एक वाटी मोड
आलेले मेथीचे
दाणे,१ कांदा
बारीक कापून,१
टॉमेटो बारीक कापून,फोड्णी
साठी हिंग, मोहरी,
जीरे आणि कडीपत्ता, हळद, मसाला
पूड, मीठ,चवीसाठी
साखर, खोबरे, कोथिंबीर.
कृती:-
मेथी ही भाजी पाने व बिया (मेथीदाणे) या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीच्या पानांप्रमाणेच मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी/उसळ चविष्ट लागते. आमच्या कडे थंडी मधे ही भाजी केली जातेच. मेथी धूवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
सकाळी पाणी काढून एका जाळीच्या भांड्यात मोड येण्यासाठी झाकून ठेवा. मेथीदाण्यांना मोड यायला दोन दिवस लागतात. रात्री पुन्हा मेथी धुवून परत झाकून ठेवा. दुसर्या दिवशी मोड आलेले मेथीदाणे भाजी करण्यासाठी तयार आहेत.
कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्या. मग जीरे आणि हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा थोडा फ्राय झाल्यावर बारीक चिरलेला टॉमेटो टाका.टॉमेटो शिजल्यावर मोड आलेले मेथीदाणे टाका.
हळद, मसाला आणि मीठ टाकून परतून भाजी झाकून ठेवा आणि वाफेवर शिजण्यासाठी झाकणावर थोडे पाणी घाला
मेथीदाणे शिजल्यावर एक चमचा साखर टाकून गॅस बंद करा.
वरून चिरलेली कोथिंबीर आणि खोबरे टाका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा