शनिवार, २० जुलै, २०१९

कुडाच्या शेंगांची भाजी


कुडाच्या शेंगां

साहित्य:-
प्रत्येकी एक चमचा तेल, मोहरी, जिरे, हिंग.एक जुडी कुडाच्या शेंगा, दोन कांदे , चार मिरच्या.थोड ओलं खोबरं, मुठभर  कोथिंबीर.
                                                        
कृती :- कुडाच्या शेंगा बारीक चिरून उकडून घ्या. हलक्या हाताने चुरुन आतील पाणी
 पुर्णपणे काढून टाका. कढई मध्येतेल गरम करून त्यात हिंग, जिरे, मोहरी याची फोडणी करावी. यात कांदा, मिरची घालून परतून घ्या.त्यात उकडलेल्या शेंगा टाका. मग चवीपुरतं मीठ टाकून भाजी चांगली परतून घ्यावी. शेवटी खवलेलं ओलंखोबरंकोथिंबीर घालून भाजी खायला घ्या. तांदळाच्या भाकरी बरोबर ही भाजी खायला छान लागते.
याच भाजी मध्ये मिरची ऐवजी लाल तिखट व थोडा स्वच्छ जवळा भाजुन घातला तर हि भाजी अजुनच चवदार करता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...