पाककृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पाककृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

गुळा-नारळाच्या पुर्‍या/वडे/घारे-नारळी पौर्णिमा स्पेशल



साहित्य
२ वाटी तांदळाचे पीठ (साधारण पाव किलो), 1 मोठया नारळाचा (संपूर्ण) चव/ किस, 1 वाटी गूळ(आवडी प्रमाणे कमी /जास्त घेऊ शकता).
किंचीतसे मीठ, पाव चमचा जायफळ पूड आणी वेलची पूड, तळण्यासाठी तेल. २ टिस्पून तूप.

कृती-
पराती मध्ये थोडेसे पाणी घालून बारीक मिक्सर केलेला नारळाचा कीस घालून घ्या.त्यामध्ये बारीक केलेला गूळ घ्यावा.
आता यात जायफळ पूड, वेलची पूड आणी किंचीतसे मीठ मिक्स करून घ्या. या तयार मिश्रणा मध्ये जेवढे मावेल तेवढेच तांदळाचे पीठ थोडे-थोडे मिक्स करायचे. नारळाचा कीस हा तांदळाच्या पीठा पेक्षा थोडा जास्त असला पाहीजे, तरच याला छान टेस्ट येते. हे मिश्रण अजिबात पाणी न वापरता तयार करायचे आहे. शेवटी तयार मिश्रण थोडे तूप हाताला लावून मऊसर मळून घ्यावे. तयार मिश्रणाचा गोळा झाकून अर्धा तास तसाच बाजूला ठेवून द्यावा. यामुळे ते व्यवस्थित मिळून येते. तसेच गुळाचे थोडे मोठे असलेले तुकडे देखील विरघळून जातात.
तयार पिठाला तुपाचा हात लावून लहान-लहान गोळे बनवून त्याच्या छोटया-छोटया पुर्‍या करून घ्याव्या.(श्रीखंड पुरी करतो त्या मधील पुरी प्रमाणे) थोडी जाडसर, पण आकाराने छोट्या अश्या पुर्‍या थापाव्यात. तेल कडकडीत तापवून घ्यावे. आपण वडे तळतो त्या प्रमाणे या पुर्‍या तेला मध्ये मध्यम गॅसवर दोन्ही साईडने मस्त खुसखुशीत, लालसर रंगावर तळून घ्यावे. नारळी पौर्णिमेला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यासाठी आम्ही अश्या पुर्‍या/ वडे करतो. नारळी भाताला पर्याय म्हणून. फार तर २० मिनिटांत या तयार होतात. दुधा बरोबर,चहा बरोबर किंवा सकाळचा नाष्टा म्हणून खायला हरकत नाही. चविष्ट लागतातच आणि पौष्टिक ही आहेत.


*या पाककृती मध्ये तांदळाचे पीठ वापरत असल्याने काही ठिकाणी याच रेसिपी ला ‘गुळा- नारळाचे वडे' असे देखील म्हणतात. 'घारे' असे ही म्हणतात. साहित्य वगैरे विषेश काही लागत नाही. अगदी सहज-सोपी पाककृती आहे. ओभड-धोबड पणे घाई-घाई मध्ये करण्याजोगी रेसीपी आहे.
* उकडीच्या मोदकाचे सारण उरले असेल तर त्याच्या देखील सेम अश्याच तांदळाच्या पिठा मध्ये मिक्स करून पुर्‍या बनवता येतात.
* मैदा आणि गव्हाचे पिठ एकत्र करुन ‘नारळाच्या पोळ्या किंवा सांजोर्या/ साटोर्‍या' बनवल्या जातात. ती रेसिपी वेगळी आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
"आमच्याकडे कणीक वेगळे मळुण घेतले जाते. त्यामध्ये घातले जाणारे सारण हे उकडीच्या मोदकाच्या सारणा प्रमाणे असते. हे सारण पुरणपोळी च्या, पुरणा प्रमाने कणकेच्या गोळ्यामध्ये आत भरले जाते. आणि पोळी प्रमाणे लाटुन केल्या जातात."

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

मच्छी कढी - (pomfret curry) / fish curry


साहित्य:- माशांना मॅरिनेट करण्यासाठी.
माशाचे चार-पाच तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावेत. ४-५ कोकमाच्या तुकड्यांना भिजत घालून केलेला रस,  मीठ अर्धा चमचा, पाव चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा.
- माशांना कोकम, मीठ , तिखट,  हळद लावुन १५ मिनिट फ्रिझ मध्ये  ठेवा.

ओला मसाला-
साहित्य:- छोटा कांदा १, लसणीच्या ५-६ पाकळ्या, टोमॅटो १, दोन चमचे धने, अर्धा ओला नारळ खवून,
अर्धी वाटी स्वच्छ धुवून कोथींबीर, आल्याचे छोल्या एवढे २ तुकडे,लाल तिखट अर्धा चमचा चविला+रंगाला, ओली हिरवी मिरची २ ,शंकासुरी मिरची २, बेडगी मिरची २ , मीठ अर्धा चमचा .

ओला मसाल्यासाठी कृती- वरिल सर्व साहीत्य एकत्र करुन घ्यावा, मिक्सरच्या भांड्यात अगदी नावाला पाणी घालुन सगळा मसाला बारीक गंधा सारख वाटुन घ्यावा.



फोडणीसाठी
तेल ४ चमचे, लाल तिखट अर्धा चमचा, लसणीच्या २  पाकळ्या, कढीपत्ता ४ पाने,२ त्रिफळे.



कृती- वरिल दिलेल्या साहीत्याच्या क्रमाने कढई  मध्ये फोडणी करावी. आता या फोडणी मध्ये ओला मसाला घालुन चांगला परतावा , बर्यापैकी तेल सुटु लागल्या वर मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे  घालावे.

थोडे  कोमट/ गरम पाणी घालुन मंद
गॅसवर उकळी काढावी. उकळी मध्ये २ त्रिफळे टाका. थोडी कोथींबीर वरुन भुरभुरा. मच्छी कढी तयार आहे.


  टिप-
1) मॅरिनेट केल्याने- कोकम,मीठ,तिखट, हळद हे माशांमध्ये आत पर्यंत व्यवस्थित मुरते.
2) कोकमाच्या ऐवजी चिंच वापरु शकता.
3) ओला मसाला करताना पाणी जास्त वापरले तर तो फोडणी मध्ये टाकल्यावर वरती-वरती उडतो त्यामुळे पाणी थोडेच घालावे.   
4) लाल तिखट फोडणी मध्ये टाकल्याने चांगला रंग येतो.
5) थोडे  कोमट पाणी या साठी की थंड पाणी वरुन घातल्याने चव कमी होते (आईचा उपदेश).
6) पाणी स्वतःच्या अंदाजाने घाला  किती पातळ किवा जाडसर रस्सा हवा आहे त्या नुसार,जाडसर रस्सा चवदार लागतो.
7) फोडणी जास्त उकळू नये नाहीतर माशांचा खिमा होइल.
8) त्रिफळे टाकल्या वरती मस्त चव येते, पण २ च त्रिफळे टाका, जास्त टाकल्याने थोडी तुरट चव येते.(माझा अनुभव- मागे एकदा अजुन छान चव येईल म्हणुन २-४  त्रिफळे जास्त घातली होती, आणि  सगळा बेत बिघडला होता)
9) वरुन कोथींबीर ऐछीक, पाहीजे तेवढी घाला.


पुडिंग- साधे सोपे आणि झटपट.



साहित्य :-

गरम केलेले घट्ट दूध- पाउण लीटर
साखर - ३/४ वाटी( साधारण १० टिस्पुन पुरे होते).
अंडी - ३ (पाव लिटर दुधासाठी १ अंड हे  माझ प्रमाण)
वेनिला एसेंस - १ टिस्पुन.
आवडत असेल तर केसर 2-3 काडी
किंवा वेलची पावडर 1 चमचा.



सजावट साहीत्य (ऐच्छिक) :-
काजू, बदाम, पिस्ते, स्ट्रॉबेरीस, काळ्या मनुका ई.



कृती :-

कोमट दूधमध्ये साखर मिक्स करा, व्यवस्थित मिक्स झाली पाहीजे. आता ३ अंडी व्यवस्थित फेटुन मध्ये मिक्स करा. वेनिला एसेंस आणि केसर धालुन मिश्रण ढवळुन घ्या. वरुन वेलची पावड भुरभुरुन घ्यावी. हलक्या पिवळसर रंगाचे मिश्रण तयार होईल.
सर्वात शेवटी केक करण्यासाठी तुम्ही जो पसरट गोलाकार डब्बा वापरत असाल त्यात हे मिश्रण घालुन. हा डब्बा कुकर मध्ये ठेवा. मोदक उकडताना आपण जसे पाणी घालतो त्या प्रमाने तळाशी पाणी घालुन १५ मिनिट गॅस वरती वाफवुन घ्यावे,  हे करताना प्रेशर कुकर ची शिट्टि काढुन ठेवावी. जमा झालेली वाफ त्यामधुन निघुन जाउदे. पुडिंग घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.







आता तयार  पुडिंग सेट होण्यासाठी १-२ तास फ्रीज मध्ये ठेवा.
यानंतर सजावट करुन पुडिंग खाण्यासाठी तयार आहे.
* दूध कोमट झाल्यावर वापरास घ्यावे, गरम दूधामध्ये अंडी फोडुन घातल्यास शिजुन अंड्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि अस्तित्वात नसलेली काहितरी भयंकर रेसिपी तयार होईल (स्व-अनुभवावरुन).
* साखर ६-७ टिस्पुन म्हणजे कमी गोड डायबेटीस चा पेशन्ट देखिल खाउ शकतो असे प्रमान. १० म्हणजे मिडियम गोड. यानुसार प्रमान ठरवता येते.
* वेनिला एसेंस १०० मिली ची बाटली ५०रु च्या आसपास मिळते, पुन्हा ७-१० वेळा वापरु शकता. त्यामुळे जास्त खर्च नाही.






* मिश्रण पातळ असताना (केसर किंवा वेलची पावडर लावून पर्याय म्हणून) कोको पावडर सुद्धा घालु शकता. चोकोलेट ची टेस्ट आणि मस्त कलर येतो. लहान मुल आवडीने खातात.


* या मधुन शरिराला भरपुर कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते.
* हि निश्चितच झटपट रेसिपी आहे, फक्त सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो .

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

चिकन कटलेट्स

साहित्य-
बोनलेस चिकन पाव किलो (खीमा बनवन्यासाठी)

हिरव्या मिरच्या 2, आल्याचा छोटा तुकडा, लसूण पाकळ्या 3-4 (आलं-लसूण-मिरची पेस्ट करुन घ्यावी)

1 छोटा बटाटा उकडुन, १ छोटा कांदा, शिमला मिरची १/४ वाटी, कोबी १/४ वाटी, कोथिंबीर १/४  वाटी, अर्धा लिंबाचा रस
1 चमचा लाल तिखट, मीठ 1 चमचा, गरम मसाला 1 लहान चमचा, तेल तळण्यासाठी.

आवरणासाठी- कॉर्नफ्लॉवर आणि पोह्याचा चुरा (जास्त ऑईली होत नाही, म्हणुन मी पोह्याचा चुरा घेते. त्या ऐवजी ब्रेडक्रम्स वापरले जाते)


कृती:
स्वच्छ केलेल्या बोनलेस चिकन ला आलं-लसूण-मिरची पेस्ट लावुन घ्यावी. यामध्ये २ पेले पाणी घालुन हवा बंद कढई मध्ये शिजण्यासाठी टेवावे. पाणी पुर्णपणे निघुन गेल्यावर एखाद्या चमच्याने चिकन शिजले आहे का ते चेक करुन पहा. शिजले चिकन बाहेर काढुन त्याचे छोटे तुकडे करुन त्याचा व्यवस्थित खीमा बनवुन घ्यावा.
खीमा तयार आहे.
कांदा, शिमला मिरची,कोबी,कोथिंबीर हे सर्व बारिक चिरुन घ्यावे. बटाटा कुस्करुन घावा.
सर्वप्रथम तयार खीमा एका बोलमध्ये घेउन लिंबाचा रस व्यवस्थित लावुन घ्यावा. आता यामध्ये कांदा, शिमला मिरची,कोबी,कोथिंबीर,बटाटा हे सर्व  साहित्य मिक्स करुन घ्यावे. आता यामध्ये लाल तिखट ( कलर साठी) ,मीठ, गरम मसाला हे देखिल व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
चिकन कटलेटस मिश्रण तयार झाले आहे. याचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करुन घ्यावे.
कॉर्नफ्लॉवर मध्ये अंदाजाने थोडे पाणी घालुन पातळ मिश्रण करुन घ्या. या मिश्रणा मध्ये चिकन कटलेटस मिश्रणा चे तयार गोळे बुडवुन हेच गोळे शेवटी पोह्याचा चुरा किवा ब्रेडक्रम्स मध्ये घोळुन घावे. या नतर पॅन मध्ये तेल गरम करुन त्या मध्ये घेउन मंद आचेवर तळुन घ्या.
तळल्या नंतर व्हाईट टीशू पेपर वर ठेवा (जास्तीचे तेल निघुन जाण्यासाठी).
तयार कटलेट सॉस, चटणी सोबत खायला चांगले लागते.

टिप-
कॉर्नफ्लॉवर ऐवजी अंड्याचा ही वापर केला जातो.

मंगळवार, ३० जुलै, २०१९

मोड आलेल्या मेथीदाण्याची भाजी



साहित्य:-
एक वाटी मोड आलेले मेथीचे दाणे, कांदा बारीक कापून, टॉमेटो बारीक कापून,फोड्णी साठी हिंग, मोहरी, जीरे आणि कडीपत्ताहळद, मसाला पूड, मीठ,चवीसाठी साखर, खोबरे, कोथिंबीर.

कृती:-


मेथी ही भाजी पाने  बिया (मेथीदाणेया दोन्ही रूपांत वापरली जातेमेथीच्या पानांप्रमाणेच मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी/उसळ चविष्ट लागतेआमच्या कडे थंडी मधे ही भाजी केली जातेचमेथी धूवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

सकाळी पाणी काढून एका जाळीच्या भांड्यात मोड येण्यासाठी झाकून ठेवामेथीदाण्यांना मोड यायला दोन दिवस लागतातरात्री पुन्हा मेथी धुवून परत झाकून ठेवादुसर्या दिवशी मोड आलेले मेथीदाणे भाजी करण्यासाठी तयार आहेत.
कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्यामग जीरे आणि हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालाकांदा थोडा फ्राय झाल्यावर बारीक चिरलेला टॉमेटो टाका.टॉमेटो शिजल्यावर मोड आलेले मेथीदाणे टाका.
हळदमसाला आणि मीठ टाकून परतून भाजी झाकून ठेवा आणि वाफेवर शिजण्यासाठी झाकणावर थोडे पाणी घाला
मेथीदाणे शिजल्यावर एक चमचा साखर टाकून गॅस बंद करा.
वरून चिरलेली कोथिंबीर आणि खोबरे टाका.

बुधवार, २४ जुलै, २०१९

नारळीभात





साहित्य-
 तांदूळ  वाटी,नारळाचा चव चव/ किस १ वाटी  गूळ १ वाटी,२ वाट्या पाणी,दोन तीन लवंगा.
ऐछिक साहित्य- वेलचीपूड, केशर,मनुके,चारोळी,बदाम काप,काजू तुकडे.
कृती-
तांदूळ धुवून निथळून घ्यावा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्यावा.त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग गूळ घालुन घ्यावा.यात थोडे पाणी घालून ढवळुन घ्या. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घालून दोनतीन शिट्ट्या काढुन घ्या
वरून बदाम काप, बेदाणे,काजूचे तुकडे इत्यादी घालून सर्व करा.





शनिवार, २० जुलै, २०१९

गोडा मसाला-ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी.


आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. कांदा-खोबर मसाला,तिळकुट,गरम मसाला,घाटी मसाला, मालवणी मसाला वैगरे वैगरे.
असे मसाल्याचे खुप प्रकार आहेत आणि त्यांचा वापर ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी केला जातो. पण ऐनवेळी पाहुणे वैगरे आले आणि एखादा मसाला करायचं झालं तर वेळ जास्त लागतो आणि जेवणासाठी उशीर होऊ शकतो.यासाठी मी आईनेच शिकवलेल्या पद्धतीने गोडा मसाला नेहमी तयार ठेवते. आपल्याला माहितच असेल की गोडा म्हणजे प्रत्यक्ष गोड चव नसुन हे त्याचं एक नाव आहे. हा नेहमी च्या वापरातला एक कॉमन मसाला आहे. कॉमन यासाठी कारण कडधान्य उसळी पासून ते तिखट आमटी, सुक्क चिकन,मटण, खेकड्यांचा रस्सा तसेच  मच्छी चे कालवन/ तिखल अश्या सगळ्या प्रकारच्या स्वयंपाकासाठी आपण हा मसाला वापरू शकता. रेसिपी झटपट होते. उदा. चण्याची भाजी करायची असेल तर आपण करत असलेल्या फोडणी मध्ये नेहमी प्रमाणे  मोहरी,थोडा कांदा आणि टोमॅटो, यामध्ये हा गोडा मसाला - चमचे तुमच्या अंदाजाने घाला, आणि नंतर हळद, मिरची पावडर, मिठ, गरम मसाला पावडर घालून मस्त रसरशीत चण्याची भाजी होते.
तर याची पाककृती पुढील प्रमाणे आहे.

साहित्य:-मिडियम आकाराचे  कांदे, सुख खोबरं वाटी आणि ओल खोबर वाटी, (तीन कांद्यासाठी एक वाटी खोबरं हे प्रमाण. ओल किंवा सुख कोणत्याही प्रकारे खोबरं वापरु शकता)


लसुण चे कांदे, बोटभर आदरक स्वच्छ धुवून छोटे तुकडे करून घ्यावेत, एक वाटी पुदीना एक वाटी कोथिंबीर स्वच्छ करून घ्यावी. - चमचे तेल. मोठा चमचा मीठ.
कृती:- 
प्रथम कांदे उभे पातळसर कापुन घ्या. गॅस लावुन मंद आचेवर कढई मध्ये - चमचे तेल आणि मीठ घालून त्यात सर्व कांदे मस्त मऊ एकजीव आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्या. जास्त करपु देउन नयेथोडंफार चालेल. मध्ये मध्ये कालथ्याने ढवळुन घ्यावे. हे डिश मध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्या.
नंतर किसुन घेतलेलं खोबरं कढई मध्ये घालून सारखे व्यवस्थित ढवळून घ्या. तांबुस सोनेरी रंग आल्यावर गॅस बंद करावा हे देखील थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्या. ओल सुख दोन्ही खोबरं वेगवेगळ भाजून घ्या.
आता थंड झाल्यावर कांदे,खोबरं मिक्सर मधून बारीक करून घ्या. आदरक लसूण एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी, तसेच पुदीना आणि कोथिंबीर यांची देखील मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.

शेवटी वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. आत्ता हा मसाला तयार आहे
डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे.

टीप:-
* पानांबरोबर कोंथिबीरी चे कोवळे देठ देखील टाकून देता या मध्ये वापरता येतात.
* वरिला प्रमाण घेऊन अर्धा ते पाऊण किलो मसाला तयार होतो. अर्थात कांदे आणि खोबर वैगरे चां आकार कमी जास्त असु शकतो म्हणून थोडासा फरक पडू शकतो.


*ओल खोबर भाजायला सुक्या खोबऱ्याचा तुलनेने जास्त वेळ लागतो. एकत्र केल्यास कच्च राहू नये म्हणून ते वेगवेगळे भाजून घ्यावेत.
* वरिला प्रमाण घेऊन अर्धा ते पाऊण किलो मसाला तयार होतो. अर्थात कांदे आणि खोबर वैगरे चां आकार कमी जास्त असु शकतो म्हणून थोडासा फरक पडू शकतो.
*तुमची मसाल्याची पाककृती नक्की शेअर करा.
एक आठवण
पाणी अजिबात वापरले नसल्याने मसाला महिनाभर आरामात टिकतो. खराब होत नाही किंवा चविमध्ये बदल होत नाही.
आई सांगत असते "पुर्वी गावी फ्रीज नसायचे त्या वेळी याच मसाल्या (सुख खोबरं वापरून आणि पुदीना नाही असा केलेला) मध्ये मसाल्याच्या / लाल मिरची पावडर आणि - चमचे मीठ घालून ठेवायचे. १०-१५ दिवस हा मसाला फ्रीज चा बाहेर ठेवला तरीही खराब होत नाही".
साधारण तीन वर्षापूर्वी मी पुण्याला होते तेव्हा ची गोष्ट. पि.जी. राहत असल्याने माझ्या रुम मध्ये फ्रीज न्हवता. त्या वेळी आई असा मसाला बनवुन मला देत असे. जेव्हा मेस च्या भाजीचा कंटाळा यायचा तेव्हा पोळी किंवा भाकरी वरती छोटा मसाल्याचा गोळा असाच ठेवून खाण्यात वेगळाच आनंद होता.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...