बुधवार, १६ मार्च, २०२२

नक्षत्रांचे देणे ४५

 निधी निल बरोबर थोडावेळ घालवून भूमी काइट्स माउंटनकडे आली. एवढ्या महिन्यांनी ती आज तिथे आली होती. ती येऊन एका टेबल शेजारी खुर्चीवर बसली. मूड अगदी डाऊन होता. एक कॉफी ऑर्डर करून ती पलीकडे असणाऱ्या डोंगरावरून अस्ताला जाणारा सूर्यास्त बघत होती. मस्त तांबूस झालेलं आकाश आणि त्यामधून डोंगराआड लपणारा सूर्य, सगळीकडे पडत चाललेला अंधार ती शांत चित्ताने आपला डोळ्यांनी टिपत होती.

 

''अजून त्या नक्षत्रांकडे बघत बसण्याचे वेड गेलेले दिसत नाहीये.'' क्षितीज तिच्या मागे उभा होता. तिने मागे वळून पहिले.

 

 

 

 

''त्याला वेड नाही छंद म्हणतात.'' भूमीने त्याच्याकडे बघून उत्तर दिले.

 

 

 

 

''इथे एकटीच काय करतेस?'' क्षितिज तिच्या दिशेने येत म्हणाला.

 

 

 

 

''काहि जागा पण तुझ्या मालकीची आहे कि कायनाहीतर तुझी परमिशन घ्यावी लागेल.'' भूमी

 

 

 

 

''संध्याकाळ झालेलीआता इथे चांगले लोक सहसा येत नाहीत. वरती बार आहे त्यामुळे जास्त वेळ इथे थांबू नकोस.'' क्षितिज

 

 

 

 

''ओहम्हणजे तू आता बारमध्ये जायला लागलास तरमी आपला उगाचच गैरसमज केला कि तू इथे सूर्यास्त बघायला आला आहेस.'' भूमी

 

 

 

 

''सूर्यास्त बघून बघून कंटाळलो. मग वरचा रस्ता धरला. ऐ नी वेमाझं डोकं दुखतंयमी जातोयशक्य असेल तर तू घरी जा. इथे थांबू नको.'' म्हणत तो त्या हॉटेलच्या वरच्या मजल्याकडे निघाला. भूमी त्याच्याकडे बघत राहिली. किती बदलाव माणसानेआणि काएका साधारण गैरसमजामूळे. तिला हताश आणि निराश झाल्यासारखे वाटत होते. ज्याच्यासाठी ती कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मत करून पुन्हा इकडे आली होती. त्या माणसाच्या मानत आता तिच्यासाठी  काहीही स्थान उरलेले नव्हते. तिला झालेल्या कॅन्सर मधून बरे होण्याचे चान्सेस खूप कमी होते. त्यामुळे फक्त आपले बरे वाईट झाले तर त्याला त्याचा धक्का बसू नये म्हणून तिने हि गोष्ट त्याच्यापासून लपवली. आणि मायग्रेन झाल्याचे खोटे सांगितले होते.

 

हातात कॉफीचा मग घेऊन ती तशीच वर आभाळाकडे बघत राहिली. आयुष्य कुठून कुठे घेऊन जात होतएक कोड सुटलं म्हणता म्हणता तिच्यापुढे दुसरा पेच निर्माण होत होता.  क्षितिजचे हे रूप तिने केव्हाही न पाहिलेले आणि न अनुभवलेले होते.

 

 

 

 

*****

 

क्षितीज वरती जाऊन बसला होता. पण त्याचे मन लागलं नव्हते. भूमी एकटीच खाली होती. त्यात इथे बऱ्याच लोकांची मांदीआळी होती. न राहवून तो परत खाली आला. भूमी अजूनही त्याच टेबलवर बसून होती. कोणीतरी दोन तरुण मुलं तिच्या दिशेने चालत येताना त्याने पहिले. तसे तो तिच्याकडे लगबगीने चालत आला.

 

''तू अजूनही इथेच बसलेस?''

 

 

 

 

''होयतुला काय प्रॉब्लेम आहे का?'' भूमी

 

 

 

 

''मी मस्करी करत नाहीयेइथे आता कॅफे कमी आणि बार जास्त चालतो. बारमध्ये जाणारे सगळे इकडे फिरत असतात. ते लोक चांगले नाहीत. माहित आहे ना  तुला. स्वतःसाठी उगाचच संकट कशाला ओढवून घेतेस.'' क्षितीज

 

 

 

 

''निधी येतेतिच्यासोबत घरी जाणार आहे. म्हणून तिची वाट बघत थांबली आहे. इथे कोणते लोक येतात आणि काय करतात त्याच्याशी मला काही एक देणेघेणे नाही.'' भूमी रागारागाने त्याला बोलली.

 

 

 

 

''चल मी घरी निघालोयतुला सोडतो.'' म्हणत क्षितीज तिच्याकडे बघत होता.

 

 

 

 

''आमच्या सारख्या सामान्य माणसांना घरी सोडने SK ग्रुपच्या CEO ला शोभत नाही.'' भूमी

 

 

 

 

''इथे कोणाला माहित नाहीयेमी CEO आहेइथे मी फक्त खातोपितोआणि मजा करतो.'' क्षितीज

 

 

 

 

''गुड.'' भूमी त्याच्याकडे बघून हसत म्हणाली.

 

 

 

 

''येतेसकि मी निघू.''  क्षितीज

 

 

 

 

''नाही येत.'' भूमी

 

 

 

 

क्षितिजने आजूबाजूला पहिले आजूबाजूचे काही लोक तिच्याकडेच पाहत होते. कदाचित एवढा वेळ ती एकटीच बसली होती म्हणून त्यांच्या गैरसमज झाला असावा. कि ती कोणी बारमध्ये जाणारी आहे. त्यामुळे एक नजर आजूबाजूला बघून क्षितीजने सरळ भूमी जवळ जाऊन तिच्या हाताला पकडले.

 

''हट्ट करु नकोस. चुपचाप चल.'' म्हणत तिला घेऊन तो तिथून बाहेर पडला. आपला हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला पण क्षितिजने तो घट्ट पकडला होता. तो पुढे आणि ती मागे असे त्याच्या गाडीपर्यंत येऊन पोहोचले. दार उघडून त्याने भूमीला आत बसायला सांगितले. तिने त्याचा हात झटकून आत बसायला साफ नकार दिला. ''मी कुठेही येणार नाही.'' म्हणत ती त्याला ढकलून पुन्हा मागे जायला निघाली. रागाने क्षितिजने आपला हात गाडीच्या काचेवर आपटला होता. धाडssss  असा त्याचा मोठा आवाज झाला. आणि भूमी गर्रकन मागे वळली.

 

''क्षितीज.. काय करतोयस. हा काय वेडेपणा?'' म्हणत तिने तो हात आपल्या हातात घेतला. काच फुटून त्याचे काही तुकडे त्याच्या हातात घुसले होते. रक्ताची धार लागली होती. तिने त्याच्या हातात घुसलेले दोन काचेच टुकडे बाजूला करून तिच्या स्कार्फने त्याचा हात घाट बांधला.  तो काहीही न बोलता तिच्याकडे रागाने बघत होता.

 

''हेच येत तुला. दुसऱ्याला त्रास होईल असं वागायचं. आणि मग निघून जायचं.'' तो तिच्याकडे बघत म्हणाला.

 

 

 

 

''मग बोल ना माझ्याशी. भांड ना.... मी असं का केलं ते विचार.  ते सोडून तू नुसता राग राग करत बसलायस. आणि हे काय करून घेतलेस बघ स्वतःच. ऑफिसमध्ये लोकांशी कसा वागतोसस्वतःच घरस्वतःची माणसं सगळं सोडून दिल आहेस. इथे..इथे बारमध्ये येऊन पित बसतोय. हे... हे शोभत तुला?'' भूमी राग- रागाने त्याची कॉलर पकडून त्याला विचारत होती.

 

 

 

 

''मला तुझ्याकडून कोणत ही स्पष्टीकरण नकोय. तू जे वागलीस ना त्यावरून मी काय समजायचं ते समजलोय. एव्हरीथिंग इस ओव्हर.'' क्षितीज

 

 

 

 

''गुड. आता गाडीत बस.'' म्हणत भूमी ड्रॉयव्हर सीटवर बसली. आणि तिने त्याची गाडी स्टार्ट केली. तो आपला हात झाडत येऊन तिच्या बाजूला बसला. गाडीची मागच्या खिडकीची काच तुटलेली होती.

 

 

 

 

''डॉक्टरकडे जाऊया?'' भूमी विचारत होती.

 

 

 

 

''नकोएवढं काही लागलं नाही.'' क्षितीज

 

 

 

 

''तुझ्या नवीन घराचं लोकेशन सांग?''  भूमी

 

 

 

 

''मोबाइलमध्ये टाकलय बघ.'' क्षितीज

 

 

 

 

''गुड.'' म्हणत तिने गाडी पळवायला सुरुवात केली.

 

 

 

 

अर्ध्यातासात ती त्याच्या बंगलो जवळ आली होती. तिने अगदी सुरक्षित आणि सफाईदारपणे गाडी चालवली होती ते पाहून, ''गाडी चालवायला शिकलीस.'' म्हणत क्षितीज खाली उतरला.

 

 

 

 

''ड्रॉईव्हरला सांगून तुला सोडायला लावतो. अफ्टर ऑल यू डिड समथिंग फॉर मी.'' म्हणत त्याने आपल्या ड्रॉईव्हरला हात दाखवला.

 

 

 

 

''नकोमाझी गाडी येईलच थोड्यावेळात. लोकेशन पाठवल आहे.'' भूमी आपल्या मोबाइलमध्ये बघत म्हणाली.

 

 

 

 

''गुड.'' तो त्याच्या गाडीला टेकत म्हणाला. ती तशीच उभी राहून तिचा ड्रॉईव्हर आणि गाडी येण्याची वाट बघत होती.

 

 

 

 

''आत येणार आहेस?" क्षितीज

 

 

 

 

''नाही. येईल गाडी एवढ्यात. तू तझ्या हाताला बँडेज करून घे. खूप रक्त गेलयनाहीतर नंतर त्रास होईल.'' भूमी

 

 

 

 

''हो. करतो उद्या.'' क्षितीज

 

 

 

 

''इथे कोण आहे काकि तुझं तू बँडेज करशील?'' भूमी

 

 

 

 

''बघतो जमल तर करतो.'' क्षितीज म्हणाल आणि तिने रागाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला.

 

 

 

 

''सांगत होती डॉक्टरकडे जाऊयातर नको म्हणालास. आत जमलं तर करतो म्हणतोस. तुझं डोकं जाग्यावर आहे का?'' म्हणत ती त्याच्या सोबत आतमध्ये आली.

 

 

 

 

''फार काही लागलेलं नाहीय. आणि आता  मला सवय झाले या सगळ्याची.'' क्षितीज बेल वाजवून तो आत घरात शिरला. भूमी त्याच्या पाठोपाठ होती. समोर असणाऱ्या एका मदतनिसाला फस्ट्रेट बॉक्स आणायला सांगून भूमी खुर्चीवर बसली.

 

 

 

 

''हो तुला फार काही लागलेलं नाही. फक्त दोन काचेचे तुकडे हातात घुसलेले आणि रक्त वाहत होत बस्स. गाडीची काच फुटली. मला वाटत त्या गाडीला लागलं असावं.'' तिने हात कॉटन ने साफ केला आणि त्यावर औषध लावून बँडेज गुंडाळले. क्षितीज एकही शब्द न बोलता तिच्याकडे बघत होता. त्याने पहिले  त्यांच्या साखरपुड्याची अंगठी अजूनही भूमीच्या हातात तशीच होती. ते पाहून त्याने नकारार्थी मान हलवली.

 

 

 

 

''तुझी ऐकून घायची तयारी असेल तर आपण बोलायचं काकमीत कमी मला स्वतःला एक्सप्लेन करण्याची एक संधी तरी दे.'' भूमी त्याच्याकडे बघत म्हणाली.

 

 

 

 

''अजिबात मूड नाहीये. आणि मूड नसल्यावर मी काय करतो हे तू मघाशी पाहिलं आहेस. सो प्लिज.'' क्षितीज

 

 

 

 

''प्लिज. तुला आणि मला दोघांनाही या सगळ्याचा त्रास होतोय. गोष्टी क्लिअर झाल्यावर गैरसमज दूर होतील. मला प्रयत्न तरी करू देत.'' भूमी त्याचा हात आपल्या हात घेत म्हणाली.

 

 

 

 

तो हात बाजूला करून तो ताडकन उठला. ''बाहेर हॉर्न वाजतोय. तुझी गाडी आली असेल. जाऊ शकतेस आणि मदत केल्याबद्दल थँक्स.''

 

 

 

 

''ओकेकाही हरकत नाहीतुझ्यापासून लपवून ठेवलेल्या काही गोष्टी एक्सप्लेन करायला मला फक्त थोडा वेळ हवाय. केव्हा तुझी इच्छा झाली तर सांग मला. वेळ निघून गेल्यावर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.'' भूमी

 

 

 

 

''वेळ केव्हाच निघून गेलेय. आता या सॉरी आणि थँक्यू चा काहीही उपयोग नाही. माझ्या लेखी याला काहीच किंमत नाही. सो तू सुद्धा मूव्ह ऑन कर. आणि मला माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगू दे.'' क्षितीज

 

 

 

 

''नंतर पश्चाताप करत बसू नकोस. कदाचित पश्चाताप करायला सुद्धा काही शिल्लक राहिलेले नसेल.'' म्हणत उठून भूमीने आपली पर्स आणि तो रक्ताने भरलेला तिचा स्कार्फ उचललाती बाहेर येऊन गाडीत बसली आणि घरी निघाली.

 

****

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...