बुधवार, १६ मार्च, २०२२

नक्षत्रांचे देण ४१

 ''कामात होते, म्हणून नाही जमल. मग मैथिली बद्दल समजलं आणि मी तडक इथे निघाले. तसाही तू इथेच भेटणार हे माहित होता.'' भूमी

 

 

 

 

''तू कंपनी सोडलीस नामग कोणत्या कामात आहेसपुन्हा जॉईन करणार आहेस काबोलू पपांशी?'' क्षितिज

 

 

 

 

''नको.'' भूमी पटकन बोलून गेली.

 

 

 

 

''विभास पुन्हा त्रास देतोय का?'' क्षितीज

 

 

 

 

''नाही. पत्रकारांना त्यांचं उत्तर मिळाल आहेविभासच खोटेपणा सगळ्यांच्या समोर आलायआता तो काहीही करू शकत नाही.'' भूमी

 

 

 

 

''मग काय झालंतू अपसेट दिसतेस?'' क्षितीज

 

 

 

 

''तू अपसेट म्हणून मग मी हि अपसेट. आपल्या दोघांच्या आयुष्यात एकत्रितपणे अचानक चित्र विचित्र घटना सुरु होतात ना?'' भूमी

 

 

 

 

''एसपण आत्ता काय विचित्र झालायसांगणारेस का?'' क्षितीज उठून बसलं आणि तिला विचारू लागला.

 

 

 

 

''काही नाही. समजा तर उद्या तुला अपेक्षित नसणारी कोणतीही गोष्ट तुला न सांगता मी केली. तरतुझी काय प्रतिक्रिया असेल?'' भूमी

 

 

 

 

''असं का विचारतेस?'' क्षितीज

 

 

 

 

''सांग नाअसं काहीही झालं तर तू माझ्यावर विश्वास ठेवशीलकिंवा आता जशी मला साथ देतोस तशीच साथ देशील?'' भूमी

 

 

 

 

''होयकाहीही झालं तरीही माझा तुला पाठिंबा असेल. आणि मी नेहेमीच तुझ्यावर विश्वास ठेवेन. प्रॉमिस.'' म्हणत त्याने तिला जवळ घेतले.

 

 

 

 

भूमी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसून राहिली. ''प्रेमात खूप कसौटी द्याव्या लागतात असं ऐकलं होतआपल्या बाबतीत याची सुरुवात झाली वाटलं.'' भूमी बोलत होती.

 

 

 

 

''तू सोबत असशील तर ते हि चालेल.'' क्षितीज

 

 

 

 

''होयनेहेमी असणे.'' भूमी

 

 

 

 

''काय झालं ते सांगशील का आता?'' क्षितीज

 

 

 

 

''झालाय बरच काही त्यातलं महत्वाचं सांगतेमाझं सारखं डोकं दुखत असत त्यासाठी आपण काही टेस्ट केल्या होत्या नात्याचे रिपोर्ट्स आलेत. मायग्रेन ची लक्षण आहेतपण ते थर्ड स्टेजला आहे. वाढण्याआधी ट्रीटमेंट घ्यावी लागेल.'' भूमी

 

 

 

 

''कायकाय बोलतेस?'' तो घाबरला आणि जवळजवळ ओरडला.  ''मग आधी चांगला डॉक्टर बघूया आपण आणि  लवकरात लवकर तुझी ट्रीटमेंट करून घेऊ.''

 

 

 

 

''होयपण चांगली ट्रीटमेंट घ्यायची झाली तर त्यांनी मला एक लंडनचा डॉक्टर सजेस्ट केला आहे. तिथे जावं लागेल बहुतेक.'' भूमी

 

 

 

 

''मग वाट कसली पहातेसमी येऊ का तुझ्यासोबतथिर्ड स्टेप म्हणजे डेंजर असतेनो रिस्क. लवकरच ट्रीटमेंटला सुरुवात कराहायला पाहिजे.'' क्षितीज

 

 

 

 

''होयमला जावं लागेल तिकडे कमीत कमी एक महिना तरी.'' बोलताना भूमी थोडी टेन्शनमध्ये आली होती.

 

 

 

 

''काही हरकत नाहीएका महिन्याचा तर प्रश्न आहे.'' क्षितीज

 

 

 

 

''आणि जास्त दिवस लागले तर?'' भूमी त्याच्याकडे बघत विचारत होती.

 

 

 

 

''तर मी तिकडे येईन तुला भेटायला.'' म्हणत क्षितीज हसला.

 

 

 

 

''नकोमी लवकरात लवकर जाऊन येईन.'' भूमी

 

 

 

 

''एक महिनायार मिस करेन मी तुला...   एक दिवस तुला न पाहत राहवत नाही. एक महिना कसा जाणार ?’’ क्षितीज

 

 

 

 

''म्हणूनच सांगत नव्हतेमग जाऊ कि नकोइथेच ट्रीटमेंट घेता येईल. जायलाच पाहिजे असे काही नाही.'' भूमी

 

 

 

 

''नकोजा तू. माझी मदत लागली तर सांग.'' बोलत क्षितीजने तिला आपल्या जवळ ओढले. ''लवकर बरी हो. आणि परत येमी वाट पाहीन.'' तिला आपल्या मिठीत घेत तो  म्हणाला.

 

 

 

 

त्याच्या मिठीत भूमी शांत उभी होती. तिच्या मायग्रेन बद्दल सगळं खरं असलं तरीहीतिच्या लंडन ला जाण्यामागची करणे वेगवेगळी होती.  तिच्या आयुष्यात अजूनही बऱ्याच गोष्टी घडत होत्या. काय ते तिला माहित होत. पण क्षितिजला आत्ता सांगता येन शक्य नव्हतं. त्याने अजून गैरसमज वाढतील असे तिला वाटले.

 

*****

नाना आणि माईना समजावून तिने आपला लंडनला जाण्याचा निर्णय फिक्स केला. ती किर्लोस्करांची मुलगी आहेहे कळल्यावर नानांना फार बरं वाटलं. कमीत कमी तिच्या अस्तित्वावर शिक्का मोर्तब झाला होता. तिला तिची ओळख पटली होती. आणि एक नवीन ओळख मिळाली होती. विभासच्या प्लॅनमधूनही तिची सुटका होणार होती.

 

 

मायग्रेन विषयी कळताच माईना काळजी वाटू लागली. 'जा परदेशी आणि बरी होऊन लवकर परत ये.असे त्या म्हणाल्या.

 

 

राहून राहून तिला वाईट एकाच गोष्टीचे वाटत होते. 'जेव्हा क्षितिजला कळेल कि ती एक महिन्यासाठी नाही तर कायमचीच तिथे चालली आहे.'तेव्हा त्याला काय वाटेलमला तो चुकीचं तर समजणार नाही नाअसा तिला प्रश्न पडला. त्याला सोडून जाणे तिच्यासाठी खूप अवघड होते. पण नाइलाज होता.’

 

 

 

'निधीला सांगणे अपरिहार्य होतेभूमीने सर्व गोष्टी निधीला विश्वासात घेऊन तिच्या कानावर घातल्या. कोणाला तरी सत्य माहित असायला पाहिजे होते. त्यामुळे खरे आणि क्षितीज पासून लपवून ठेवलेले सगळे निधीला सांगितल्यावर तिला हायसे वाटले.

 

 

''एक ट्रिप तो बनता है. तू लंडनला जाण्याआधी एकदा आपण सगळे पिकनिकला जाऊया ग प्लिज.'' निधी तिला रिक्वेस्ट करत होती.

 

 

''ओकेडन. तू प्लॅनिंग कर. मी नक्कीच येणार.'' भूमी म्हणाली.

 

 

''तुझ्या अशा एकाएकी जाण्याने क्षितिजला खूप वाईट वाटेल. बिचारा हे सहन करू शकणार नाहींग. खूप प्रेम करतो तुझ्यावर.'' निधी

 

 

''माहित आहेत्याला सोडून जाणे मला तरी कुठे शक्य आहे. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही.'' भूमी

 

 

''होयतुझ्या जाण्याने सगळे प्रश्न सुटणार असतील तर तू जा. मी अडवणार नाही.'' बोलताना निधी भावून झाली होती.

 

 

''थँक्स डिअरआणि तू यातलं काहीही क्षितिजला सांगणार नाहीस. प्रॉमिस मी.'' भूमी

 

 

''प्रॉमिस. मी तुला खूप मिस कारेन. तिथे गेल्यावर मला विसरू नकोसरोज फोन करायचा समजलं का?'' निधी

 

 

''थँक्स यार.'' भूमी

 

 

''ए माझ्या आणि नीलच्या लग्नाला येशील नाप्लिज.'' निधी म्हणाली

 

 

''तुम्ही खरंच लग्न करणार आहातआणि संजनाचं काय?'' भूमी

 

 

''नीलने तिला सगळं सांगितलं आहेलग्नामागील सत्य समजल्यावर ती सुद्धा या बंधनात राहायला तया नाही. मुळात ज्यात प्रेमच नाही. अशा नात्याला अर्थ काय?'' निधी

 

 

''ओकेगुड. तिच्या बद्दल वाईट वाटत ग. असो तू मला कळवंयेण्यासारखं असेल तर मी नक्कीच येईन.'' भूमी

 

 

''होयअजून काही राहिली काकि मी निघू आता?'' भूमी

 

 

''हो निघतयारीला लाग. मी पिकनिक प्लॅन करते. आणि तुला कळवते.'' निधी बोलत असताना त्या दोघीही उठून हॉटेलमधून निघाल्या. निधीला बाय करून भूमी टॅक्सिमध्ये बसली. आणि निधी तिच्या गाडीने पुढे निघून गेली.

 

 

*****

'भूमीला क्षितिजच्या आयुष्यातून कायमच दूर करण्यासाठी त्याच्या आईने म्हणजेच मेघाताईनी प्लॅनिंग केले होते. पण त्यांना राहून राहून सारखे वाटत होते कि ते एवढे सहज सोपे नाहीय. तो भूमीला विसरू शकणार नाही. आणि आपल्या सांगण्यावरून ती परदेशी जात आहेहे क्षितिजला समजले तर तो त्यांच्यावर खूप चिडेल. हे त्यांना माहित होते. त्यात मिस्टर सावंत वरचेवर आजारी पडत होतेत्यांच्या अस्थम्याच्या आजाराने त्या चिंतीत होत्या. त्यांच्या चेहेरा चिंताग्रस्त होत चालला होता. क्षितीज घरी आला तेव्हा त्या सोफ्यावर बसून त्याचीच वाट बघत होत्या.'

 

 

''आईतू अजून जागी आहेस?'' क्षितीज त्यांच्या शेजारी बसत बोलला.

 

 

''होयतुझीच वाट बघतेय. जेवलास का?'' मेघाताई

 

 

''हो मी जेवून आलोयतू?'' क्षितीज

 

 

''मी जेवले. तुझे बाबा आजकाल थोडे थकल्या सारखे वाटतात. त्यांना लोड सहन होत नाहीय वाटत. त्यांची काळजी वाटते.'' मेघाताई

 

 

''आईमी त्यांना सांगत असतो थोडा काम मला पण सांगत जापण ते एकटेच सगळं हान्डेल करत असतात. त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीय वाटत.'' क्षितीज

 

 

''तू थोडं लक्ष देत जा आता. त्यांना अस्थमा आहेआता या वयात जास्त दगदग करून चालणार नाही.'' मिसेस सावंत

 

 

''होयमी स्वतः हुन काही गोष्टी माझ्या हातात घेतोमग त्यांना थोडा आराम मिळेल.'' क्षितीज सोफ्यावर आडवा होत म्हणाला.

 

 

''ओकेगुड नाईट. वर जाऊन झोप.'' म्हणत त्या उठून झोपायला निघून गेल्या. क्षितीज उठून त्याच्या रूममध्ये आला आणि फ्रेश होऊन अंथरुणावर पडला. पण झोप लागत नव्हती.  तो भूमीचा  विचार करत होता. आज ती जरा जास्तच इमोशनल होती. न बोलावता स्वतःहून त्याला भेटायला आली होती आणि महत्वाचे म्हणजे तिला मायग्रेन असल्याचे समजल्यावर त्याला तिची काळजी वाटू लागली. आज ती कमालीची शांत होती. तिच्या मनात काहीतरी चाललंय. त्याच्या थांग पत्ता ती आपल्याला लागू देत नाहीये. असं त्याला वाटत होत.

 

 

*****

'निधीने आयोजित केलेल्या पिकनिकला सगळे एन्जॉय करत होते. बीच म्हणजे भूमीचे फेव्हरेट डेस्टिनेशन मग कोणताही असो. त्यामुळे ती मस्त रमून गेली होती. तिच्यासोबत क्षितिजही होता. तो येणार हे भूमीला माहित नव्हते. पण निधीने त्याला कन्व्हेन्स केले. आणि तो त्यांच्या सोबत आला होता. निधीच्या दोन मैत्रिणी सीमा आणि जयश्री तिच्या सोबत होत्या आणि नीलाही. भूमी मात्र प्रत्येक क्षण मस्त मजेत घालवत होती.  जेवढा वेळ क्षितीज सोबत घालवता येईल तेव्हढा वेळ ती त्याच्या सोबत होती.'

 

 

'संध्याकाळी मस्त सूर्यास्त टिपताना दोघेही मऊशार वाळूमध्ये एकमेकांच्या सानिध्यात बसलेले होते. खाली बसलेल्या क्षितिजला टेकून ती ''त्याच्या छातीवर डोकं ठेवून सूर्यास्ताकडे बघत होती. तिच्या भोवती आपले हात गुंडाळून त्याने आपली हनुवटी तिच्या डोक्यावर टेकवली होती. थंडगार वाऱ्याने चौफेर पसरलेले तिचे केस तो आपल्या हाताने सावरत होता.'

''क्षितीजतुला माहित आहेमी लहान असताना पासून मला हे शांत समुद्र किनारे आणि संध्याकाळी नंतर अंधार पडतानाचे निर्भर आकाश पाहण्याची आणि त्याचे निरीक्षण करण्याची खूप आवड होती. पुढे पुढे मी अगदी रात्र रात्र आकाशाकडे डोळे लावून बघत बसायची. माहित नाही कापण मला त्याची प्रचंड ओढ आहे.''

 

 

''होयआणि तुझ्या या वेडापायी मी सुद्धा आजकाल आकाशात टक लावून बसलेलो असतो. तुला चंद्र ताऱ्यांच वेड आहेआणि मला तुझं.'' क्षितीज बोलत होता.

 

 

''प्रेम म्हणजे एक प्रकारचे वेडच.''  भूमी

 

 

''वेळकाळ याचं भान राहत नाही. आजकाल तर कंपनीमध्ये सुद्धा माझं लक्ष लागत नाही. तू जॉब सोडल्या खूप पासून कंटाळा येतो.'' क्षितीज

 

 

''असं करू नकोसपप्पाना काय वाटेल. एकतर आधीच कंपनी लॉस मध्ये आहेकिती मोठमोठे घोटाळे सुरु आहेत.'' भूमी

 

 

''अरे होसांगायचं राहील. दोन दिवसापूर्वीच तो चंदिगढ फ्रॉड पकडला गेला. तू आणि पप्पांची आयडिया सक्सेसफुल झाली.'' क्षितीज आनंदाने तिला सांगत होता.

 

 

''या मागे कोण होतकोणाचं नाव पुढे आलं?'' भूमी

 

 

''मुखर्जी साहेब. दुसरं कोण असणारज्या लॅब मध्ये हस्तक्षर तपासणी साठी दिले होतेतेथील उच्च अधिकाऱ्याला पैसे देऊन मॅनेज करत होतेतेव्हा आपला लोकांनी कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग केलं होत. पोलीस पुढचा तपास करत आहेतसो चंदिगढ केस सोडून अजून त्याने कायकाय घोटाळे केले आहेत हे लवकरच उघड होईल. इट इज जस्ट बीकॉज ऑफ यु.  '' क्षितीज

 

 

''ग्रेटछान झालं. निदान जाता जाता मला कंपनीसाठी काहीतरी करता आलं. पण सरांना शेवटचं भेटताही आलं नाहीययाच वाईट वाटतंय.'' ती चटकन बोलून गेली.

 

 

''शेवटचं का म्हणतेसतू लंडनला जातेस ते हि हेल्थ ट्रीटमेंट साठी हे मी त्यांना सांगितलं आहे. सो तुला वेळ मिळेल तेव्हा भेट त्यांना. तसही लंडनहून आल्यावर भेटता येईल ना.'' क्षितीज

 

 

''होयआल्यावर भेटेन.'' म्हणत ती शांत झाली. आता त्यांना भेटणे शक्य नाही. निरोप घेणेही शक्य नाही हे तिला माहित होते.  आपण इथून जाताना काय काय मागे सोडून जातोयहे आठवल्यावर तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले.

 

 

''भूमीइमोशनल फुल आहेस तू. केवढ रोमँटिक वातावरण आहेआणि तू रडत बसणार आहेस का?'' क्षितीज तिच्याकडे बघत म्हणाला. तशी ती ''सॉरी.'' बोलून तिचे डोळे पुसू लागली. ''तू ना रडताना पण सुंदर दिसते यार.'' म्हणत त्याने तिला आपलाकडे ओढले. ती जवळजवळ त्याच्या अंगावर पडणारा होतीआणि क्षितिजने तिला दोन हातांनी धरून सावरलं होत. तिच्या कमरेभोवती त्याचा हात आला होता. तिच्या अजूनच जवळ जात त्याने तिच्याभोवती आपल्या हाताची पकड  घट्ट केली. तो अगदी तिच्या जवळ आला होता. अगदी श्वासाच्या अंतरावर.  आणि तिने लाजून मान खाली वळवली.

 

 

हाताने तिची हनुवटी वरती उचलली आणि भूमीच्या डोक्यावर क्षितिजने आपलं डोकं टेकवलं. ती डोळ्याच्या पापण्यांची फडफड करत  त्याच्याकडेच बघत होती. तिच्या थरथरत्या ओठांपर्यंत त्याचे ओठ पोहोचले होते. . . तो काय करतोय हे भूमीला समजलं, ''क्षितिज आपण...'' आपण बाहेर आहोत असं ती बोलणार होती एवढ्यात त्याच्या फोनची रिंग झाली. आपल्या उजव्या हाताचे बोट तिच्या ओठांवर ठेवून डाव्या हाताने त्याने फोन उचलून स्पीकर वर टाकला. पलीकडून निधीचा फोन होता. 'अरे कुठे आहेत तुम्ही दोघेरात्र झालीयआम्ही वाट बघतोयपटकन जेवायला या.निधी बोलत होती. ''इथे समोरच आहोत. आलो...'' म्हणत क्षितिजने फोन कट केला. ''बरंतर आपण कुठे होतो.'' म्हणत त्याने मिश्कीलपणे हसत भूमीकडे पहिले.

''कायइथेच होतो आपण. पुरे आता चला. उगाच उशीर नको. म्हणत ती त्याला ढकलून उठली. ''काही उशीर होत नाही. थोड्यावेळाने काय फरक पडतो?'' क्षितिज

त्याला उठवत भूमी म्हणाली. ''उठ ना. थोड्यावेळा काय थोड्यावेळ?''

''थोडावेळ नाहीकिस करायला दोन मिनिट पुरे असतात. हा आता तुला  त्यानंतर सावरायला वेळ लागतो म्हणा. त्यात माझा काय दोष?'' म्हणत तो हट्टीपणाने तिथेच खाली बसून राहिला.

''पुरे हा चावटपणा. चल मी जाते.'' म्हणत भूमी नकट्या रागाने एकटीच पुढे निघाली. तसे तो उठून तिच्या मागोमाग आला. तिच्या खांद्यावर हात ठेवूनत्याने ''रुसूबाई. गंमत केली.'' म्हणत तिचा गालगुच्छ घेतला आणि ‘’हट्टी आहेस तू’’ म्हणत तिने नाक फुगवून त्याला हलकेच एक ठोसा मारला. आणि दोघेही तिथून निघाले.

 

 

सगळ्यांनी वाट बघून जेवायला सुरुवात केली होती. शेवटी जेवणाच्या टेबलवर क्षितिज आणि भूमी पोहोचले होते. निधी लव्ह बर्ड्स म्हणून चिडवू लागली. ''काय मज्जा आहे बुवाकोणीतरी जाणारे तर कोणीतरी तिला सोडायला मागत नाहीये. आम्ही पण आहोत इथे. जरा इकडे पण लक्ष असुद्या.''

 

 

भूमी काहीही न बोलता खाली मान घालून चुपचाप जेवत होती. क्षितीज तिच्याकडे बघून हसला.

 

 

''तुझ्याकडे लक्ष द्यायला आता कोणीतरी आहे म्हंटल.'' क्षितीज नीलकडे बघत म्हणाला.

 

 

आणि निधी हसायला लागली. ''शी इज फ्रीकोणी हि लक्ष् दिले नाही तरी तिला काही फरक पडत नाही.'' निल

 

 

''ए आपण भूमी रिटर्न आल्यावर पुन्हा एकदा अशी ट्रिप काढूया.'' क्षितीज म्हणाला आणि भूमीला जोराचा ठसका लागला. एक पाण्याचा ग्लास घेऊन त्याने तो तिच्या तोंडाला लावला. थोडं पाणी पिऊन ती शांत झाली. तरीही तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागला.

 

 

''सावकाश. आर यु ओके?'' म्हणत क्षितीज तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. तिने आपले डोळे पुसले. ''मी ठीक आहे.'' म्हणत उठून ती बेसिन कडे वळली. निधी व्यतिरिक्त कोणालाही माहित नव्हते. तिच्या परत येण्याच्या अपेक्षा फार कमी होत्या. त्यामुळे क्षितीज बोलला आणि ते ऐकून तिला ठसका लागला. निधी वेळीच भूमीला सावरले आणि ती तिला रूममध्ये घेऊन आली.

''निधी मी जातेय खरंपण क्षितीज स्वतःला नाही सांभाळू शकत. त्याला समजल्यावर खूप त्रास करून घेईल स्वतःला. काय करू?'' एवढं बोलून ती निधीच्या मांडीवर डोकं ठेवून ओक्सबोकसी रडू लागली.

''चिलतू का जातेसआणि त्याने काय होणार आहेहे आपल्याला माहित आहे. दुसरा कोणताही पर्याय नाहीयसो तू जा. आम्ही आहोत क्षितिजला सांभाळायला. अर्थात तुझी उणीव भरून काढता येणार नाही. पण मी आणि निल मिळून प्रयत्न करू.'' निधी तिच्या पाठीवर हात फिरवून तिला समजावत होती.

 

 

थोड्यावेळाने भूमीने स्वतःला सावरले. क्षितीज समोर नॉर्मल केला. त्यामुळे त्याला काहीही समजले नाही. संपूर्ण ट्रीपमध्ये भूमीने त्याला काहीच कळू दिले नाही.

***** 

 

 

मैथिलीला घेऊन तिचे पप्पा एरपोर्टला पोहोचले होते.  नाना आणि माई गावी गेले होते. त्यामुळे भूमीने त्यांना फोन करून निघत असल्याचे सांगितले. सगळी तयारी करून भूमी बाहेर पडली. क्षितीज गाडी घेऊन तिला सोडायला आला होता. खाली येऊन त्याच्या गाडीत बसल्यावर ती शांत होती. तो देखील काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. एकमेकांपासून लांब राहणं त्यांना दोघांनाही शक्य नव्हतं. गाडी पार्क करून त्याने तिची बॅग बाहेर काढली.''बायकाळजी घेआणि लवकर बरी होऊन रिटर्न ये.'' क्षितीज म्हणाला.

 

 

हातात बॅग घेऊन ती तिथेच थांबली होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते. ''तू स्वतःची काळजी घे. आणि कंपनीमध्ये लक्ष देत जा.'' भूमी

 

 

''येसनिघ तू फ्लाईटचा टाइम झाला आहे. चेकइन ला वेळ जातो.'' म्हणत क्षितीज मागे वळला. आणि भूमी पुढे निघाली. दोन-चार पाऊल पुढे जाऊन ती पुन्हा मागे धावत आलीतो पाठमोरा उभा होताती तशीच त्याला मागूनच त्याला बिलगली.

''सो सॉरी क्षितीजमी तुला खूप मिस करेन.''

 

 

''सॉरी काय गतुला ट्रीटमेंट ची गरज आहेसो तू जा. आणि मिस करशील तेव्हा कॉल करत जाफोन आहेच आपण बोलू शकतो.'' म्हणत क्षितीजने समोर उभे करत तिला  मिठी मारली. ती फक्त रडत होती. ''या वेडाबाईआता माझा शर्ट भिजवायचे प्लॅनिंग आहे का?किती रडतेस. शांत हो.''  म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस करत लाडाने तिचे दोन्ही गाल आपल्या हातात पकडले. तसे तिने डोळे पुसले. ''काळजी घेआणि मला परतायला उशीर झाला किंवा अजून काहीही झालंहे तुला अपेक्षित नसेलतर स्वतःला त्रास करून घेऊ नको. आपण एकमेकांसोबत असणे किंवा नसणे हा निव्वळ योगायोग आहेजे नशिबात असेल ते होणार. ते एक्सेप्ट करूया.ओके?''  ती त्याच्या कॉलर वरून हात फिरवत म्हणाली.

 

''एसएकमेकांचा नशिबात तर आपण आहोतचबी कॉज स्टार्स विथ अस. आणि ज्या स्टार्स नी आपली भेट घडवून आणली आहे ना ते नेहेमीच आपल्याला एकत्र ठेवतीलआपण कितीही दूर गेलो तरीही. सो डोन्ट वरी.'' क्षितीज

 

''आपलं प्रेम म्हणजे आपल्याला मिळालेलं त्या स्टार्सच गिफ्ट आहेआपल्याला मिळालेलं नक्षत्रांच देण आहेते कायम अबाधित असेल. सेम लाइक स्टार्स.''

म्हणत भूमीने त्याच्या हातावर हलकेच आपले ओठ टेकवले आणि त्याच्या निरोप घेतला. ती में गेटच्या दिशेने निघाली. आणि क्षितीज तिच्याकडे मागे वळून न बघता आपल्या गाडीकडे वळला. तिला आपल्या पासून डर जाताना बघणं त्याला शक्य नव्हतं. ती कायमचीच आपल्या पासून दूर जाते हेही त्याला माहित नव्हतं. ती लवकरच परतणार या आशेवर तो गाडीत बसून घराकडे निघाला.

क्रमश

https://siddhic.blogspot.com/

नक्षत्रांचे देणे ४०


 ''हॅलो भूमी कुठे आहेस? काल ठरल्याप्रमाणे नाना-माईंना घेऊन तू इथे होतीस.'' क्षितीज भूमीला फोनवर विचारत होता. पत्रकार आलेले होते. भूमीच्या लग्नाचे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी नाना आणि माई तिथे उपस्थित राहणार होते. पण भूमी अजूनही तिथे पोहोचलेली नव्हती.

 

 

 

 

''मला शक्य होणार नाहीय. बहुतेक.'' पलीकडून भूमी बोलत होती.

 

 

 

 

''काकाय झालंमी घ्यायला येऊ का?'' क्षितीज

 

 

 

 

''नको. माई आणि नाना पोहोचतील एवढ्यात. मी प्रयत्न करते. जमेल का माहित नाही.'' भूमी

 

 

 

 

''ओकेनानांना तरी पुढे येउ देत. नाहीतर फार गोंधळ होईल. आणि मला इथे सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागेल.'' क्षितीज

 

 

 

 

''होते आले असतील बघ. बाय. कॉल यु लेटर.'' म्हणत तिने फोन ठेवला.

 

 

 

 

'नाना आणि माई तिथे पोहोचले होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी उत्तरही दिले. भूमीची विभासने केलेली फसवणून आणि मुळातच अमान्य असलेलं त्यांचे लग्न आणि त्याचे सत्य जगासमोर आले होते. त्यामुळे क्षितीज खूष होता. पत्रकार निघून गेले आणि नाना माईना गाडीमध्ये बसवून क्षितीज कंपनीमध्ये निघाला. भूमीला एवढे  काय महत्वाचे काम होतेयाचा विचार तो करत होता.

 

 

 

 

इकडे भूमी आश्रमात आली होती. तिथे तिला खूप महत्वाची गोष्ट समजली होती. ते समजल्यानंतर तिला शॉक बसला. ती तशीच घरी निघाली. एक पेच संपतो न संपतो तो दुसरा पेच समोर येऊन उभा राहत होता.  परिस्थितीला कसे समोर जावे हेच तिला कळेना. sk ग्रुप ने तिचा राजीनामा मान्य केला होता. त्यामुळे तिच्या हातचा जॉब हि गेला होता. आणि आत्ता पुन्हा त्या कंपनीत जाणे तिला शक्य नव्हते. क्षिती बरोबर बोलून गोष्टी सुटल्या असत्या पण तिने तसे केले नाही. कारण हि तसेच होते.

 

 

 

 

*****

 

इकडे ऑफिसमध्ये आल्या आल्या क्षितिजला एक नवी बातमी समजली. दोन दिवसांपूर्वी मैथिली शुद्धीवर आली होती. ती कमरेखाली अपंग झाली होती. पण तिला शुद्ध आली होती. हे समजल्या वर त्याने हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिथे डॉक्टरांशी बोलणे झाले. मैथिली  शुद्धीवर आली होती.पण तिची स्मृती निघून गेली होती. ती कोणालाही ओळखत नव्हती. त्यात शाररिरीक अपंगत्व घेऊन. त्यामुळे सगळे टेन्शनमध्ये होते. क्षितिजला मनातून खूप खजील झाल्यासारखं झालं. त्याच्या अपेक्षे प्रमाणे ती मरणाच्या दारातून परतली होती. पण आता हे शारीरिक आणि मानसिक अपंगत्व कोणाच्यानेही सहन होण्यासारखे नव्हते. तिची स्मृती परत येण्याची शक्यता होती. पण या अपंगत्वातून तिची सुटका अटळ आहेअसे डॉक्टरांनी सांगितले. तिच्याकडे बघताना क्षितिजचे डोळे अचानक भरून आले. एक मैत्रीण एक चांगली हुशार सहकारी म्हणून तिचे त्याच्या मनातील स्थान अढळ होते. तिथून परतताना भूतकाळातल्या कितीतरी गोष्टी कित्त्येक आठवणी त्याच्या डोक्यात फेर धरून नाचत होत्या. काही चांगल्या काही वाईट पण आठवणी विसरणे त्याला शक्य नव्हते. तो अगदी निराश होऊन घरी परतला.

 

 

 

 

*****

 

क्षितिजच्या आईने त्याला घरी पहिलेतो कमालीचा निराश होता. मैत्रीलीच्या शुद्धीवर येण्याची बातमी त्यांना समजली होती. त्यांनाही तिच्या अपंगत्वाबद्दल वाईट वाटले.  असे आयुष्य देवाने का द्यावे असा प्रश्न पडला. त्यांनी क्षितिजला समजावले पण तो निराशाच होता.

 

 

 

 

फ्रेश होऊन तो जुन्या आठवणी आणि आपला भूतकाळ यांचा विचार करत बसला होता. खूपदा फोन ट्राय करूनही  भूमीने रिप्लाय देत नव्हती. कंटाळून तो तयार झाला आणि काइट्स माउंटनच्या दिशेने निघाला. निराशेमध्ये आपले मन रामवण्याचे त्याचे एकमेव आवडते ठिकाण.

 

 

 

 

*****

 

 

 

 

'सगळ्या लीगल फॉर्मेलिटीज कम्प्लिट झाल्या होत्या. भूमीने किर्लोस्कर आणि इतर मदतनिसांचा निरोप घेतला आणि ती निघाली. तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी महत्वाची घटना आज घडली होती. आश्रमाने मध्ये तिला अचानक बोलावणे आले आणि ती तडक तिकडे गेली. आश्रमातील महत्वाच्या अधिकाऱ्यांनी तिला तिच्या अस्तित्वाचा मागोवा घेणारी एक महत्वाची फाइल दाखवली. ती आणि तिच्या आईचे फोटोतिच्या बाबांचे फोटो आणि तिच्या जन्मदाखला. तिची आई तर तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. पण तिचे बाबाही देवाघरी गेल्याचे तिला सांगण्यात आले होते ते साफ खोटे होते. तिच्या बाबांची दुसरी पत्नी म्हणजे तिची आई. पण हे त्यांचे गुपचूप झालेले लग्न. प्रेमविवाह होता आणि मुळातच त्यांची पहिली पत्नी हयात होती.  त्यामुळे घरून मान्यता नव्हतीत्यामुळे भूमी आणि तिच्या आईला कोणीही स्वीकारले नाही. आपल्या लहानग्या मुलीला घेऊन भूमीच्या आईनी भूमी सहा महिन्यांची असतानाच सासर सोडले. त्यांचे नाव आणि आडनावही आपल्या नावातून काढून टाकले. भूमीला त्यांच्याबद्दल काहीही माहित कळणार नाही अशी व्यवस्था केली. तिचे बाबा तिच्या लहानपणीच देवाघरी गेले आहेत असे तिला सांगण्यात आलेपण तसे नव्हते. ते त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर शहरात राहत होते. त्यांना एक मुलगीही होती.'

 

 

 

 

'दुसरे तिसरे ते कोणीही नसून खुद्द sk ग्रुपचे सेकेंड ओनर कोर्लोस्कर तिचे वडील होते. हे तिला आश्रमात आल्यावर समजले. तेही एवढ्या उशिरा समजण्याचे कारण म्हणजे किर्लोस्करांची एकुलती एक मुलगी आणि त्यांचा एकुलता एक वारस आता असून नसल्यासारखा होता. मैथिलीची अवस्था समजल्यावर किलरोस्करांच्या पायाची जमीन सरकली. आता त्यांना कोणीही वारसदार नव्हतेत्यात त्यांना हृदयविकाराने ग्रासले होते, SK ग्रुप कंपनी हाताची जाण्याची जाण्याची शक्यता होतीहे ओळखून काही दिवसांपूर्वीच किर्लोस्करांनी आपल्या पहिल्या पत्नीचा आणि मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केला होती. आणि आज त्यांच्या शोध त्या आश्रमात येऊन थांबला होता. भूमीच त्यांची मुलगी असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले होते.'

 

 

 

 

आश्रमातील मदतनीसांनी तिला सगळे पूरावे दाखवले. एवढ्या लहानपणी पासून पोरके म्हणून आश्रमात वाढलेली भूमी,जेव्हा तिला गरज होती तेव्हा कोर्लोस्करांना तिची आठवण आली नाहीआता आपली मुलगी म्हणजेच मैथिली केव्हाही पूर्णपणे बरी होऊ शकत नाही हे त्यांना समजले तेव्हा त्यांनी भूमीचा शोध सुरु केला होता. त्यामुळे त्यांच्या विषयी भूमीला काहीही प्रेम माया वाटत नव्हती. मैथिलीची अवस्था काय आहेहे समजल्यावर तिला वाईट वाटले. कारण तिचा यामध्ये काहीही दोष नव्हता. त्यात किर्लोस्करांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेल्याचे समजल्यावर ती त्यांना भेटायला तयार झाली. तिची भेट कोर्लोस्करांशी झाली.  त्यांच्या कुटूंबाला आणि कंपनीला भूमीची गरज होती. नाही म्हणणे तिला शक्य नव्हतेत्यामुळे तिने फक्त व्यावसायिक दृष्टया त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि ती तिथून निघाली.

 

*****

 

 

'सकाळी क्षितिजच्या आईशी फोनवर बोलणे झाले होतेत्या भूमी बद्दल फारशा सकारात्मक नव्हत्या. असे दिसले आणि महत्वाचे म्हणजे 'माझा मुलगा तुझ्यामुळे माझ्यापासून लांब गेला आहे त्यामुळे क्षितिजच्या आयुष्यातून तू निघून जा.अशी त्यांनी भूमीला विनंती केली होती. त्यामुळे तिने खूप महत्वाचा निर्णय घेतला होता. ज्याने सगळ्यांचेच प्रश्न सुटणार होते. किरालोस्कराना भेटून आल्यावर तिने आपला निर्णय पक्का केला. 'तिच्याकडे थोडेच दिवस शिल्लक होते त्यामुळे ती क्षितिजला भेटायला गेली. क्षितिजला समजावणे हा तिच्यासाठी महत्वाचा टास्क होता.'

 

 

 

*****

 

'काइट्स माउंटन वर येऊन क्षितिज वर आकाशाकडे टक लावून बसला होता. आज त्याला टेबल बुक करावेसे वाटेनातो तसाच हिरव्यागार गवतावर पहुडला होता. मूड खराब असला तरीही प्रसन्न करणार वातावरण होत. संध्याकाळी अस्ताला गेलेला सूर्य आणि अर्धवट चमकणारा चन्द्र यांच्यामध्ये लुकलुकत आपले अस्तित्व शोधणारे तारे तो आपल्या डोळ्यानी टिपत होता. हळूहळू त्याने आपले डोळे मिटले आणि तो फक्त शांतपणे पडून राहिला. थोड्यावेळाने त्याला त्याच्या डोक्यावर हलकेच थंड असा स्पर्श झाल्याचे त्याला जाणवले.  त्याने डोळे उघडले. भूमी त्याच्या बाजूला बसून त्याच्याकडे बघत होती. तिने आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवून हलकेच एक चुंबन घेतले होते. तो तिला बघून उठण्याचा प्रयत्न करू लागलाअन तिने त्याच डोकं आपल्या मांडीवर ठेवून त्याला तसच खाली हिरव्या गवतावर पडून राहायला सांगितलं.

 

''थँक्स हनी.'' म्हणूं त्याने तिचा हात हातात घेतला.

 

 

 

 

''कशाबद्दल?'' भूमी त्याच्याकडे बघत विचारत होती.

 

 

 

 

''इथे आलीस म्हणून. आज खूप अस्वस्थ वाटतंय. कुठेही अजिबात मन नाही लागत. तुझीच आठवण येत होतीतर मॅडम फोन नाही घेत. कॉलबॅक सुद्धा नाही करत.'' क्षितीज

 

 

 

 

 

मंगळवार, १ मार्च, २०२२

नक्षत्रांचे देणे ३९

 


''तू माझ्या आयुष्यात येण्याआधी मैथिली होती. ती खूप चुकीचं वागली तरीही मी तिच्याशी प्रामाणिक होतो, कारण माझ्यासाठी प्रेमाची व्याख्याच वेगळी आहे. त्यात मी माझं कर्तव्य सोडत नाही. तू मागितलं नाहीस तरीही माझं वचन आहे तुला. काहीही झालं तरीही, जिथे असू तिथे आपण एकत्रच असू.''  क्षितीज

 

''थँक्स. माझी आई म्हणायची, 'दूर कुठून, त्या नक्षत्रातून तुला न्यायला कोणी राजकुमार येणार.'  तू आमच्या सोबत आल्यावर तो काय एकटाच राहणार इथे. तू त्याच्या सोबत राहा.' विभास आयुष्यात आल्यावर आईच्या गोष्टी स्वप्नवत वाटायला लागल्या. पण आज वाटतं, त्या दूरवरच्या नक्षत्रांनी तुला माझ्यासाठी बनवलं  असणार किंवा मला तुझ्यासाठी.'' भूमी वर आभाळाकडे बघत म्हणाली.

 

''नक्षत्रांचा माहित नाही, माझा तेवढासा विश्वास नाहीय, पण योगायोग मात्र आहे. आपल्या बाबतीत सगळं योगायोगाने जुळून आलं आहे. तो अपघात, तुझं ऑफिस जॉइनिंग आणि काइट्स माऊंटनला आईने ठरवलेली आपली भेट. माझ्या आईचा यात खूप महत्वाचा वाट होता.'' क्षितीज

 

''विभास आणि नंतर साठे काकांनी त्यांना जे सांगितलं त्यामुळे तुझ्या आईचं खूप मोठा गैरसमज झालाय. इथे गावी आणि आमच्या नातलगांना खरं काय हे काहीच माहित नाहीय त्यामुले असं झालं.'' भूमी

 

''फोटोग्राफरने सुद्धा पुरावे दिले म्हणून आई चिडली.'' क्षितीज

 

''होय, पण ते खरच आहे ना. पुरावे खरे आहेत. समाजाच्या दृष्टीने अजूनही मी नानांची सून आणि विभासची पत्नी आहे. हे नाकारता येत नाही.'' भूमी

 

''त्यांना खरं काय ते सांगायला हवं ना मग. नाहीतर हे असेच प्रॉब्लेम्स पुन्हा-पुन्हा होत राहतील.'' क्षितीज

 

''हो. नाना सगळ्यांना सांगणार आहेत.'' भूमी

 

''मला आधी समजलं असत कि तुला या सगळ्या गोष्टी माहित आहेत, तर मी एवढ्या तातडीने इकडे आले नसते.'' भूमी पुढे बोलत होती.

 

''यासाठी कॉम्युनिकेशन असावं लागत, तू काहीही न सांगता निघून आलीस, प्रॉमिस यापुढे असं करणार नाहीस.'' क्षितीज तिच्या हात आपल्या हातात घेत म्हणाला.

 

''प्रॉमिस.'' म्हणत ती हसली. कितीतरी वेळाने तिला असं हसताना पाहून त्याला बरं वाटलं.

 

''तू अशीच खुश राहा, हसत राहा. बाकी घरी आईला वेगैरे काय समजवायचं ते मी बघतो.'' क्षितीज

 

त्या दोघांच्या काही वेळ गप्पा रंगल्या होत्या. मध्यरात्र केव्हा उलटून गेली दोघांनाही माहित नव्हतं. ते दोघे बोलत असतानाच नाना उठून बाहेर आले होते. त्याच्याकडे पाहून नानांनी ओळखले कि तो क्षितीज सावंत आहे. ज्याच्याबद्दल भूमीने त्यांना सांगितले होते. तरीही भूमीने नाना आणि क्षितीज यांची ओळख करून दिली. विभास बद्दल सकाळी झालेला प्रकार भूमीने क्षितिजच्या कानावर घातला होता. थोडक्यात विभासची प्रतिमा क्षितिजच्या डोळ्यासमोर उभी राहिली.

 

'लहान असताना साठे कुटुंबीयांनी आश्रमातून भूमीला दत्तक घेतले होते. त्यामुळे तिच्या नावापुढे साठे हे आडनाव लागले. तिने अर्धवेळ काम करून स्वतःचे   शिक्षण पूर्ण केले होते. डिग्री पूर्ण करून चांगलया नोकरीला लागली. माई-नानांचा तिच्यावर एवढा जीव होता कि, नंतर परदेशी असलेल्या आपल्याच मुलाच्या म्हणजेच  विभासच्या लग्नाचा विचार करताना त्यांनी भूमी पहिली पसंती दिली. आणि तिचे विभास बरोबर लग्न लावून दिले. पण हे लग्न होताच कायद्याच्या दृष्टीने अमान्य ठरलं. कारण विभास आधी पासून विवाहित होता. तिची झालेली फसवणूक आणि नंतर तिने आपल्या भविष्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल.'या क्षितिजला समजल्या होत्या. सगळ्या गोष्टी क्षितिजला समजल्या होत्या.'

नानांनी त्याला महत्वाचे असे सगळेच सांगितले होते. थोडंफार बोलणं झाल्यावर त्या दोघांनाही झोपायला सांगून नाना त्यांच्या रुममध्ये निघून गेले. 

 

'भूमिकची डोकेदुखी, मध्येच होणारी चिडचिड आणि बदलणारा स्वभाव कशामुळे आहे हे क्षितिजच्या लक्षात आले होते. सकाळी घरी आई-पपांना फोन करून सगळ्या गोष्टी कानावर घालायच्या असे त्यांनी ठरवले. पाहुण्यांसाठी असलेल्या खोलीत त्याच्या झोपण्याची सोया करून भूमी झोपायला निघून गेली.

 

*****

'सकाळी क्षितिजने घरी फोन करून सगळे इत्यंभूत कानावर घातले होते. नानांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल सांगितल्यानंतर बऱ्यापैकी गैरसमज दूर झाला होता.'

'नाही म्हंटल तरीही मेघाताईंना हे लग्नाचे कोडे पटलेले नव्हते. विभास आधी लग्न झालेले असले तरीही भूमीचे आणि विभासाचे लग्न झाले ना. मग लग्नाच्या विधी तर असणारच, मग कायद्याच्या दृष्टीने त्याला मान्यता दिली तरीही लग्न ते लग्नच. उघडपणे त्या क्षितिजला काहीही बोलत नसल्या तरीही त्यांचे संस्कारी आणि प्रतिगामी विचाराचे डोके हे लग्न अमान्य आहे हे मानायला तयार नव्हते. विभास आणि भूमीचा नवरा-बायको म्हणून काही संबंध आला असेल तर? अशी मुलगी आमच्यासारख्या घरंदाज लोकांची सून म्हणून येणार? ती अनाथ असणे वैगरे ठीक होत पण हे लग्नाचं गूढ त्यांना पटलेले नव्हतं. असल्या नको त्या विचाराने त्यांच्या मनात भूमीविषयी दूषित विचाराने जागा घेतली होती.   'उगाच आपण पुढाकार घेऊन त्या दोघांनाही काइट्स माऊंटनला भेट घडवून आणली. नाहीतर हे पुढे काही घडलेच नसते.' असे त्यांना वाटू लागले. पण आत्ता क्षितिजच्या पुढे त्यांचे काही चालेना.'

'विभासने कालवलेले विष भूमीच्या आयुष्यात पसरायला लागले होते. ती ठिणगी वणव्याची रूप धारण करायला पुरेशी होती.'

 

'आत्ता भूमीच्या दृष्टीने नाना-माईनाइथे गावी ठेवणे योग्य नव्हते. विभास इथे येऊन त्यांना त्रास देण्याची शक्यता होती. त्यांच्या जीवाला धोका आहे हे ओळखून भूमी त्या दोघांना घेऊन शहरात यायला निघाली. क्षितिजही सोबत होता.

 

'गोष्टी सावरत आहेत. असे वाटत असतानाच विभासने अजून एक कारस्थान रचले. त्याच्या सांगण्यावरून सकाळच्या न्यूज पेपरला त्याचे आणि भूमीचे लग्नाचे फोटो छापून आले होते. 'बिझनेसमॅन संजय सावंतांची होणारी सून आधीपासूनच विवाहित.' अश्या हेडींगने अनेकांचे लक्ष वेधले. SK ग्रुपच्या  शत्रूंना आयतेच कोलीत सापडले होते. त्यामुळे सर्वत्र सावंत फॅमिली आणि भूमीवर चिखलफेक सुरु झाली होती. भूमी शहरात पोहोचे पर्यंत या बातमीने गोंधळ उडाला होता.'

 

'संध्याकाळी घरी आल्यावर मेघाताईंनी क्षितिजला हि बातमी दाखवली. त्याला धक्का बसला. न्यूजवाल्यांशी संपर्क साधून त्याने माहिती काढायला सुरुवात केली. साहजिकच त्याने ओळखले विभास शिवाय हे कोण करणार?'

 

'हे भूमीला समजल्यावर तिचे अवसान गळून पडले. एक गोष्ट सावरली तर विभासने नवीन डाव रचला होता. नानांची संपत्ती मिळवण्यासाठी तो वाट्टेल त्या थराला जायला तयार होता.'

 

'भूमीबद्दल आधीच शासंक असलेल्या मेघाताईंच्या मनात अजून नकारात्मक भावना निर्माण झाली. लग्नाच्या आधीच या मुलीने आमच्या आयुष्यात वादळ निर्माण केले आहे, नंतर काय होईल? खरंखोटं काहीही असो, पण हि मुलगी क्षितिजच्या आयुष्यात यायला नको. असे त्यांनी मनाशी  पक्के ठरवले.

 

*****

 

 

''हॅलो भूमी कुठे आहेस? काल ठरल्याप्रमाणे नाना-माईंना घेऊन तू इथे होतीस.'' क्षितीज भूमीला फोनवर विचारत होता. पत्रकार आलेले होते. भूमीच्या लग्नाचे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी नाना आणि माई तिथे उपस्थित राहणार होते. पण भूमी अजूनही तिथे पोहोचलेली नव्हती.

नक्षत्रांचे देणे ३८



 'संध्याकाळ झाली तेव्हा निधीने नानांच्या मोबाइलवर फोन केला होता. क्षितीज भूमीला शोधात गावी येईल निघाला आहे, हे समजल्यावर नानांनी ताबडतोप भूमीला त्याला फोन करण्यासाठी सांगितले. भूमीचा फोन अजूनही बंद होता. तिने तो चालू केला आणि क्षितिजला फोन लावला. आता त्याचा फोन बंद येत होता.'

 

काय करावे हे भूमीला कळेना. 'तिथून निघताना मी फोन करत होते, तो त्याने उचलला नाही. आणि आता तो गावी का येतोय? त्याला जर विभास बद्दल सगळे कळले आहे तर त्याचा गैरसमज होणे साहजिकच आहे. मग एवढ्या लांब येण्याचे कारण काय? मला जाब विचारायला?'  एक ना अनेक प्रश्नांची सरमिसर तिच्या मनात सुरु होती. त्याच्या घरी कोणाला फोन करणे आता शक्य नव्हते. ते लोक रिप्लाय करतील असे तिला वाटत नव्हते.  आधीच विभासमुळे घरी घडून गेलेला प्रसंग आणि आता हे, त्यामुळे ते तिघेही चिंतेत होते.'

 

'नाना-माईना बळेच थोडं जेवायला देऊन ते झोपले, तिला काही खाण्याची इच्छा होईना. रात्र झाली तरीही क्षितिजचा फोन लागेना. झोप उडाली होती. आपण घाई करून निघायला नको होत. क्षितिजला सांगायला पाहिजे होत. असं तिला वाटू लागलं. तो आता कुठे असे? एवढ्या लांब शहर सोडून गावी एकटाच येतोय. तेही नवीन ठिकाणी. अजून का पोहोचला नाही? तिला कळेना. तिने पुन्हा फोन ट्राय केला. रिंग वाजत होती. पण कोणताही रिस्पॉन्स नव्हता. तिने पुन्हा-पुन्हा ट्राय केले. जवळपास अर्ध्या तासाने पलीकडून क्षितिजने फोन उचलला होता. ''दार उघड, मी बाहेर आहे.'' एवढेच बोलून त्याने फोन ठेवला. भूमीने धावत  जाऊन दरवाजा उघडला. पाहते तर गाडी बाहेर लावून क्षितीज तिच्याच दिशेने येत होता. त्याला बघून तिला हायसे वाटले.'

 

तो शांतपणे येऊन तिच्यासमोर उभा राहिला. काय बोलावं तिला सुचेना. तो सुखरूप आहे, आणि व्यवस्थित घरी पोहोचलाय हेच तिच्यासाठी फार होते. तोंडातून एकही शब्द फुटतं नव्हता. ती फक्त समोर बघत तशीच उभी राहिली.

''मी अगदी व्यवस्थित आहे. रस्त्यामध्ये गाडी दोन वेळा पंक्चर झाली, त्यामुळे लेट झालं.''  भूमीने न विचारातही क्षितिजने तिच्या अबोल प्रश्नांची उत्तरे दिली होती.

 

''सॉरी. कितीदा फोन ट्राय केला. का उचलला नाहीस?'' भूमी 

 

''तुझ्यासारखं फोन बंद करून तरी नाही ठेवत ना? आता समजलं फोन कशासाठी असतो ते.'' क्षितीज

 

''निघण्यापूर्वी मी तुला फोन ट्राय केला होता. तू नाही घेतलास.'' भूमी त्याला समजावत होती.

 

''ड्राइविंग करत होतो. अशावेळी मी फोन नाही घेत. तुला माहित आहे. मग फोन स्विचऑफ करण्याची काय गरज होती?'' क्षितीज

 

 

''तेव्हा घडलेल्या प्रकारामूळे काय करावं मला सुचेना. मी डिस्टर्ब होते. आणि मला वाटलं तू पण माझ्यावर रागावला असशील. सो.... '' बोलताना भूमीच्या पाणी जमा झालं होत. अगदी निकराने प्रयत्न करूनही तिला ते लपवता आलं नाही. क्षितिजच्या  गोष्ट सुटलीही नाही.  तिच्या चेहेरा स्वतःच्या ओंजळणीत घेतला. ओघळणारे अश्रू पुसून त्याने तिला जवळ घेतलं. '' शांत हो. मी का रागवेन तुझ्यावर? तुझी यात काहीच चूक नाही. तिचा गैरसमज झाला. कारण तिच्यासमोर पुरावे होते.''

 

 

''मी हि गोष्ट आधी सांगायला पाहिजे होती. आधी तुझ्या कानावर घालायला पाहिजे होती. मी प्रयत्नही केला होता पण राहून गेलं.'' भूमी

 

 

''काही राहून गेलं नाही. मला सगळं आधीपासूनच माहित होत. आत जाऊया, एवढ्या रात्री इथे बाहेर बरं दिसत नाही.'' क्षितीज तिला म्हणाला.

 

 

''सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. तू आत ये ना. फ्रेश हो, मग बोलूया आपण.'' भूमी त्याला घेऊन आतमध्ये आली.

 

 

''नको इथेच अंगणात थांबतो, तुझे नाना- माई असतील ना?'' क्षितीज

 

''त्यांना कल्पना आहे तू येणार ते. आत्ताच ते झोपालेत, नाही उठवलं तरी चालेले, ये आत. मो पाणी आणते.'' म्हणत भूमी आत जायला वळली. क्षितिजही आतमध्ये गेला.  

 

*****

 

फ्रेश होऊन, थोडं खाऊन ते दोघेही अंगणात बसून बोलत होते.

''तुला माझ्या आणि विभासच्या लग्नाबद्दल कसं काय माहित?'' भूमी विचारत होती.

 

''चंदीगढला असताना तुझ्या अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मी तुझ्या रूममध्ये आलो होतो, तेव्हा तू फोनवर माईंशी बोलत होतीस. आठवतंय? रूमचा दरवाजा चुकून उघडच राहिला होता. फोनवर बोलून झाल्यावर तू स्वतःशीच बडबड करत राहिलीस. आणि तुझ्या आणि विभास बद्दल सगळं बोलून गेलीस. तेव्हाच मी हे ऐकलं होत.'' क्षितीज

 

''तुला आधीपासूनच माहित होत हे?'' क्षितीज

 

''होय, पण माझ्यासाठी हि गोष्ट फार महत्वाची कधीच नव्हती. त्यामुळे मी तो विषय तुझ्यासमोर काढला नाही. आणि तुला याचा किती त्रास होत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे  तू सांगण्याचा प्रयत्न केलास तेव्हा टाळाटाळ केली.'' क्षितीज

 

''आणि तरीही तू ...''

भूमी काय बोलणार हे क्षितिजला माहित होत तिला थांबवत तो म्हणाला. ''बघ, लग्न म्हणजे एक टॅग असतो, त्यापलीकडे काहीही नाही. मग ते लग्न करून त्या नवरा-बायकोमध्ये काय नातं आहे? काय गोष्टी घडतात? का लग्न होऊनही ते विभक्त आयुष्य जगतात? याचा विचार लोक करत नाहीत. लग्न झाल्यावरही काही नवरा-बायकोमध्ये लग्नाचा कोणताही संबंध नसतो. तरीही लोकांच्या दृष्टीने ते लग्नच. आणि त्याच्या उलट लग्न न करता एखाद प्रेमी जोडप आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडून जवळ आलेले असतं. लग्न न करताही त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचे संबंध असतात. पण लोकांना हि गोष्ट माहीतच नसते. भविष्यात तो मुलगा किंवा मुलगी दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करून आपापले वेगळे मार्ग निवडता. पण यावर कोणीही  आक्षेप घेत नाही. कारण हा आपला समाज आहे.''

 

''बरोबर, पण या गोष्टीचा तुझ्यासारखा अश्या वेगळ्या पद्धतीने विचार करणारे खूप कमी असतात.'' भूमी

 

''असतात ना. पण बोलून दाखवण्याचं किंवा काबुल करण्याचं धाडस कोणामध्ये नसत. माझं आणि मैथिलीच्या अफेअर होत. आमच्यामध्ये काय गोष्टी घडल्यात किंवा आम्ही किती मर्यादा ओलांडल्या होत्या. यावर तू मला कधीच काहीही प्रश्न विचारला नाहीस. तुला आपलं नातं सुरु करताना माझा भूतकाळ मध्ये आणावा असं नाही वाटलं. त्याला तू तेवढं महत्व नाही दिलंस. म्हणजेच असा वेगळा विचार करणारी माणस असतात.'' क्षितीज

 

''लग्न होऊनही विभासची बायको न झालेली मी, आणि लग्न न करत मैथिलीच्या जोडीदार झालेला तू, काय भूतकाळ आहे ना आपला. किती फरक असतो ना नात्यांमध्ये. दोन वेगळ्या नात्यांची वेगळी भाषा आहेत.'' भूमी

 

''राग मनू नको पण, मला लग्न वगैरेवर काही विश्वास नाहीय. आयुष्यभर एकमेकांची साथ महत्वाची, एकनिष्ठता महत्वाची आणि विश्वास महत्वाचा. नाहीतर तीन वेळा लग्न करूनही एकटीच राहणारी माझी आज्जो बघ. तिच्या आयुष्यात कधीच खुश नाही. तरीही अजून चोथ्या लग्नाच्या तयारीत आहे.'' क्षितीज

 

''विश्वास माझा पण नाहीय, होता, विभासने त्याची व्याख्याच बदलून टाकली. पण होय, सगळ्यांच्या बाबतीत होत नसले तरीही, समाजात समाधानाने जगायचं असेल तर बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनून राहणं अवघड असत, लोक जगू देत नाहीत.  त्यापेक्षा रोज एकमेकांच्या चुका काढत, मर-झोड करत आला दिवस ढकलणाऱ्या नवरा-बायकोला जास्त मन मिळतो इथे.'' भूमी

 

''डोन्ट वरी, आय प्रॉमिस यु. आपलं लग्न झालं तरीही आणि नाही झालं तरीही हे असं काहीही आपल्यामध्ये होणार नाही.'' क्षितीज

 

''जे नशिबात असेल ते होईल. जन्मजात भाळी लिहिलेले नक्षत्रांचे देणे असते, ते आपल्याला मिळणारच. ना कोणते बंधन, ना कोणता करार, ना शपथ, मला फक्त तुझी साथ हवीय, मग ती कोणत्याही परिस्थितीत असो.'' भूमी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली. 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...