साहित्य-
बासमती किवा कोणताही तांदुळ १ वाटी धुवून अर्धा चमचा मिठ घालुन व्यवस्थित शिजवुन घ्यावा,
शिमला मिरची, गाजर , पत्ताकोबी , कांदा हिरवी पात व सफेद भाग वेगवेगळा या धुवून बारिक चिरलेल्या भाज्या प्रत्येकी १/ ४ वाटी.
अदरक-लसुन का पेस्ट - १ चमचा, हिरवी तिखट मिरची ४, काळीमीरी पावडर १ चमचा.
अंडी २, मीठ १ चमचा , तेल ४ चमचे.
चिली सॉस , टोमैटो सॉस , सोया सॉस , प्रत्येकी १/२ छोटा चमचा.
मुठभर कोथिंबीर.
कृती -
शिजवुन घेतलेला राईस थोडा सुटा मोकळा करुन हवेवर ठेवा.
कढईमध्ये तेल गरम करुन यात अदरक-लसुन पेस्ट, हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, कांदा फक्त सफेद भाग, काळीमीरी पावडर मीठ हे सर्व क्रमाने घाला. पाच मिनिट वरिल साहित्य व्यवस्थित शिजु द्या.
मग हे मिश्रण कढईच्या एका बाजुला घेऊन, दुसर्या बाजुला राहिलेल्या तेलामध्ये दोन अंडी फोडुन घाला त्यावर थोडे मिठ घालुन ते फेटुन व्यवस्थित शिजवुन घ्यावे (चित्रात दाखवल्या प्रमाणे अजुन एखादी कढई लागु नये म्हणुन एकाच कढईमध्ये दोन्ही करा).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा