साहित्य-
बोनलेस चिकन पाव किलो (खीमा बनवन्यासाठी)
हिरव्या मिरच्या 2, आल्याचा छोटा तुकडा, लसूण पाकळ्या 3-4 (आलं-लसूण-मिरची पेस्ट करुन घ्यावी)
1 छोटा बटाटा उकडुन, १ छोटा कांदा, शिमला मिरची १/४ वाटी, कोबी १/४ वाटी, कोथिंबीर १/४ वाटी, अर्धा लिंबाचा रस
1 चमचा लाल तिखट, मीठ 1 चमचा, गरम मसाला 1 लहान चमचा, तेल तळण्यासाठी.
आवरणासाठी- कॉर्नफ्लॉवर आणि पोह्याचा चुरा (जास्त ऑईली होत नाही, म्हणुन मी पोह्याचा चुरा घेते. त्या ऐवजी ब्रेडक्रम्स वापरले जाते)
कृती:
स्वच्छ केलेल्या बोनलेस चिकन ला आलं-लसूण-मिरची पेस्ट लावुन घ्यावी. यामध्ये २ पेले पाणी घालुन हवा बंद कढई मध्ये शिजण्यासाठी टेवावे. पाणी पुर्णपणे निघुन गेल्यावर एखाद्या चमच्याने चिकन शिजले आहे का ते चेक करुन पहा. शिजले चिकन बाहेर काढुन त्याचे छोटे तुकडे करुन त्याचा व्यवस्थित खीमा बनवुन घ्यावा.
खीमा तयार आहे.
कांदा, शिमला मिरची,कोबी,कोथिंबीर हे सर्व बारिक चिरुन घ्यावे. बटाटा कुस्करुन घावा.
सर्वप्रथम तयार खीमा एका बोलमध्ये घेउन लिंबाचा रस व्यवस्थित लावुन घ्यावा. आता यामध्ये कांदा, शिमला मिरची,कोबी,कोथिंबीर,बटाटा हे सर्व साहित्य मिक्स करुन घ्यावे. आता यामध्ये लाल तिखट ( कलर साठी) ,मीठ, गरम मसाला हे देखिल व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
चिकन कटलेटस मिश्रण तयार झाले आहे. याचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करुन घ्यावे.
कॉर्नफ्लॉवर मध्ये अंदाजाने थोडे पाणी घालुन पातळ मिश्रण करुन घ्या. या मिश्रणा मध्ये चिकन कटलेटस मिश्रणा चे तयार गोळे बुडवुन हेच गोळे शेवटी पोह्याचा चुरा किवा ब्रेडक्रम्स मध्ये घोळुन घावे. या नतर पॅन मध्ये तेल गरम करुन त्या मध्ये घेउन मंद आचेवर तळुन घ्या.
तळल्या नंतर व्हाईट टीशू पेपर वर ठेवा (जास्तीचे तेल निघुन जाण्यासाठी).
तयार कटलेट सॉस, चटणी सोबत खायला चांगले लागते.
टिप-
कॉर्नफ्लॉवर ऐवजी अंड्याचा ही वापर केला जातो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा