अळूची पातळ भाजी हे नाव बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, मात्र अळु भाजीच्या बुळबुळीतपणा या गुणधर्मावरुन अळूचं फदफदं हे नाव ठेवल गेल आहे.
अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात.
तर अळू वडी साठी थोडी जाडसर अन् गडद हिरवी, वरती मोठ्या गडद शिरा असणारी पाने वापरली जातात.
हा या दोघांमधील फरक आहे.
अळूपासुन शरीरास मिळणारे फायदे:-
अळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.
रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी या साठीही अळू भाजी उपयोगी ठरते.
मामाच्या गावी गेल्यावर केव्हा-केव्हा हा अळूच्या फदफद्याचा बेत अजुनही होतो, आणि आजीचा "भात भाकरी आहे हो खुप. आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका" असा टोला पण असतोच. आजी अस का म्हणते ग नेहमी? अस विचारताच आजी तिचीच नेहमीचीच/पुर्वापार चालत आलेली कथा रंगवून सांगत असते. मला तिच ती कथा परत-परत ऐकायला आवडत. विषय अळुचा आहे म्हणुन ती कथा मी इथे टाकत आहे.
तर कथा अशी आहे.... एक नव विवाहीत जावई बायको सोबत तिच्या माहेरी जेवणासाठी आलेला असतो, घरी अठरावीष्व दारिद्र्य, धान्य नाही, जावयाचा पाहुणचार कसा करावा ? हा सासुबाईंना पडलेला प्रश्न. मनाशी काही तरी ठरवुन त्या गाठीशी असलेले पेलाभर तांदुळ शीजत घालतात. परसातील कोवळी अळुची पाने काढुन भरपुर प्रमानात अळूचं फदफदं बनवतात. जावई जेवायला बसल्यावर पापड-कुर्ड्या, भात आणि फदफदं असा बेत पानामध्ये वाढला जातो. जावईबुवा भातावरती यथेच्छ पसरवलेल फदफदं समपवुन "वा छान झाल आहे फदफदं" अस म्हणत खाली असणार्या भाताला हात लावणार तेवढ्यात सासुबाई " आवडल ना मग घ्या अजुन लाजू नका" अस म्हणत वरती प्रेमानेच(?) अजुन फदफदं वाढत.
आता फदफदं खावुन तृप्त (?) झालेला जावईबुवा पानात लावलेला भात कसाबसा संपवुन सासुरवाडीचा प्रेमभावे निरोप घेतो. वरती अजुन फदफदं वाढत असताना सासुबाईच्या तोंडुन सारख बाहेर पडणार एक वाक्य मात्र तो कायमचच लक्षात ठेवतो "भात भाकरी आहे हो खुप. आवडल म्हणुन नुसत फदफदंयावर भागवु नका"
आजीची कथा संपली की आम्ही पोट धरुन हसतो, आणि तितकच वाईट ही वाटत.
तर "अळूची पातळ भाजी,अळूचं फदफदं किवा अळूचं फतफत " काहीही म्हणा याची मी करत असलेली पाककृती मी इथे पोस्ट करत आहे.
साहित्य:
अळूची पाने ५-६
शेंगदाणे व चणा डाळ दोन्ही छोटी अर्धी वाटी.
फोडणीसाठी साहित्य:
तेल ४ टेबल स्पून ,१ छोटा चमचा मोहोरी ,हिंग चविनुसार (ऐच्छिक), १/२ चमचा हळद व तितकाच गरम मसाला , १ चमचा लाल तिखट,अर्धा कादा आणि टोमटो(ऐच्छिक), लसुन २-३ पाकळी, मिठ चविनुसार, १ चिंच किवा कोकमाची साल, १ तमालपत्र (ऐच्छिक), 2-4 मेथ्याचे दाणे (ऐच्छिक).
गोडा मसाला २ मोठे चमचे. (गोडा मसाला पाककृती लवकरच )
कृती:
शेंगदाणे/चणा डाळ ४ तास पाण्यात भिजत ठेवावा, अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठं वरिल पातळ आवरन काढुन घ्यावे. नंतर पानं व देठंही बारीक चिरून घ्यावे. हे सर्व प्रेशर कुकरमध्ये पाहीजे तेवढे पाणी घालुन १ शिट्टी करून शिजवून घ्यावे.(नंतर फोडणीमध्ये वरुन पाणी घालु नये)
कढईत तेल गरम करून फोडणीसाठी साहित्याच्या दिलेल्या क्रमनुसार फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे. वरुन भुरभुरायला आवडत असेल तर थोडस ओल खोबर घालु शकता.
गावठी तांदळाचा भात किवा भाकरी बरोबर खायला घ्या, पावसाळ्यात एक मस्त बेत होउन जाईल.
टिप:
१) अळूत ऑक्झॅलिक अॅसिड असल्यामुळे खाताना घशाला खाज सुटते, त्यासाठी चिंच, कोकम किवा आमसूल घालावा लागतो.
अळू चिरताना हातालाही खाज सुटते, त्यासाठी हाताला चिंचेचा कोळ लावून, अथवा साधे प्लास्टिकचे ग्लोज घालुन ते चिरावं लागत.
२) अळूच्या देठा पासुन देठी हा रुचकर पदार्थ ही बनवता येतो.
३) शिजवून घेतलेला अळु मिक्सर करुन किवा मस्त पैकी घाटुन घेतला की भाजी मिळुन येते.

खूपच छान गोष्ट आणि फदफद सुद्धा
उत्तर द्याहटवा