साधारणपणे तिघांसाठी.
साहित्य:
* तांदुळ, चना डाळ, मुग गळ, उडीद डाळ प्रत्येकी अर्धी वाटी.
* हळद, हिरवी मिरची व आले व लसुन पेस्ट २ मोठे चमचे, १ चमचा साखर, मीठ चवीपुरते.
* फोडणीसाठी तेल ४ चमचे, १ मोठा चमचा मोहरी ,कढिपत्ता ८-१० पाने, ३ हिरवी मिर्ची.
* सजावटीसाठी थोडी कोथींबीर.
कृती:
तांदुळ, चना डाळ, मुग डाळ, उडीद डाळ प्रत्येकी अर्धी वाटी स्वच्छ धुवून ४ तास भिजत ठेवा. त्यानतर हे सर्व ईडलीच्या मिश्रणाप्रमाणे मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि ६-७ तास हे मिश्रण झाकुन ठेवा. {साधारणता दुपारी डाळी व तांदुळ भिजत घातले तर रात्रीते मिक्सर करुन घ्या. व रात्रभर आंबवण्यासाठी झाकुन ठेवा. या मध्ये पिठ छान फुलून येते व खायचा सोडा घालण्याची अजीबात गरज नसते. }
ह्या मिश्रणात हळद, हिरवी मिरची व आले व लसुन पेस्ट, अर्धा चमचा साखर, मीठ घाला व चांगले ढवळुन एकजीव करावे. मिश्रणाची कन्सीस्टन्सी भजी करण्यासाठी ज्या प्रमाने बेसन पिठ तयार केले जाते त्याप्रमाने ठेवावी. ढोकळ्याच्या स्टण्ड् किवा एक पसरट पातळ स्टिल यांच्या डब्याला आतुन तेलाचा हात लावुन घ्या. आता हे मिश्रण त्या डब्यामध्ये ओतून व्यवस्थित टॅप करा. एकसारखे पसरु द्या. मग हा डब्बा कुकरमधे ठेवा. शिटी न लावता १५ मिनिटे वाफवून घ्या. कुकरमधे पाणी जरा जास्त ठेवावे. डबा थोडा पाण्यावरतीच रहाण्यासाठी कुकरमधे आतमध्ये डब्याखाली एखादी उंच प्लेट ठेवून द्यावी. तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिर्ची, अर्धा चमचा साखर याची फोडणी करून घ्यावी. या फोडणी मध्ये अर्धा पेला पाणी ओतून मग हे सर्व गरमागरम मिश्रण वाफवलेल्या ढोकळ्यावर ओतावे शेवटी त्याचे आवडत्या आकाराप्रमाने तुकडे करावे.
ढोकळा खायला तयार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा