बुधवार, २९ मे, २०१९

आठवणीतील चिमणी

आज रविवार. सकाळ पासूनच धमाल नुसती. आम्ही मुलं परसात खेळत होतो. लपाछपी चा खेळ म्हणुन मी एका आंब्याच्या झाडामागे लपलेले. एवढ्यात बाजूलाच असलेल्या सुक्या पानांच्या ढिगामध्ये काही तरी पडल्याचा आवाज झाला. पण बाहेर पडले तर पकडले जाईन म्हणून मी तिथुनच निरिक्षण करायला लागले.काहीच दिसेना.
थोड्याच वेळात चि....चि.....असा काहीसा आवाज झाला तिथे आणि मी ओरडत त्या दिशेने धावतच सुटले.
आई गं ! ते इवलेस चिमणीच पिल्लू, कुणी बरं त्याची पिस ओरबाडली असतील? पिसातुन रक्त येत होत, थोडी स्कीन पण निघाली होती. धड उडता पण येत नसाव. त्याला तसंच हातात घेऊन काहीही विचार न करता मी पळत सुटले ते थेट घरीच.
'आईईईई हे बघ ना, ये ना इकडे लवकर, काय झालं गं याला बघ ना'
आईने थोडं पाणी चमच्याने त्याच्या चोचीत घातल पण सगळंच बाहेर आलं आणि त्या पिल्लाने शेवटचा श्वास घेतला.
चिमणी म्हणजे काय वाटतं माला, काय सांगू ! माझा अगदी जीव की प्राण आणि त्या पिल्लाने तर माझ्या हातावरतीच प्राण सोडला होता.
दिवसभर खुप रडले, जेवले सुद्धा नाही. 'मला एक पिल्लू आणुन दे आत्ताच्या आत्ता' माझा पाढा चालूच. बाबानी खुपदा समजावून झाल पण काहीच उपयोग झाला नाही. लहान होते तेवढी अक्कल कुठून असणार! आजी माझ्या जवळ आली, मी तिचं ऐकायची ना म्हणून.
आजी- ' बाळ असं नको ते हट्ट करू नये, तु आता मोठी झाली की नाही आणि बघ ....... ..
तिचं वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच माझी धुसफूस सुरू ' तु... तु ....ना गपच बस आज्जे, ते काल एक पिल्लू मिळालं होतं ना ? मग ते का सोडून दिलस ???
कोकणातल कोलारु घर कालच एक पिल्लू घरात सापडलं होतं, आणि आजी ने ते बाहेर झाडावर सोडून दिल होत. ते माझ्या लक्षात आलं.
मी परत चालू- 'आज्जे तु मला आत्ताच्या आत्ता दुसर पिल्लू आणुन दे, आत्ता च्या आत्ता'.
उन्हाळ्याचे दिवस होते. आई स्वयंपाक घरात आंब्याच पन्हं करत होती. ऐकुन ऐकुन घेऊन सरळ बाहेर आली. माझ्या बघोटिला धरून त्याच हाताने माझ्या एक कानाखाली वाजवली. मी नुसती लाल झाले, गंगा जमुना ना आणखीनच पुर् आला.
आई चालू - ' चुप बस, एकदम चुप, मघा पासुन ऐकुन घेते , आजी ला उलट सुलट बोलते, काय वेड आहे या मुलीला, मारायचे आहे का त्या चिमण्या ना ???
चिमणी हवीय म्हणे, काल आजी ने बाहेर झाडावर सोडूली ना तिचं हि चिमणी आज मेली ती. पक्षाचे सुद्धा काही नियम असतात, माणसांचा हात एखाद्या पक्षाला लागला ना मग इतर पक्षी त्याला स्विकारत नाहीत,चोचीने टोचुन मारतात.आपल्या हाताचा वास येतो त्या पक्षाला म्हणून कदाचित.
एक दिवस शाळेला सुटी असेल तर तुम्ही मुलं सकाळ पासूनच बाहेर उंदडत असता ना??
तुला कोणी पकडुन ठेवल तर चालेल का???
आई खुप ओरडली, तरीही मी मात्र अर्धा-निम्मा दिवस पायात डोक खुपसून रडतच होती.
चिमणी हवीय म्हणून.
खुप वर्ष झाली आता, गावी कौलारू घर जाऊन स्ल्याप, प्लास्टर ची छोटेखानी इमारत आहे, आजी पण देवाघरी गेली, चिमणी दिसणं पण तुरळकच, गावी गेलेच तर माझ चिमणी पुराण आईकडून एकदा तरी दोहरल जातच. मी ही चालुच ठेवलंय माझं चिमणी प्रेम.

IMG_20181005_081435_HDR.jpg

माझ्या बाल्कनीतला हा फोटो, गेले काही महिने हि बाई स्वेच्छेने येऊन बसते रोज. घान करते म्हणून माझ्या शिवाय घरी फारसं कोणाला तीच येण आवडत नाही. पण मला याचा काही फरक पडत नाही आणि तिला ही.

एखाद्या पक्षाला फक्त माणसाचा हात लागला म्हणून बाकीचे पक्षी टोचुन मारतात. (आईच्या म्हणण्यानुसार, तिचा समजही असेल,खरं खोटं ते पक्षीच जाणोत) (कदाचित पंजी, आजी,आई पिढ्यांन पिढ्यांची समजुत असावी, कारण आई ला हे तिच्या आईने सांगितले असं ती म्हणते! असो यावर आपलं मत जाणून घ्यायला आवडेल.)
पण हे खरं असेल तर मग माझ्या मनात एक प्रश्न नेहमी टोचत राहतो! माणसं एवढी चुकतात, भरकटतात, अक्षम्य गुन्हे सुद्धा करतात, तरीही हा समाज आणि आपण त्यांचा स्विकार करतोच ना?
'मग आपण ज्यांना अज्ञानी समजतो त्या पक्षाचा न्याय मोठा की स्वतःला सर्वज्ञानी समजणाऱ्या माणसांचा'???

२ टिप्पण्या:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...