माते कडून पान्ह्याची
गुरु कडून ज्ञानाची
विधात्या कडून प्राणाची..
अन विंदांच्या गाण्याची....
अशी गुंफण केली दानाची
पण जमेनाच ते फेर धरन....
त्याच्या कडून चांगुलपणाची
तुझ्या कडून हळवेपणाची
तिच्या कडून सौंदर्याची
अन कृतज्ञतेच्या जाणिवांची
अशी गुंफण केली भावनांची
पण जमेनाच ते फेर धरन.
कल्पने कडून शब्दांची
स्मृतीं कडून भावनांची
तिमिरा कडून सरन्याची
अन उष:कालाच्या किरणांची
अशी गुंफण केली प्रारब्धाची
पण जमेनाच ते फेर धरन.
पानावर पड्ले शब्द शब्दची
सारेच बिघडले-अडखळले,
अनं चडफडले मी.
पुढे पंक्तिच सुचेना काव्याची
तरिही गुंफण केली रचनांची
का बर जमेनाच ते फेर धरन ?
( विता करनं जमत नाही तरीही ही कविता पुर्णपणे माझीच आहे याची क्रुपया नोंद घावी.
पहिलीच कविता त्यामुळे अपेक्षित बदल नक्की सुचवा. )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा