गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

नक्षत्रांचे देणे ५३ (शेवटचा भाग)

 ''मैथिली शुद्धीवर आली आहे? कशी आहे ती?'' भूमी त्यांना विचारत होती.

 

''मी अगदी व्यवस्थित आहे. फक्त चालत येत नाही. एवढंच. पण ती माझ्या कर्माची फळ आहेत. क्षितिजला फसवलं होत, आता भोगतोय.'' म्हणत व्हील चेअर वर बसून एक मदतनिसांच्या साहाय्याने मैथिली आतमध्ये लग्न मंडपात येत होती. तिला बघून क्षितीज आणि भूमी दोघेही स्टेजवरून उतरून तिच्या जवळ आले.

 

''तू बरी झालेस. विश्वास बसत नाही.'' भूमी

 

''मैथिली पुन्हा तुला बोलताना पाहून माझ्या मनातील गिल्ट कमी झालाय. लवकर स्वतःच्या पायावर उभी राहा.'' क्षितीज

 

''होय, नक्कीच. सॉरी क्षितीज. सॉरी तुझ्याशी खोटं प्रेमाचं नाटक करण्यासाठी. तुला फसवण्यासाठी, आणि कंपनी म्हणशील तर ती भूमीने तुझी तुला परत केली आहे. तुझ्या आई जवळ सगळे पेपर्स आम्ही रिटर्न केले आहेत.'' बोलताना मैथिलीचे डोळे पाण्याने भरले.

 

''तू तुझी काळजी घे, सगळ्यांच्या काही नाकाही चुका झाल्या होत्या. सगळ्यांनी एकमेकांना समजावून घेऊ आणि पुढे जाऊ.'' क्षितीज

 

'आता इथे तुमच्या दोन्ही कुटुंबाचे सगळे नातेवाईक जमा झाले असतील तर सप्तपदी राहिल्या आहेत. त्या पूर्ण करूया का? म्हणजे कस आहे,लग्न पूर्ण होईल आणि तुम्ही गप्पा मारायला मोकळे.''  साठे काका मध्येच हसत हसत म्हणाले. आणि सगळे हसायला लागले.

आणि पुन्हा भूमी क्षितिज स्टेजवर आले. सप्तपदीला सुरुवात झाली. सप्तपदी पार पडून क्षितिजने भुईच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. सगळ्यांनी त्यांच्यावर सुमनांचा वर्षाव केला आणि खऱ्याअर्थाने आज दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने हा विवाह सोहळा पार पडला होता.

 

रिसिप्शन पार पडले आणि किर्लोस्कर कुटुंब भूमी क्षितिजला शुभेच्छा देऊन घरी परतले. नाना आणि माई सुद्धा त्यांच्या सोबत घरी परतले. क्षितिजच्या आईने त्याला त्यांच्या राहत्या घरी परतून येण्याचा खूप आग्रह केला पण त्याने नकार दिला. त्याला भूमीचा गृहप्रवेश त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरात करायचा होता. त्याने तशी व्यवस्थाही केली होती. उलट त्याने आई आणि पप्पाना काही दिवसासाठी त्याच्या बंगल्यावर राहायला बोलावले. आणि नवीन सुनेचे स्वागत करण्यासाठी ते दोघे क्षितिजच्या घराकडे निघाले. मागच्या गाडीने क्षितिज भूमीला घेऊन त्याच्या घरी निघाला. फुलांनी सजलेली गाडी समोर आली. ड्राइव्हरने दार उघडले आणि भूमी आत जाऊन बसली. क्षितीज दुसऱ्या बाजूने आत बसला आणि गाडी घरच्या दिशेने निघाली.

 

 क्षितिजच्या बंगल्यावर गेल्यावर मेन गेटमधून आत प्रवेश करताना भूमीला फार आनंद झाला. कारण त्याचा संपूर्ण बंगला संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता. एवढी लाइटिंग केली गेली होती. ठिकठिकाणी फुलांची सजावट केली गेली होती.

क्षितिजच्या आईने तिची आरती केली. दारात पोहोचताच घरातील काकू पुढे आल्या, त्यांनी फुलांच्या नक्षीच्या मधोमध एक मोठे मापं भरून धान्य दारात ठेवले. आणि भूमीने माप ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. आरती करून तिला आत घेण्यात आले.  तिची पाऊले खाली लादीवर उठली होती. तर हातचे निशाण संपूर्ण घराच्या भिंतीवर छाप छाप म्हणून उठवले गेले. एवढे मस्त स्वागत होईल याची तिला अपेक्षा हि नव्हती.  ती खूपच खुश होती. अखेर तिचा एकटीचा  वनवास संपून तिला तिच्या प्रेमाची साथ मिळाली होती. आणि तिला मिळालेलं हे नक्षत्रांच देणं तिला तिच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत जपून ठेवायचं होत.



 ''ताई वरती रूममध्ये तुमचे सामान नेऊन ठेवलेले आहे.  करा.'' काकू येऊन सांगून गेल्या आणि भूमी वरच्या रूमकडे वळली. क्षितिजचा बेडरूम... जो आजपासून तिचा सुद्धा बेडरूम असणार होता. तिने वर येऊन रूमचा दरवाजा उघडला. आतमध्ये खूपच काळोख होता. आता लाईटचे बटन कुठे असेल ते ती शोधू लागली. पण तिला बटन सापडले नाही. एवढ्या काळोखात तिला भीती वाटू लागली. आणि काहीतरी वस्तू पायाला लागून ती धडपडून खाली पडली. आता आपल्याला मार लागणार या भीतीने तिने डोळे मिटून घेतले. पण... पण ती बेडवर पडलेली होती. आणि ती पडताच क्षणी रूमची लाइट लागलेली होती. फुलांनी सजवलेल्या बेडवर पडल्यापडल्या तिच्यावर वरून फुलांचा वर्षाव झाला. गुलाबाच्या असंख्य पाकळ्या तिच्या डोक्यावर, अंगावर आणि बेडवर सगळीकडे पडलेल्या होता. ती बघतच राहिली. रूममध्ये लावलेल्या नाजूक लाइटिंग मधून तिने पहिले क्षितीज तिच्याच दिशेने येत होता. तो येऊन तिच्या बाजूला बसला. आणि त्याने तिच्या हात हातात घेतला.

''कस वाटलं सरप्राइज?''

 

''क्षितीज थँक्स, तू अजून किती सरप्राइज करणार आहेस मला? आधीच काय कमी केलस का माझ्यासाठी.'' भूमी त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली.

 

''माय प्लेजर. तू एवढ्या मोठ्या कंपनीची पार्टनरशिप एक मिनिटात सोडू शकतेस, तर मी सुद्धा तुझ्या आनंद साठी काहीही करू शकतो.''

 

''ते गरजेचं होत, नाहीतर तुझ्या आईला माझ्यावर विश्वास बसला नासता, आणि त्यांच्या गैरहजेरीत आपलं लग्न होऊ शकाल नसत. तेव्हडा तर मी नक्कीच करू शकते.''

 

''लव्ह यु हनी.'' म्हणत त्याने मैत्रीला मिठी मारली.

 

''लव्ह यु टू. आणि असाच आयुष्यभर माझ्यासोबत राहा. आज मी खरच खूप खुश आहे.  विभासने दिलेल्या दुःखापेक्षा तू केलेलं प्रेम कितीतरी पटीने मोठं आहे, माझ विखुरलेलं आयुष्य तू पुन्हा मार्गी लावला आहेस.''

 

''बाय द वे, तू आज खूप छान दिसतेस. आणि नवरीच्या वेशात तर अगदी सुंदर. मिसेस भूमी क्षितीज सावंत.''

 

''एस, आज मी खऱ्या अर्थाने तुझी झाले. माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे हा क्षितीज.''

 

''खऱ्या अर्थाने नाही म्हणत येणार हा. अजून काहीतरी बाकी आहे ना?'' म्हणत क्षितिजने तिला आपल्याकडे ओढले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव सुरु केला. ती लाजून अगदी चूर झाली होती.

 

''आपल्या नात्याला पूर्ण करायचं का मग? काय म्हणते? अर्थात तुझी परमिशन असेल तर?'' तिला डोक्यावर ओठ टेकवत तो म्हणाला. आणि तिने डोळ्यांनीच त्याला होकार दिला.

 

त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ अलगद टेकवले आणि एक दीर्घ चुम्बन घेतले. पाण्यात खडीसार विरघळावी तशी ती हळूहळू त्याच्या मिठीत विरघळत गेली. तिच्या ओठांवर, मानेवर, कमरेवर त्याने आपल्या ओठांनी किस करायला सुरुवात केली. अगंणावरील वस्त्रांचा अडसर दूर झाला होता. श्वासाची अडखळती लय दर सेकंदाला वाढू लागली. आणि तिच्या गोर्यापान देहाला तिने क्षितिजच्या स्वाधीन केले. दोन्ही शरीर खऱ्या अर्थाने तन आणि मनाने एक झाली होती. प्रणयाच्या शेवटच्या क्षणी एक अस्फुट हुंकार तिच्या ओठातून बाहेर पडला. आणि तो तिच्यापासून दूर झाला. एक थंडीची लाट खिडकीतून आत आली. आणि थंडीने कुडकुडून ती तशीच विवस्त्र शरीराने क्षितिजच्या कुशीत शिरली. अंगावरच ब्लँकेट तिच्या भोवती गुंडाळून क्षितिजने ''लव्ह यु हानी'' म्हणत तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं.

बाहेरचा चंद्रमा आणि त्याच्या संख्या सोबती त्या तारका म्हणजेच भूमीचे आवडते नक्षत्र आत बेडरूममध्ये डोकावून पाहत होते. कारण आज ते दोघेही एक झाले होते. कायमचे. एकमेकांपासून कधीही विलग न होण्यासाठी. तिच्या नक्षत्रांनी तिच्या साठी पाठवलेला राजकुमार आज तिचा झाला होता आणि ती त्याची. या देण्यासाठी ती त्या नक्षत्रांनची नेहेमीच ऋणी असेल.

 

 

कथा वाचकांचे मनापासून आभार.कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

 इथे मी आज या कथेचा शेवट करत आहे. पर्व २ च्या विचारात आहे. वाचकांनी कळवावे, आपल्याला वाचायला आनंद होत असेल तर मी पर्व दोन अवश्य लिहायला घेईन आणि रोज तुम्हाला नवीन भाग वाचायला मिळेल.


नक्षत्रांचे देणे ५२

 'पदरावर जरतारी मोर आणि हिरव्या रंगाची जरीकाठ असलेली साडी नेसून भूमी तयार होती. नाकात नथ घालून तिने ओठांवर लाल  चुटुक लिपस्टिक लावली. मेकअप आर्टिस्टने तिच्या गळ्यात एक सोन्याचा हेवी असा हार घातला आणि त्यावर मॅचिंग असे मोठे कानातले कानात घातले. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला त्याच्या मध्ये मध्ये क्षितिजने पाठवलेल्या जाड पाटल्या घालून भूमीला तयार केले. ती सुंदर दिसत होती. केसात एका बाजूला खेवलेली केवड्याची आणि जरबेरिया ची लाल फुले तिच्या कानावर येऊन तिच्या चेहेर्याची सुंदरता अजूनच वाढवत होती. एक चंद्रकोर कपाळावर लावून भूमीने आरशात पहिले. खाली मंत्र पठन करायला सुरुवात झाली होती. लग्नघटिका जवळ आली होती. निधी तिला न्यायला वरती आली आणि निधी तिला नवरीच्या वेशात बघून खुश झाली. कधी नाही ते निधीच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.'

 

'मोरपंखी आणि सोनेरी शेरवानी सूट घालून क्षितीज तयार होता. डोक्यावरचा फेटा व्यवस्थित करत त्याने आरश्यात पहिले. आपला लूक परफ़ेकत आहे हे समजताच तो खाली लग्न मंडपाकडे निघाला. तो अगदी नवरदेव म्हणून शोभून दिसत होता. त्यात त्याने परिधान केलेला मोरपंखी शेरवानी त्यात तो अगदी राजबिंडा दिसत होता.'

 

'लग्न घटिका जवळ आली आहे, नवरा नवरीच्या हजर व्हावे.' म्हणत पंडितजी पाटावर येऊन बसले. मिस्टर सावंत त्याच्या जवळ आले. क्षितिजला मिठी मारून त्यांनी शुभेच्या दिल्या. आज्जो सुध्या त्यांच्या नवीन जोडीदाराशी लग्नाला उपस्थित होत्या. त्या देखील क्षितिजला येऊन भेटल्या.  भूमीचे नाना व्हीलचेअर वर बसून आले होते आणि त्यांच्या सोबत माई उपस्थित होत्या, तसेच निधीचा नवरा निल देखील त्याच्या बॉस च्या लग्नाला म्हणजेच क्षितिजच्या लग्नाला आला होता. सगळयांना भेटून झाल्यावर क्षितिजने बाहेरच्या दाराकडे पहिले अजूनही त्याची आई आलेली नव्हती. त्याला अशा होती कि त्या येतीलच. म्हणून तो वाट बघत होता. एवढ्यात भूमीला घेऊन निधी वरच्या मजल्यावरून जिन्याने खाली येताना सगळ्यांनी पहिले. ती अतिशय सुंदर सजली होती. क्षितीज ची नजर तिच्यावर होती. आणि तिच्या निरागस सौंदर्यावर तो हवी झाला होता.  

आज एवढ्या वर्षांनी तिला पुन्हा नवरीच्या वेशात पाहून नाना आणि माईंच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. नानांनी तिला आशीर्वाद दिला.

उपस्थित सगळ्या मोठ्या माणसांच्या पाय पडून ती स्टेजवर आली आणि क्षितिजच्या शेजारी उभी राहिली. 'छान दिसतेस.' अशी क्षितिजने तिला नजरेनेच पावती दिली. ती गोडं लाजली. ''पप्पा येणार आहेत ना?'' क्षितीज तिला विचारत होता.

''नाही, ते माझ्यावर फार रागावलात. काल मैथिलीची तब्येत अचानक बिघडली. पण लग्नाचा मुहूर्त आजच असल्याने मी सगळ्या गडबडीत हॉस्पिटल ला सुद्धा जाऊ शकले नाही.''

'''लग्न झाल्यावर संध्याकाळी जमलं तर जाऊन येऊया. मला काळजी आहे आईची. ती अजूनही आलेली नाही. ती नाही आली तर काहीच होऊ शकत नाही.'' क्षितीज पुन्हा पुन्हा दरवाज्याकडे बघत म्हणाला.

 

''येतील त्या. नक्कीच येतील. त्यांना यावंच लागेल.'' भूमीने त्याला समजावले.

 

''सावंत साहेब, मुहूर्त सुरु होतोय, सुरु करूया का?'' साठे काका मिस्टर सावंतांना विचारत होते. आणि क्षितिजने पुन्हा दाराकडे पहिले. क्षितिजच्या पप्पांनी मानेने त्याला नकार दिला. आज्जो पुढे आल्या होत्या.

 

''तुम्ही सुरुवात करा. ती नाही येणार.'' आज्जोने क्षितीज आणि भूमीला सांगितले. पण क्षितीज जागचा हलला नाही.

 

''पंडितजी त्याच्याकडे बघत बसले. भूमीचा चेहेरा साफ पडला होता. म्हणजे मी भेटून सुद्धा क्षितिजच्या आई येणार नाहीत तर? का? स्वतःच्या मूलाच्या सुखापेक्षा त्यांना त्यांचा ईमो महत्वाचं वाटतो तर?' तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला.

 'क्षितीज अजूनही येऊन पाटावर का बसत नाही?'असा प्रश्न खाली लग्न मंडपात जमलेल्या सगळ्या लोकांच्या मनात निर्माण झाला.

 

एवढ्यात दारातून मिसेस सावंत यांची इंट्री केली होती. त्यांना बघून कोण नव्हते तो आनंद क्षितीज आणि भूमीच्या चेहेऱ्यावर दिसत होता. त्या थेट क्षितीज च्या जवळ आल्या. क्षितीजला पाटावर बसवून त्या भूमीकडे वळल्या.  ''साठे काक सुरुवात करा.'' म्हणत त्यांनी हातातली शाल भूमीच्या अंगावर टाकली. आणि तिच्या हाताला धरून तिला पाटावर बसवले.

 

''आई, हे लग्न तुला नक्की मान्य आहे ना?'' क्षितिजने त्यांच्याकडे बघत त्यांना विचारले.

 

''होय, काल माझी होणारी सून मला भेटायला आली होती. ज्या कंपनीच्या पार्टनरशिप मुले किर्लोस्कर आणि आपले संबंध बिघडले होते ती कंपनीचं तिने आपल्याला परत केली आहे. तेही बेशर्त. पन्नास टक्के च्या पार्टनरशिप वर क्षणात लाथ मारून त्याबदल्यात तिने माझ्याकडे तुझी साथ मागितली. आणि मला इथे यायला भाग पाडलं. भूमीपेक्षा अजून कोणतीही निस्वार्थी मुलगी मला सून म्हणून मिळणे शक्य नाही. याव तर लागणार ना?''

 

''म्हणजे? भूमी काल तुला भेटायला आली होती?'' क्षितीज त्यांना पुन्हा विचारत होता.

 

''होय, पण आपण या विषयी नंतर बोलू, आधी लग्न मुहूर्त सुरु झाला आहे. काका तुम्ही सुरुवात करा.'' म्हणत त्या स्टेजवरून बाजूला झाल्या. आणि साठे काकांनी क्षितीज आणि भूमीच्या लग्नाला सुरुवात केली. क्षितिजच्या आत्ता लक्षात आले होते, कि भूमीमुळे आपली आई इथे लग्नाला आली आहे. त्याला खूप समाधान वाटले. भूमी मात्र काही न बोलता तशीच शांत बसून त्याच्याकडे बघून हसली.

लग्न अर्ध्यावर आले होते, सप्तपदीसाठी क्षितीज आणि भूमी दोघेही उभे राहिले. आणि दारातून कोणाची तरी चुळबुळ सुरु झालेली त्यांना ऐकायला आली.

मिस्टर किर्लोस्कर आतमध्ये येण्यासाठी दारावरील शिपायावर ओरडत होते. आणि शिपाई त्यांना आत सोडायला तयार नव्हता. हे बघून क्षितिज आणि भूमी फेरे घेता घेता जागीच थांबले.

मिस्टर सावंतांनी पुढे होवून शिपायांना बाजूला केले आणि मिस्टर कोर्लोस्कर लगबगीने आत घुसले.

''माझ्या मुलीचे लग्न, आणि आमच्या शिवाय कसे काय होवू शकते?'' ते थेट जाऊन भूमीच्या शेजारी उभे राहिले आणि विचारू लागले.

 

''बाबा प्लिज शांत व्हा.'' भूमी त्यांना शांत करत होती.

 

''मला इथे कोणतीही गडबड नको आहे, लग्न होऊद्या. प्लिज.'' मिस्टर सावंत तिथे येत म्हणाले.

 

''मी आशीर्वाद द्यायला आलो आहे, काही गडबड होणार नाही.'' म्हणत त्यांनी भूमीला मिठी मारली. आणि त्यांचे डोळे अश्रुनी भरले.

 

''बाप म्हणून मी सपशेल हरलो, मला माफ कर, एका मुलीला फितवून सावन्तांची कंपनी अडकवली. आणि तुला लहानपणीच वाऱ्यावर सोडून बापाच्या नावाला काळिमा फसला.  आता मला माझं कर्तव्य करू देत. कन्यादान करू देत.'' ते भूमीला सांगून रडत होते.

 

''बाबा, काय म्हणताय तुम्ही ? आणि माफी कशाला?'' मैत्रीला काही सुचेना झाले होते.

 

''मैथिली पूर्णपणे शुद्धीवर आलेय, तिने मला सांगितलं कि क्षितीजमूळे तिचा अपघात नाही झाला. तर हे त्या मुखर्जी, वेदांत आणि इतर सहकाऱ्यांचा कारस्थान होत. मैथिलीला हे माहित झालं म्हणून त्यांनी चंदिगढला असताना त्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणला. मला सगळं समजलेले आहे, मी विनाकारण क्षितीज ला दोष देत राहिलो. क्षितीज मला माफ कर.'' ते क्षितिजला सांगत होते.

नक्षत्रांचे देणे ५१

 गाडी हमरस्त्याला लागली होती.

'नया कल चौखट पर है

आज उस पर एतबार कर

कब तक बीते कल में उलझेगा

चल आज एक नई शुरुआत कर..!'

 

म्युझिक प्लेअर वर लागलेली शायरी ऐकत क्षितीज गाडी चालवत होता. आणि भूमी नेहेमीप्रमाणे त्याच्या बाजूला सीटवर रेलून झोपलेली होती. गाडी शहराकडे भरधाव वेगाने निघाली होती.

तेव्हा भूमीला जाग आली. ''क्षितीज आपण पोहोचलो का?''

 

''नाही, दहा मिनिटात पोहोचू.''

 

'' माझं घर तर मागे गेलं ना, तू पुढे कुठे निघाला आहेस?'' भूमी बाहेर रोडकडे बघत म्हणाली. आणि क्षितिजने ब्रेक लावला, गाडी जागीच उभी झाली होती.

 

''आपण माझ्या घरी आलोय, माझ्या आई-पप्पांच्या घरी. त्यांना भेटायला.'' क्षितीज गाडीतून उतरत म्हणाला.

 

''का? तुझ्या आईने मला तुझ्यासोबत पाहिलं तर त्या खूप रागावतील.''

 

''आता तिला काय रागवायचं आहे, एकदाच रागावू दे. नंतर तिला नेहेमीच आपल्या दोघांना सोबत बघायचं आहे.'' क्षितीज तिच्या बाजूचा दरवाजा उघडत म्हणाला.

 

''म्हणजे?'' भूमी आश्यर्य आणि कुतूहलाने विचारत होती.

 

''लग्न करतोय आपण. लवकरच... तेच इथे कानावर घालायला आलोय आपण.'' क्षितीज तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.

 

''आर यु सिरिअस? एवढ्या लवकर डिसिजन घेऊन निकाल पण झालास?'' भूमी अजूनही आ वासून त्याच्याकडे बघत होती.

 

''होय, का तुला काय प्रॉब्लेम आहे का?'' क्षितीज

 

''नाही, पण त्यांना म्हणजेच तुझ्या आईला हे मान्य नाही. माहित आहे ना तुला.''

 

''बघूया, चल आत.'' म्हणत त्याने बेल वाजवली आणि आणि आतून दार उघडले गेले. समोर हॉलमध्ये मिस्टर अँड मिसेस सावंत सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. समोर क्षितिजला आणि त्याच्या सोबत भूमीला बघून त्यांना आश्चर्य वाटले.

 

''क्षितीज तू कसा आहेस? आणि आज अचानक इथे?'' मिस्टर सावंत विचारत होते.

 

''मी मस्त, तुम्ही? आणि आज्जो?'' क्षितीज त्यांच्या शेजारी बसत म्हणाला.

 

''आम्ही सगळे ठीक, भूमी तू कशी आहेस?'' मिस्टर सावंत भूमीकडे बघून विचारत होते. आणि बाजूला बसलेल्या मिसेस सावंत डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होत्या.

 

''मी ठीक आहे.'' भूमी क्षितिजच्या शेजारी बसत म्हणाली.

 

''मी इथे तुम्हाला आमच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आलोय. लवकरच आम्ही लग्न करतोय.'' क्षितीज त्या दोघांकडे आळीपाळीने बघत म्हणाला.

 

''लग्न करतोय म्हणजे काय? तू तुझ्या मर्जीने लग्न करणार आहेस? तेही हिच्याशी? तर आम्हाला आमंत्रण कशाला देतोस?'' क्षितिजची आई ताडकन उठून उभी राहत म्हणाली.

 

''तुला माहित आहे, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. साखरपुडा झालेला आहे, तिचे काही पर्सनल प्रॉब्लेम होते. म्हणून ती परदेशी गेली होती. आता परत आली आहे, तर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आहे.'' क्षितीज एक दमात म्हणाला.

 

''कर लग्न, एक लग्न झालेल्या मुलीशी लग्न कर. आणि त्यात ती सहा-सात महिने बाहेरगावी जाऊन राहून आलेली आहे. परदेशी असताना ती तुझ्याशी कशी वागली, हे विसरलास का? तेव्हा तिला तुझी आठवण तरी होती का?'' मिसेस सावंतने अजूनच मोठ्याने ओरडत म्हणाल्या.

 

''आई ती काय आणि कसं वागली हे मला माहित आहे, त्यामागे बरीच कारण होती. त्यामुळे तू त्या विषयच भांडवल करू नकोस.'' क्षितीज त्यांना शांत करत म्हणाला.

 

''होय का, काय सांगितलं तिने तुला? आणि तू तिच्या बोलण्यावर  लगेचच विश्वास ठेवावा असा कोणता पुरावा तिने तुला दिला?'' क्षितिजची आई

 

''माझ्या आणि भूमीच्या नात्याला पुराव्याची काहीही गरज नव्हती. जिथे विश्वास असतो ना तिथे पुरावे आणि साक्षीदाराची गरज नसते.'' क्षितीज

 

''अरे या किर्लोस्करांच्या मुली फक्त फसवू शकतात. आणि तू तिच्यावर विश्वास ठेवून हे लग्न दरवुन मोकळा झालास? तर आम्हाला कशाला बोलावतोस?'' मिसेस सुभेदार म्हणजे क्षितिज ची आई

 

''घराच्या प्रतिष्ठेसाठी, कंपनीच्या हितासाठी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. तसाही लग्न झालाच पाहिजे असं काही नाही. आमचं लग्न झालं नाही तरीही आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर तुम्ही दोघे लग्नाला आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत तर हे लग्न होईल अन्यथा आणि असेच एकत्र राहू.  मला त्याचा काही फरक पडत नाही. तेव्हा तू ठराव तू येऊन आम्हाला आशीर्वाद देणार आहेस, कि आम्ही बिनलग्नाचे लिव्ह इन मध्ये राहू. हे तुझ्या हातात आहे.'' क्षितीज सरळ बोलून बाहेर पडला.

 

 ''तुम्ही येणार आहेत हे मला माहित आहे, पण दोघे सोबत याला अशी अपेक्षा करतो.'' निघताना तो पप्पांचा पाय पडला.  आणि बाहेर आला. भूमीला काय बोलावे सुचेना. तिला हे सगळे अनपेक्षित होते.

''क्षितीज घाई करू नकोस. असं आई-बाबांना तोडून चालत नाही.'' ती त्याला समजावत होती.

 

''आपण कोणालाही तोडायचं नाही, उलट या लग्नामुळे सगळे एकत्र येतील याची मला खात्री आहे. तू काळजी करू नकोस.''  क्षितीज तिला म्हणाला.

 

''तू काय म्हणाल होतास आठवतंय, आपलं लग्न होऊदेत अथवा नाही. त्याचा तुला काही फरक पडत नाही.'' भूमी

 

''म्हणालो होतो, पण आता मी आणि तू दोघेही एका नामांकित कंपनीचे CEO आहोत. सो जबाबदारी आणि प्रतिष्ठा दोन्हीही आहे. त्यात आपण दोघे  विना लग्नाचे एकत्र राहणार नाही, एवढी आपल्याला अक्कल आहे. त्यामुळे मी सगळं विचार करून हा निर्णय घेतलाय.'' क्षितीज

 

''आणि जर तुझी आई आपल्याला लग्नाच्या वेळी उपस्थित राहिली नाही तर? आपण हे लग्न भर मंडपात मोडायचं?'' भूमी

 

''तेवढी वेळ येणार नाही. म्हणूनच मी तिला सांगितलं कि, आम्ही बिनलग्नाचे लिव्ह इन मध्ये राहू शकतो. त्यावर ती नक्कीच विचार करेल.'' क्षितीज म्हणाला आणि भूमी शांतपणे काहीतरी विचार करू लागली.

नक्षत्रांचे देणे ५०

         'जवळपास तासाभराने भूमीला जाग आली, क्षितीजने गाडी थांबवली होती. आणि तो तिच्याकडे बघत होता. कदाचित तो तिच्या उठण्याची वाट बघत असावा. तिने समोर पहिले आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती चक्क आश्रमाच्या समोर होती. तिचा आश्रम लहानपणीच्या आठवणींचा आश्रम. कितीतरी महिने ती इकडे फिरकली सुद्धा नव्हती. आज क्षितिजमुळे ती पुन्हा तिथे आली होती. त्या लहान सवंगड्याना भेटायला.'

 

''क्षितीज विश्वास बसत नाही रे, थँक्स, थँक्यू सो मच.'' म्हणत उतरून ती आश्रमाच्या फाटकातून आत निघाली. क्षितीज गाडी पार्क करून तिच्या मागे आश्रमात जाऊ लागला. तेथील मुलांनी तिला बघून एकच गलका केला होता. ''भूमी दीदी आली.'' म्हणत सगळे तिच्या दिशेने आले. धावत येऊन सगळी मूळ तिला भेटली. आश्रमातील बाई, मदतनीस मंडळी त्या दोघांना भेटायला पुढे आले. क्षितीज आणि भूमी आश्रमात पोहोचले. आत हॉलमध्ये बसून त्यांच्या गप्पा रंगल्या. आपण इथे नसतानाही क्षितीज इथे येऊन जायचा. या मुलांना खाऊ आणि भेटवस्तू द्यायचा. तसेच SK गुओप कडून इथे दरवर्षी न चुकता डोनेशन हि येते. हे ऐकल्यावर भूमी फार बरं वाटलं. क्षितीजचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी होते. ती खूपच खुश झाली.  क्षितीज आणि भूमी दोघेही त्या मुलांमध्ये दंग होते. मस्ती आणि मज्जा सुरु होती. खानपान सगळं तिथेच झालं.  

''बाय द वे, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होत. वेळ आहेच आणि इथे कोणी डिस्टर्ब करणार नाही.'' क्षितिज भूमीला म्हणाला. आणि भूमीने आजूबाजूला नजर टाकली. आश्रमाच्या अंगणात असलेल्या बाकड्यावर दोघे बसलेले होते, मुलं खेळून दंवलेली होते, त्यामुळे ती आतमध्ये गेली होती. आजूबाजूला कोणीही नसल्याचे भूमीला जाणवले. तेव्हा तिने क्षितिजला तिची आपबिती सांगायला सुरुवात केली. आणि ऐकत असताना क्षितिजला आश्यर्य वाटत होते, त्याला माहित नसणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्याला तिच्याकडून माहित झाल्या.

 

'पहिली गोष्ट म्हणजे, ती मायग्रेन ट्रीटमेंट साठी परदेशी गेली नव्हती तर तिला ब्रेन ट्युमर होता, त्याच्या केमोथेरपीसाठी ती तिथे गेली होती. तिचे त्यातून वाचण्याचे चान्सेस फक्त १० टक्के होते, कारण तिने कॅन्सर ची दुसरी स्टेज क्रॉस केली होती. त्यामुळे तिला असे वाटले कि आपण काहीच दिवसाचे सोबती आहोत. क्षितीज च्या संपर्कात राहून आपण गेल्यानंतर त्याला त्याचा खूप त्रास होईल त्यापेक्षा आपण त्याच्याशी सर्व प्रकारचा संपर्क तोडावा, म्हणजे त्याच्या मनात आपल्या बद्दल राग उत्पन्न होईल. आणि तो आपल्याला विसरून जाईल. कमीत कमी आपण मेल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा एवढा त्रास होणार नाही. असा विचार करून तिने परदेशी जाताच आपला मोबाइल नंबर बदलला आणि इतर कोणत्याही प्रकारे क्षितीज शी संपर्क केला नाही.' 

 

'दुसरी गोष्ट म्हणजे, मैथिली देखील भूमी बरोबर तिच्या ट्रीटमेंट साठी परदेशी गेली होती. मैथिली २४ तास भूमीच्या सोबत होती. स्मृती गेली असली तरीही तिला आजूबाजूला काय घडत आहे, हे समजत होत. महत्वाचं म्हणजे एकदा भूमीच्या मोबाइल मध्ये क्षितीज चा फोटो पाहून तिने त्याला ओळखलं होत, तिची तब्येत त्यानंतर खूपच बिघडली. आणि डॉक्टर ने तिला त्रास होणाऱ्या कोणत्याही गोष्टी, फोटो, आवाज किंवा इतर कोणीही व्यक्ती याना तिच्यासमोर आणण्यासाठी सक्त मनाई केली. त्यामुळे भूमीने क्षितीज ला आपल्या पासून लांब ठेवण्याचा निर्णय अगदी पक्का केला.'

‘परदेशी ट्रीटमेंट झाल्यावर भूमीच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि ती भारतात परतली. इथे आल्यावर तिला क्षितीज आणि S K ग्रुप यामध्ये झालेल्या बदल विषयी समजले. क्षितीज तीच तोंडही पाहायला तयार नाही हे समजल्यावर तिला काय करावे सुचेना, मग तिने तिच्या बाबानी तिच्या समोर ठेवलेला कंपनीचा प्रस्ताव स्वीकारला. आणि मिस्टर किर्लोस्करांच्या जागी कंपनीच्या पार्टनर पदी ती नियुक्त झाली. फक्त क्षितिजच्या जवळ राहता यावं आणि त्याला समजवावं या एकमेव हेतूने तिने हि जबाबदारी स्वीकारली होती.’

निधीला भूमीच्या आयुष्यात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती. पण भूमीने तिच्याकडून वचन घेतले होते, कि तिने हे कोणालाही सांगू नये. त्यामुळे निधी क्षितिजला याबद्दल काहीही कल्पना देऊ शकली नाही.

सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यावर भूमीला हलकं झाल्यासारखं वाटलं. तिने सुटकेचा एक निश्वास सोडला. क्षितीज अजूनही शून्यात नजर लावून बसलेला होता. अजाणतेपणी तो भूमीला बरेच काही बोलून गेला होता. आता शब्द माघार घेणे शक्य नव्हते. ''सॉरी.'' एवढेच बोलून त्याने आपले डोळे पुसले.

''दॅट्स फाईन, तुला याची काहीच कल्पना नव्हती. तू तुझ्या जागी माझ्यासाठी बेस्टच आहेस.'' भूमी बोलत होती.

''तू आता ठीक आहेस ना? कि अजून काही ट्रीटमेंट ची गरज आहे?'' क्षितीज काळजीच्या स्वरात म्हणाला.

''मी ठीक आहे, पण एकदा ट्रीटमेंट साठी जावं लागेल. थोडा त्रास अजूनही होतो. पण धोका पूर्णपणे टळलेला आहे.''

''गुड, पूर्णपणे बरी हो.  पुन्हा जावं लागलं तरीही चालेल.''

''थँक्स क्षितीज, तुझं माझ्यावरच निस्वार्थ प्रेम, नाना आणि माईंचा आशीर्वाद आणि मिस्टर किर्लोस्करांनी ट्रीटमेंट च्या खर्चासाठी केलेली मदत यामुळे मी आज इथे दिसते. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.''

''म्हणून तू कोर्लोस्करांचं ऐकतेस का? 'आणि त्यांच्या घरी राहतेस?'' क्षितीज

''होय, त्यांनी यावेळी खरंच खूप मदत केली. लहानपणी आई मला सोडून गेली, बाबांचा पत्ता नव्हता, माझ्यासाठी ते हयाद नव्हते, नंतर मोठी झाल्यावर विभास कडून झालेली फसवणूक यामुळे मी मेंटॅलि खूप स्ट्रेस होते. त्यातून हा आजार झाला. असं डॉक्टर म्हणाले. पण हे समजताच पप्पांनी मला खूप मदत केली. मानसिक आधारही दिला. '' भूमी

''दॅट्स गुड. आता तू माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नकोस. मी नेहेमीच तुझ्यासोबत असेन. बेशर्त.'' क्षितीज तिचा हात हातात घेत म्हणाला. आणि ती होकारार्थी मन डोलावून हसली.

गुरुवार, २४ मार्च, २०२२

नक्षत्रांचे देणे ४९

 निधी अजूनही निल सोबत डान्स करत होती. क्षितीज आणि भूमी, ते हि एकत्र तिथे आलेले पाहून तिला फारच आनंद झाला. तिने क्षितिजला वरती डान्स करण्यासाठी बोलावले आणि भूमीला घेऊन तो स्टेजवर गेला.

 

'ना है ये पाना

ना खोना ही है

तेरा ना होना जाने

क्यूँ होना ही है

 

तुमसे ही दिन होता है

सुरमई शाम आती

तुमसे ही, तुमसे ही.'

हे गाणं सुरु झालं होत.

''सो पार्टनर, नानांची तब्येत कशी आहे आता?" क्षितीज डान्स करता करता भूमीला विचारत होता. 

''एक दिवसात नाही सांगता येणार, पण थोडे दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल.'' भूमी 

''आणि तुझी?'' क्षितीज 

''माझी? मला काय झालाय?'' भूमी आश्चर्याने. 

''अधून मधून तुझं डोकं वेगैरे दुखत ना. निधी सांगत होती.'' क्षितीज 

''होय, आता ठीक आहे सगळं.'' भूमी 

''ओके.'' क्षितीज 

''अजून काय सांगितलं निधीने तुला?'' भूमी त्याला काय काय माहित आहे, हे पाहण्यासाठी विचारत होती.

''काही नाही. का असं काही आहे का सांगण्यासारखं. जे तू लपवून ठेवलं आहेस.'' क्षितीज 

''नाही. काहीच नाही.'' बोलताना भूमी जरा गोंधळली होती. 

''तुला खोट बोलता येत नाही, म्हणून तू खरं सुद्धा लपवून ठेवतेस. हाच प्रॉब्लेम आहे, आणि यामुळे लोकांचा तुझ्याबद्दल गैरसमज होतो.'' क्षितीज 

''लोकांचा नाही, तुझा.'' भूमी 

''मग समजावं ना, जे प्रॉब्लेम्स असतील ते सांगत जा.'' क्षितीज 

''सांगेन ना, नंतर भेट, सांगते.'' भूमी 

''नंतर? तुला खूप काम असतात. नाना आजरी असतात. माईना बघायला जायचं असत. कंपनीमध्ये महत्वाचं काम असत. अजून ही बऱ्याच गोष्टी.'' क्षितीज 

''सध्या काही काम नाही. तेवढा वेळ आहे.'' भूमी 

''मी सोडून तुला खूप काम असतात. पहिल्या पासून मला फक्त गृहीतच धरत आलीस तू. आणि मी फक्त वाट बघत बसलो.'' क्षितीज 

''असं काही नाहीय रे. तू गैरसमज करून घेऊ नकोस.'' भूमी 

''तुझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये माझं नाव आहे तरी का ग?'' क्षितीज 

''सर्वात आधी तुझं नाव येत, मग बाकीचे. तुझा विश्वास नाही त्याला मी काय करू.'' भूमी 

''विश्वास कमवावा लागतो.'क्षितीज 

''काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल?'' भूमी 

''वेळ आल्यावर सांगतो.मग बघू.'' क्षितीज 

''बरं, डान्स पुरे करूया का? मला चक्कर सारखं होती.'' भूमी 

''ओह, सॉरी. आधी सांगायचं ना.'' म्हणत क्षितिजने तिला हाताला धरून स्टेजवरून खाली उतरवले. आणि ते बघून निधी धावतच त्यांच्याकडे आली.  तिला क्षितीज आणि भूमीला एकत्र बघून आनंद झाला होता.  

''हाय, गाईज. नाइस टू सी यू  टुगेदर.'' निधी 

''थँक्स डिअर तुझ्यामुळेच हे शक्य आहे. नाहीतर मला वाटलं होत, क्षितीज पुन्हा माझ्याशी केव्हाही बोलणार नाही. '' भूमी 

''मला वाटलं नव्हतं, क्षितीज एवढ्या लवकर तुला माफ करेल. त्याचा राग बघून तर पुन्हा तुम्ही दोघे एकत्र येणे स्वप्नवत वाटत होते.'' निधी 

''मी एवढा रुड नाहीये ग. थँक्स टू यू हनी. कशी आहेस?''  क्षितीज निधीला विचारत होता. 

''मी मस्त.'' निधी 

''आणि हा तुला काही त्रास देत नाही ना?'' क्षितीज निल कडे बघत निधीला विचारत होता. 

''नाही रे.'' निधी नीलच्या हातात हात घालून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली. 

''पुन्हा एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले रे आम्ही दोघांनी. संजना आणि माझा डिवोर्स नंतर माझ्या घरच्यांचे नखरे, मी घर आणि घरचा बिझनेस सगळं सोडलं, तू मदत केलीस, म्हणून आमचं लग्न झालं, नाही तर एकामागोमाग एक अशी संकटपाठ सोडायला तयार नव्हती.'' निल 

''माय प्लेजर. काही विशेष केलं नाही. ऍटलीस्ट तुमची लव्हस्टोरी पूर्ण होताना बघून समाधान वाटलं.'' क्षितिज निधी आणि निल बरोबर बोलत होता. भूमी त्यांचं बोलणं बाजूला उभी राहून ऐकत होती. या काही दिवसात क्षितिजच्या स्वभावाचे नवीन पैलू तिला बघायला मिळाले होते. त्याने निधी आणि नीलच्या लग्नासाठी मदत केली होती. ऐकून भूमीला आश्चर्य आणि कौतुक दोन्हीही वाटलं. आपण यांच्यामध्ये कुठेच बसत नाही, त्यात क्षितीज आपल्यामुळे दुखावला गेला आहे, याच तिला सारखं वाईट वाटत होत. तिचे मन तिलाच खात होते. आपण काय करतो आणि त्याच काय होत? होत्याच नव्हतं होऊन, आपलं इतरांपासून वेगळे होते, आणि दरवेळी आपल्याला एकाकीपणाला समोर जावं लागत.  हो गोष्ट तिला त्रास देत होती. त्यांच्या गप्पा ऐकताना ती गुपचूप तिथून बाहेर पडून साइडला गेली. 

निधी आणि निल बरोबर गप्पा मारताना क्षितिजच तिच्याकडे चांगलं लक्ष होत, तो दाखवत नसला तरीही त्याने भूमीला तिथून बाहेर जाताना पाहिलं होत. थोडावेळ गप्पा मारू तो त्यांना शुभेच्छा देऊन बाहेर आला. भूमी कुठे दिसत नव्हती. कदाचित फ्रेश व्हायला गेली असेल म्हणून त्याने थोडावेळ बाहेर तिची वाट पहिली. अजूनही तिचा पत्ता नव्हता. क्षितिजने तिचा फोन ट्राय केला. तिने तो उचलला. ती गाडीत जाऊन बसली होती. हे समजल्यावर क्षितीज तिथे गेला. 
''निघतेस का?'' क्षितीज 

''होय, निधीला भेटून निघेन. आतलं आवरलं आहे का? कि अजून पार्टी सुरु आहे?'' भूमी 

''पार्टी संपत आले. निधी आणि निळा सुद्धा निघतील.'' क्षितीज तिच्या उतरलेल्या चेहेऱ्याकडे बघत म्हणाला 

''आणि तू?'' भूमी 

''तुझा मूड ठीक वाटत नाहीय. थोडावेळ थांब आपण सोबत निघू.'' क्षितीज 

''मी गाडी आणलेय, आणि तू पण. सो मी निघते.'' भूमी 

''माझ्यासोबत यायचं नसेल तर तस सांग, उगाच गाडीचं निमित्त सांगू नकोस.'' क्षितीज 

''ओके, मी तिला सांगून येते. मग निघूया. '' भूमी गाडीतून बाहेर निघत म्हणाली. 

''ओके.'' म्हणत क्षितीज तिथेच थांबून राहिला. आणि भूमी निधीला भेटायला आत निघून गेली. 

इकडे क्षितीजला भेटायला मिसेस मेघा सावंत म्हणजेच क्षितिजची आई त्याच्या सध्याच्या राहत असलेल्या घरी आल्या होत्या. कंपनीमधून त्यांना काही महत्वाच्या कागदपरांवर साह्य पाहिजे होत्या. त्या घेण्यासाठी त्या तिथे आल्या होत्या. पण तो घरी नाही हे समजल्यावर त्या तिथून पुन्हा सावंत निवासाकडे निघाल्या. 'काय करत असेल? कुठे असेल क्षितीज ? एकटाच घरदार सोडून इथे राहतो. काय गरज आहे या सगळ्याची याचा विचार त्या करत होत्या.' आपला मुलगा आपल्यापासून खूपच लांब गेला आहे, मानाने आणि शरीराने, हि गोष्ट त्यांना अजिबात पटत नव्हती. खूप वाईट वाटायचे पण त्या काहीही करू शकत नव्हत्या. क्षितिजला पुन्हा घरी घेऊन येण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण यश आले नाही. तो घरी यायला अजिबात तयार नव्हता. भूमी त्याच्या आयुष्यात आल्यापासून या सगळ्या गोष्टी बिघडल्या होत्या असा त्यांचा गैरसमज झाला होता. काय करावे म्हणजे तो पुन्हा पहिल्या सारखा होईल? याचा विचार करत त्या घरी जायला निघाल्या. 

*****

भूमी निधीला भेटून पुन्हा बाहेर आली. क्षितिजला फोन आला होता तो बोलत होता. ती येऊन बराच वेळ उभी राहिली. तो गाडीच्या समोर उभा होता आणि भूमी गाडीला टेकून उभी राहून त्याच्याकडे बघत होती.  

फोनवर बोलताना काय म्हणून क्षितिजने नजरेनेच तिला विचारले आणि तिने नकारार्थी मान डोलावली.  फोनवर बोलता बोलता त्याने भूमीला हाताला धरू गाडीत बसवले आणि तो गाडी सुरु करून निघाला. ती मागे डोकं टेकून आरामात डोळे मिटून शांत बसून होती. बोलून झाल्यावर फोन बाजूला ठेवून क्षितिजने तिच्याकडे पहिले. 
''मॅडम कुठे जाणार?'' क्षितीजने तिला विचारले. 

''माहित नाही, पण तुझ्यासोबत आहे म्हणजे योग्य ठिकाणी पोहोचेन एवढं मात्र नक्की.'' भूमी म्हणाली. 

''मूड का डाऊन आहे? बरं नाही वाटत का?'' क्षितीज 

''थोडं अस्वस्थ वाटतंय, का माहित नाही.'' भूमी 

''मुडी आहेस तू. अचानक स्विंग होतेस.'' क्षितीज म्हणाला आणि ती फक्त हसली. 

''घरी येतेस का ? माझ्या सोबत.'' क्षितीज 

''नको.'' भूमी 

''मग, तुझ्या घरी सोडू?'' क्षितीज 

''नको, कुठेतरी शांत ठिकाणी जाऊया. मला तुझ्याशी बोलायचं. खूप काही बोलायचं राहून गेलय.'' भूमी 

''ओके, एक मस्तपैकी झोप कधी, पोहोचल्यावर उठवतो. तुझा मूड सुद्धा फ्रेश होईल.'' क्षितीज 

''दॅट्स गुड.'' म्हणत भूमी डोकं मागे टेकून पुन्हा शांत झोपून गेली.  

बुधवार, १६ मार्च, २०२२

नक्षत्रांचे देणे ४८



 ‘भूमी पार्टी हॉलमध्ये पोहोचली तेव्हा डान्स फ्लोअरवर सगळे कपल डान्स करण्यात मग्न होते. मस्त धुंद असे डेकोरेशन, लाइट्स आणि फुलांच्या मला नि हॉल सजवण्यात आला होता. 

' सायलेंट म्युझिक ची धून वाजत होती.

 

हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से

जी भर के देख लीजिये हमको क़रीब से

फिर आपके नसीब में ये बात हो न हो.

फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो.

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो.

 

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो.

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो.

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो.

या गाण्यावर निधी आणि नीलने रोमँटिक अंदाजात एकमेकांच्या हातात हात घालून  ताल धरला होता. सगळीकडे आपली नजर फिरवत,भूमी समोरच्या आसनावर बसून त्यांना बघत राहिली.’

 

'तिला क्षितिज आपल्या जवळ असल्याचा भास होत होता. कुठेतरी उभा राहून तो आपल्याकडे बघतोय, असे तिला वाटत होते. लग जा गले कि... च्या सुरुवातीच्या धून वर ती क्षितीज आणि तिच्या भूतकाळात गेली. त्याच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता. अगदी काळ परवाच घडून गेल्यासारखे वाटत होते. त्याच्या शिवाय आपल्या जाण्याला अर्थच नाहीय, असे वाटून तिचे डोळे भरून आले. कोणी पाहू नये म्हणून तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. हाताच्या मुठी आवळून तिने स्वतःच्या भावना होल्ड करण्याचा प्रयत्न केला. हळूच डोळे उघडून तिने आजूबाजूला पहिले. समोरून कोणीतरी एक तरुण तिच्या दिशेने चालत आला होता. 'डान्स प्लिज.' म्हणत त्याने आपला हात तिच्या समोर धरला. कोण तो? ना ओळख ना पाळख. असेल निधीच्या नात्यातील. पण त्याच्या सोबत डान्स करण्याची तिची अजिबात इच्छा होईना. 'सॉरी.'म्हणत ती तिथून उठली आणि निधीने डान्स करता करता तिला पहिले. दुरूनच हात करून दोहींनी एकमेकींना हाय केले. 'तू कंटिन्यू कर, नंतर भेटू.' असे इशाऱ्याने सांगून भूमी तिथून बाहेर आली.’

 

‘हॉल बाहेरच्या छोट्या गार्डनमध्ये एका खुर्चीवर बसून तिने क्षितिजला मेसेज सेंट केला. 'कुठे आहेस?'  त्याने वाचला तर ठीक, नाहीतर काय करू शकते. ती त्याच्या मेसेजच्या रिप्लायच्या प्रतीक्षेत तिथेच बसून राहिली. काहीही प्रतिसाद आला नव्हता. डोळ्यातून खळणारा एक अश्रू लगेच आपल्या रुमालाने टिपले. यापेक्षा जास्त वेळ तिथे थांबणे तिला शक्य नव्हते. कदाचित तिला रडू कोसळले असेल. जे थांबवता येणे तिला शक्य नव्हते. 'मी निघते. एन्जॉय कर. भेटू नंतर.' असा मेसेज करून ती उठली. आणि तिचा मेसेज बॉक्स वाजला. क्षितिजचा मेसेज होता. 'कुठे म्हणजे? अजूनही तिथेच आहे. तुझ्या हृदयात...' मेसेज वाचुन ती खुश झाली आणि वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने मागच्या दिशेने मस्त सुगंधित वास तिला आला.  BVL ब्रँड चा तो पर्फ्युमचा वास होता, तिने क्षणात ओळखले. आणि खुश होऊन मागे वळून पाहिले.

क्षितीज तिच्या मागेच उभा होता. तिच्याकडे एकटक बघत. तिच्या उडणाऱ्या पदराचे एक टोक त्याच्या हातात होते. ते तिच्याबोवती गुंडाळत तो तिच्या जवळ आला. ''अशी रेड हॉट साडी घालून एकटीच उभी आहेस. ते हि अंधारात.'' क्षितीज

 

''सहज, कंटाळा आला होता म्हणून इथे आले. तू आला आहेस?'' भूमी

 

''हो, तू बोलावलं होतस, आलो.'' क्षितीज

 

''मी? आय मिन निधीने तुला तसं सांगितलं का?" भूमी

 

''होय, ती जास्तच फोर्स करत होती. मी इथे यावं म्हणून. सो मला डाऊट आला. तिला क्लिअर विचारलं, तेव्हा ती म्हणाली भूमीने रिक्वेस्ट केली आहे, तिला भेटायचं आहे, ये.'' क्षितीज

 

''ओह, तू भेटायचं म्हणत होतास, पण मला काल येता आलं नाही. सॉरी.'' भूमी खाली बघत म्हणाली. बोलताना ती कमालीची नर्व्हस असल्याचे स्पष्ट दिसत होते.

 

''आता नाना कसे आहेत? काही सुधारणा?'' क्षितीज

 

''निधीने सांगितलं का?'' भूमी

 

''होय. म्हणून इथे आलो. खरतर मला वेळ नव्हता. बट इट्स ओके.'' क्षितीज तिच्या उतरलेल्या चेहेऱ्याकडे बघत म्हणाला. ती उगाचच आपल्या हातातील रुमालाशी चला करत इकडे तिकडे बघत तशीच उभी होती. काय बोलावं? आणि कुठून सुरुवात करावी? तिला कळेनासे झाले.

 

''काहीतरी बोलणार होतीस?'' क्षितीज

 

''कुठून सुरुवात करू? आणि काय काय सांगू काहीच समजत नाहीये. आणि इथे पार्टी आहे, अशा ठिकाणी मला तुला काहीच सांगता येणार नाही.'' भूमी

 

''मी नक्की काय समजू? माझं महत्वाचं काम सोडून मी इथे आलोय, आणि तू...? तुझा हाच प्रॉब्लेम आहे, ऐन वेळेस पलटी खायची. मी पुन्हा तुला संधी नाही देणार. आत्ताच सांगतोय.'' क्षितीज खूप रागवला होता. ते बघून भूमीला काय करावे सुचेना. ती तशीच स्तब्ध त्याच्याकडे बघत उभी राहिली. आपले कां पकडून ती फक्त ''सॉरी'' एवढेच म्हणाली. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

ते पाहून तिचे दोन्ही हात खाली करत क्षितिजने तिला मिठीत घेतले.''भूमी रडू नकोस प्लिज, शांत हो आधी. आणि एवढ्या सुंदर मुलीला मी रडवतोय असे इथे कोणी पहिले ना तर मारतील मला. त्यातआतमध्ये पार्टीमध्ये तुझ्यासोबत डान्स करायला खूपजण उत्सुक आहेत.'' क्षितीज तिच्या गालावर आलेले केस कानामागे सारत म्हणाला.

 

''म्हणजे तू तेव्हा तिथेच होतास?'' भूमी आपले डोळे पुसत म्हणाली.

 

''तेव्हा नाही. तू किर्लोस्करांच्या घरातून निघाल्यापासून मी तुझ्या मागे आहे. ते डोळे बंद करून मला आठवत होतीस ना, तेव्हा पण मी तुझ्या मागे होतो.'' क्षितीज

 

''का?'' भूमी

 

''तू पार्टीला येणार म्हणजे स्पेशल असणार. तूच स्पेशल आहेस म्हणा. आणि अशी तयार होऊन आलीस तर मला सिक्युरिटी द्यायलाच पाहिजे ना.'' क्षितीज तिच्याकडे बघत म्हणाला.

 

''काही पण असत तुझं.'' भूमी

 

''काही पण नाही. जे आहे तेच सांगतोय, या साडीत सुंदर दिसतेस. अगदी माझी नजर हटत नाही.'' क्षितीज तिला जवळ ओढत म्हणाला.

 

''तू मला माफ केलास?'' भूमी त्याच्या गालाला हलकेच हात लावत विचारत होती.

 

''नाही. पण आपण आता त्या विषयावर न बोललेलं बरं नाही का? उगाच मूड का खराब करून घ्यायचा.'' क्षितीज

 

''आय लव्ह यु.'' भूमी

 

''नो, यु डोन्ट. माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून तर एवढं सगळं होऊनही मी तुझ्या सोबत आहे.  दुसरा कोणीही असता ना तर .... जाऊदे आता काय बोलायचं.तुम्हा बहिणींना सवय असावी बहुदा एखाद्याच्या विश्वासाचा गैरफायदा घायची. '' क्षितीज

 

''प्लिज असं म्हणून नको. आणि मैथिली बद्दल तर नकोच नको. ती खोटी केव्हाच नव्हती. नाहीये. ती फक्त बाबांचं ऐकायची आणि तसच वागायची. स्वतःच डोकं लावेल असत तर आज या अवस्थेत नसती.'' भूमी

 

''कशी आहे ती? तब्ब्येत ?'' क्षितीज

 

''काही दिवसांची सोबती आहे.'' बोलताना भूमीचा कंठ दाटून आला होता.

 

''ओह. सो सॅड.'' क्षितीज

 

''तुझ्या बाबानी माझ्याविरुद्ध शास्त्र म्हणून तुला त्यांच्या जागी उभं केलाय ना?'' क्षितीज

 

''नाही. त्यांना माहित आहे मी तुझ्या अगेन्स केव्हाच जाऊ शकत नाही. पण त्यांना कंपनीतील आमचे शेअर्स सोडायचे नाहीत. आणि कंपनीपण. त्यांना आता हे सगळं जमत नाही. म्हणून मला जॉईन करायला सांगितल '' क्षितीज

 

''आणि तू होकार दिलासा.'' क्षितीज

 

''फक्त तुला भेटता यावं, तुझ्या जवळ राहावं या एकमेव हेतूने मी हो तयार झाले. नाहीतर तू मस्त मागे पुढे दोन-दोन गाड्या घेऊन सिक्युरिटी सोबत फिरतोस. असा बाहेर भेटला असतास  का मला? कोणाला जवळ फिरकू हि देत नाहीस. मग आपण भेटलो नाही तर एकमेकांपासून अजून दूर गेलो असतो.'' भूमी डोळे पुसत बोलत होती.

 

''तुला त्रास झाला ना. सॉरी तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात नाही चालणार. तुला माहित आहे, या मधल्या काळात माझ्यावर दोन वेळा हल्ला झालाय. म्हणून ती सिक्युरिटी ठेवावी लागते. आणि भेटायचं म्हणशील तर तू इथे रिटर्न आलीस ना त्या दिवशी पासून मी अस्वस्थ आहे. तुझ्यावर राग सुद्धा आहे. आणि प्रेम सुद्धा. न राहवून मीच तुला भेटायला आलो असतो.'' क्षितीज तिच्या डोक्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाला.

 

''तू कंपनीमध्ये असं का वागतोस? सगळे लोक घाबरतात तुला. नुसता राग राग आणि बॉसिगिरि करत असतोस. लोक कामासाठी येतात, त्यांना पैश्यची गरज असते आणि आपल्याला त्यांच्या कामाची. आपन त्यांच्यावर काय उपकार करत नाही. तू असं तडकाफडकी वागत जाऊ नकोस.'' भूमी

 

''सॉरी बाबा. आता तू काय लेक्चर सुरु करतेस का? आत चल, निधीला भेटूया, ती काय म्हणेल? ''  क्षितीज

 

''होय, पण तू माफ केलास ना मला?'' भूमी

 

''नाही. अजून नाही. नंतर बघून ठरवेन.'' क्षितीज

 

''बघून म्हणजे? तू काय माझी परीक्षा वेगैरे घेणारेस का?'' भूमी

 

''आता एक किस घेतो, मग परीक्षेचं बघू. तयार राहा.'' म्हणत त्याने तिच्या गालावर हलकेच किस केले आणि ती गोडं लाजली, आता  हातात हात घालून ते दोघे आतमध्ये पार्टी हॉल कडे निघाले.

*****

निधी अजूनही निल सोबत डान्स करत होती.क्षितीज आणि भूमी ते हि एकत्र तिथे आलेले पाहून तिला फारच आनंद झाला. तिने क्षितिजला वरती डान्स करण्यासाठी बोलावले आणि भूमीला घेऊन तो स्टेजवर गेला.

 

'ना है ये पाना

ना खोना ही है

तेरा ना होना जाने

क्यूँ होना ही है

 

तुमसे ही दिन होता है

सुरमई शाम आती

तुमसे ही, तुमसे ही.'

 

हे गाणं सुरु झालं होत...

क्रमश

https://siddhic.blogspot.com/

 

नक्षत्रांचे देणे ४७

मैथिली अजूनही ऍडमिट होती. भूमी तिला भेटायला जात असे. निधीशी बोलून झाल्यावर डॉक्टर ना फोन केला आणि मैथिलीच्या तब्येतीची विचारपूस केली. मैथिली काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताना डॉक्टरनी पहिले होते. पण तिला स्पष्ट बोलता येत नव्हते. कदाचित तिला कोणाला तरी बोलवायचे असावे. त्यामुळे ती तसे इशारे कात होती. तब्येतीत सुधारणा काहीच नव्हती उलट तिची तब्येत अजून बिघडत चालली होती. लंडनहून स्पेशल ट्रीटमेंट घेऊन आल्यावरही तिला बरे वाटत नव्हते.  त्यामुळे डॉक्टर देखील काळजीत होते. 

मैथिली साठी भूमीला खूप वाईट वाटले. ती बारी व्हावी यासाठी काय वाट्टेल ते करण्याची सगळ्यांची तयारी होती. दर्दैवाने तास काहीही पॉसिटीव्ह रिस्पॉन्स मिळत नव्हता. 

 

*****

 

कंपणीतील काम आवरल्यावर क्षितिजने भूमीला ऍड्रेस मेसेज केला आणि तो निघाला. भूमी अजूनही कामात व्यस्त होती हे त्याने पहिले होते. मिस्टर किर्लोस्करांचे बरेचसे काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे भूमीला वेळ लागणार होता. जेव्हडे शक्य आहे तेवढे करून भूमी निघायची तयारी करू लागली. आणि गावाहून माईंचा फोन आला. 

''हॅलो. भूमी नानांना इकडे शहरात आणलं आहे. ते अचानक आजारी पडले आहेत. त्यांना जेजे हॉस्पिटलला ऍडमिट केलं आहे. तू येशील कामी एकटीच आहे ग.'' माई बोलत होत्या. 

 

''नानांना ऍडमिट केलाय. काय झालं?'' भूमी 

 

''अर्ध्याग वायू असावा. पण मी म्हातारी एकटीचडॉक्टर काही सांगत नाहीत. तू ये ना.'' माई 

 

''होय माईमी लगेच निघते. तुम्ही काळजी घ्या.'' म्हणत फोन ठेवून भूमी जेजे हॉस्पिट्लच्ये दिशेने निघाली. 

 

*****

 

अर्ध्यातासात ती हॉस्पिटलमध्ये टच झाली होती. नाना ऍडमिट केले होते तिथे जाऊन तिने डॉक्टरला विचारपूस केलीनानांना प्यारालिसिस चा अटॅक आला होता. आणि त्यामुळे त्यांची डावी बाजू संवेदनाशून्य झाली होती. जनरल वॉर्ड मधून इमर्जन्सी वार्ड मध्ये त्यांना हलवण्यात आले. माई भूमीला बघून ओक्सबोकसी रडू लागल्या. एकटी बाई अशा परिस्थितीत काय करणारात्या अगदी घाबरल्या होत्या. काय करावं आणि काय नाहीत्यांना समजत नव्हतं. त्यामुळे त्यांनी भूमीला बोलावून घेतलं होत. 

''माई रडू नका. सगळं ठीक होईल.'' म्हणत भूमीने त्यांना खुर्चीवर बसवले. 

 

''काय झालं ग हेमला एकटीला नाही जमत ग हे सगळं. काही सुधारत नाहीये.'' माई रडू लागल्या. 

 

''मी आहे ना. तुम्ही काळजी करू नका. मी इथेच थांबते तुम्ही पाहिजे तर थोडा वेळ आराम करा. तुमच्या तब्येतीची काळजी पण घेतली पाहिजे.'' भूमी 

 

''मी ठीक आहेत्यांना इथे सोडून मी कुठे नाही जाणार. तू थांब माझ्या सोबत.'' माई 

 

''मी आहे इथे. डॉक्टर काय म्हणतात ते पाहूया आणि मग माझ्याबरोबर घरी चला. आता इथून पुन्हा गावाला जाऊ नका. नाना बरे झाले कि मग पाहूया काय करायचं ते.'' भूमी 

 

''ते बरे होतील ना गमला काळजी वाटते.'' माई 

 

''होयहोणार बरे. आणि विभास ला फोन केला होता का?  त्याच्या कानावर घालून ठेवा.'' भूमी 

 

''होयतो लवकरात लवकर इमर्जन्सी ची फ्लॅइट पकडून इकडे येतोय.'' माई 

 

''बरं केलात.'' म्हणत भूमी डॉक्टरांच्या केबिनमध्ये निघून गेली. 

 

विभास पूर्वीपेक्षा बदलला होता. आणि हा बदल साकारात्म की होता. पुन्हा परदेशी स्थाईक होऊन त्याने नोकरी करायला सुरुवात केली होती. एवढेच नाही तर नाना आणि माईना फोन करून वेळोवेळो त्यांच्या तब्येतीची ती चौकशी करत होता. जमेल तेव्हा इथे भारतात पार्ट येऊन त्यांची काळजी हि घेत होता. त्यामुळे नाना माईना आत्ता कसलेही टेन्शन नव्हतेतर त्यात नानांना आता हे पॅरालिसिस चे दुखणे आले होते. भूमीने माईना वेळीच आधार दिला. डॉक्टरांनी नानांची काळजी घ्यायला सांगितली. त्यांना कम्प्लिट बेडरेस्ट सांगितलं होता. माईना याचा खूप धक्का बसला पण वसुस्थिती स्वीयकारण्या शिवाय पर्याय नव्हता. 

 

*****

भूमीला लोकेशन पाठवून एक तास झाला होता. पण तिने अजूनही क्षितिजचा मेसेज पाहिलेला नव्हता. क्षितीज येऊन तिची वाट बघत होता. त्याने तिला कॉल मारण्याच्या प्रयत्न केला पण तिने एकही कॉल उचलला नाही. तिला हॉस्पिटलमध्ये फोन घेता येणे शक्य नव्हतेयातले काहीही क्षितिजला माहित नसल्याने तो वाट बघत बराच वेळ तिथे थांबून राहिला मग ती फोनला रिप्लाय देऊ शांत नाही किंवा मेसेजही करत नाही हे पाहून त्याला वाटेल ती त्याला भेटायला येणार नाही. त्यामुले तो रागाने तिथून घरी निघून गेला. 

 

*****

नाना आणि माईना घेऊन भूमी आपल्या घरी आली. ते थोडे दिवस इथेच राहतील असे तिने तिच्या बाबाना सांगितले. नानांची गंभीर प्रकृती बघता. त्यांना थोडे दिवस इथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मिस्टर किर्लोस्करही हो म्हणाले. माई आणि नानांनी भूमीला दत्तक घेतली होतेआणि त्या आश्रम नंतर लहानाचे मोठे केले होते. जेव्हा मिस्टर किर्लोस्करांना माहीतही नव्हते तेव्हा भूमीला सांभाळण्याचे काम नानांनी केले. त्यामुळे त्या दोघांचे तिच्यावर आणि अर्थातच किर्लोस्करांवर उपकार होते. त्यामुळे नाना आणि माई विभास येईपर्यंत किंवा डॉक्टर पुढील काही सुचेचना देत नाहीत तोपर्यंत भूमी बरोबर राहणार होते.'

 

*****

 

मेघाताई आज सकाळ सकाळ ऑफिसमध्ये हजार झाल्या होत्या. कंपनीच्या HR ला भेटून त्या पासून इथे नियमित येणार आहेत असे सांगितले. आणि त्या केबिनमध्ये जाऊन बसल्या. त्यांना भूमीला भेटायची इच्छा होती. कदाचित तिला काहीतरी वाईट साईट बोलावे असा त्यांचा हेतू होता. पण भूमी आज हजर नसल्याने त्या नुसत्याच इकडे तिकडे फिरत बसल्या कंपनीच्या कामकाजा विषयी आणि इतर गोष्टीं विषयी माहित काढत बसल्या. 

 

 *****

 

'सकाळी ऑफिसला आल्यावर क्षितीजची चिडचिड सुरु होती. काल भूमी आपल्याला भेटायला आली नाही याचा त्याला राग होता. त्याला वाटले कि ती मुद्दामहून आली नाही. त्याने जाऊन तिच्या केबिनमध्ये पहिले. ती अजूनही ऑफिसमध्ये आलेली नव्हती. त्यात मेघाताईंचे म्हणजेच त्याच्या आईचे येणे त्याच्यासाठी अनपेक्षित होते. त्या आता रोज कंपनीत येणार आहेत हे कळल्यावर तो डिस्टरब झाला. हातातील काही महत्वाचे काम आवरून तो बाहेर निघाला. एवढ्यात निधीचा मेसेज आला होता. 'संध्याकाळी लग्नाची पार्टी देतेय ये. ऍड्रेस पाठवून दिला आहे.

'आज नाही जमणार. सॉरी हानी.'असा त्याने रिप्लाय पाठवून दिला. 

 

'ट्राय कर. बघ जमल तर ये. मी वाट बघते.'  निधीने पुन्हा मेसेज पाठवला होता आणि 'त्यावर 'ओकेअसा रिप्लाय पाठवून तो गाडीत बसला. 

***** 

'भूमी घरी राहून नानाची देखभाल करत होती. आजपासून एक मदतनीस तिने त्यांच्यासाठी नेमली होती. पण काही कारणांनी तिला उशीर झाला. नानाच्या पॅरालिसिस असल्याचे माईना कळल्यापासून त्याना खूप मोठा धक्का बसला होता. त्यांना सावरणे कठीण जात होते. त्यामुळे भूमी स्वतः घरी थांबली. संध्याकाळी ती मदतनीस हजार झाली होती. मग तिला नानाच्या सगळ्या मेडिसिनपथ्य पाणी आणि नाकी गोष्टींची माहिती देऊन भूमीने तिला नानाची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली. काळ संध्याकाळ पासून तिला झोप लागलेली नव्हती. रात्रभर ती नानांच्या उशाला बसून होती. आपला फोन गाडीतच राहिला आहे हे लक्षात आल्यावर तिने एका नोकराला तो आणायला पाठविल.  तोपर्यंत थोडं फ्रेश होऊन तिने खाऊन घेतलं.'

 

'फोन हातात मिळाल्यावर तिने आधी क्षितिजाला फोन लावला. त्याचे बरेच कॉलस मिस्ड झाले होते. त्याने पाठवलेल्या लोकेशन वर तिला पोहोचता आले नाही. त्यामुळे तिला वाईट वाटले. पण कशामुळे ती तिथे पोहोचू शकली नाही हे त्याला सांगावे म्हणौन तिने फोन ट्राय केला. नेहेमी प्रमाणेच क्षितिजच्या PA फोन घेतला. आणि तो बिझी आहे नंतर कॉल करा असे सांगितले. पुन्हा क्षितिजला राग आला आहे हे तिने ओळखले.'

 

'थोड्यावेळाने तिने निधीचा मेसेज पहिले. तिच्या लग्नाच्या पार्टीचं आमंत्रण आलं होत. मग भूमीने निधीला फोन लावला.

 

''हाय निधी. कुठे आहे पार्टी?'' भूमी

 

''ऍड्रेस पाठवला आहे बघ. ये ग प्लिज.'' निधी

 

''मी येइन ग... क्षितीज येणारे का?'' भूमी

 

''त्याला सांगितलं आहे . जमणार नाही म्हणालाय. का ग?'' निधी

 

''बोलावं नापलीज. रिक्वेस्ट करयेईल तो.'' भूमी

 

''ओहआठवण येते का. भेटायचं आहे.'' निधी

 

''नाही ग. काल आम्ही भेटणार होतो पण मी तिथे नाही पोहोचू शकले. म्हणून तो नक्कीच माझ्या वर रागावला असणार.'' भूमी

 

''का नाही भेटायला गेलीस?  आयताच तो तयार झाला होता. एकदा भेटून सगळ्या गोष्टी क्लाअर करायच्या तर तू असं करतेस बघ.'' निधी

 

''ऐक तरीनानांना पॅरालिसिस चा अटॅक आला ग काल. संध्याकाळी बिचार्या माई नव्हत्याच त्यांना घेऊन गावाहून इथे शहरात आल्या. हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं होत.मला समजलं तशी मी लगेच तिथे पोहोचले. रात्री उशिरा मी त्यांना आणि माईना घेऊन घरी आली. आणि या सगळ्या गडबडीत माझा फोन गाडीतच राहिला होता. त्यामुळे त्याला भेटू शकले नाही. आणि त्याला आता फोन करते तर तो नाही घेतत्याच्या PA शी बोलणं झालंआणि तो बिझी आहे.'' भूमीने सरसकट सगळं निधीला सांगून टाकलं.

 

''ओहसॉरी डिअर. मी उगाच तुला लेक्चर देत बसले. आता कसे आहेत नाना?'' निधी

 

''आहेत तसेच आहेत ग. कम्प्लिट बेडरेस्ट. पण घरी त्यांच्यावर लक्ष ठेवायला आम्ही आहोत. माईना पण याचा खूप धक्का बसलायमी काळ पासून त्यांच्याच जवळ बसून आहेत्यांची काळजी घेत. ऑफिसला सुद्धा नाही गेले.'' भूमी

 

''ओकेमग तुला जमेल ना पार्टीला यायला?'' निधी

 

''जमवून घेईन. तुझ्यासाठी आणि  क्षितीजसाठी. माझी माणसं सांभाळताना मला त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचंय. म्हणून येण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर तो अजूनच रागावेल आणि चिडचिड करेल.'' भूमी

 

''ओकेये तू. मी काहीही करून त्याला बोलावते.  माझ्या पार्टीपेक्षा तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. माझी गाडी सध्या रुळावर आहे. तुझ्यासाठी मी एवढं नक्कीच करू शकते.'' निधी

 

''थँक्स डिअरबाय.'' भूमी

 

''बायासी यु. यावेळी मिस करू नकोस.''  निधी

 

''नाहीमी येणार आहे.'' भूमी

*****

''निधी आणि नीलच्या लग्नाची पार्टी आहे. जाऊ का?'' भूमी माईंना विचारत होती.

 

''जा ना तू. आणि आता ती मदतनीस आहे नानांना बघायला. मी सुद्धा आता बऱ्यापैकी सावरली आहे. डॉक्टरांशी बोलणं झालं. व्यवस्थित काळजी घेतली तर नां लवकर बरे होतील. म्हणाले. तू जा इथली काळजी करू नकोस.'' माई

 

''मी सुद्धा घरीच आहेनानांना काहीही लागलं तर बघेन. तू जाऊन ये. तासाभराचा तर काम आहे. जा तू.'' मिस्टर किर्लोस्कर म्हणाले.

 

आणि भूमी तयार होऊन निधीच्या पार्टीला जायला निघाली.

 

'रेड वाइन नेटच्या साडीवर गोल्डन कलरचा ब्लाउज असा तिच्या पेहेराव होता. कानात मोठे हिऱ्यांचे गोल टॉप्स आणि हातात एक हिऱ्यांचा कडा घालून तिने तिच्या लूक परफ़ेकत केला. हलकीशी लाला लिपस्टिक ओठांवर लावून तिने केसांची एक साईट कानामागे पिन केली होती. आणि एक साईट तशीच मोकळी सोडली होती. हातात छोटासा गोल्डन क्लच आणि मोबाइल घेऊन ती गाडीत येऊन बसली. आणि निधीचा मेसेज आला. 'क्षितीज एका कामानिमित्त बाहेर गेलायसो नाही येऊ शकत. सॉरी.मेसेज वाचून भूमीला वाईट वाटलं. त्याच्यासाठी ती अवधी मस्त तयार झाली होती. तीच येणार नव्हता. पण निधीच्या पार्टीला जाणेही तितकेच महत्वाचे होते त्यामुळे, 'ओकेमी निघालीभेटू.असा निधीला रिप्लाय करून तिने गाडी स्टार्ट केली.'

