' साथीच्या रोगान विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेची, पोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती. नवरा अकाली गेल्याचे दुःख होतेच, तरीही आपल्या दोन लेकरांकडे बघून त्या मारुतीरायाला साकड घालत, ती एक-एक दिवस ढकलत होती. '
आषाढ मध्यावर आला, पेरणीची हिरवीगार पीकही मळीमध्ये दिमाखात डोलू लागली, आणि लावनीची लगबग सुरु झाली होती.
"आज उजाडल्या पासनं वातावरण पावसाच हाय ! ढग फुटल्यागत कोसळतोय ... आकाडाचा पाऊस लावनीला उमद्या जोमान फुलवतो." रखमा नुकतेच नेसुन आलेले लाल-निळे पातळ चापुन-चोपुन निटनेटके करत, घराच्या दारातून हलकेच डोकावत बडबडत होती.
"माय यकटीच काहुन बडबडते गं ?" गंगी तिच्याकडे गमतीने पाहुन विचारु लागली.
"आज पाऊस मोप हाय. दोग पन शाळला जाऊ नगा. म्या मारुतीच्या मालावर जाते, आन भात लावुन घेते. आज लावनी केलीच पायजे."
"माय मी बी येव काय ? " छोटा म्हादु तिच्या पदराला धरुन खेचत मागे लागला.
"सोन्या एकच विला हाय ना... मग तु काय करणार र येऊन... पाऊस बी मोप पडतोय. भिजलास त शीक पडशील, गंगी शालेत बी जाऊ नग हा... आज घरातच थांबा."
सदा भाऊ शेत नांगरणी करत होता. भारी रबरबीत कमरेएवढ्या चिखलात शेतीची लावनी रंगली होती. आणि भरला पाऊस बघुन किसनी माळीन झोकात गाणं गात होती. तिच्या गाण्याबरोबर काम करण्यासाठी हुरूप आला होता.
एवढ्यात किसनी माळीन तोंड वर करुन बोलली.
"वयनी जमत का ते तर बगु. बाकी समदी माझ्या मारुतीरायाची किरपा हाय म्हणा, तो आडत्याला वर काडतुया बगा. " रखमा शेताकडे वळली. कमरेचा विळा बांधावर ठेवुन तिने मारुतीरायाला हात जोडले.
"निरोप मिळाला आन बेगिन धावत आलो बग. पावसाचा जोर बी वाडलाय. बाविच्या वाडीत पानी भरलय, आन मानखोर्यात तर लोक घरातून भाईर पडनात , आग समद्या नद्या-नाल भरुन व्हावत्यात."
"काय बोलतु थोरल्या यवढा पाऊस भरला म्हनायचा ? "
"व्हय ग. मी नांगरतु, तोवर तु ढेकळ सारकी कर. कामाला लागु... जादा वेळ दवडुन जमायच न्हाय." म्हणत थोरला कामाला लागला होता.
"का ते म्हाइत न्हाय, पन थोरल्या, आजचा दिवस लय वंगाळवाना वाटतोय... नुसत कसनुस झालय र्र ! "
थोरल्याची अशी दिनवाणी अवस्था पाहुन रखमाला परिस्थितीचा अंदाज आला . थोरल्याला आता लवकरच निघायला पाहिजे . नाहीतर त्याच्या गावाला जाणारे सारेच रस्ते बंद होतील, हे ओळखून तिने थोरल्याला उठवले.
"आग पन हित तू यकटी कशी लावनी करायचीस, अजुन तास- दोन तासाच काम हाय न्हव ? " थोरला शेतावर एकवार नजर टाकत म्हणाला.
"बेगीन पल आता... डोक्यावर पाऊस बग किती भरलाय. पानी अजुन भरल त मग आडकुन बसशील.... तुझी पोर वाट बगत आसतील न्हव. हे समद म्या बगती... तू आजाबात कालजी करु नगुस. नीग आता."
रखमाचा थोरला भाऊ तिचा निरोप घेऊन निघाला, आपले बैल-नांगर असे साहीत्य गुंडाळत, डावीकडून धरणाच्या पुलाच्या रस्त्याने झपझप पावले टाकत निघून गेला होता. पोटाची खळगी भरण्यासाठी गेले तास दिड-तास रखमा एकटीच लावणी करत होती. अर्धे-निम्मे शेत देखील अजून लावून झाले नव्हते. एवढ्यात आजुबाजुच्या शेतातील मजुर-माणसाची पळापळ सुरु झाली.
हातातील आवे खाली टाकुन गडी-मानसे आणि बाया-बापड्या दिसेल त्या मार्गाने घराकडे पळत सुटले होते. गावामध्ये पाणी भरलं असणार हे एव्हाना रखमाच्या लक्षात यायला पाहीजे होत. पण हे शेत अगदी डोंगरालगल असल्याने इथे जास्त पाणी साचुन राहू शकत न्हवते. ' डोंगरा लगलच्या शेतीसाठी मुसलधार आकाड्याचा पाऊस पायजे नायतर यक आवा बी रुतायचा नाय ह्या जमीनीत...' ही तिच्या नवर्याने सांगीतलेली गोष्ट लक्षात ठेवुन ती पावसाच्या जोरावरती शेत लावतच राहीली. गावाकडची खबर तिला लागली नाही. आता फार उशीर झाला होता.
१०-१२ मिनिटाचा रस्ता संपतो न संपतो तोच घात झाला होता. रस्त्याच्या बाजुला डोलणार्या पिंपळाच्या झाडामागे आडुन बसलेला बाळा पाटील अवचीत येवुन रखमाच्या पुढ्यात टपकला होता. त्याने अशी वाट अडवलेली पाहुन रखमा घाबरली... तिने आजूबाजूला नजर फिरवली तर कोणी चिटपाखरूही दिसेना. सगळे लोक शेतातून केव्हाचेच पांगले होते.
"पाटील, काय काम हाय ? लवकर बोला, माझी पोर वाट बघत्यात... घराकड यकटीच हायत." पाटलाची आपल्यावर असलेली वेडीवाकडी नजर पाहुन रखमाच्या अंगाची आग झाली होती. तरीही तिने शांतपणे विचारले.
"यका शेताच्या तुकड्यावर यवढी ऊडते व्हय, त्याच्या दुप्पट पैसा देतो बग. गप-गुमान ही जमीन मला मला दे." पाटीलाने डायरेक्ट विषयला हात घातला होता.
"पाटील माझ्या हाक्काचा तेवढाच तुकडा हाय. तो देवुन कस जमल? पोरं मोठी झाली की तेवढीच एक शिदोरी हाय तैनला. " रखमा ताट मानेने उत्तरली.
"ईचार कर रखमा... तुझी पोरं यकटीच घरात असतात, आणि तू बी हित यकटीच हायस.... कायबी होवू शकत हा." म्हणत पाटील खीssखीss करून बेशरमीपणाने हसला, आणि तिच्या अजुनच जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला.
त्याचे ते हिडीस शब्द ऐकुन रखमाच्या हाता-पायाची आग आग झाली.
आपला ' पाटला ' असा एकेरी उल्लेख केलेला पाहुन पाटील सापासारखा फणकारला...
"पाटला ! खर बोललास .... काय बी होवु शकत."
------------------------------------------------------------------------------
आषाढ मध्यावर आला, पेरणीची हिरवीगार पीकही मळीमध्ये दिमाखात डोलू लागली, आणि लावनीची लगबग सुरु झाली होती.
"आज उजाडल्या पासनं वातावरण पावसाच हाय ! ढग फुटल्यागत कोसळतोय ... आकाडाचा पाऊस लावनीला उमद्या जोमान फुलवतो." रखमा नुकतेच नेसुन आलेले लाल-निळे पातळ चापुन-चोपुन निटनेटके करत, घराच्या दारातून हलकेच डोकावत बडबडत होती.
"माय यकटीच काहुन बडबडते गं ?" गंगी तिच्याकडे गमतीने पाहुन विचारु लागली.
"आज पाऊस मोप हाय. दोग पन शाळला जाऊ नगा. म्या मारुतीच्या मालावर जाते, आन भात लावुन घेते. आज लावनी केलीच पायजे."
हातात मातीचा दिवा आणि अगरबत्ती घेऊन ती चुलीकडे वळली . पेटत्या जाळावर अगरबत्ती टेकवून दिवा लावत-लावत पुन्हा देवाकडे वळली.... पुढ्यातल्या बाप्पाच्या फोटोंपुढे ओवाळणी करत तिने हात जोडले.
"माय मी बी येव काय ? " छोटा म्हादु तिच्या पदराला धरुन खेचत मागे लागला.
"सोन्या एकच विला हाय ना... मग तु काय करणार र येऊन... पाऊस बी मोप पडतोय. भिजलास त शीक पडशील, गंगी शालेत बी जाऊ नग हा... आज घरातच थांबा."
हातातला विळा दाखवर रखमाने त्याची भाबडी समजुत काढली. आणि ते समजुदार लेकरु ते सुद्धा गप्प बसले.
फाटक-तुटक ईरल तेवढच पावसापासून आधाराला होते... ते हातात घेऊन, भाकरीची टोपली सोबत घेऊन तिने दार लोटले. डोक्यावरचा पदर सावरतं , ऊजाड कपाळाने ती पहिल्यांदाच घराबाहेर पडत होती. ओल्या झालेल्या डोळयांच्या कडा लपवण्यासाठी तिने पाठमोरीच हात करुन मुलांचा निरोप घेतला.
फाटक-तुटक ईरल तेवढच पावसापासून आधाराला होते... ते हातात घेऊन, भाकरीची टोपली सोबत घेऊन तिने दार लोटले. डोक्यावरचा पदर सावरतं , ऊजाड कपाळाने ती पहिल्यांदाच घराबाहेर पडत होती. ओल्या झालेल्या डोळयांच्या कडा लपवण्यासाठी तिने पाठमोरीच हात करुन मुलांचा निरोप घेतला.
सदा भाऊ शेत नांगरणी करत होता. भारी रबरबीत कमरेएवढ्या चिखलात शेतीची लावनी रंगली होती. आणि भरला पाऊस बघुन किसनी माळीन झोकात गाणं गात होती. तिच्या गाण्याबरोबर काम करण्यासाठी हुरूप आला होता.
" हिरव सोनं पिकल या
शेतात नागर रुतल या
चल राजा ररर ,चल सर्जा
लावनीच गान सुचल या
आता लावनीच गान सुचल या !"
रखमाकडे पाहुन सगळ्यांचेच डोळे मोठे झाले . हि एकटी शेत लावणार आणि नांगरणी कोण करायचे ? ' हा प्रश्न सदा भाऊच्या अगदी तोंडावर आला होता. पण तिची विचारपुस करण्यास मात्र कोणी ही धजेना. शेवटी पुढे जाता-जाता न राहवून रखमानेच तोंड उघडले.
"भाऊ झाली काय नांगरणी... चांगलाच जोर लावलाय म्हणायचा ! "
एवढ्यात किसनी माळीन तोंड वर करुन बोलली.
"रखुताई ! सरासरा नांगरणी करुन, कमरेपातूर रबरबीत चिखल तयार पायजे, तवा कुठ सोनं पिकतया ! ह्या बाई मानसाच काम न्हाय व. तू यकली कस करायची समद ? "
"वयनी जमत का ते तर बगु. बाकी समदी माझ्या मारुतीरायाची किरपा हाय म्हणा, तो आडत्याला वर काडतुया बगा. " रखमा शेताकडे वळली. कमरेचा विळा बांधावर ठेवुन तिने मारुतीरायाला हात जोडले.
"देवा तु गोरगरीबांच्या हाकला धावतुया, काटाकुट्यांपासुन समद्याच रक्षण करतुया , गुराढोरावर तुझी आशीच किरपा ठेव. आज पासुन लावनीला सुरुवात करते , कष्ट कराया मी डगमगत नाय पण माझ्या धन्यासार माझ्या बी अंगात बळ दे !"
मंदिराकडे दृष्टी करुन केळीच्या पानावर ठेवलेला दही-भाताचा नैवेद्य दाखवत तिने डोळे मिटले. तोच तिचा थोरला भाऊ
सोबत बैलजोडी
आणि नांगर घेऊन आपल्या बहिणीच्या मदतीसाठी पोहोचला होता.
"रखुताय सुरवात करायची का मंग ? "
हाकेसरशी रखमा मागे वळली..." थोरल्या कधी आला र्र ? म्हंजी कालचा निरोप मिळला व्हय ! आक्षी देवासारा धावलास म्हणायचा. "
हाकेसरशी रखमा मागे वळली..." थोरल्या कधी आला र्र ? म्हंजी कालचा निरोप मिळला व्हय ! आक्षी देवासारा धावलास म्हणायचा. "
"निरोप मिळाला आन बेगिन धावत आलो बग. पावसाचा जोर बी वाडलाय. बाविच्या वाडीत पानी भरलय, आन मानखोर्यात तर लोक घरातून भाईर पडनात , आग समद्या नद्या-नाल भरुन व्हावत्यात."
"काय बोलतु थोरल्या यवढा पाऊस भरला म्हनायचा ? "
"व्हय ग. मी नांगरतु, तोवर तु ढेकळ सारकी कर. कामाला लागु... जादा वेळ दवडुन जमायच न्हाय." म्हणत थोरला कामाला लागला होता.
‘
सकाळच्या पहिल्या प्रहराला आलेली रखमा आणि थोरला, दुपार भरेपर्यंत शेतात राबत होती. पावसाने जोर अजुनच वाढवला. बरेच पाणी-पाणी झाले होते. त्यातच दोन वेळा बाळा पाटील घिरट्या घालून गेला.... त्याला पाहताच क्षणी रखमाच्या काळजाच पाणी झालं. गावातल्या बाया-पोरींवर याची वाईट नजर होती. आज कित्तेक दिवस या छोट्याश्या जमिनीच्या तुकड्यासाठी देखिल तो रखमाच्या मागे हात धुवून लागला होता. पण रखमा त्याला दाद देत नव्हती.’
"का ते म्हाइत न्हाय, पन थोरल्या, आजचा दिवस लय वंगाळवाना वाटतोय... नुसत कसनुस झालय र्र ! "
ताठ उभी राहुन चौफेर नजर टाकत ती उगाचच बडबडली. पण थोरल्याच तिच्याकडे लक्ष नव्हते. शेतबांधावरच्या आईनाच्या झाडावर चढून त्याने टेहळणी करायला सुरुवात केली होती. शेवटी आ वासुन तो झाडवरुन सरसर उतरला...आणि डोक धरुन मटकन खाली बसला.
"रखु आग आभाळ फाटल बगं ! मागची नदी भरली ग, नदीवरना पानी व्हावतय. वरला पुल बी दिसनासा झालाय. आर्र माज्या देवा ! काय केलस
काय र्र हे ? "
थोरल्याची अशी दिनवाणी अवस्था पाहुन रखमाला परिस्थितीचा अंदाज आला . थोरल्याला आता लवकरच निघायला पाहिजे . नाहीतर त्याच्या गावाला जाणारे सारेच रस्ते बंद होतील, हे ओळखून तिने थोरल्याला उठवले.
"उठ हिम्मत हारु नगस. ही नदी भरली पन आपल्या धरनाची नदी मोठी हाय, ती भरायच्या आत गाव गाठ... हितन डावीकडन जा... फोफळीच्या दोन बागा उलाटल्या की आट- धा पावलावर धरणाचा पूल लागतु बग."
"आग पन हित तू यकटी कशी लावनी करायचीस, अजुन तास- दोन तासाच काम हाय न्हव ? " थोरला शेतावर एकवार नजर टाकत म्हणाला.
"बेगीन पल आता... डोक्यावर पाऊस बग किती भरलाय. पानी अजुन भरल त मग आडकुन बसशील.... तुझी पोर वाट बगत आसतील न्हव. हे समद म्या बगती... तू आजाबात कालजी करु नगुस. नीग आता."
रखमाचा थोरला भाऊ तिचा निरोप घेऊन निघाला, आपले बैल-नांगर असे साहीत्य गुंडाळत, डावीकडून धरणाच्या पुलाच्या रस्त्याने झपझप पावले टाकत निघून गेला होता. पोटाची खळगी भरण्यासाठी गेले तास दिड-तास रखमा एकटीच लावणी करत होती. अर्धे-निम्मे शेत देखील अजून लावून झाले नव्हते. एवढ्यात आजुबाजुच्या शेतातील मजुर-माणसाची पळापळ सुरु झाली.
"पूर आला... पूर. घरला पला र गड्यांनो ! मानस व्हावत्यात ....गाय-बकरी बी व्हावुन गेली. पला र्र पला. घराकड पला! "
हातातील आवे खाली टाकुन गडी-मानसे आणि बाया-बापड्या दिसेल त्या मार्गाने घराकडे पळत सुटले होते. गावामध्ये पाणी भरलं असणार हे एव्हाना रखमाच्या लक्षात यायला पाहीजे होत. पण हे शेत अगदी डोंगरालगल असल्याने इथे जास्त पाणी साचुन राहू शकत न्हवते. ' डोंगरा लगलच्या शेतीसाठी मुसलधार आकाड्याचा पाऊस पायजे नायतर यक आवा बी रुतायचा नाय ह्या जमीनीत...' ही तिच्या नवर्याने सांगीतलेली गोष्ट लक्षात ठेवुन ती पावसाच्या जोरावरती शेत लावतच राहीली. गावाकडची खबर तिला लागली नाही. आता फार उशीर झाला होता.
"मारुतीराया माझी चिमुकली दोन लेकर घरात एकलीच हायत र ! त्याची राकन कर देवा !"
मनोमन मारुतीचा धावा करत रखमाने घराकडे पळ काढला. जिवाच्या आकांताने ती पळत सुटली.
१०-१२ मिनिटाचा रस्ता संपतो न संपतो तोच घात झाला होता. रस्त्याच्या बाजुला डोलणार्या पिंपळाच्या झाडामागे आडुन बसलेला बाळा पाटील अवचीत येवुन रखमाच्या पुढ्यात टपकला होता. त्याने अशी वाट अडवलेली पाहुन रखमा घाबरली... तिने आजूबाजूला नजर फिरवली तर कोणी चिटपाखरूही दिसेना. सगळे लोक शेतातून केव्हाचेच पांगले होते.
"काय रखुबाई ! फार वाट बगाय लावता ओ ... घरातून भायर बी पडत न्हाय. शेवटी मीच शेतात आलो. " पाटील तिच्या थेट समोर उभा रहात म्हणाला.
"पाटील, काय काम हाय ? लवकर बोला, माझी पोर वाट बघत्यात... घराकड यकटीच हायत." पाटलाची आपल्यावर असलेली वेडीवाकडी नजर पाहुन रखमाच्या अंगाची आग झाली होती. तरीही तिने शांतपणे विचारले.
"यका शेताच्या तुकड्यावर यवढी ऊडते व्हय, त्याच्या दुप्पट पैसा देतो बग. गप-गुमान ही जमीन मला मला दे." पाटीलाने डायरेक्ट विषयला हात घातला होता.
"पाटील माझ्या हाक्काचा तेवढाच तुकडा हाय. तो देवुन कस जमल? पोरं मोठी झाली की तेवढीच एक शिदोरी हाय तैनला. " रखमा ताट मानेने उत्तरली.
"ईचार कर रखमा... तुझी पोरं यकटीच घरात असतात, आणि तू बी हित यकटीच हायस.... कायबी होवू शकत हा." म्हणत पाटील खीssखीss करून बेशरमीपणाने हसला, आणि तिच्या अजुनच जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला.
त्याचे ते हिडीस शब्द ऐकुन रखमाच्या हाता-पायाची आग आग झाली.
"पाटला गप-गुमान वाट सोड, माझी पोरं वाट बघत्यात. उगा वाकड्यात शिरू नग. "
आपला ' पाटला ' असा एकेरी उल्लेख केलेला पाहुन पाटील सापासारखा फणकारला...
"मला उलट बोलते व्हय. दावतोच तुला." म्हणत त्याने झटक्यात एका हाताने तिच्या केसाचा बुचडा पकडला. बेसावधपणे ओले झालेले केस जोरात ओढल्याने रखमाच्या डोक्यातुन एक सणसणीत कळ उसळली. बिचारी कळवळली ...तिने हात-पाय मारुन पाहीले, पण काही केल्या तिला त्याचा हात सोडवता येईना. अगदी हताश होऊन तिच्या डोळ्यात पाणी तरळले. ती आता काही करु शकत नाही, हे पाहुन बाळा पाटलाला अजुनच चेव एढला. त्याने चक्क तिच्या पदराला हात लावला होता. केसावरची त्याची पकड सैल झाली, हे पाहुन संधीचा फायदा घेत रखमाने कमरेला लावलेला विळा सरकन वरती ऊपसून काढुन उजव्या हातात पकडला होता. क्षणाचाच अवकाश... एक गगनभेदी किंकाळी आणि पिचकारी सारखी उडणारी रक्ताची धार एकाच वेळी बाहेर पडली.
"पाटला ! खर बोललास .... काय बी होवु शकत."
रखमा मोठ्याने ओरडली. आणि त्या सरशी तिने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत किसनी माळीनीच्या बाजुलाच असणार्या शेतात ढकलुन दिले. तिच्या नवऱ्याच्या एकुलत्या एक शस्त्राने पाटलाच्या हाताचा अचुक नेम घेतला होता. हाताच्या तुटलेल्या नसीने पाटलाला उभ्या-उभ्या चिखलात आडवे केले. सदा भाऊने सकाळीच शेत लावणीसाठी तयार करून ठेवलेल्या कमरेपर्यंतच्या रबरबीत चिखलात पाटील सपशेल आडवा पडला. बाळा पाटील कायमचाच चिखलात रुतला, पुन्हा केव्हा ही वरती रुजुन न येण्यासाठी. उभ्या शेतातील लाल चिखलावर एक वेगळीच लाल करा अलिप्तपणे पसरली होती. अशा पापी मानसाचे रक्त सामावून घ्यायला ती जमीन ही आज तयार नव्हती. पाठमोरी रखमा उजव्या हातात तोच रक्ताळलेला विळा घेऊन, तशीच भिजलेल्या अवस्थेत बेभान होऊन पुन्हा घराकडे धावत सुटली.
काही ग्रामीण शब्द -
आकाडा -आषाढ .
मोप - खुप.
ईरल - बांबूचे वेत,पालापाचोळा तसेच थोड्या प्रमानात प्लॅस्टीक वापरुन तयार केलेले ,पावसापासुन सौरक्षण करण्यासाठी शेतात वापरले जाणारे साधन.
यकली - एकटी.
वंगाळवाना - विचित्र असा.
आभाळ फाटणे - मुसळधार पाऊस येणे.
व्हावत्यात - वाहुन जातात.
आवे- लावनीस तयार झालेल्या हिरव्या भात शेताच्या छोट्या-छोट्या काड्या.
हिडीस - घाणेरडे / वाईट.
केसाचा बुचडा - केसाचा अंबाडा.