बुधवार, २९ मे, २०१९

अंडा बिर्याणी- (उकडुन तुकडे केलेल्या अंडयाची बिर्याणी )

 सकाळ व्रुत्त सेवा yen buzz  मध्ये प्रकाशित.
http://www.yinbuzz.com/egg-biryani-10287

   अख्या अंडयाची बिर्याणी आपण करतोच....ही थोडी वेगळी अंडयाचे तुकडे करून केलेली बिर्याणी आहे. अख्ख अंड घालुन बिर्याणी होते पण तो अंडयाच flavor अजीबात येत नाही म्हणुन मी अशी बिर्याणी try केली....
एकदा तरी करून बघा....आवडेलच.
वाढणी/प्रमाण:
२-३
लागणारा वेळ:
३० मिनिटे
साहित्य
1) भातासाठी साहित्य-
बासमती तांदुळ 2 वाटी, 2 लवंगा, 2 मिरी दाणे, 1 मोठी मसाला वेलची, 1 पूर्ण भरलेला टी स्पून मीठ, 1 टेबल स्पून तेल.

IMG_20190417_204712_HDR.jpg
2) अंडा-मिश्रण साहित्य -
2 टेबल स्पून तेल,कांदे- 2 बारीक चिरून घ्या, आल्ले लसूण पेस्ट 1 टेबल स्पून, 2 हिरवी वेलची, 2 दालचिनी, 2 काळी मिरीचे दाणे, हळद 1/2 टी स्पून, लाल मिरची पावडर 2 टी स्पून, जीरे पावडर व धणे पावडर दोन्ही 1 टी स्पून, 1 टी स्पून मीठ,
टोमॅटो- 2 स्लाईस करून . 4 अंडी उकडुन, १ चे ४ तुकडे करून घ्या
3) ईतर साहीत्य-
पुदिना 1/2 वाटी,कोथिंबीर 1 वाटी बारीक चिरून घ्या,
कांदा 2 पातळ स्लाईस करून तेलात सोनेरी तांबूस तळुन घ्या,
चिमटित मावेल एवढाच गरम मसाला पावडर.
क्रमवार पाककृती:
भातासाठी कृती -
वरील सर्व साहीत्य कुकर मध्ये एकत्र करावे, 2 मिनिट कुकर मध्ये मद गास वरती चांगले परतावे (याने तांदुळ चागला मोकळा आणि सडसडीत होतो). तांदुळ थोडा कमीच शिजायला हवा म्हणुन यात 3 वाटी पाणी घालून २ च शिट्ट्या करा, नतर थड करयला ठेवा.

IMG_20190417_203501_HDR.jpg
अंडा-मिश्रण कृती-
खोलगट कडईमध्ये तेल गरम करा, ( अंडा-मिश्रण साहित्य मधील सर्व प्रमाण) यात कांदा व आल्ले लसूण पेस्ट घालून एक मिनिटांसाठी मंद आचेवर परतावे. त्यानंतर 2 हिरवी वेलची,2 दालचिनी,2 काळी मिरीचे दाणे, हळद, लाल मिरची पावडर, जीरे पावडर, धणे पावडर, थोडे पाणी घालून सर्व एकत्र पुन्हा चांगले परतावे. स्लाईस केलेले टोमॅटो घालून तेल वेगळे व्हायला सुरुवात होईपर्यंत शिजवावे. मीठ घालून झाकन घाला, आता उकडलेली अंडी काळजीपूर्वक घालून न धवलता मिश्रण बाजूला ठेवा.

IMG_20190417_212549_HDR1.jpg
आता कुकर मध्ये थर रचावेत, एक लहान जाड तळ असणारे गोल शिजवण्याचे भांडे सुदधा वापरू शकता .
त्यावर 1-२ टी स्पून तूप पसरावे, त्यानंतर पहिला थर भाताचा घालावा, अंडा-मिश्रणचा एक थर अगदी प्रेमाने पसरावा, तुकडे केलेली अंडी जास्त फुटु नयेत म्हणुनच, हिरवी कोथिंबीर, पुदिन्याची पाने, गरम मसाला पावडर टाकावी, कांदा (सोनेरी तांबूस तळुलेला) घाला, त्यानंतर अजुन एक भाताचा थर घालावा. या प्रमाने आपण एक एक थर घालु शकतो, क्रम एछीक आहे. पहिल्यांदा डीश अल्यूमीनियम फाइलने सील करावी, मंद आचेवर हा कुकर एका जाड पॅन वरती ठेवा. 10 मिनिटे शिजवा. (शिटी करायची नाहीय. झांकण ठेवावे, अथवा कुकर असेल तर कुकरच्या झाकणावरची शिटी काढून टाका)
अंडा बिर्याणी खायला तयार आहे.
IMG_20190417_212545_HDR.jpg
मी सेम रेसिपी मध्ये अंड्या एवजी १/४ कि बोनलेस चिकन तुकडे दही, हळद,मीठ मारीनेशन करून चागल शिजवुन घालते , आल्ले लसूण पेस्ट मात्र् २ टेबल स्पून घालते, आणि ३-४ टि स्पून लाल मिरची पावडर आणि थोडा चिकन बिर्याणी मसाला घालुन बिर्याणी बनवते. बाकी सर्व सेम, झक्कास चिकन बिर्याणी होते.
टीप-
1) थोड्या दुधात २ काडी केशर घोळुन या थरावर मधे- मधे घालु शकता,याने चागला कलर येतो.
2) कोथिंबीर, पुदिन्याची पाने या बरोबर मणुके, तळलेले काजू ई घालु शकता मस्त टेस्ट येते.
3) गरम मसालया एवजी थोडा चिकन बिर्याणी मसाला घालुन हिच रेसिपी अजुन रूचकर करता येईल.
4) सर्व करताना त्या बरोबर लिंबु घेऊ शकता.
माहितीचा स्रोत:
ही माझी स्व:तची पद्धत आहे....अजून बऱ्याच वेगवेगळ्या पदधती असु शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...