बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

नक्षत्रांचे देणे ३०

 


 


'आश्रमात आल्यापासून खूप वेळ निघून गेला होता. दुपारचं जेवण वेगैरे सगळं तेथेच आटोपलं होत. उद्या भूमीने ऑफिसला सुट्टी टाकली आहे, त्यामुळे ती आज इथेच थांबणार होती, हे समजल्यावर क्षितिजही तिथेच थांबला. तसही हाताच्या दुखण्याने गाडी चालवणे त्याला आता शक्य नव्हते, दोघेही एकत्रच निघू, असं ठरवून ते आश्रमातील मुलांबरोबर रमले.'

 

'तिच्याही नकळत तो तिला समजून घेत होता. तिच्या आवडीनिवडी, सवयी, स्वभाव हे समजल्यामुळे त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यायला खूप मदत झाली. बंगल्यात राहणार मुलगा इकडे आश्रमात रामलाय, हे पाहून भूमिकाही नवल वाटले.  मुळातच शांत स्वभाव आणि समजुदारपणा बरोबरच त्याच्यात दडलेला साधेपण भूमीला जास्त आवडला. 'महत्वाचं म्हणजे तो समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आदर करतो, आपली कोणतीही मत, कोणतीही डिमांड कुणावरही लादत नाही. हि गोष्ट भूमीसाठी खूप महत्वाची होती.'

 

'रात्री बाहेर अंगणात मस्त थंडगार हवा रेंगाळत होती. आश्रमातील मुलेही बाजूला खेळात दंग झाली होती. सगळं आवरल्यावर दोघेही आवारात बसले. एक बँडेज रोल आणून देत आश्रमातील काकूंनी ते क्षितिजच्या हाताला बांधायला सांगितलं. दिवसभर तो हात तसाच होता, गाडी चालवल्यामुळे जखम थोडी चिघळलेली होती त्यामुळे बँडेज बदलण्याची गरज होतीच. भूमीने अलगद त्याचा हात उचलून आधीचे बँडेज सोडले, कापसाच्या बोळ्याने जखम थोडी साफ केली आणि दुसरे बँडेज त्यावर लावले. ते लावताना त्याच्याकडे वरती बघत तिने विचारले.

''डॉक्टरने गाडी चालवायची नाही, असं सांगितलं असेल ना? तरीही एवढा त्रास सहन करून इथे यायची काय गरज होती.?

 

''अपघात झाल्यापासून मी ऑफिसमध्ये येत नाही, त्यामुळे खूप दिवस आपली भेट झालीच नाही. भेटायचं होत तुला.'' क्षितीज तिच्याकडे बघत बोलत होता.

 

''एवढं महत्वाचं काय काम होत? नंतर भेटलो असतो तर चाललं असत. एक दिवसाने एवढा काय फरक पडतो?''  भूमी 

 

''खूप फरक पडतो. आपल्या दोघांनाही फरक पडतो? वागण्यात तस दाखवत नाही आहोत म्हणून काय झालं. त्याशिवाय एकमेकांना सारखे फोन सुरु  असतात.'' क्षितीजच्या वाक्यावर भूमी शांत झाली होती. पुढे बोलण्यासारखं काहीच शिल्लक नव्हतं. ''मी आलेच.'' म्हणून भूमी जागेवरून उठली. 

 

''मी इन्डायरेक्ट्ली तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तुझा काही रिस्पॉन्स नसतो. मग असं वाटत घाई होते, आणि मी विषय टाळतो.'' क्षितीज

 

''कशाबद्दल?'' भूमी

 

''आपल्याबद्दल.'' क्षितीज

 

''आपण एकमेकांना कितीसे ओळखतो? एकमेकांबद्दल काय माहिती आहे?'' भूमी क्षितिजला विचारत होती.

 

''वर्तमानकाळ दोघांनाही महित आहे. भूतकाळा विषयी बोलतेस का तू? मैथिली माझ्या आयुष्यात होती. त्याबद्दल काय विचारायचं असेल तर विचारू शकतेस?'' क्षितीज

 

''होती। आता नाहीये ना. मग त्या बद्दल काय विचारणार? आणि ऑफिसमध्ये रोज तो विषय चालू असतो. त्यामुळे बरचं काही माहित झालं आहे.'' भूमी

 

''मग अजून काय जाणून घ्यायचं आहे?'' क्षितीज

 

''माझ्याबद्दल?'' भूमी

 

''तुझ्याबद्दल सगळं माहित आहे.'' क्षितीज

 

''काय माहित आहे? मला सुद्धा पास्ट होता.'' भूमी

 

''होता ना. आता नाहीय. आपण प्रेझेंट बद्दल बोलतोय, मला जेवढी माहित असायला पाहिजे तेवढी नक्कीच आहे. त्यापलीकडे जाण्याची काही गरज नाही वाटत.''  क्षितीज

 

''पण काही महत्वाचं असेल तर?'' भूमी

 

''जे होऊन गेलं, ते महत्वाचं होतं कि नाही? याला किती महत्व द्यायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. झालेल्या गोष्टी बदलता येत नाहीत. त्यामुळे त्यांना उगाळत बसण्यात काहीही अर्थ नाही.'' क्षितीज  

 

''तरीही तुला स्वतःहून अजून काही सांगायचं असेल तर नक्की सांगू शकतेस.''  क्षितीज

 

''पुन्हा केव्हातरी.'' भूमी

 

''पण मला आजच एक गोष्ट क्लिअर करू देत.'' क्षितीज उठून तिच्यासमोर उभा राहिला तो काहीतरी बोलण्याच्या तयारीत असताना मागून मुलांचा आवाज आला. काही मुलं हातात फुलगुच्छ आणि कॅडेल वगैरे घेऊन त्याच दिशेने येताना दिसले.

 

एकाच्या हातात केक तर एकाच्या हातात एक गिफ्ट बॉक्स होता. मुलांनी येऊन भूमीच्या हाताला पकडले, आश्रमाच्या मागच्या बाजूला बागेत मधोमध सपाट जागी एक टेबल आणि खुर्ची ठेवण्यात आली होती. सगळे तिला तिथे घेऊन गेले. मुलांनी छानशी डेकोरेटिव्ह फुलदाणी, विविध रंगाचे फुगे आणि रंगीत लाइटिंगचे डेकोरेशन केले होते. टेबलवर केक ठेवून कॅडेल लावली आणि एका सुरात सगळ्यांनी 'हैप्पी बर्थडे दीदी... हैप्पी बर्थडे टू यू... 'म्हणायला सुरुवात केली. सफेद चुणीदार ड्रेस त्यावर लांब जाळीदार असा अंगभर पसरलेला दुपट्टा आणि अर्धे सोडलेले केस यामुळे तिचा लूक अगदी खुलला होता. रात्रीच्या प्रसन्न वातावरणात उमललेली रातराणी जणू. त्या लहान मुलांच्या घोळक्यात उभी असणारी भूमी सुंदर आणि मोहक दिसत होती. क्षितीज तिला दुरूनच बघत होता. अगदी डोळ्यात साठवून घेत होता. केक कापून तिने सगळ्यांना तो थोडाथोडा भरवला. क्षितीज जवळ आल्यावर तिने हात पुढे केला, थोडासा केक खाऊन त्याने तिला विश केलं. 'हैप्पी बर्थडे टू यु. मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे.'  ती थँक्स म्हणून गोड हसली. मुले आणि आश्रमतील इतर लोक केक आणि स्वीट्स खाण्याची मज्जा करत होते.

 

''आज तुझा वाढदिवस आहे हे आधी का नाही सांगितलंस?'' क्षितीज विचारात होता.

 

''होय, दरवर्षी मी इथे वाढदिवस साजरा करते. म्हणून तर ऑफिसला सुट्टी घेऊन आज इथे आली आहे. हि मुलं स्वतः केक बनवतात आणि हे सगळं डेकोरेशन सुद्धा न विसरता करतात. १२ वाजून गेले तरीही अजून झोपली नाहीत बघा. नाहीतर ९ वाजताच त्यांची दांडी गुल असते.'' भूमी सांगत होती.

 

''मला आधी सांगितलं असत तर मी गिफ्ट आणलं असत ना.'' क्षितीज

 

''सांगायचं लक्षात नाही राहील, आणि गिफ्ट कशाला पाहिजे. आता थोडी लहान आहोत आपण. बरं तुमचा बड्डे केव्हा असतो?'' भूमी

 

तिने विचारलेल्या प्रश्नावर तो खूप हसला. ''काय झालं?'' तिने पुन्हा विचारलं.

 

''माझा वाढदिवस सुद्धा आजच आहे. काय योगायोग ना.'' क्षितीज

 

''ओह. ग्रेट... आधी सांगायचं ना. भूमीने पुन्हा सगळ्या मुलांना बोलावून क्षितिजचाही आजच बड्डे असल्याचं सांगितलं. मुलं खूप खुश झाली. थोड्यावेळाने अजून एक केक बनवून तिथेच कटिंग केला गेला. मुलांनी स्वतः बनवलेले पेंटींग आणि वोलपीस त्या दोघांना भेट म्हणून दिले होते. मस्त मजा सुरु होती. नुसता गोंधळ आणि मस्ती.

 क्षितिजचा वाढदिवस  असल्याने त्याला सारखे फोन येत होते. त्यात अजून घरी का आला नाही विचारण्यासाठी घरून फोन चालू होते. ते घेण्यासाठी तो  थोडं बाजूला गेला.

 

रात्रीचे २ वाजायला आले होते. माईं आणि नानांशी बोलून भूमी आश्रमात आतमध्ये गेली. आव्हान पिंगणारी मुलं रूममध्ये जाऊन झोपली होती. क्षितिजला बड्डे विश करण्यासाठी सारखे फोन येतच होते. थोडावेळ बोलून त्याने फोन बंद केला आणि तिथेच सोफ्यावर तो आडवा झाला. जे बोलायचं होत ते राहून गेलं होतं. थकलेला असल्याने तो या विचारात तसाच झोपी गेला. आतून आणलेलं एक ब्लॅंकेट त्याचा अंगावर घालून भूमी देखील आतमध्ये झोपायला निघून गेली.

 

 

क्रमश 
https://siddhic.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...