसत भूमी प्रत्येक गोष्टीचे  निरीक्षण करत होती. पण अजूनही कोणीही तिथे आलेले नव्हते. बाहेर मात्र फार गडबड आणि माणसांचे आवाज ऐकू तेय होते. त्यावरून तिने अंदाज बांधला कि, अजून न्यू प्रोजेक्ट च्या कामामध्ये सगळे बिझी असणार. शेवटी कंटाळून तिने बाजूच्या मोठ्या काचेच्या खिडकीमधून खाली नजर टाकली. तेव्हा आपण फारच उंचीवर असल्याची जाणीव तिला झाली. बाहेर बऱ्यापैकी पाऊस सुरु होता. आज सकाळपासूनच पावसाने जोर लावला होता. सगळीकडे पाणी पाणी झाले होते.

''हाय भूमी .'' बाहेरून अचानक आलेल्या आवाजाने तिने मागे वळून पहिले. सावंत सर आणि एक लेडी एम्प्लॉई केबिनमध्ये आले होते. ''हॅलो सर.'' म्हणत तिने त्यांच्याकडे पहिले.  

 

''भूमी, आज तुझा पहिला दिवस आणि न्यू प्रोजेक्ट्स लॉन्च असा योग आहे. मी खूप बिझी आहे, सो तुला या कादंबरी मॅम तुझ्या कामाचे डिटेल्स आणि बाकी गोष्टी समजावतील . आज रिलॅक्स हो, इथल्या बाकीच्या एम्प्लॉईना भेट, इंट्रो झाला कि मग आपण मेन हॉलमध्ये भेटू. हॅव अ गुड डे, ओक.'' एक वाक्यात सगळं सांगून सर निघूनही गेले. 

 

''ओक सर.'' म्हणत भूमी कादंबरी मॅम बरोबर कामाचे डिस्कशन करायला बसली. सर आज बिझी असणार हे तिला अपेक्षित होतेच, पण कोणीतरी आपल्याला गाईड करायला आलं आहे, हे पाहून तिला फर बर वाटलं.

 

 कादंबरी मॅम कडून बेसिक गोष्टी समजल्यावर भूमी बाहेर निघाली, दुपारी बाहेर सगळ्यांबरोबर इंट्रो करून झाली होती. लंच वगैरे आवरलं होत. टेबलवर असलेल्या फोनवर फोनकरून पलीकडून तिला कोणीतरी कंपनीच्या मेन हॉलमध्ये यायला संगितले. ती विचारत विचारत त्या ठिकाणी पोहोचली . त्या प्रशस्त  सभागृहात बरेच लोक उपस्थितीत होते. राउंड टेबल अरेंजमेंट होती, समोर स्टेजवर मिस्टर सावंत आणि त्यांचा सिलेक्टिव्ह स्टाफ तसेच इतरही मोजकी मंडळी बसलेली होती. न्यू प्रोजेक्ट रिलेटेड काहीतरी अनाउन्समेंट सुरु असल्याने उगाच डिस्टरब नको, म्हणून भूमी दाराजवळील एका रिकाम्या टेबलाकडे वळली, तेथील बाजूची एक चेअर ओढून ती बसणार एवढ्यात स्टेजवरून अजून एक अनाउन्समेंट झाली होती. कोणीतरी आपली नाव घेते आहे, हे लक्षात आल्यावर भूमीने त्या दिशेने पहिले, तो मिस्टर सावंतांचा PA असावा, स्टेजवरून त्याने 'न्यू प्रोजेक्ट लीगल हेड म्हणून, भूमी साठे.' असे नाव अनाऊन्स केले होते. ऐकून भूमीला घाम फुटला.  काय बोलावं तिला कळेना. तिथे काय विचारल तर? काय? या प्रोजेक्ट बद्दल तर तिच्याकडे अगदीच थोडी माहिती होती. आधीच गोंधळलेली भूमी आता फार घाबरली. तरीही उठून ती कशीबशी स्टेजवर पोहोचली होती. पण काहीही प्रॉब्लेम झाला नाही. मिस्टर सावंत स्वतः उठून तिच्या इथे आले. त्यांनी तिच्या बाजूला उभे राहून सगळ्यांना स्वतः माहिती दिली कि, आजपासून न्यू जॉईन झालेल्या या भूमी साठे आपल्या नवीन प्रोजेक्ट्सच्या लिजलचे सगळे काम पाहणार आहेत. आणि सगळ्यांनी तिचे स्वागतही केली. हे सगळं अवाक होऊन बघत स्टेजच्या खाली उभा असलेला क्षितीज मात्र शॉकमध्ये होता. आपल्याला कुणी काहीच कल्पना कशी दिली नाही, हे त्याला कळेना. इकडेतिकडे लक्ष टाकताना भूमिच्याही लक्षात आलं होत, कि क्षितिजपण इथे उपस्थित आहे आणि त्याला आपल्या जॉईन बद्दल आश्चर्य वाटणे साहजिक आहे. त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हेच तिला कळेना.'

'हॉलमधला कार्यक्रम आवरला आणि सगळे आपल्या केबिनच्या दिशेने निघाले. क्षितीज समोरच उभा आहे हे आव्हान भूमीच्या तिच्या लक्षात आलं होत. तिने त्याला बघून प्रसन्न मुद्रेने हाय केले. अगदी थंड नजरेने तिच्याकडे बघत तोही हसला. तो काहीतरी बोलणार एवढ्यात बाजूला उभे असलेले ,'काँग्रॅज्युलेशन मॅम अँड वेलकम .'' असं म्हणत त्या दोघांच्या मध्ये हजार झाले होते.  ''थँक्स.'' म्हणत भूमी क्षितिजला काहीतरी सांगणार तर, वेदांत तिथे आला होता.  ''हाय... हाय.''  म्हणून त्याने हात हलवत भूमीला अभिनंदन केलं. खरतर मुखर्जी आणि वेदांतसाठी भूमीच जॉइनिंग एक आश्चर्याचा धक्काच होता. पण नेहमीप्रमाणे तोंडावर उसण हसू आणून ते दोघे भूमीशी अगदी गोडं-गोड गप्पा मारत बसले होते, आणि आधीच चिडलेला क्षितीज तिथून कंटाळून निघून गेला, बोर होऊन शेवटी काहीतरी खोट काम सांगून भूमीही तेथून निघाली. क्षितिजचा गैरसमज झाला असावा हे तिला जाणवत होत. त्यात कंपनीचे मालक असणारे सावंत सर तिला पर्सनली इंट्रो करत होते, या आधी असे केव्हाही झाले नव्हते. हा काय प्रकार आहे. हि नक्की कोण आहे? का विचारात बाकीचा स्टाफ तिला अजूनच निरखून बघत होता.’

 

आजचा ऑफिसचा दिवस संपला होता.  क्षितिजबरोबर काहीच बोलणं झालं नाही. याच भूमीला वाईट वाटत होत.  त्याच विचारात सगळं आवरून ती घरी जायला निघाली.

नक्षत्रांचे देणे १३



 'मेघाताई आणि मिस्टर सावंत यांचं बोलणं सुरु होत. आज भूमी ऑफिस जॉईन करतेय, हे समजल्यावर मेघाताईंना कितीतरी आनंद झाला. क्षितीज आणि त्याच्या पप्पांचे बदलणारे सूर त्यांना आता स्पष्ट दिसत होते. म्हणून त्यांनी मुद्दाम विषय काढला.'

''संजय क्षितिजमध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येतोय का? तो आता एकटा-एकटा नाही वाटत. पहिल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह वाटतो. आणि पॉसिटीव्हही ''

''होय, आणि ते त्याच्यासाठी आणि कंपनीसाठी चांगलं आहे.'' ऑफिसला जाण्याच्या तयारीत असलेले मिस्टर सावंत मेघाताईंना म्हणाले.

''भूमीला असं त्याला न सांगता जॉईन करण्याचं कारण समजेल का?''

मेघाताईंनी डायरेक्ट विषयाला हात घातला.

''भूमी ही कंपनीच्या हिताच्या दृष्टीने असलेली माझी चॉईस आहे, क्षितिजला मला इथे इन्व्हॉल्व्हड करायचं नाहीय.''  ते मेघाताईंकडे बघत म्हणाले.

''पण का? तो चांगल बोलतो तिच्याशी. इनफॅक्ट त्यांचं छान  बॉण्डिंग आहे.''

''असेलही पण त्याच्या एका चुकीची शिक्षा माझी संपूर्ण कंपनी भोगतेय. आता इथे पुन्हा त्याच रिपीटेशन नको.  मेघा तू यात लक्ष देऊ नकोस, प्लिज.''

''कोणती चूक? मैथिलीला कंपनीत जॉईन करण्याची ना?''

''नुसती जॉईन नाही केलं त्याने,  त्यानंतर माझी कंपनी लॉसमध्ये गेली, म्हणून त्याने तिच्या बापाला पार्टनरशिप द्यायला लावली. आणि आता स्वतःच्या मुलीच्या मागे तो किर्लोस्कर माझ्या डोक्यावर बसलाय.'' मिस्टर सावंत आता फार चिडले होते.

''होय, ते खरं असलं तरीही हे नाकारता येणार नाही, कि मैथिलीमुळे क्षितीज ऑफिसला जायला लागला. नाहीतर नुसता उनाड मुलासारखा वागत होता. आठवत ना?''  मेघाताई आपला मुद्दा क्लिअर करत म्हणाल्या.

''मेघा तुला अजूनही कसं समजतं नाही. त्या मैथिलीला पैसेवाला मुलगा पाहिजे होता, आणि त्याच्या मार्फत आपल्या फॅमिलीला बिझनेसमध्ये सेटल करण्यासाठी तिने क्षितिजचा फक्त वापर केला. एवढं वाईट व्हायला नको होत, पण आपलं सुदैव, की तिचा तो अक्ससिडेन्ट झाला आणि क्षितीज तिच्या जाळ्यातून सुटला.''  बोलताना मिस्टर सावंतांचा राग आता अगदी अनावर झाला होता. नेहमीप्रमाणे त्यांच्या हातापायांची थरथर व्हायला लागली.

 

''मला असं नाही वाटतं. असो, आपण का वादावाद घालतोय. आता क्षितीज ओक आहे, सो तुम्ही आता त्याला समजून घेत जा. प्लिज.''  मेघाताई त्यांना शांत करत म्हणाल्या.

''येस, सध्या तरी मी तेच करतोय.'' म्हणत ऑफिसची तयारी करून ते बाहेर निघाले होते.

******


आज तिचा नवीन जॉबचा पहिला दिवस. पुचारपूस करावी म्हणून माईंनी भूमीला फोन केला. ''हैलो, झाली का ग तयारी?''

''होय माई, निघतेच आहे.''

''भूमी टिफिन वगैरे घेतला का?'' 

''होय माई, सगळं घेतलं हो. तुम्ही दोघांनी काळजी घ्या.''

''तू काळजी घेत जा. आम्ही मस्त आहोत. आणि रात्री यायला उशीर झाला तर बाजूच्या गोखले काकूंना सांगून ठेवत जा. त्या तुझं जेवण करत जातील.''

''माई, काकू आत्ताच येऊन गेल्या. आपल्या या फ्लॅटमध्ये एवढ्या दिवसांनी मी राहायला आले, ते आवडलं त्यांना.''

''होय गं, नानांच्या रिटायर्डमेन्टच्या आधी आम्ही तिथे राहायचो ना, चांगली गट्टी जमली होती गं आमची. मुंबई सोडून फार वर्षे झाली, पण त्या आम्हाला विसरल्या नाहीत अजून. ''

'' तुमची आठवण काढत होत्या. सवडीने फोन करा त्यांना, आणि इथल आपलं घर अगदी सुस्थितीत आहे, काहीही काळजी नसावी.'' असं म्हणत भूमी मोठ्याने हसली. पलीकडून स्पिकरवरून माईंचे आणि भमीचे फोन संभाषण ऐकणारे नाना देखील हसले. त्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधीच त्यांना उत्तर मिळाले होते. 

''बरं बाई, उगा पहिल्याच दिवशी तुला उशीर नको. संध्याकाळी फोन कर हो.'' म्हणत माईंनी फोन ठेवला आणि आपली पर्स उचलून हॉलचा दरवाजा ओढत भूमी घराबाहेर पडली.

ऑफिसचा पहिला दिवस, त्यात क्षितिजला काहीही पूर्वकल्पना न देता त्याचीच कंपनी जॉईन करतेय. आणि मिस्टर सावंतांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास... या सगळ्याच प्रचंड दडपण तिच्या मनावर आलं होतं. खरतरं एवढ्या मोठ्या गॅप नंतर पुन्हा काम करण्याची इच्छा तिला नव्हती. पण आयतीच ऑफ़िर चालून आली होती, ती ही तिच्या आवडत्या क्षेत्रात, त्यामुळे आपल्या भविष्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल टाकण्यासाठी तिने हि संधी एक स्वतःलाच दिलेले आव्हान म्हणून स्विकारली होती.  

कॅब पकडून भूमी निघाली, थोडे अंतर पार झाले नसेल तेवढ्यात तिच्या मेल बॉक्समध्ये एक नवीन मेल आल्याचे नोटिफिकेशन तिला दिसले, मेल ओपन केल्यावर मात्र तिच्या चेहेरा उतरला होता. SK ग्रुप ऑफ कंपनीज च्या HR चा मेल होता. ' काही अपरिहार्य कारणामुळे मिस्टर सावंत आज कंपनीमध्ये उपस्थित राहू शकत नव्हते, त्यामुळे भूमीला उद्या जॉईन करायला सांगितले होते.' कदाचित सावंत सरांना त्यांच्या अनुपस्थित भूमीच जॉइनिंग अपेक्षित नसावं. असा भूमीने अंदाज बांधला. नकारार्थी मान डोलावत पुढील मेल वाचत तिने कॅब परत मागे घ्यायला सांगितली. तिच्या मोबाइलवर एक अनोळखी नंबरचा कॉल आला होता. तिने आपला मोबाइल कानाला लावला.

''हैलो, भूमी साठे ?'' पलीकडून विचारणा झाली.

''येस, आपण?''

''मी SK ग्रुप ची HR बोलतेय, तुम्हाला मेल मिळाला असेलच तरीही सरांनी एक फोन करायला सांगितला होता.'' SK ग्रुपची HR बोलत होती.

खरतरं भूमी थोडी गोंधळली होती. तरीही तिने विचारलेले. ''ओके, बोला.'' 

''उद्या कंपनीमध्ये न्यू प्रोजेक्टच लॉन्चिंग आहे, सो नो फॉर्मल्स, उद्या ड्रेसकोड असणार आहे.  तुम्ही न्यू जॉईंनी आहेत त्यामुळे तुमचा गैरसमज व्हायला नको, म्हणून मी पर्सनली फोन करून तुम्हाला हे सांगते. मेल मिळाला असेलच.''

''ओह, thats fine. मेल बघून मी थोडी गोंधळलीच होती. तुम्ही फोन करून क्लीअर केलं ते बरं केलं.'' आता भूमीला थोडं हायस वाटलं. निशंक होऊन ती उद्याच्या तयारीला लागली.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...