 

*****


नक्षत्रांचे देणे ४६

 'क्षितिजचे पप्पा भूमी आणि क्षितिजचा विचार करत बसले होते.

काही महिन्यांपूर्वी घरात हसतं खेळतं वातावरण होत. दोघांचा साखरपुडा झालालग्न होणार होत. आणि सगळं काही अचानक विस्कटवून गेलं. होत्याच नव्हतं झालं. विभासने येऊन मेघाताईंच्या मनात भूमी बद्दल संशय निर्माण केला आणि त्यानंतर गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. पण भूमी अचानक लंडनला का निघून गेलीत्यामागे काय कारण होतेसत्य काय आहेहे तिने विश्वासात घेऊन क्षितिजच्या कानावर घातले असेल तर हि वेळ आली नसती. कदाचित त्यामागेही तिचा काहीतरी हेतू असेल. होतात चुका. माणूस म्हंटल तर हे होणारचपण या गोष्टच परिणाम होऊन क्षितिज एवढा बदलून जाईल. हे त्यांना मुळीच पटलेले नव्हते. त्यांच्या दृष्टीने महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे क्षितिजमुळे SK ग्रुप प्रॉफिट मध्ये आला होता. कंपनी जागतिक बाजार पेठेत आपलं नाव कमावत होती. तरीही त्यांना राहून राहून क्षितिजच्या खाजगी आयुष्याची चिंता लागून होती. खाजगी आयुष्यात त्याने कोणालाही हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली नव्हती. त्याचे सर्व निर्णय तो स्वतः घेत होता. कोणीही त्याला उपदेश किंवा सूचना केली तर ते त्याला आवडत नव्हते.

आता लग्न वेगैरे गोष्टी तर त्याच्या साठी संपलेल्या होत्या. त्याविषयी एकही अक्षर काढण्याची मुभा नव्हती. 'मी लग्न करणार नाही.असे त्याने घरी ठामपणे सांगून टाकले होते. त्यामुळे मिस्टर सावंत त्याच्या भविष्या बद्दल चिंतेत होते.'

 

*****

 

'ऑफिस मध्ये आज खूप गडबड सुरु होती. कॉन्फेरंस हॉलमध्ये सगळा महत्वाचा स्टाफ एकत्र जमला होता. कंपनीचे उच्च अधिकारी येऊन खुर्चीवर बसले. एक महत्वाची घोषणा होणार होती. क्षितिजने किर्लोकस्कराचा मेल पाहिला आणि तो त्या तातडीच्या सभेसाठी हॉलमध्ये दाखल झाला. किर्लोस्कर उठून उभे राहिले आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली.'

 

 

 

 

'शुभ सकाळ... आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि माझ्या बिघडत चाललेल्या तब्ब्येतीमुळे मला सध्या इथे नियमित हजार राहणे शक्य होत नाही. त्यामुळे कंपनीच्या कारभारात मला लक्ष देता येत नाही. त्याच कारणाने माझ्यानंतर माझा कारभार म्हणजेच माझे कंपनीमध्ये असणारे स्थान मी माझ्या वारसास सोपवत आहेआणि त्यासाठीच मी इथे आज तुम्हा सगळ्यांना आमंत्रण पाठवून बोलावले आहे. सो मी आज एक महत्वाची घोषणा करत आहे.म्हणत त्यांनी बाजूचे काही कागदपत्र आपल्या हातात घेतले.

 

 

 

 

'त्यांचा वारसमैथिली व्यतिरिक्त त्यांना कोण वारस आहेआणि ती तर आता उठण्या बोलण्याचाही मनस्थितीत नाही. उलट ती कोणाला ओळखत हि नाही. मग हे आपलं पद कोणाला देत आहेतकोण आहे यांचा वारस?' क्षितीज डोळे उचंवून किर्लोस्करांकडे बघत होता. त्याला काही कळेनासे झाले.'

 

 

 

 

'किर्लोस्करांनी पेपर्सवरती स्वाक्षरी केली आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना सोपवले. 'आज पासून  मी माझी द्वितीय कन्या मिस भूमी किर्लोस्कर हिला माझ्या पदावर बसवत आहे. त्यासंबंधी सगळे कायदेशीर कागदपत्र मी इथे दिलेले आहेत. भूमी प्लिज.'' म्हणत त्यांनी दरवाज्यातून आत येणाऱ्या भूमीकडे बोट दाखवले. परपल शर्टवर सफेद ब्लेझर आणि तशीच पॅन्टकेसाचा हाय बनडोळ्यात डार्क काजळकानात छोटेसे हँगिंग मोती अशी ती अगदी प्रोफेशनल आणि जबरदस्त दिसत होती. ती आत आली. मिस्टर किर्लोस्करांच्या बाजूच्या खुर्चीवर बसत तिने त्यांच्या हातातील पेपर्स आपल्या हातात घेऊन त्यावर स्वाक्षरी केली.'

 

 

 

 

'क्षितीज शॉक्ड होऊन समोर बघत होता. त्याच्या साठी हा सर्वात मोठा धक्का होता. आपल्या प्रतिस्पर्धीच्या खुर्चीवर ती व्यक्ती जिच्यावर आजही तो जीवापाड प्रेम करत होता. भूमीला बाबा नाहीतअसं ती म्हणायचीमग हे कायअसा प्रश्न त्याला पडला. आणि किर्लोस्करांना आधी हे माहित नव्हतं का कि भूमी त्यांची मुलगी आहेअशा बऱ्याच गोष्टीं विषयी त्याला प्रश्न पडले होते.'

 

 

 

 

''गुड मॉर्निंग. इथे असणारे बरेचसे मला ओळखतात. भूमी साठे म्हणून. काही महिन्यांपूर्वी मी इथे लीगल आड्वायसर  म्हणून काम करत होते. तेव्हा मला आणि माझे बाबा म्हणजेच किर्लोस्कर सर याना आम्हा दोघांनाही आमच्या नात्याची पुसटशी कल्पना नव्हती. ती गोष्ट वैयक्तिक आहे त्यामुळे मी इथे त्याबद्दल जास्त काहीही सांगू इच्छित नाही.  आय होप तुम्ही समजून घ्याल. सो काहीच दिवसांपूर्वी आम्हाला आमच्या नात्याची ओळख मिळाली. यापुढे मी इथे बाबांच्या जाग्यावर SK ग्रुपच्या पार्टनरच्या अधिकाराने काम पाहीन. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आपण मिळून कंपनीच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न करू. आजपासून मी हि जबाबदारी स्वइच्छेने स्वीकारत आहे. आशा करते तुम्ही सगळे मला सहकार्य कराल.''

 

एवढं बोलून भूमीने हातातील कागदपत्र मदतनिसांच्या हाती सोपवले. किर्लोस्करांच्या PA ने पुष्प गुच्छ देऊन ''वेलकम मॅम'' म्हणत तिचे स्वागत केले. आणि उपस्थित सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले.

 

 

 

 

''SK ग्रुप चे आपले एकमेव पार्टनर आणि सध्याचे CEO मिस्टर क्षितिज सावंत इथे उपस्थितीत आहेतत्याच्या बरोबरीने आता मिस भूमी किर्लोस्कर काम करणार आहेत. सो आपल्या कंपनीचे आपले दोन्ही ही मुख्य अधिकारी इथे उपस्थितीत आहेत. मी मिस्टर क्षितीज सावंत ना विनंती करतो त्यांनी ही नव्याने झालेली नेमणूक आणि तिचे कायदेशीर कागदपत्र यांची एक प्रत आपल्याकडे रेकॉर्डसाठी ठेवून घ्यावी.'' मिस्टर किर्लिस्करांनी काही पेपर्स क्षितिजकडे दिले. क्षितिजपुढे काहीही पर्याय नव्हता. तो उठून तिथे आला आणि त्याने ते पेपर्स स्वीकारले. बाजूला भूमी उभी होती.

 

 

 

 

''अभिनंदन मिस भूमी किर्लोस्कर.'' म्हणत त्याने तिच्या हातात हात मिळवला. त्या दोघांची नजरा नजर झाली. क्षितीजने खुनशी पनाने भूमीकडे बघत टशन दिले होते. ती अगदी नॉर्मल होती. आधी जशी असायची तशीच.

 

 

.''थँक्स पार्टनर.'' म्हणत ती खुर्चीवर बसली. मिटिंग आटोपली होती. मिस्टर किर्लोस्कर भूमीला सगळं कारभार सोपवून घरी निघून गेले. बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून भूमी तिथून निघाली आणि आपल्या केबिनमध्ये आली.'

 

 

 

 

'मे आय कम इन?'' भूमी आतमध्ये येऊन बसते नाही तोपर्यंत क्षितिज तिच्या मागोमाग तिच्या केबिनमध्ये आला होता.

 

 

 

 

''माझ्या केबिन मध्ये यायला परमिशन लागत नाही. येऊ शकता सर.'' भूमी मुद्दामच सर या शब्दावर जोर देत म्हणाली.

 

 

 

 

''ओहमाझ्या केबिनमध्ये यायला परमिशन लागते ना सो सवय झाले.'' क्षितीज

 

 

 

 

''उद्या पासून ती हि नाही लागणार.'' भूमी

 

 

 

 

''व्हॉट डू यू मिन?'' क्षितीज

 

 

 

 

''लिव्ह इट. उद्या समजेल. काहीतरी महत्वाचं काम असेल नात्याशिवाय इथे आलायस.  बोला. '' भूमी

 

 

 

 

''ते किर्लोस्कर आणि तू ... तुमचं नातंते लंडनला जाण्याआधी तुला माहित झालं असेल ना?'' क्षितीज

 

 

 

 

''होय.'' भूमी

''तू प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लपवलीसमला अंधारात ठेवल. काका केलंस हे सगळं कशासाठी?'' क्षितीज चिडून तिच्या अगदी जवळ आला होता. ती उठून त्याच्या समोर उभी राहिली. आणि त्याच्याकडे फक्त्त बघत राहिली.

''मी काय विचारतोयआणि तू बघतेस कायदूर हो आधी.'' क्षितीज

ती त्याच्या अजून जवळ येत म्हणाली. ''पहिली गोष्ट तू माझ्या केबिनमध्ये आला आहेस. ते हि न बोलावता. आणि दुसरी गोष्ट किसमोरची खुर्ची सोडून माझ्या खुर्चीजवळ येऊन वर मलाच सांगतोसदूर जा म्हणूं.'' भूमी

''मुद्दाम करतेस ना हे सगळं. मला त्रास द्यायला.'' क्षितीज तिच्या दंडाला पकडत म्हणाला.

'' तुला एक ह्ग करुस वाटतंय रे. करू?'' तिने त्याच्या गळ्याभोवती हात ठेवून त्याची कॉलर नीट केली. आणि टाय हात पकडत त्याच्याकडे पहिले.

''हे ऑफिस आहेनो मोअर पर्सनल डिस्कशन इन ऑफिस.'' क्षितीज तिच्या हातून आपली टाय सोडवून पार्ट त्याच्या खुर्चीवर येऊन बसला.

''इझॅक्टली... हेच तुझ्या प्रश्नच उत्तर आहे.'' भूमी

''म्हणजे?''क्षितिज

''मी आणि माझे नव्याने उत्पन्न झालेले बाबामाझं लंडनला जाण आणि इतर पर्सनल गोष्टी इथे कंपमानीमध्ये विचारायच्या नाहीत. इथे आपण काम करायला येतोसो पर्सनल डिक्सशन बाहेर करायचं.'' म्हणत तिने आपल्या समोरील पेपर्सचा गठ्ठा घेऊन तो चेक करायला सुरुवात केली. क्षितीज तिच्याकडे बघतच बसला.  त्याचीच ट्रिक वापरून तिने त्याला अंतर्मुख केले होते.

''संध्याकाळी भेटणार?'' क्षितीज

''ते सुद्धा कंपनी बाहेर गेल्यावर विचार. बाहेरच उत्तर देईन.'' भूमी वरती न बघता म्हणाली.

''सात वाजता भेट. काइट्स माउंटन.''  क्षितीज

''आज तिथे बारवाल्यानी लॉक लावलंय का?'' भूमी

''सात ला चालेल. आठ नंतर तिथे अजिबात जात जाऊ नकोस. माझ्या गाडीची काच फोडण्यात मला आजिबात इंटरेस्ट नाही.'' क्षितीज

''सातला नाही जमणार. काम आहे.''भूमी

''काम झालं कि येकेव्हाही. लोकेशन पाठवतो. मग तर झालं?'' क्षितीज पुन्हा चिडून तिच्या जवळ येत म्हणाला.

''बघतेजमल तर.'' भूमी त्याला चिडवत म्हणाली.

''तू येणार आहेस. दॅट्स इट. बाय.'' म्हणत तो मागे वळून बाहेर जाऊ लागला. लगेच भूमीने उठून मागून त्याचा हात पकडला होता.

अजूनही कालच बँडेज तसच होत. ''डॉक्टर कडे का नाही गेलास?'' भूमी

''हे पण पर्सनल डिस्कशन झालं ना. बाहेर बोलूया.'' क्षितीज गालात हसत तिला म्हणाला.

''मी नाही येणार. तू जा एकटाच बस.'' भूमी नाक फुगवून म्हणाली.

''तू जिथे असशील ना तिथून उचलून घेऊन जाईन.'' क्षितीज तिच्या कानात येऊन हळूच म्हणाला आणि सरळ दार ढकलून बाहेर निघून गेला.

******

क्षितीज बाहेर निघून गेला आणि वेदांत भूमीच्या केबिन मध्ये आला. मुखर्जी निघून गेल्यापासून त्याची डाळ शिवजत नव्हती. त्यात क्षितीज मुख्य पदावर बसला होता. क्षितीज आणि भूमीच्या बिघडलेल्या रिलेशनच्या बातम्या त्याला माहित होत्या. त्यामुळे संधी साधून भूमीला इम्प्रेस करावे असे ठरवून ती तिथे आला.

''हाय भूमी. आय मिन भूमी मॅम.'' वेदांत

''हायबस ना.'' भूमी

''अभिनंदन.'' वेदांत

''थँक्स. कसा आहेसआणि बाकी काय स्पेशल चाललं आहे?'' भूमी

''मी मजेत. कोर्लोस्कर सर आणि तू आय मिन तुम्ही.. तुमचं मुलगी वडिलांच नातं आहे. हे समजल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटल. मला पण.'' वेदांत

''येसआय नो. बट इट्स ट्र्यु.'' भूमी

''मैथिली मॅम कशा आहेतकाही रिकव्हरी आहे का?'' वेदांत

''जर काही चेंजेस नाहीत. पण ठीक म्हणायचं..'' भूमी

''ओहगुड.'' वेदांत

खरतर त्याला क्षितीज बद्दल आणि तिच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा होती पण ती जेव्हड्यास तेवढे उत्तर देते हे पाहिल्यावर तो शांत बसला तोपर्यंत बाहेरून एक शिपाई आत आला होता. ''मॅम स्टाफ मेम्बर तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत. जस्ट इंट्रो म्हणून... पाठवू का?'' शिपाई

''येसप्लिज.'' भूमी

''ओकेमी निघतो. बाय.'' म्हणत वेदांत केबिन बाहेर निघाला आणि बाकीच्या स्टाफ बरोबर भूमी इंट्रो मध्ये बिझी झाली.

*****

भूमीच्या जॉइनिंग ची बातमी मेघाताईना समजली होती. पुन्हा क्षितीज आणि तिची भेट अटळ होती हे त्यांच्या लक्षात आले. आणि भूमी आता कंपनीच्या मुख्य पदावर असणार आहे हे समजल्यावर त्यांचा पारा चढला. कंपनीतील संबंधित लोकांशी संपर्क करून त्यांनी विचारपूस चालू केली. भूमीला कंपनीतूल काढून टाकण्यासाठी काही करता येण्यासारखे आहे का हे पहिले. पण ते आता शक्य नव्हते. आता ती कंपनीमध्ये कोणाच्याही हाताखाली काम करत नव्हती. कि कोणालाही रिपोर्टींग करत नव्हती. ती आता तिथे बॉस होती. 

 

उलट भूमी किर्लोस्करांची मुलगी आहे हे कळल्यावर मेघाताईंना जून आश्चर्य वाटले. किर्लोस्करांची मुलगी म्हणजे ती मैथिलीची सावत्र बहीण होती. मैथिलीमुळे त्यांची अर्धी कंपनी किर्लोस्करांच्या हातात आयतीच गेली होती. नंतर तिने क्षितिजला फसवले आणि आत तिची बहीण म्हणजे भूमी क्षितिजला फसवणार असे त्यांना वाटत होते. 

 

या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी उद्या पासून ऑफिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 

 

*****

 

भूमीने कंपनी जॉईन केली हे नीलने निधीला सांगितले होते. भूमी का उगाचच क्षितिजच्या विरोधात जात आहे हे तिला विचारण्यासाठी निधीने भूमीला फोन केला. 

''हायभूमी मॅडम. कशी आहेस?" निधी 

 

''ए मॅडम काय म्हणतेस गमी मस्तती कशी आहे?'' भूमी 

 

''मी पण मस्तसध्या SK ग्रुप ची मॅडम आहेस. म्हणून मॅडम म्हंटल.  पण काय गका असे जाणून बुजून क्षितिजच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतेस?'' निधी 

 

''म्हणजे तुला पण असच वाटतंय कि मी त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करते?'' भूमी 

 

''सध्याच चित्र तेच दाखवत आहे ना.'' निधी 

 

''मी त्याच्या बरोबरीने राहण्याचं ठरवलंय. त्याच्या विरोधात नाही तर त्याच्या जोडीने. पार्टनर म्हणून. कंपनीला क्षितीज एकटा हॅण्डल करतोयपण त्याला नाही जमत. तो फक्त कंपनीच्या हिताचा विचार करतोयकामगार हिताचं कायत्यासहिच मी बाबांची ऑफ़िर स्वीकारली आणि इथे जॉईन झाले.'' भूमी 

 

''ते ठीक आहे ग. पण त्यामुळे क्षितिजचा राग अजून वाढेल ना. तुमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झालेत त्यामध्ये नाहक वाढ कशाला करतेस?''निधी 

 

''तुला माहित आहेमी त्याला सगळं खरं सांगायला तयार आहेपण तो काहीही ऐकून घेत नाही. उलट त्याने मला कंपनीत यायला परवानगी दिली नाही. त्याच्या घरी जाऊन फायदा झाला नाही. त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनातून जवळजवळ वजा केली. हे आमच्या दोघांमध्ये जे डिस्टन्स वाढत चाललंय ना. ते संपवण्यासाठी मला सतत त्याच्या समोर किंवा जवळ राहणं गरजेचं आहे. कंपनीमध्ये जॉईन केल्यावर आता मला ते शक्य आहे. नाहीतर तो मला त्याच्या जवळपासही फिरकू देत नव्हता.'' भूमी 

 

''पण तिथे तुमचे काही मतभेद झाले तरकंपनीचे शत्रू त्याचा फायदा घेतील.'' निधी 

 

''नाही होणार. मी त्याच्याच ट्रेकने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. लवकरच सगळं सुरळीत होईल. आणि क्षितीज अजूनही मायावर प्रेम करतो. फक्त रुसवा आह. तोही जाईल. बघशील तू.'' भूमी 

 

''गुड. मला आवडेल तुम्हा दोघांना एकत्र बघायला. काळजी घे. बाय .'' निधी 

 

''गुड डे हनी. बाय.'' भूमी 

 

 

 

नक्षत्रांचे देणे ४५

 निधी निल बरोबर थोडावेळ घालवून भूमी काइट्स माउंटनकडे आली. एवढ्या महिन्यांनी ती आज तिथे आली होती. ती येऊन एका टेबल शेजारी खुर्चीवर बसली. मूड अगदी डाऊन होता. एक कॉफी ऑर्डर करून ती पलीकडे असणाऱ्या डोंगरावरून अस्ताला जाणारा सूर्यास्त बघत होती. मस्त तांबूस झालेलं आकाश आणि त्यामधून डोंगराआड लपणारा सूर्य, सगळीकडे पडत चाललेला अंधार ती शांत चित्ताने आपला डोळ्यांनी टिपत होती.

 

''अजून त्या नक्षत्रांकडे बघत बसण्याचे वेड गेलेले दिसत नाहीये.'' क्षितीज तिच्या मागे उभा होता. तिने मागे वळून पहिले.

 

 

 

 

''त्याला वेड नाही छंद म्हणतात.'' भूमीने त्याच्याकडे बघून उत्तर दिले.

 

 

 

 

''इथे एकटीच काय करतेस?'' क्षितिज तिच्या दिशेने येत म्हणाला.

 

 

 

 

''काहि जागा पण तुझ्या मालकीची आहे कि कायनाहीतर तुझी परमिशन घ्यावी लागेल.'' भूमी

 

 

 

 

''संध्याकाळ झालेलीआता इथे चांगले लोक सहसा येत नाहीत. वरती बार आहे त्यामुळे जास्त वेळ इथे थांबू नकोस.'' क्षितिज

 

 

 

 

''ओहम्हणजे तू आता बारमध्ये जायला लागलास तरमी आपला उगाचच गैरसमज केला कि तू इथे सूर्यास्त बघायला आला आहेस.'' भूमी

 

 

 

 

''सूर्यास्त बघून बघून कंटाळलो. मग वरचा रस्ता धरला. ऐ नी वेमाझं डोकं दुखतंयमी जातोयशक्य असेल तर तू घरी जा. इथे थांबू नको.'' म्हणत तो त्या हॉटेलच्या वरच्या मजल्याकडे निघाला. भूमी त्याच्याकडे बघत राहिली. किती बदलाव माणसानेआणि काएका साधारण गैरसमजामूळे. तिला हताश आणि निराश झाल्यासारखे वाटत होते. ज्याच्यासाठी ती कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मत करून पुन्हा इकडे आली होती. त्या माणसाच्या मानत आता तिच्यासाठी  काहीही स्थान उरलेले नव्हते. तिला झालेल्या कॅन्सर मधून बरे होण्याचे चान्सेस खूप कमी होते. त्यामुळे फक्त आपले बरे वाईट झाले तर त्याला त्याचा धक्का बसू नये म्हणून तिने हि गोष्ट त्याच्यापासून लपवली. आणि मायग्रेन झाल्याचे खोटे सांगितले होते.

 

हातात कॉफीचा मग घेऊन ती तशीच वर आभाळाकडे बघत राहिली. आयुष्य कुठून कुठे घेऊन जात होतएक कोड सुटलं म्हणता म्हणता तिच्यापुढे दुसरा पेच निर्माण होत होता.  क्षितिजचे हे रूप तिने केव्हाही न पाहिलेले आणि न अनुभवलेले होते.

 

 

 

 

*****

 

क्षितीज वरती जाऊन बसला होता. पण त्याचे मन लागलं नव्हते. भूमी एकटीच खाली होती. त्यात इथे बऱ्याच लोकांची मांदीआळी होती. न राहवून तो परत खाली आला. भूमी अजूनही त्याच टेबलवर बसून होती. कोणीतरी दोन तरुण मुलं तिच्या दिशेने चालत येताना त्याने पहिले. तसे तो तिच्याकडे लगबगीने चालत आला.

 

''तू अजूनही इथेच बसलेस?''

 

 

 

 

''होयतुला काय प्रॉब्लेम आहे का?'' भूमी

 

 

 

 

''मी मस्करी करत नाहीयेइथे आता कॅफे कमी आणि बार जास्त चालतो. बारमध्ये जाणारे सगळे इकडे फिरत असतात. ते लोक चांगले नाहीत. माहित आहे ना  तुला. स्वतःसाठी उगाचच संकट कशाला ओढवून घेतेस.'' क्षितीज

 

 

 

 

''निधी येतेतिच्यासोबत घरी जाणार आहे. म्हणून तिची वाट बघत थांबली आहे. इथे कोणते लोक येतात आणि काय करतात त्याच्याशी मला काही एक देणेघेणे नाही.'' भूमी रागारागाने त्याला बोलली.

 

 

 

 

''चल मी घरी निघालोयतुला सोडतो.'' म्हणत क्षितीज तिच्याकडे बघत होता.

 

 

 

 

''आमच्या सारख्या सामान्य माणसांना घरी सोडने SK ग्रुपच्या CEO ला शोभत नाही.'' भूमी

 

 

 

 

''इथे कोणाला माहित नाहीयेमी CEO आहेइथे मी फक्त खातोपितोआणि मजा करतो.'' क्षितीज

 

 

 

 

''गुड.'' भूमी त्याच्याकडे बघून हसत म्हणाली.

 

 

 

 

''येतेसकि मी निघू.''  क्षितीज

 

 

 

 

''नाही येत.'' भूमी

 

 

 

 

क्षितिजने आजूबाजूला पहिले आजूबाजूचे काही लोक तिच्याकडेच पाहत होते. कदाचित एवढा वेळ ती एकटीच बसली होती म्हणून त्यांच्या गैरसमज झाला असावा. कि ती कोणी बारमध्ये जाणारी आहे. त्यामुळे एक नजर आजूबाजूला बघून क्षितीजने सरळ भूमी जवळ जाऊन तिच्या हाताला पकडले.

 

''हट्ट करु नकोस. चुपचाप चल.'' म्हणत तिला घेऊन तो तिथून बाहेर पडला. आपला हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला पण क्षितिजने तो घट्ट पकडला होता. तो पुढे आणि ती मागे असे त्याच्या गाडीपर्यंत येऊन पोहोचले. दार उघडून त्याने भूमीला आत बसायला सांगितले. तिने त्याचा हात झटकून आत बसायला साफ नकार दिला. ''मी कुठेही येणार नाही.'' म्हणत ती त्याला ढकलून पुन्हा मागे जायला निघाली. रागाने क्षितिजने आपला हात गाडीच्या काचेवर आपटला होता. धाडssss  असा त्याचा मोठा आवाज झाला. आणि भूमी गर्रकन मागे वळली.

 

''क्षितीज.. काय करतोयस. हा काय वेडेपणा?'' म्हणत तिने तो हात आपल्या हातात घेतला. काच फुटून त्याचे काही तुकडे त्याच्या हातात घुसले होते. रक्ताची धार लागली होती. तिने त्याच्या हातात घुसलेले दोन काचेच टुकडे बाजूला करून तिच्या स्कार्फने त्याचा हात घाट बांधला.  तो काहीही न बोलता तिच्याकडे रागाने बघत होता.

 

''हेच येत तुला. दुसऱ्याला त्रास होईल असं वागायचं. आणि मग निघून जायचं.'' तो तिच्याकडे बघत म्हणाला.

 

 

 

 

''मग बोल ना माझ्याशी. भांड ना.... मी असं का केलं ते विचार.  ते सोडून तू नुसता राग राग करत बसलायस. आणि हे काय करून घेतलेस बघ स्वतःच. ऑफिसमध्ये लोकांशी कसा वागतोसस्वतःच घरस्वतःची माणसं सगळं सोडून दिल आहेस. इथे..इथे बारमध्ये येऊन पित बसतोय. हे... हे शोभत तुला?'' भूमी राग- रागाने त्याची कॉलर पकडून त्याला विचारत होती.

 

 

 

 

''मला तुझ्याकडून कोणत ही स्पष्टीकरण नकोय. तू जे वागलीस ना त्यावरून मी काय समजायचं ते समजलोय. एव्हरीथिंग इस ओव्हर.'' क्षितीज

 

 

 

 

''गुड. आता गाडीत बस.'' म्हणत भूमी ड्रॉयव्हर सीटवर बसली. आणि तिने त्याची गाडी स्टार्ट केली. तो आपला हात झाडत येऊन तिच्या बाजूला बसला. गाडीची मागच्या खिडकीची काच तुटलेली होती.

 

 

 

 

''डॉक्टरकडे जाऊया?'' भूमी विचारत होती.

 

 

 

 

''नकोएवढं काही लागलं नाही.'' क्षितीज

 

 

 

 

''तुझ्या नवीन घराचं लोकेशन सांग?''  भूमी

 

 

 

 

''मोबाइलमध्ये टाकलय बघ.'' क्षितीज

 

 

 

 

''गुड.'' म्हणत तिने गाडी पळवायला सुरुवात केली.

 

 

 

 

अर्ध्यातासात ती त्याच्या बंगलो जवळ आली होती. तिने अगदी सुरक्षित आणि सफाईदारपणे गाडी चालवली होती ते पाहून, ''गाडी चालवायला शिकलीस.'' म्हणत क्षितीज खाली उतरला.

 

 

 

 

''ड्रॉईव्हरला सांगून तुला सोडायला लावतो. अफ्टर ऑल यू डिड समथिंग फॉर मी.'' म्हणत त्याने आपल्या ड्रॉईव्हरला हात दाखवला.

 

 

 

 

''नकोमाझी गाडी येईलच थोड्यावेळात. लोकेशन पाठवल आहे.'' भूमी आपल्या मोबाइलमध्ये बघत म्हणाली.

 

 

 

 

''गुड.'' तो त्याच्या गाडीला टेकत म्हणाला. ती तशीच उभी राहून तिचा ड्रॉईव्हर आणि गाडी येण्याची वाट बघत होती.

 

 

 

 

''आत येणार आहेस?" क्षितीज

 

 

 

 

''नाही. येईल गाडी एवढ्यात. तू तझ्या हाताला बँडेज करून घे. खूप रक्त गेलयनाहीतर नंतर त्रास होईल.'' भूमी

 

 

 

 

''हो. करतो उद्या.'' क्षितीज

 

 

 

 

''इथे कोण आहे काकि तुझं तू बँडेज करशील?'' भूमी

 

 

 

 

''बघतो जमल तर करतो.'' क्षितीज म्हणाल आणि तिने रागाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला.

 

 

 

 

''सांगत होती डॉक्टरकडे जाऊयातर नको म्हणालास. आत जमलं तर करतो म्हणतोस. तुझं डोकं जाग्यावर आहे का?'' म्हणत ती त्याच्या सोबत आतमध्ये आली.

 

 

 

 

''फार काही लागलेलं नाहीय. आणि आता  मला सवय झाले या सगळ्याची.'' क्षितीज बेल वाजवून तो आत घरात शिरला. भूमी त्याच्या पाठोपाठ होती. समोर असणाऱ्या एका मदतनिसाला फस्ट्रेट बॉक्स आणायला सांगून भूमी खुर्चीवर बसली.

 

 

 

 

''हो तुला फार काही लागलेलं नाही. फक्त दोन काचेचे तुकडे हातात घुसलेले आणि रक्त वाहत होत बस्स. गाडीची काच फुटली. मला वाटत त्या गाडीला लागलं असावं.'' तिने हात कॉटन ने साफ केला आणि त्यावर औषध लावून बँडेज गुंडाळले. क्षितीज एकही शब्द न बोलता तिच्याकडे बघत होता. त्याने पहिले  त्यांच्या साखरपुड्याची अंगठी अजूनही भूमीच्या हातात तशीच होती. ते पाहून त्याने नकारार्थी मान हलवली.

 

 

 

 

''तुझी ऐकून घायची तयारी असेल तर आपण बोलायचं काकमीत कमी मला स्वतःला एक्सप्लेन करण्याची एक संधी तरी दे.'' भूमी त्याच्याकडे बघत म्हणाली.

 

 

 

 

''अजिबात मूड नाहीये. आणि मूड नसल्यावर मी काय करतो हे तू मघाशी पाहिलं आहेस. सो प्लिज.'' क्षितीज

 

 

 

 

''प्लिज. तुला आणि मला दोघांनाही या सगळ्याचा त्रास होतोय. गोष्टी क्लिअर झाल्यावर गैरसमज दूर होतील. मला प्रयत्न तरी करू देत.'' भूमी त्याचा हात आपल्या हात घेत म्हणाली.

 

 

 

 

तो हात बाजूला करून तो ताडकन उठला. ''बाहेर हॉर्न वाजतोय. तुझी गाडी आली असेल. जाऊ शकतेस आणि मदत केल्याबद्दल थँक्स.''

 

 

 

 

''ओकेकाही हरकत नाहीतुझ्यापासून लपवून ठेवलेल्या काही गोष्टी एक्सप्लेन करायला मला फक्त थोडा वेळ हवाय. केव्हा तुझी इच्छा झाली तर सांग मला. वेळ निघून गेल्यावर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.'' भूमी

 

 

 

 

''वेळ केव्हाच निघून गेलेय. आता या सॉरी आणि थँक्यू चा काहीही उपयोग नाही. माझ्या लेखी याला काहीच किंमत नाही. सो तू सुद्धा मूव्ह ऑन कर. आणि मला माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगू दे.'' क्षितीज

 

 

 

 

''नंतर पश्चाताप करत बसू नकोस. कदाचित पश्चाताप करायला सुद्धा काही शिल्लक राहिलेले नसेल.'' म्हणत उठून भूमीने आपली पर्स आणि तो रक्ताने भरलेला तिचा स्कार्फ उचललाती बाहेर येऊन गाडीत बसली आणि घरी निघाली.

 

****

 

नक्षत्रांचे देणे ४४

 भूमी भारतात परत आल्याचे समजल्यावर नानांनी तिला फोन लावला.

 

''हॅलो बेटाकशी आहेस?'' नाना

 

 

 

 

''मी मस्त. तुम्ही कसे आहेत आणि माई?'' भूमी

 

 

 

 

''आम्ही अगदी मजेत. इकडे गावी केव्हा येणार आहेसये आम्हाला भेटायला. तुला बघावंसं वाटतंय.'' नाना

 

 

 

 

''हो,तुम्हाला भेटायला लवकर येणार आहे. इथे थोडं महत्वाचं काम आहे. ते संपल्यावर येते.'' भूमी

 

 

 

 

''क्षितिजला भेटलीस कातो अधून मधून चौकशी करण्यासाठी फोन करतो आम्हाला.'' नाना

 

 

 

 

''हो. भेटले. मस्त मजेत आहे सगळं. तुम्ही काळजी घ्याफ्री झाल्यावर फोन करते मगमाईंशी बोलेन.'' भूमी

 

 

 

 

''आत्ता घाईमध्ये दिसतेस. बर बरं सावकाश फोन कर.'' म्हणत नानांनी फोन ठेवला.

 

 

 

 

भूमी फोन कट करून विचार करू लागली. नाना आणि माईंनी क्षितीज आणि माझ्या साठी खूप काही केले. अगदी आपल्या मुलाचे सत्य जगासमोर आणण्यासाठी मदत केली. जर त्यांना समजलेकि आता क्षितीज आणि मी एकत्र नाही आहोत. तर त्यांना वाईट वाटेल. त्यामुळे हि गोष्ट सध्यातरी त्यांच्या पासून लपवून ठेवावी. त्यामुळे तिने थोडक्यात बोलणे उरकून तिने फोन ठेवून दिला.

 

 

 

 

*****

 

 

 

 

भूमीला सांगितल्या प्रमाणे किर्लोस्कर तिला घेऊन आज कंपनीमध्ये हजर झाले. वार्षिक सर्वसाधारण सभा होती. बरेच महत्वाचे निर्णय आज घेतले जाणार होते. त्यामुळे ते मिटिंगसाठी निघून गेले. ऑफिस मध्ये आल्यावर भूमीला खूप सारे बदल जाणवले. पूर्वीचे खेळीमेळीचे वातावरण आता दिसत नव्हते. सगळे लोक खाली मान घालून काम करत होते. कोणीही मजा मस्ती करत नव्हते. जो तो आपला कामात व्यस्त. युनिफॉर्म वरचे नियम कडक करण्यात आले होते. सगळे फॉर्मल मध्ये होते. रिसिप्शन वरती असणारी आधीची मुलगी बदलण्यात आली होती. बरेच वरिष्ठ अधिकारी बदलले होते. त्यांच्या जागी नव्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. मुखर्जींची जागा सरपोतदार म्हणून एका तरुण मुलाने घेतली होती. जुन्या स्टाफ पैकी फक्त वेदांत तिथे हजार होता. भूमीला बघून तो लगेच तिच्या जवळ आला. हाय हॅलो करून त्याने तिची विचारपूस केली. बदलेले सूर आणि नवीन बॉस च्या हाताखाली काम करताना जाणवणारी परकेपणाची भावना त्याने बोलून दाखवली.

 

 

 

 

थोडं फार ऑफिस फिरून ती तिच्या आधीच्या केबिनकडे वळली. तिथे रागिणी नावाची एक तरुण मुलगी जॉईन झाली होती. तिच्याशी गप्पा मारून झाल्यावर भूमी क्षितिजच्या केबिनकडे वळली तेव्हा तिला 'भूमीम्हणून मागून कोणीतरी हाक मारली होती. तिने मागे वळून पहिले मागे निधीचा नवरा निल उभा होता.

 

''हाय तू इथे?'' भूमी

 

 

 

 

''मी इथे जॉब करतो. तू इथे कशी काय?'' निल

 

 

 

 

''ओहम्हणजे तू क्षितिजच्या कंपनीत जॉईन झाला आहेस तर. ग्रेट.'' भूमी

 

 

 

 

''एसनिधीसाठी मी माझं घर सोडलंमग जॉबचा प्रश्न आला. क्षितिजने मला जॉब ऑफ़िर दिली. एवढेच नाही आमच्या लग्नासाठी त्याने खूप प्रयत्न केलं आहेत. म्हणून तर हे सगळं शक्य झालं.'' निल

 

 

 

 

''गुडमी बाबांच्या बरोबर आलेयजस्ट कंपनी पाहायला.'' भूमी

 

 

 

 

''बाबाओहमिस्टर किर्लोस्कर काएस निधीने संगीतलं आहे मला. ते इकडे अगदीच क्वचित येतात. आज तुला घेऊन आले.'' निल

 

 

 

 

''एसक्षितिजला भेटायला जाते.'' भूमी

 

 

 

 

''तो.. आय मिन सर इथे नाही आहेत. बट त्याच्या PA कडून आधी अपॉइंटमेंट घावी लागतेतरच तो भेटतो.'' निल

 

 

 

 

''व्हॉटआर यु सिरिअस?'' भूमी

 

 

 

 

''एससगळं काही बदललेलं आहे. बी केअरफूल.'' निल

 

 

 

 

''सांगितल्या बद्दल थँक्स.  नाहीतर मी डायरेक्ट आत गेले असते.'' भूमी

 

 

 

 

''चुकूनही नको जाऊस. तो अजिबात इंटरटेन करणार नाही. उलट सीक्युरीटीला सांगून तुला ऑफिस बाहेर काढेल.'' निल

 

 

 

 

''ओ आय सी.'' भूमी

 

 

 

 

''चलबाय. भेटू नंतर.'' म्हणत निल निघून गेला. आणि काहीतरी विचार करून भूमी गुपचूप क्षितिजच्या केबिनमध्ये शिरली. सुदैवाने कोणाचे तिच्याकडे लक्ष गेले नाही.  कोणी तिला पाहू नये म्हणून आतमध्ये गेल्यागेल्या तिने आतली लाईट बंद केली. आणि ती क्षितिजची वाट बघत तिथे बसून राहिली.

 

 

 

 

*****

 

मिस्टर किर्लोस्कर मिटिंग मध्ये व्यस्त होते. ते कंपनीमध्ये खूप दिवसांनी आले होते त्यामुळे बऱ्याच गोष्टी पेंडिंग होत्या. त्यांच्या टेबलवरती कागदपत्रांचा ढीग पडला होता. महत्वाचे सगळे कागदपत्र तपासून त्यांनी त्यावर सह्या केल्या. महत्वाचे टेंडर पास केले आणि त्यांच्या दृष्टीने महत्वाचे नसणारे रिटर्न केले. उद्या एक तातडीच्या सभेचे मेल महत्वाच्या व्यक्तींना पाठवून दिले आणि ते वार्षिक सभेसाठी कॉमन हॉलमध्ये हजर झाले.

 

 

 

 

*****

 

 

 

 

कॉमन हॉलमध्ये शुकशुकाट पसरला होता. काही निर्णय घेऊन झाले होते. तर काही पेंडिंग ठेवण्यात आले. किर्लोस्करांना बघून क्षितीज सभा अर्धवट सोडून तिथून उठून त्याच्या केबिनच्या दिशेने निघाला. ''माझा PA पुढचे सगळे हान्डेल करेल मी निघतोय. महत्वाचे काम आहे.'' असे बोलून तो आपल्या केबिनमध्ये आला. लाईट लावून त्याने आपली चेअर ओढली त्यावर तो बसणार तर समोरच्या खुर्चीवर बसलेल्या भूमीकडे त्याची नजर गेली.

 

''तूमाझ्या केबिनमध्ये माझ्या परवानगी शिवाय काय करतेस?'' म्हणत तो उठून उभा राहिला. भूमी अजून बसलेली होती. त्याच्याकडे बघत तिने एक स्माईल दिली.

 

''बॉस वाटतोस हा आता. अगदी हटके.'' भूमी

 

 

 

 

''तू आधी इथून बाहेर निघून जा. आणि मला समजवायला वेगैरे आली असशील तर तसा प्रयत्नही करू नको. त्याचा काहीही उपयोग होणार नाही.'' क्षितीज रागाने तिला म्हणाला.

 

 

 

 

''नाही. तुला काय समजावणार मी. कंपनीत आली होती तर तुला भेटायला आली.'' भूमी

 

 

 

 

''तुला आतमध्ये कोणी येऊ दिल?'' क्षितिज

 

 

 

 

''आले गुपचूपकाय करणार आहेस?'' भूमी

 

 

 

 

''माझे पेशन्स चेक करू नकोस. सरळ सरळ उत्तर देत जा. आणि हो मला खूप काम आहेत. सो प्लिज आलीस तशीच निघून जा.'' क्षितीज अजूनही चिडलेला होता. खुर्चीवर बसत त्याने समोरचे पेपर्स आपल्याकडे ओढले आणि त्यावर साह्य करायला सुरुवात केली.

 

 

 

 

''जातेऐकून होते इथला बॉस खूपच तापट आहे. स्वतःची मनमानी करतोकंपनीच्या प्रॉफिट शिवाय त्याला कोणाशीही काहीही हितसंबंध ठेवायला आवडत  नाहीत. वेगैरे वेगैरे एकूण होतेआता प्रत्यक्षात बघितलं. खात्री करत होते. तोच क्षितीज आहे कि वेगळा कोण इथे येऊन बसल्या.'' भूमी अतिशय शांतपणे बोलत होती.

 

 

 

 

''माझी कंपनीमी काय वाट्टेल ते करेन. तुझी आता खात्री झाली असेल तर तू जाऊ शकतेस.'' क्षितीज

 

 

 

 

''विचार कर तुझ्याच कंपनीत तुझ्या समोरच्या खुर्चीवर प्रतिस्पर्धी म्हणून मी बसलेली आहे. काय करशील?'' भूमी

 

 

 

 

''अशक्य. या कंपनीत तुला आत कोणीही पुन्हा घेणार नाही. तसा स्वप्नातही विचार करू नकोस.'' क्षितीज

 

 

 

 

'म्हणजे मी किर्लोस्करांची मुलगी आहे हे याला अजूनही माहित नाहीतरभूमीने विचार केला. न सांगितलेले बरे. आत्ता तर खरी मज्जा येणार होती. त्यामुळे ती मनातच हसली.''गुडसी यु सून पार्टनर.'' म्हणत दार ढकलून ती बाहेर आली. आणि सरळ कंपनीबाहेर येऊन तिने घराचा रस्ता धरला.

 

बदलेला क्षितिज आणि त्याने कंपनीत चालवलेली मनमानी बघून तिने तिच्या बाबांना फोन करून आपण घरी जात असल्याचे कळवले. आणि त्यांनी तिच्या समोर ठेवलेल्या प्रपोजलला ताबडतोप होकार कळवळा.

 

 

*****

निधीनिल आणि भूमी कॅफेमध्ये कॉफी घेत बसले होते. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. क्षितीज बद्दल भूमीला समजलेल्या गोष्टी तिने निधी आणि नीलकडून कडून  कन्फर्म करून घेतल्या. निधीने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला कि आता क्षितीज आणि तू पुन्हा एकत्र येणं शक्य नाही. पण भूमी आपल्या निर्णयावर ठाम होती. बदललेला क्षितिज आणि आता त्याला टक्कर द्यायला ती स्वतःला बदलायला तयार झाली होती.

 

''तू लंडनला जाण्यामागचे खरे कारण आणि तिथे गेल्यावर घडलेल्या अनपेक्षित गोष्टी तू क्षितिजला सांग.'' असे निधी म्हणाली. पण आता क्षितीज भूमीचे काहीही ऐकायला तयार नव्हता. एवढंच काय तिने काहीही सांगितले तरीही ती खोटं बोलते असे त्याला वाटने साहजिक होते. त्यामुळे भूमीने तसे करण्यासाठी साफ नकार दिला.

 

 

 

 

'निल आणि निधीने तिला समजावले पण आता भूमी देखील मागे हटणार नव्हती. क्षितीजवर आपले प्रेम होतेआहे आणि सदैव असेल. त्यामुळे त्याला परत मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. नीलने तिला लागेल ती मदत करण्याचे वचन दिले. निधी देखील त्या दोघांना पुन्हा एकत्र बघण्यासाठी उत्सुk होती.'

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...