मॅरिनेट करण्यासाठी लागणारी सामुग्री -
हाताच्या आकाराचे १ पॉम्फ्रेट स्वच्छ धुवून साफ करून घावे, त्यावर सुरीने आडवे दोन कट द्यावे. यावर प्रत्येकी अर्धा छोटा चमचा हळद, लाल तिखट, कोकम रस/ आगळ आणि १ चमचा मीठ हे सर्व व्यवस्थित लावून झाकून १५-२० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. (छोटा चमचा घ्यावा, त्याचा आकार साहित्य चित्रामध्ये दाखवला आहे.)
तिखलं मसाला साहित्य- लसणीच्या २-३ पाकळ्या बारीक चिरून, मूठभर स्वच्छ धुतलेली कोथींबीर, १-२ हिरवी मिरच्या (कमी तिखटाच्या), १ कोकम साल. लाल तिखट चविला+रंगाला प्रत्येकी १-१ चमचा, गरम मसाला १ चमचा, कांदा-लसूण मसाला असेल तर १ मोठा चमचा. थोडेसे पाणी.
कृती- मॅरिनेट केलेल्या पॉम्फ्रेटला एका कढईमध्ये घ्या. त्यावर वरील सर्व साहित्य लावा. थोडे शिजण्यापुरते पाणी घालून वरती एक झाकण ठेवून पलटी न करता तसेच ५ मिनिटे तसेच दुसर्या बाजुनेही ५ मिनिटे शिजवुन गॅस बंद करावा. थोडी कोथींबीर वरुन भुरभुरवी व चमचमित पॉम्फ्रेट तिखलं भाकरी बरोबर सर्व करा.
थोडे पाणी घातल्याने पॉम्फ्रेट दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजते, जास्त शिजवण्याची गरज लागत नाही. या प्रकारे ओला बांगडा आणि हलवा वगेरे मासे छान होतात.
विशेष - या प्रकारामध्ये आपण अजिबात तेल वापरले नाही. माश्याला स्वतःचे तेल असतेच तेवढे पुरे आहे. ज्यांना डॉक्टरने जेवणातील तेल कमी करण्याचा सल्ला दिला असेल तर त्यांच्यासाठी हा उत्तम प्रकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा