‘आतलं यावरून ती बाहेर येईपर्यंत क्षितीज तिथेच
सोफ्यावर आडवा झाला होता. टाय-कोट बाजूला ठेवून तो शांत झोपला होता. त्याच्या
निरागस चेहेऱ्याकडे बघून तिने ओळखले, कि दिवसभरच्या धावपळीने आणि मेंटली स्ट्रेसने
तो खूप थकला आहे. अगदीच न राहवून ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या केसांवर हात
फिरवत ती तिथेच शेजारी बसली. तिने दोनवेळा त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न
केला. पण तो झोपलेलाच होता. 'खूप
थकलाय वाटत, झोपूदेत इथेच.' म्हणत तिने त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले, आणि ती उठणार एवढ्यात त्याने डोळे
उघडले होते. तिच्या हाताला पकडून स्वतःकडे ओढत त्याने 'काय' म्हणून विचारले. त्याच्या एवढ्या जवळ जाऊन ती
थोडी लाजली. ''इथेच झोपणार आहेस का?''
''मग कुठे झोपू? आत एकच बेड आहे.'' तिच्या कपाळावरून खाली ओघळणारे केस
बाजूला करत तो म्हणाला.
''मी झोपते इथे. तू आत झोप.'' त्याच्या हात सोडवून ती उठली.
''नको. जा तू झोप.'' क्षितीज
''नाही, नाहीतर मी इथेच समोरच्या सोफ्यावर झोपेत.'' भूमी हट्ट करत होती.
''ओके, चालेल, मग रात्रभर मी तुला बघत बसणार, आणि तू मला.'' क्षितीज
''चालेले.'' म्हणत ती समोरच्या सोफ्यावर तोंड फिरवून झोपी
गेली.
''भूमी, जा ना आत झोप. मी इथे ठीक आहे. काही प्रॉब्लेम
नाही.'' क्षितीज तिला समजावत होता. पण ती
ऐकायला तयार नव्हती. शेवटी तो सोफ्यावरून उठला. ती झोपलेली होती तिथे जाऊन तिला
दोन्ही हातांनी उचलून तो बेडरूमकडे वळला. तिला काही कळायच्या आत त्याने तिला
आतल्या बेडवर ठेवले. आणि तो जायला उठला. भूमीचे दोन्ही हात त्याच्या भोवती तसेच
गुंफलेले होते. तो तिच्या अगदी जवळ होता. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तोही
तिच्या नजरेत स्वतःला हरवून बसला. त्याच्या छातीवर रुळलेल्या तिच्या हाताला
त्याच्या हृदयाचे वाढणारे ठोके स्पष्ट जाणवत होते. लाजून तिने तिची नजर खाली
झुकवून हळुवार आपले डोळे बंद केली. क्षितिजला स्वतःला सावरणे आता शक्य नव्हते.
भूमीच्या डोक्याखाली आपल्या हाताचा आधार देत त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ
टेकवले. श्वासाचा वेग दर सेकंदाला वाढू लागला आणि त्याचा आवेगही वाढला. नाकावरून
हळूच त्याचे ओठ तिच्या गुलाबी मऊसर ओठांवर येऊन थांबले. त्याचा उष्ण श्वास तिच्या
चेहेऱ्यावर जाणवला. तिने डोळे उघडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत
दोघांचेही ओठ एकमेकांच्या ओठात गुंतले होते. तिच्या तोकडा विरोध गळून त्याचे
रूपांतर प्रतिसादात झाले होते. उघडलेले डोळे पुन्हा बंद करून ती कितीतरी वेळ शांत
पडून राहिली. एकमेकांच्या आधीन झालेले ते ओठ खूप वेळानंतर विलग झाले. अस्ताव्यस्त
चेहेर्यावर पसरलेले तिचे रेशमी केस बाजूला करून क्षितिजने तिच्या डोक्यावर पुन्हा
आपले ओठ टेकवले. त्याच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. ''लव्ह यु, अँड सॉरी हनी, मी ठरवून काही केलं नाही. एनएक्सपेक्टेड होत
ते. आय कूडनॉट कंट्रोल माय सेल्फ.'' हे ऐकून स्वतःला सावरत तिने डोळे उघडले
होते. ''आपल्या बाबतीत सगळं अचानकच घडत.'' म्हणत उठून तिने स्वतःला त्याच्या छातीवर झोकून दिले.
ते दोघे आता एकमेकांच्या घट्ट मिठीत सामावले होते. ती काहीही न बोलता त्याच्या
छातीवर डोकं ठेवून तशीच पडून राहिली. ''झोप तू, मी बाहेर जाऊ का?'' भूमीला स्वतःपासून थोडं दूर करत तो म्हणाला. ''थांब ना. झोप इथेच, चालेल मला.'' ती.
तिला ओढून आपल्या कुशीत घेत तो तिथेच
बाजूला बेडवर झोपला. ती अजूनही शांतच होती.
''एवढी शांत का झाली. काय झालं?'' क्षितीज
''काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा घडतात तेव्हा वेळ लागतो सावरायला.'' म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली. ''दोघांनी मिळून एकमेकांना सावरुया. अगदी
आयुष्यभर, आयुष्याच्या अखेरपर्यंत.'' म्हणत आपल्या दोन्ही हातानी तिला जवळ घेत, तिच्या कपाळावर आपली हनुवटी टेकून तो
डोळे मिटून झोपी गेला. काही मिनिटातच भूमी देखील झोपेच्या आधीन झाली.
‘शेवटी दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा आदर करत
एकमेकांना सावरलं. एक
गोडं नातं
अगदी
हळुवार संयमाने फुलू पाहत होतं, आणि
आपापला भूतकाळ मागे सोडून भविष्याच्या स्वप्नाच्या झुल्यावर झुलू पाहत होतं.’
कुठेतरी दूरवर गाण्याचे बोल हळुवार
कानावर गुंजत होते.
धड़क रहा है दिल मेरा, झुकी-झुकी हैं पलकें यहाँ
जो दिल में हो, वो कह भी दो, रुकी-रुकी सी है ये दास्तां
जज़्बात माँगे ज़बां
और क्या..और क्या..और क्या..?
तुम आये तो हवाओं में एक नशा है
तुम आये तो फिज़ाओं में रंग सा है
ये रंग सारे, है बस तुम्हारे
और क्या, और क्या, और क्या?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा