मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

नक्षत्रांचे देणे १४


 'ऑफिसमध्ये आज फार गडबड चालू होती. न्यू प्रोजेक्ट लॉन्चिंग त्यामुळे बरेचसे नवीन लोक आले होते. न्यू प्रोजेक्ट्ची अक्खी टीम खूपच बिझी दिसत होती.

एवढ्या सकाळी सकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थितपने हॅण्डल करण्यात रिसिप्शनिस्टची दमछाक झाली होती. भूमीने एंट्री केली तेव्हा 'आपण?' असा चेहेरा करून तिने भुवया उंचावल्या होत्या. नवीन जॉइनिंग तीही सावंत सरांनी डायरेक्ट अपॉईंट केलेली एम्प्लोइ. हे समजल्यावर तर ती अजूनच शॉक झाली. अवधी सुंदर दिसत होती ती कि, तिच्याबरोबर त्या एरियात आजूबाजूला असणारे इतर लोकही शॉक्ड होते. भूमीला बघून... कित्त्येकांच्या नजरा तिथे उंचावल्या होत्या. '' मोस्ट वेलकम मॅम.'' असं म्हणत रिसिप्शनिस्टने भूमीला तिच्या केबिनच्या रूट सांगितलं आणि भूमी आतमध्ये वळली. खरतरं तिला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. घरात साडी घालून वावरायची सवय नव्हती.  इथे ऑफिस मध्ये तर शक्यच नव्हतं. त्यात पहिला दिवस, कित्त्येक एम्प्लॉई तिच्याकडे निरखून बघत होते, हे जाणवल्याने तर ती अजूनच अस्वस्थ झाली. ती कोणाशी काहीही न बोलता सरळ केबिनमध्ये घुसली. 'मॅम तुम्ही बसा,


सावंत सर अजून मीटिंगमध्ये आहेत, ते स्वतः तुम्हाला पुढच्या इंस्ट्रक्शन्स देतील,' असं म्हणून एक माणूस निघून गेला.

 

बऱ्यापैकी मोठी केबिन होती ती. एक मध्यम आकाराचे काचेचे टेबल त्यावर PC बाजूला लागणाऱ्या स्टेशनरीच्या साहित्य आणि काही फाइल्स अगदी  व्यवस्थितपणे  लावून ठेवण्यात आल्या होत्या.  समोर असणाऱ्या चेअरवर बसत भूमी प्रत्येक गोष्टीचे  निरीक्षण करत होती. पण अजूनही कोणीही तिथे आलेले नव्हते. बाहेर मात्र फार गडबड आणि माणसांचे आवाज ऐकू तेय होते. त्यावरून तिने अंदाज बांधला कि, अजून न्यू प्रोजेक्ट च्या कामामध्ये सगळे बिझी असणार. शेवटी कंटाळून तिने बाजूच्या मोठ्या काचेच्या खिडकीमधून खाली नजर टाकली. तेव्हा आपण फारच उंचीवर असल्याची जाणीव तिला झाली. बाहेर बऱ्यापैकी पाऊस सुरु होता. आज सकाळपासूनच पावसाने जोर लावला होता. सगळीकडे पाणी पाणी झाले होते.

''हाय भूमी .'' बाहेरून अचानक आलेल्या आवाजाने तिने मागे वळून पहिले. सावंत सर आणि एक लेडी एम्प्लॉई केबिनमध्ये आले होते. ''हॅलो सर.'' म्हणत तिने त्यांच्याकडे पहिले.  

 

''भूमी, आज तुझा पहिला दिवस आणि न्यू प्रोजेक्ट्स लॉन्च असा योग आहे. मी खूप बिझी आहे, सो तुला या कादंबरी मॅम तुझ्या कामाचे डिटेल्स आणि बाकी गोष्टी समजावतील . आज रिलॅक्स हो, इथल्या बाकीच्या एम्प्लॉईना भेट, इंट्रो झाला कि मग आपण मेन हॉलमध्ये भेटू. हॅव अ गुड डे, ओक.'' एक वाक्यात सगळं सांगून सर निघूनही गेले. 

 

''ओक सर.'' म्हणत भूमी कादंबरी मॅम बरोबर कामाचे डिस्कशन करायला बसली. सर आज बिझी असणार हे तिला अपेक्षित होतेच, पण कोणीतरी आपल्याला गाईड करायला आलं आहे, हे पाहून तिला फर बर वाटलं.

 

 कादंबरी मॅम कडून बेसिक गोष्टी समजल्यावर भूमी बाहेर निघाली, दुपारी बाहेर सगळ्यांबरोबर इंट्रो करून झाली होती. लंच वगैरे आवरलं होत. टेबलवर असलेल्या फोनवर फोनकरून पलीकडून तिला कोणीतरी कंपनीच्या मेन हॉलमध्ये यायला संगितले. ती विचारत विचारत त्या ठिकाणी पोहोचली . त्या प्रशस्त  सभागृहात बरेच लोक उपस्थितीत होते. राउंड टेबल अरेंजमेंट होती, समोर स्टेजवर मिस्टर सावंत आणि त्यांचा सिलेक्टिव्ह स्टाफ तसेच इतरही मोजकी मंडळी बसलेली होती. न्यू प्रोजेक्ट रिलेटेड काहीतरी अनाउन्समेंट सुरु असल्याने उगाच डिस्टरब नको, म्हणून भूमी दाराजवळील एका रिकाम्या टेबलाकडे वळली, तेथील बाजूची एक चेअर ओढून ती बसणार एवढ्यात स्टेजवरून अजून एक अनाउन्समेंट झाली होती. कोणीतरी आपली नाव घेते आहे, हे लक्षात आल्यावर भूमीने त्या दिशेने पहिले, तो मिस्टर सावंतांचा PA असावा, स्टेजवरून त्याने 'न्यू प्रोजेक्ट लीगल हेड म्हणून, भूमी साठे.' असे नाव अनाऊन्स केले होते. ऐकून भूमीला घाम फुटला.  काय बोलावं तिला कळेना. तिथे काय विचारल तर? काय? या प्रोजेक्ट बद्दल तर तिच्याकडे अगदीच थोडी माहिती होती. आधीच गोंधळलेली भूमी आता फार घाबरली. तरीही उठून ती कशीबशी स्टेजवर पोहोचली होती. पण काहीही प्रॉब्लेम झाला नाही. मिस्टर सावंत स्वतः उठून तिच्या इथे आले. त्यांनी तिच्या बाजूला उभे राहून सगळ्यांना स्वतः माहिती दिली कि, आजपासून न्यू जॉईन झालेल्या या भूमी साठे आपल्या नवीन प्रोजेक्ट्सच्या लिजलचे सगळे काम पाहणार आहेत. आणि सगळ्यांनी तिचे स्वागतही केली. हे सगळं अवाक होऊन बघत स्टेजच्या खाली उभा असलेला क्षितीज मात्र शॉकमध्ये होता. आपल्याला कुणी काहीच कल्पना कशी दिली नाही, हे त्याला कळेना. इकडेतिकडे लक्ष टाकताना भूमिच्याही लक्षात आलं होत, कि क्षितिजपण इथे उपस्थित आहे आणि त्याला आपल्या जॉईन बद्दल आश्चर्य वाटणे साहजिक आहे. त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हेच तिला कळेना.'

'हॉलमधला कार्यक्रम आवरला आणि सगळे आपल्या केबिनच्या दिशेने निघाले. क्षितीज समोरच उभा आहे हे आव्हान भूमीच्या तिच्या लक्षात आलं होत. तिने त्याला बघून प्रसन्न मुद्रेने हाय केले. अगदी थंड नजरेने तिच्याकडे बघत तोही हसला. तो काहीतरी बोलणार एवढ्यात बाजूला उभे असलेले ,'काँग्रॅज्युलेशन मॅम अँड वेलकम .'' असं म्हणत त्या दोघांच्या मध्ये हजार झाले होते.  ''थँक्स.'' म्हणत भूमी क्षितिजला काहीतरी सांगणार तर, वेदांत तिथे आला होता.  ''हाय... हाय.''  म्हणून त्याने हात हलवत भूमीला अभिनंदन केलं. खरतर मुखर्जी आणि वेदांतसाठी भूमीच जॉइनिंग एक आश्चर्याचा धक्काच होता. पण नेहमीप्रमाणे तोंडावर उसण हसू आणून ते दोघे भूमीशी अगदी गोडं-गोड गप्पा मारत बसले होते, आणि आधीच चिडलेला क्षितीज तिथून कंटाळून निघून गेला, बोर होऊन शेवटी काहीतरी खोट काम सांगून भूमीही तेथून निघाली. क्षितिजचा गैरसमज झाला असावा हे तिला जाणवत होत. त्यात कंपनीचे मालक असणारे सावंत सर तिला पर्सनली इंट्रो करत होते, या आधी असे केव्हाही झाले नव्हते. हा काय प्रकार आहे. हि नक्की कोण आहे? का विचारात बाकीचा स्टाफ तिला अजूनच निरखून बघत होता.’

 

आजचा ऑफिसचा दिवस संपला होता.  क्षितिजबरोबर काहीच बोलणं झालं नाही. याच भूमीला वाईट वाटत होत.  त्याच विचारात सगळं आवरून ती घरी जायला निघाली.

नक्षत्रांचे देणे १३



 'मेघाताई आणि मिस्टर सावंत यांचं बोलणं सुरु होत. आज भूमी ऑफिस जॉईन करतेय, हे समजल्यावर मेघाताईंना कितीतरी आनंद झाला. क्षितीज आणि त्याच्या पप्पांचे बदलणारे सूर त्यांना आता स्पष्ट दिसत होते. म्हणून त्यांनी मुद्दाम विषय काढला.'

''संजय क्षितिजमध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येतोय का? तो आता एकटा-एकटा नाही वाटत. पहिल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह वाटतो. आणि पॉसिटीव्हही ''

''होय, आणि ते त्याच्यासाठी आणि कंपनीसाठी चांगलं आहे.'' ऑफिसला जाण्याच्या तयारीत असलेले मिस्टर सावंत मेघाताईंना म्हणाले.

''भूमीला असं त्याला न सांगता जॉईन करण्याचं कारण समजेल का?''

मेघाताईंनी डायरेक्ट विषयाला हात घातला.

''भूमी ही कंपनीच्या हिताच्या दृष्टीने असलेली माझी चॉईस आहे, क्षितिजला मला इथे इन्व्हॉल्व्हड करायचं नाहीय.''  ते मेघाताईंकडे बघत म्हणाले.

''पण का? तो चांगल बोलतो तिच्याशी. इनफॅक्ट त्यांचं छान  बॉण्डिंग आहे.''

''असेलही पण त्याच्या एका चुकीची शिक्षा माझी संपूर्ण कंपनी भोगतेय. आता इथे पुन्हा त्याच रिपीटेशन नको.  मेघा तू यात लक्ष देऊ नकोस, प्लिज.''

''कोणती चूक? मैथिलीला कंपनीत जॉईन करण्याची ना?''

''नुसती जॉईन नाही केलं त्याने,  त्यानंतर माझी कंपनी लॉसमध्ये गेली, म्हणून त्याने तिच्या बापाला पार्टनरशिप द्यायला लावली. आणि आता स्वतःच्या मुलीच्या मागे तो किर्लोस्कर माझ्या डोक्यावर बसलाय.'' मिस्टर सावंत आता फार चिडले होते.

''होय, ते खरं असलं तरीही हे नाकारता येणार नाही, कि मैथिलीमुळे क्षितीज ऑफिसला जायला लागला. नाहीतर नुसता उनाड मुलासारखा वागत होता. आठवत ना?''  मेघाताई आपला मुद्दा क्लिअर करत म्हणाल्या.

''मेघा तुला अजूनही कसं समजतं नाही. त्या मैथिलीला पैसेवाला मुलगा पाहिजे होता, आणि त्याच्या मार्फत आपल्या फॅमिलीला बिझनेसमध्ये सेटल करण्यासाठी तिने क्षितिजचा फक्त वापर केला. एवढं वाईट व्हायला नको होत, पण आपलं सुदैव, की तिचा तो अक्ससिडेन्ट झाला आणि क्षितीज तिच्या जाळ्यातून सुटला.''  बोलताना मिस्टर सावंतांचा राग आता अगदी अनावर झाला होता. नेहमीप्रमाणे त्यांच्या हातापायांची थरथर व्हायला लागली.

 

''मला असं नाही वाटतं. असो, आपण का वादावाद घालतोय. आता क्षितीज ओक आहे, सो तुम्ही आता त्याला समजून घेत जा. प्लिज.''  मेघाताई त्यांना शांत करत म्हणाल्या.

''येस, सध्या तरी मी तेच करतोय.'' म्हणत ऑफिसची तयारी करून ते बाहेर निघाले होते.

******


आज तिचा नवीन जॉबचा पहिला दिवस. पुचारपूस करावी म्हणून माईंनी भूमीला फोन केला. ''हैलो, झाली का ग तयारी?''

''होय माई, निघतेच आहे.''

''भूमी टिफिन वगैरे घेतला का?'' 

''होय माई, सगळं घेतलं हो. तुम्ही दोघांनी काळजी घ्या.''

''तू काळजी घेत जा. आम्ही मस्त आहोत. आणि रात्री यायला उशीर झाला तर बाजूच्या गोखले काकूंना सांगून ठेवत जा. त्या तुझं जेवण करत जातील.''

''माई, काकू आत्ताच येऊन गेल्या. आपल्या या फ्लॅटमध्ये एवढ्या दिवसांनी मी राहायला आले, ते आवडलं त्यांना.''

''होय गं, नानांच्या रिटायर्डमेन्टच्या आधी आम्ही तिथे राहायचो ना, चांगली गट्टी जमली होती गं आमची. मुंबई सोडून फार वर्षे झाली, पण त्या आम्हाला विसरल्या नाहीत अजून. ''

'' तुमची आठवण काढत होत्या. सवडीने फोन करा त्यांना, आणि इथल आपलं घर अगदी सुस्थितीत आहे, काहीही काळजी नसावी.'' असं म्हणत भूमी मोठ्याने हसली. पलीकडून स्पिकरवरून माईंचे आणि भमीचे फोन संभाषण ऐकणारे नाना देखील हसले. त्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधीच त्यांना उत्तर मिळाले होते. 

''बरं बाई, उगा पहिल्याच दिवशी तुला उशीर नको. संध्याकाळी फोन कर हो.'' म्हणत माईंनी फोन ठेवला आणि आपली पर्स उचलून हॉलचा दरवाजा ओढत भूमी घराबाहेर पडली.

ऑफिसचा पहिला दिवस, त्यात क्षितिजला काहीही पूर्वकल्पना न देता त्याचीच कंपनी जॉईन करतेय. आणि मिस्टर सावंतांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास... या सगळ्याच प्रचंड दडपण तिच्या मनावर आलं होतं. खरतरं एवढ्या मोठ्या गॅप नंतर पुन्हा काम करण्याची इच्छा तिला नव्हती. पण आयतीच ऑफ़िर चालून आली होती, ती ही तिच्या आवडत्या क्षेत्रात, त्यामुळे आपल्या भविष्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल टाकण्यासाठी तिने हि संधी एक स्वतःलाच दिलेले आव्हान म्हणून स्विकारली होती.  

कॅब पकडून भूमी निघाली, थोडे अंतर पार झाले नसेल तेवढ्यात तिच्या मेल बॉक्समध्ये एक नवीन मेल आल्याचे नोटिफिकेशन तिला दिसले, मेल ओपन केल्यावर मात्र तिच्या चेहेरा उतरला होता. SK ग्रुप ऑफ कंपनीज च्या HR चा मेल होता. ' काही अपरिहार्य कारणामुळे मिस्टर सावंत आज कंपनीमध्ये उपस्थित राहू शकत नव्हते, त्यामुळे भूमीला उद्या जॉईन करायला सांगितले होते.' कदाचित सावंत सरांना त्यांच्या अनुपस्थित भूमीच जॉइनिंग अपेक्षित नसावं. असा भूमीने अंदाज बांधला. नकारार्थी मान डोलावत पुढील मेल वाचत तिने कॅब परत मागे घ्यायला सांगितली. तिच्या मोबाइलवर एक अनोळखी नंबरचा कॉल आला होता. तिने आपला मोबाइल कानाला लावला.

''हैलो, भूमी साठे ?'' पलीकडून विचारणा झाली.

''येस, आपण?''

''मी SK ग्रुप ची HR बोलतेय, तुम्हाला मेल मिळाला असेलच तरीही सरांनी एक फोन करायला सांगितला होता.'' SK ग्रुपची HR बोलत होती.

खरतरं भूमी थोडी गोंधळली होती. तरीही तिने विचारलेले. ''ओके, बोला.'' 

''उद्या कंपनीमध्ये न्यू प्रोजेक्टच लॉन्चिंग आहे, सो नो फॉर्मल्स, उद्या ड्रेसकोड असणार आहे.  तुम्ही न्यू जॉईंनी आहेत त्यामुळे तुमचा गैरसमज व्हायला नको, म्हणून मी पर्सनली फोन करून तुम्हाला हे सांगते. मेल मिळाला असेलच.''

''ओह, thats fine. मेल बघून मी थोडी गोंधळलीच होती. तुम्ही फोन करून क्लीअर केलं ते बरं केलं.'' आता भूमीला थोडं हायस वाटलं. निशंक होऊन ती उद्याच्या तयारीला लागली.

नक्षत्रांचे देणे १२



 ''कंपनीत चाललेले गैरव्यवहार आमच्या सहमतीने किवा ऑर्डरने नाही होत आहेत. कोणीतरी आतील व्यक्ती कंपनीला बदनाम करण्यासाठी हे सर्व आमच्या मागे करत आहे. तेच तर उघडकीस आणायचं आहे.'' आत्तापर्यंत शांत राहिलेला क्षितीज आता त्यांच्या मैफिलीत सामील होत म्हणाला.

 

''आय सी. असं आहे तर, इफ यु डोन्ट माइंड, मला थोडा वेळ लागेल प्लिज. अचानक हो किंवा नाही  असं नाही सांगता येणार.''  भूमी त्यांचा आदर करत म्हणाली.

 

''नो प्रॉब्लेम. एनी टाइम. बायदवे नाइस तू मीट यु बेटा, मी निघती थोडं काम आहे.'' म्हणता मिस्टर सावंत निघाले. आणि त्यांच्या बरोबर आज्जोदेखील बाहेर बेडरूमकडे निघाल्या.

 

''बराच वेळ झाला, मी देखील निघते. बाय.''

 

भूमी सोफ्यावरून उठली होती. मेघाताईंनी क्षितिजला हातानेच खूण करून तिला सोडायला जायला सांगितले.

''थँक्स.'' म्हणत क्षितीज तिच्यासोबत बाहेर निघाला.

 

''फाइन. येते.''

 

''तुम्ही न सांगताच निघालात चंदिगढ वरून.'' क्षितिज

 

''तुमच्या रूमची बेल वाजवली होती. पण डोअर नाही उघडला. मला वाटलं तुम्ही झोपला असाल. सो तिथेच वेटरकडे निरोप देऊन निघाले. थोडी इमर्जन्सी होती.''  भूमी.

 

''ओह, ही फाइल फार महत्वाची आहे. म्हणून आम्ही सगळेच काही दिवस काळजीत होतो, तुमचा शोध घ्यायचा तर माझ्याकडे कोणता कॉन्टॅक्टही नव्हता. आम्हाला वाटलं कि...''

क्षितिज पुढे बोलणारच तेवढ्यात भूमी म्हणाली. '' डोन्ट वरी, मी कोणतेही पेपर्स लीक केलेले नाहीत. आणि मला तशी गरजही नाही. चंदीगढला असताना माझा गैरसमज झाला होता, की तुमची कंपनी लोकांची फसवणूक करत आहे, पण आता इथे आल्यावर समजले, की कोणीतरी तुम्हाला बदनाम करण्यासाठी हे सगळं मुद्दाम घडवून आणत आहे. असं असेल तर  यापुढे बी केअरफूल.''

त्या बरोबर दोघेही खळखळून हसले.

''हे माझं कार्ड, फोन नंबर आहे. तुम्ही जॉईन करायला तयार असाल तर, पप्पांना किंवा मला कळवा.'' क्षितिजने आपले कार्ड तिच्या समोर धरले.

 

 कार्ड हातात घेत ती म्हणाली, ''जमेल का बघते.''

 

''होय नक्की.'' क्षितीज म्हणाला. 

 

बराच वेळ शांतता पसरली शेवटी भूमी निघाली. ''वाटलं नव्हतं आपण पुन्हा भेटू.''  दोघांच्याही तोंडून एकच वाक्य बाहेर पडले. आणि अचानक दोघांनी एकमेकांकडे पहिले. एक सुंदर स्माईल तिच्या चेहेऱ्यावर पसरली होती आणि बाय करून ती तशीच निघाली. चेहेऱ्यावर मंद स्मित घेऊन क्षितीज घरामध्ये आला, मेघाताई खुश होऊन त्याच्याकडे बघत होत्या. 'काय बघतेस?' अस मानेनेच विचारल्यावर, 'तुला बघतेय. खूप दिवसांनी तुझा हा असा आनंदी चेहेरा बघायला मिळतोय ना.'' असं म्हणत मेघाताई सत्यनारायण देवाला हात जोडून उभ्या राहिल्या.  त्यांच्या मते खऱ्या अर्थाने पूजेची सांगता झाली होती. आणि क्षितिजीचा ग्रहदोष टाळायला सुरुवातही झाली होती.

 

*****

'मेघाताईंनी भूमी आणि क्षितीज बद्दल काही गोष्टी क्षितिजच्या पप्पांच्या म्हणजेच आपल्या नवऱ्याचा कानावर घातल्या होत्या. त्या विषयी कोणताही निर्णय न घेता  सध्यातरी दोघांनी व्यावसायिक दृष्टीने विचार करण्याचे ठरवले. पण भूमी बद्दल क्षितिजच्या मनात अजूनही बऱ्याच काही भावना आहेत, हे मेघाताईंनी ओळखले होते. साठे काकांना फोन करून तिची चौकशी करावी म्हणून त्यांनी विचार केला. पण आधी क्षितीज जवळ या विषयी बोलणं करून घेऊ मग पुढे जाऊ असं त्यांनी ठरवलं.'

 

'किर्लोस्करांना पेपर्स दाखवून मिस्टर सावंत निर्धास्त झाले. पेपर्स कसे काय मिळाले? या विचारात असणारे मुखर्जी मात्र नवीन काही शक्कल लढवता येते का? या शोधात होते. वेदांतचे कोर्लोस्करांचे कान भरण्याचे काम सुरु होतेच. भूमीशी कॉन्टॅक्ट व्हावे, आणि तिला आपण इथे नियुक्त करावे यासाठी दोघांचे जोरदार प्रयन्त चालू होते. त्या दोघांनाही या गोष्टीची खबर सुद्धा लागलेली नव्हती, कि मिस्टर सावंतांनी परस्पर ऑफर देऊन भूमीला कंपनी जॉईन करायला सांगितले आहे. आणि त्यांच्या या प्रपोजलला भूमीने त्यांना कॉल करून होकार देखील कळवला होता. हि गोष्ट अजून क्षितिजच्या कानावर नव्हते. मिस्टर सावंत बऱ्याच गोष्टी खाजगी ठेवत, त्यानुसार जॉइनिंग होई पर्यंत कोणालाही कळू द्यायचे नाही. असे त्यांचे ठरले होते.

 

भूमी कंपनी जॉईन करायला होकार देईल कि नाही, या विचारात क्षितीज देखील गॅलरीत येऊन आभाळाकडे टक लावून उभा होता. त्याला न राहवून सतत भूमी डोळ्यासमोर येत होती. दूरवरच्या आकाशात पोकळीतील अफाट जागा जणू त्या नक्षत्रांनी भरून काढावी अगदी तशी. नकळत का होईना पण, मैथिलीसाठी एवढी वर्ष वाट बघत एकाकी आयुष्य जगणाऱ्या क्षितीजच्या आयुष्यातील त्या एकाकीपाणाची जागा आता भूमीने भरून काढली होती.'

 

' आठवड्यापूर्वीच भूमी, माई आणि नानांच्या आग्रहामुळे आपलया पुढील करिअरसाठी शहरात आली होती. विभासाचे सत्य समजल्यावर नानांनी तिला तिचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला होता. विभासशी कोणतेही संबंध न ठेवता, जणू काही झालेच नाही, असे समजून भूमीला स्वतःच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगण्याचा अजून एक चान्स मिळाला होता. त्यात भूमीने आपल्या करिअरला पाहिले प्राधान्य दिले होते.

एका छोट्याश्या बॉक्समध्ये ठेवलेले मंगळसूत्र तिने बाहेर काढून आपल्या हातात घेतले. ते अगदी जसेच्या तसे होते. तिने ते मंगळसूत्र माई आणि नानांच्या शिवाय कोणाच्याही समोर घातले नव्हते. खरंतर आता माई-नानांच्या समोर देखील ते घालण्याची गरज उरली नव्हती.  लग्न झालं त्याच दिवशी विभासच खोटेपणा तिला समजला, तिने त्यांच्याशी न जुळलेले नातं  लग्नाच्या दिवशी तोडून टाकलं  आणि त्यांचा संसार उभा राहण्याच्या आधी तुटून गेला. आपल्या विश्वासाला गेलेला तडा आणि असा आंधळा विश्वास ठेवून आपण केवढी मोठी चूक करून बसलो आहे. हे सदैव लक्षात रहावे,  जेणेकरून आपण अशी चूक पुन्हा करणार नाही. यासाठीच तिने हे मंगळसूत्र स्वतःकडे जपून ठेवले होते. त्याच्याकडे बघून नकळत तिचे डोळे भरून आले. ते मंगळसूत्र तसेच त्या बॉक्स मध्ये ठेवून ती गॅलरीत आली, वर पांघरलेले निळंशार आभाळ आणि त्यात गुंतलेली अगणिक नक्षत्र बघण्यात ती पुन्हा गढून गेली. एकांत समई तिचा हा आवडता विरंगुळा होता. त्यातच चंदीगढला असताना पासून  क्षितीजमध्ये गुंतलेले तिचे मन... कितीही नाकारले तरीही भूमी देखील त्याचा विचार मनातून काढू शकत नव्हती.'

दूरवर कुठेतरी सूर उमटू लागले होते.

'तुम आये तो हवाओं में एक नशा है

तुम आये तो फिजाओं में रंग सा है

ये रंग सारेहै बस तुम्हारे

और क्याऔर क्याऔर क्या.'

नक्षत्रांचे देणे ११



 ‘ग्रहशांती अगदी व्यवस्थित पार पडली, मिस्टर आणि मिसेस सावंत सत्यनारायण पूजेला बसले. तोपर्यंत संध्याकाळ व्हायला आली होती. अजूनही भूमीची काहीही माहिती मिळाली नाही, म्हणून क्षितीजची काळजी अजून वाढत चालली होती. तो आपल्या माणसांना फोनवर फोन करून सारखी विचारपूस करत होता. आलेली बहुतेक सगळी मंडळी पूजेचा प्रसाद घेऊन घरी निघायला लागली.

साठे काका प्रसाद घेऊन निघालेच होते. मिस्टर सावंत आणि मंडळी त्यांच्या पाय पडले आणि काका दरवाजाकडे वळले. गर्दी कमी झालेली पाहून, मिस्टर सावंतांनी पुन्हा क्षितिजला विचारले, ''काही माहिती मिळाली का?''

''नाही.'' म्हणून मन डोलावत क्षितीज अस्वस्थ झाला. खरतर त्याची आशा आता पूर्णपणे मावळली होती. थोड्याचवेळात  बाहेरच्या मुख्यदारावर कोणीतरी विचारत होते, ''मिस्टर क्षितीज सावंत इथेच राहतात का?''

आवाज क्षितिजच्या ओळखीचा होता. पण विश्वास  बसत नव्हता. तो आणि त्याची आई, मेघाताई सरळ बाहेरच्या दाराजवळ पोहोचले. दारात एक मुलगी उभी होती. साठे काका देखील तिथेच बाजूला उभे होते. '

‘कोणीतरी मुलगी, ती पण क्षितीजला विचारतेय, या गोष्टीवर मेघाताईंचा विश्वासच बसेना, म्हणून मेघाताईंनी तिच्याकडे बघत विचारले. ''आपण?''

''ही भूमी... भूमी साठे. माझी नातलग लागते.'' साठेकाकांनी भूमीकडे बघत उत्तर दिले.

''म्हणजे तुम्ही यांना ओळखता?''  गोंधळलेल्या क्षितीजने त्यांना पुन्हा विचारले.

''होय. पण भूमी तू इथे कशी काय?'' काकांनी भूमीला प्रश्न केला.

''काका ते थोडं काम होतं.''  भूमी.

नक्की काय चालू आहे, याचा काहीही सुगावा न लागलेल्या मेघाताईनी सगळ्यांना आतमध्ये यायला सांगितले. 'दारात उभे राहण्यापेक्षा आता येऊन बोलूया.' असं म्हणत त्या आतमध्ये वळल्या.

''नाही मी आत नाही येत. तुमच्या इथे काहीतरी फंक्शन आहे वाटत. मी जस्ट हे पेपर्स रिटर्न करायला आले होते.'' पेपर्स पुढे करून भूमी निघायच्या तयारीत होती.

''घाई आहे का? पूजा आहे घरी, पाया पडून तू निघून जा.'' मेघाताई पेपर्स हातात घेत म्हणाल्या. आत्ता कुठे त्यांना लक्षात आले होते की, हीच ती मुलगी... भूमी साठे… आणि ही साठे काकांची नातलग सुद्धा लागते. त्यांच्या आग्रहाखातर भूमी आतमध्ये पूजेच्या ठिकाणी आली. आपण शोधत असलेले पेपर्स मिळाले तेही स्वतः भूमीने आणून घरी दिले होते. तिला शोधण्यासाठी आपले लोक असमर्थ ठरलेले होते. क्षितिजचे पप्पा आणि आज्जो यांना तर नवलच वाटले.

'' माझे एकमहत्वाचे काम आहे, त्यामुळे मी निघतो.'' असं म्हणत भूमीचा देखील निरोप घेऊन साठेकाका बाहेर पडले. 

पाया पडून प्रसाद घेऊन निघालेल्या भूमीला आज्जो आणि मेघाताईंनी  थोडा वेळा थांबवले त्या तिघी गप्पा मारत बसलेल्या होत्या.  बोलता-बोलता आज्जोने तर तिचा मोबाइल नंबरही मिळवला.

मिस्टर सावंत स्वतः येऊन तिला 'थँक्स' म्हणले, एवढा मोठा माणूस आपल्याले आभार मानतो याचे भूमीला फार नवल वाटले. 'घरी एक इमर्जन्सी आल्याने आपल्याला चंदिगढ वरून ताबडतोब परत निघावे लागले. त्यामुळे हे पेपर्स परत करायचे राहून गेले.' हे तिने स्पष्ट केले. दुरून हे  सर्व गुपचूप पाहत आणि ऐकत असलेला क्षितीज मात्र अजून तिच्याशी एकही शब्द बोलला नव्हता. आपण काय विचार करत होतो आणि काय समोर आले. या विचाराने क्षितिजला मनोमन खजील झाल्यासारखं झालं होत.

''पण तुला आमचा पत्ता कसा काय सापडला?'' अचानक मेघाताईंनी मनातील प्रश्न तिला विचारला. 

'' या पेपर्सवरच्या माहितीवरून SK ग्रुप च्या वेबसाइटवर थोडं सर्चिंग केलं. तिथेच तुमची थोडी माहित आणि सावंत सरांच्या PA चा नंबर होता, त्यावर फोन लावला, महत्वाचे कागदपत्र परत करायचे आहेत सांगितल्यावर, त्यांनी हा पत्ता दिला. आधीच फार दिवस हे कागद माझ्याकडे आहेत,  उशीर नको म्हणून तडक इथेच आले.'' भूमीने स्पष्टीकरण दिले.

 

''पण तू ते पेपर्स PA जवळ सुद्धा देऊ शकली असती, आय मिन तुला एवढ्या लांब यायला लागलं नसत ना.'' आज्जो म्हणाल्या.

 

''होय, पण ते पेपर्स असे कोणाच्याही हातात देणे योग्य नाहीय. आणि हे सरांना माहित असेलच.'' भूमी मिस्टर सावंतांकडे बघत म्हणाली.

 

''म्हणजे तुला माहित आहे. ते...'' ते आश्यर्य चकित होऊन म्हणाले.

 

''होय. चंदीगढला असताना ती फाइल माझ्याकडे दिली गेली. केसच्या संदर्भात मला थोडा स्टडी करावा लागला. तेव्हा ते माझ्या लक्षात आलं होत.''

भूमीच्या या वाक्यावर क्षितीज अवाक झाला होता. अचानक त्याने तिला विचारले. '' मग तुम्ही चंदीगढला असताना ती केस का घेतली?''

 

''त्यावेळी बरोबर आणि चूक यापेक्षा मला माझं कर्म महत्वाचं वाटलं. तुम्ही मला आक्सिडेंटच्या वेळी मदत केली, त्याबदल्यात तुमची थोडी मदत केली. आणि  केस खोटी आहे, हे माहित असूनही मी मीटिंगमध्ये ती क्लिअर केली.'' भूमीने एका वाक्यात उत्तर दिले होते, आणि सगळी सावंत कंपनी तिच्याकडे डोळे विस्फारून बघत होते.

 

''भूमी मी तुला ऑफर देतो. आमची कंपनी जॉईन करणार का?'' अचानक मिस्टर सावंतानी तिला विचारले. आणि ती फार गोंधळून गेली.

 

''म्हणजे?'' तिला पुढे काय बोलावे कळेना.

 

''येस, आम्हाला आमच्या कंपनीसाठी एका लीगल ऍडवायजर ची गरज आहे.  तू इंटरेस्टेड असशील तर कळवं आम्हाला. काही घाई नाही.'' मिस्टर सावंत ठामपणे बोलत होते.

 

'' सर सॉरी, पण अश्या चुकीच्या आणि खोट्या केसेस लढणं नाही जमणार मला.'' भूमी प्रामाणिकपणे म्हणाली.

 मेघाताई तिचा विश्वास आणि प्रामाणिकपणा यामुळे तर भारावूनच गेल्या होत्या.

 

''नाही आता खोट्या  केस लढायची गरज नाही. खरी केस पाहायची आहे आणि कंपनीत चाललेले असे खोटे व्यवहार उघडकीस आणायचे आहेत. जमेल? '' मिस्टर  सावंत पुन्हा आपला मुद्दा मांडत म्हणाले.

 

''म्हणजे तुमच्या कंपनीत चाललेल गैरव्यवहार उघडकीस आणून तुम्ही तुमचेच नुकसान करून घेणार? का?'' भूमीला त्यांची गोष्ट लक्षात येईना. म्हणून तिने आपली शंका विचारली.

नक्षत्रांचे देणे १०


 

''सावंत लीगलच्या फाइल बद्दल काय निर्णय झाला.''  किर्लोस्करांनी विषयाला हात घातला. 

''ज्या मुलीने ऐनवेळी येऊन चंदीगढमध्ये प्रेझेंटेशन दिले तिच्यासोबत ती फाईल गेली आहे. दुर्दैवाने ती मुलगी आमच्या जास्त परिचयाची नसल्याने वेळ लागला आहे. तरीही आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.’’ सावंत त्यांच्याकडे पाहत म्हणाले.

''सर, कंपनीके रेप्युटेशन का सवाल है. ती फाइल लीक झाली तर....'' 

मुखर्जी पुढे बोलणारच तेवढ्यात सावंत ओरडले. ''तर काय होईल हे तुम्ही आम्हाला सांगण्याची काही गरज नाही. कंपनीचा करता धरता मी आहे. मी बघतो काय करायचं ते.''  

 

''होय सावंत. तुम्ही सर्वेसर्वा असलात तरीही मी सुद्धा तुमचा पार्टनर आहे, हे विसरू नका. तुमच्या मुलाच्या चुकीमुळे मला देखील बदनामीला तोंड द्यावे लागेल.'' सरळ उभे राहत कोर्लोस्कर रागारागाने क्षितिजकडे बोट दाखवत होते.

 

''कोर्लोस्कर साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एक लीगल हेड म्हणून काम करत असला तरीही भविष्यात क्षितीजच या कंपनीचा मालक असणार आहे. त्यामुळे शब्द वापरताना जपून वापरा.''  सावंतच्या चिडलेल्या मुद्रेमुळे मिटिंग हॉलमध्ये एकाएकी शांतता पसरली. 'भविष्यात तोच या कंपनीचा मालक असणार आहे.' या त्यांच्या वाक्याबरोबर त्यांनी अप्रत्यक्षपणे कंपनीच्या भविष्याचे भाकीत केले होते. आपल्या मुलाला कायम दुय्यम स्थान देणारे सावंत साहेब आज एवढे कर्तव्यदक्ष कसे काय झाले, हेच किर्लोस्करांना कळेना.

 

परिस्थिती संभाळण्यासाठी मुखर्जीं पुढे आले. ''सर काबुल है, त्यावेळी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आपला लीगलचा माणूस अनुपस्थित होता, वेळ टाळून नेण्यासाठी आपण त्या मुलीच्या हातात ते कागदपत्र दिले, पर बादमे वो कागजद बापास लेनेकी जिम्मेदारी हमारी थी.''

 

''त्यावेळी तुम्ही सुध्या चंदीगढमध्ये उपस्थित होतात ना. मग तुम्ही काय करत होता मुखर्जी?'' किर्लोस्कर एकाएकी मुखर्जींवर भडकले होते.

''सर वो..वो...''

मुखर्जी काही बोलण्याच्या आत किर्लोस्कर उठून दाराकडे निघाले. पाठमोरे वळून त्यांनी क्षितीज आणि मुखर्जी यांच्याकडे आळीपाळीने पाहत सांगितले. ''ती लिगल फाइल घेऊन येण्याची जबाबदारी तुमची, २४ तासाची मुदत देतो. नाही जमले तर माझी इथली पार्टनरशिप संपली म्हणून समाजा.''

कोणालाही काहीही बोलण्याची संधी न देता ते निघूनही गेले. ते पार्टनरशिप सोडणार म्हणजे कंपनीचे दिवाळे निघणार, या विचारानेच मुखर्जींना आतल्याआत गुदगुदल्या होत होत्या. आपला आनंद लपवत, तोंडावर वाईट हावभाव आणून त्यांनी कसेबसे त्यांनी क्षितिजला विचारले. '' अब क्या करे.''

  '’पुढे काय करायचे ते बघू.'’ असं म्हणून घाईघाईने क्षितीज आणि मिस्टर सावंत दोघेही मिटिंग रुममधून बाहेर पडले. मथिलीच्या अपघातामुळे क्षितिजीवर असलेला राग बाहेर काढण्यासाठी किर्लोस्करांना एक चान्स हवा होता. पण संपूर्ण मीटिंगमध्ये क्षितिज काहीही बोलला नव्हता. मिस्टर सावंत म्हणजेच त्याच्या पप्पानी तसे आधीच बजावले होते. त्यामुळे जास्त काही वादावादी न होता मिटिंग थोडक्यात संपली होती. पण फक्त २४ तासात ती फाइल पुन्हा मिळवणे, तेही भूमीचा कोणताही आता पत्ता  नसताना. कसे काय शक्य आहे?  याचा विचार करत क्षितीज आणि मिस्टर सावंत घरी परतले.  

 

*****

''आशाकाकू बैठक व्यवस्था झाली का? आणि प्रसादाच काय केलं?  भटजी बुवा एवढ्यात येतील शिरा आणि पंचामृताची तयारी करा. मोरेदादा पूजेसाठीच्या फुलांच्या करड्या व्यवस्थित जागेवर ठेवा, नाहीतर खराब होऊन जातील ती.''  सूचनांचा भडीमार लावत  मेघाताई आपली जांभळी पैठणी सावर जिना उतरत होत्या. मस्त मोकळे सोडलेले केस आणि त्यात उजवीकडे खोवलेले गुलाबाचं मोठंसं फुल नीटनेटकं करत त्यांनी पूजेची तयारी झाली का याची पाहणी करायला सुरुवात केली.

''मेघे आजतरी चांगले कपडे घालायचेस गं. तुझ्या वॊर्डरॉबमध्ये साडीशिवाय काही नाहीय वाटत.''  मस्त पायघोळ नारिंगी वनपीस त्यावर महागडं वुलनच ओपन जाकीट आणि गळ्यात छोटीशी फंकी सिल्वर चैन असा पेहेराव करून आज्जो खाली आल्या होत्या. त्यांचा असा अवतार बघून मेघाताईंना हसू आवरेना.

''काय तुझी फॅशन. आज पूजा आहे पूजा. पार्टी नाहीय. मम्मा अशाप्रसंगी साडी नेसावी.'' 

''तू नेस साडी, म्हाताऱ्या सारखी... मैं तो अभी जवा हू.'' आज्जो ई हसत-हसत सोफ्यावर येऊन बसल्या.

मिस्टर सावंत म्हणजेच क्षितिजचे बाबा थोडे चिंताग्रस्त दिसत होते. सारखे हॉलमध्ये फेऱ्या मारत होते.

''काही पत्ता लागला का त्या मुलीचा?’’  मेघाताईनी त्यांना विचारले.

''नाही.''

एक शब्दात उत्तर देऊन ते पुन्हा फेऱ्या मारायला लागले. एवढ्यात क्षितिज देखील जिन्यावरून खाली उत्तराला. बिस्कीट कलरचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर गोल्डन जरीचे नक्षीकाम विणलेले होते. अश्या पेहेरावात तो अजूनच हँडसम दिसत होता. त्याला पाहून मेघाताईंनी कॉम्प्लिमेंट दिली.  ''क्षितीज ड्रेस मस्त वाटतोय.''

''थँक्स.'' म्हणत तो ही आज्जोच्या बाजूला सोफ्यावर बसला.

 

''शेवटी संजय सावंतांचा सुपुत्र आहे. नुसताच मस्त नाही. जबरदस्त दिसतोय ह.'' म्हणत आज्जोने त्याला टाळी दिली.

''क्षितीज काय झालं? काही माहिती मिळाली का?'' पप्पा त्याच्याकडे बघत विचारत होते.

''पप्पा काही लोक पाठवलेत, तिच्या नावाव्यतिरिक्त आपल्याकडे काहीही माहिती नाही, त्यामुळे वेळ लागतोय, तरीही रात्री पर्यंत शोधतील ते.'' 

''हल्ली कोणीही भरवशाचे नाही. एका मुलीमुळे एवढा मोठा प्रॉब्लेम होईल वाटलं नव्हतं.'' आज्जो काळजीच्या सुरत म्हणाली.

'' माझंच चुकलं, अश्या मुलींपासून दूर राहिलेलं उत्तम. एकदा का ती मुलगी सापडली ना मग बघ.'' क्षितिज आता फारच चिडला होता.

''आपल्याकडे फक्त आजचाच दिवस आहे. नाहीतर किर्लोस्कर काय करतील याचा नेम नाही.''  सावंत पुन्हा डोक्याला हात लावून बसले.

''पैशासाठी त्या मुलीने हे सगळं केलं असेल का रे? की दुसऱ्या कोणीतरी म्हणजेच आपल्या शत्रूंपैकी कोणी तिच्याकडून ती फाइल मिळवली असेल. काही कळत नाही.'' मेघाताईसुद्धा चिंतेत होत्या.

''पैशाची गरज असती तर  तर तिने केव्हाच आपल्याला ब्लॅकमेल केलं असतं.'' मिस्टर सावंत काहीतरी विचार करत म्हणाले.

''मला सुद्धा असच वाटत. असो पाहुणे येतील एवढ्यात आणि भटजी देखील. सर्वांसमोर ती विषय नको. पूजा झाल्यावर बघूया काय ते. ''

म्हणत मेघाताई स्वयंपाकघराकडे निघाल्या.

'साठेकाका भडजींना घेऊन पोहोचले होते, निवडक पाहुणे आणि मित्रमंडळी जमा झाली. पूजेला सुरुवात झाली होती. खरतरं संपूर्ण सावंत कुटुंबीयांचं लक्ष फोनवरती लागलेल होतं. केव्हा एकादा फोन येतो, की ती मुलगी सापडली आणि ते महत्वाचे कागदपत्र हाती लागले. असं सर्वाना झालं होत.’

नक्षत्रांचे देणे ९



 'मी खोट सांगून मैत्रिणीच्या लग्नाला चंदिगढला गेले होते. त्याबद्दल मला माफ करा.' असे बोलून भूमीने नानांना शपथ दिली की पुन्हा कधीही असं खोट बोलणार नाही. परत अनाथ आणि पोरके होण्याची भीती मनात असलेली भूमी माई आणि नानांना सोडून राहण्याचा विचार देखील करू शकत नव्हती. नानांनी तर आपल्या सगळ्या इस्टेटीतून विभासाचे नाव काढून टाकले. परत विभासच्या तोंडही पाहणार नाही, असे मनाशी ठरवले. आपल्या मुलामुळे एका मुलीची फसवणूक झाली, या विचारानेच माई अस्वस्थ झाल्या होत्या. आला दिवस अपराधीपणाची भावना त्यांना आतल्याआत खात होती.

विभासला माफ करणे त्या दोघांनाही शक्य नव्हते. या सगळ्यामुळे भूमी तर आपल्याला सोडून जाणार नाही ना, या भीतीने त्यांनी भूमीला चंदिगढ वरून ताबडतोप बोलावून घेतले.  

*****


क्षितीज बरोबर असतानाच मैथिलीच्या अपघात झाला होता त्यामुळे क्षितीजवर मैथिलीच्या बाबांचा खूप राग होता. आपल्या मुलीच्या अश्या अवस्थेला ते क्षितिजला जबाबदार समजत होते.  हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या पोहोचल्या क्षितिज मैथिलीच्या वॊर्ड जवळ पोहोचला, तेथील नर्सने त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली नाही. 'कोणालाही आतमध्ये सोडू नये.' अशी कोर्लोस्कर म्हणजेच मैथिलीच्या बाबांनी सूचना केली होती.  बाहेर असणाऱ्या खिडकीच्या काचेमधून मैथिलीला बघताना त्याचे डोळे भरून आले. आता तिला पुन्हा कधीच बघता येणार नाही, असेच त्याला वाटत होते. सुदैवाने मेघाताई म्हणजेच क्षितिजच्या आई सकाळीच तिथे उपस्थित झाल्या असल्याने त्यांनी क्षितिजला संभाळले. मैथिलीच्या बाबांची सूचना आल्याशिवाय आता मैथिलीला कोणीही पाहायला जाऊ शकत नव्हते. त्यामुळे तसा बंदोबस्त करून डॉक्टर निघून गेले. काय करावं हे क्षितिजला कळेना, त्यातच लिगल कागदपत्रांची मूळ प्रत मिळत नाही म्हणून ऑफिस मधून मुखर्जींचे फोनवर फोन येत होते. कधी नाही ते आपलया पप्पांना  म्हणजेच मिस्टर सावंतांना फोन करून त्याने कंपनीची परिस्थिती सांभाळायला सांगितले. एरवी बाप-लेक एकमेकांचे तोंड बघताना मुश्कील असे. पण मेघाताईंनी मैथिलीची बातमी कानावर घालताच मिस्टर सावंतानी देखील मुखर्जींना फोन करून समजावले. 

*****


फार अवघड पेच होता क्षितिज समोर. दोन वर्ष एकाच जाग्यावर कोमातअसलेल्या मैथिलीची अचानक बिघडलेली तब्ब्येत, त्यातच लिगलचे कागदपत्र घेऊन अचानक गायब झालेली भूमी. ते कागद कुठेही लीक झाले तर कंपनीला फार मोठी बदनामी होऊ शकते, हे त्याला माहित होते. त्यामुळे  मुखर्जींचे त्यासाठी येणारे फोन, भूमीवर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासाला गेलेला तडा. त्यात भूमीला शोधणार तरी कुठे आणि कसे? आपण खूप मोठी चूक केली वाटत असे त्याला वाटत होते.  हा गुंता कसा सोडवावा हे त्यांला कळेना.

अशातच घरी आल्यावर आज्जो ग्रह शान्तीच्या पूजेसाठी करत असलेली तयारी बघून तर तो भांबावला. शांती आहे की लग्न हेच त्याला समजेना. आज्जोला समजावणे देखील कोणाच्याच हातात नव्हते. बाहेर काहीही होउदे, तिच्यावर कशाचाही परिणाम नाही. तिला पाहिजे तेच ती करणार.  त्यामुळे कोणीही तिकडे काहीही लक्ष दिले नाही. मेघाताई मात्र आपल्या मुलाला सावरण्यासाठी प्रयत्न करत होत्या. क्षितिजच्या बाबांची लागेल तशी मदत घेऊन त्यांनी कंपनीच्या व्यापापासून क्षितिजला थोडे दिवस दूर ठेवलं होत.

*****

आज सावंतांच्या घरी गृहशांतीच्या पूजेसाठी जोरदार तयारी चालू होती. उद्याचा पूजेचा मुहूर्त होता. आज्जो आपल्या मेकअप आणि साडीची तपासणी करण्यात गुंतलेली होती. फुलांचा माळा, दिवे, नैवेद्यासाठी लागणारे साहित्य आणि येणार्यां पाहुण्यांसाठी लागणारे साहित्य वगैरे जमा झाले का ते मेघाताई स्वतः चेक करत होत्या. ग्रहशांती असली तरीही त्या निमित्ताने सत्यनारायणाची पूजा होणार होती. एवढ्या वर्षांनी सावंतांच्या घरात पूजा म्हणजे मोठी जय्यत तयारी...  त्यामुळे निवडक लोंकांना फोन करून बोलावले गेले होते. क्षितिजचे मन कशातही लागेना. तरीही येऊन जाऊन जमेल तशी मदत तो करत होता. आशाकाकू आणि मोरे यांना हाताशी धरून मेघाताई डेकोरेशन वगैरेंकडे लक्ष देत होत्या. एवढ्यात मिस्टर सावंत जिन्यावरून घाईघाईने खाली उतरले.

'' क्षितीज. लवकर निघ, ऑफिसमध्ये जायचं आहे.''

 

त्यांना असे बघून क्षितीज थोडा गडबडलाच. '' काय झालं पप्पा?''

 

''कंपनीच्या शेअर होल्डर्स बरोबर तातडीची मिटिंग आहे. आणि कोर्लोस्कर सुद्धा येतायत.''  बॅग उचलून त्यामध्ये लागणाऱ्या फाइल्स ठेवत ते निघाले सुद्धा.

 

''मिटिंग कश्याबद्दल? आणि एवढ्या अचानक.''  क्षितिज देखील मोबाइल हातात घेत तसाच निघाला.

 

''बस गाडीत... सांगतो.'' म्हणत दोघेही घराबाहेर पडले.

 

त्यांच्या मागे घरातील नोकर-चाकर आणि खुद्द मेघाताई सुद्धा अचंबित होऊन डोळे इस्फारून पाहू लागल्या.

''एकमेकांशी कधीही नपटवून घेणारे बाप-लेक आज अचानक एकत्र ऑफिसला जात आहेत. काय जादू म्हणायची.?''  आज्जो शेवटी बोललीच.

 

'' तेच म्हणते ग आई. घडणाऱ्या बऱ्यावाईट  प्रसंगांमधून शिकतायत वाटत दोघेही. अश्या प्रसंगी आपली माणसाचं आपली साथ देतात. हे समजलं आहे त्यांना, त्यामुळेच एकमेकांशी पटवून घेत आहेत.'' मेघाताई देखील दाराकडे पाहून कुजबुजला.

''देव करो आणि या बाप लोकांचं नातं पूर्वीसारखं होवो.''  आज्जो देवाला हात जोडत बोलत म्हणाली.

 

''त्या मैथिलीमुळे या दोघांमध्ये दरी निर्माण झाली आहे. नाहीतर...'' मेघाताईंपुढे बोलणारच एवढ्यात आज्जोने हातानेच इशारा केला.

 

''पुरे. मेघे तू परत त्याच विषयावर येऊ नको ग. उद्या पूजा आहे, तयारीच बघ.''  त्यांच्या हो ला हो देऊन मेघाताई देखील बेडरूमकडे वळल्या.

*****

'S K (सावंत अँड कोर्लोस्कर) ग्रुप ऑफ कंपनीजच्या भव्य हॉल मध्ये मधोमध मोस्टर सावंत आणि क्षितिज दोघे बसले होते. बाजूच्या खुर्चीवर कोर्लोस्कर आणि त्यांचा पीए हे दोघे देखील बसले. समोर बसलेल्या कंपनीचे शेअर होल्डर्स आणि महत्वाचे अधिकारी यांच्यामध्ये आपापसात कुजबूज सुरु होती. महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते आणि नवीन प्रोजेक्ट्सचे डील फायनल करण्यात आले. मिटिंग जवळपास संपायला आली होती. आपापले डाउट्स सॉल्व्हड करून एकेक मेम्बर मिटिंग रूमबाहेर पडू लागला. शेवटी किर्लोस्कर, सावंत आणि क्षितीज हे तिघेच तिथे उपस्थित राहिले. आणि एवढ्या वेळ अनुपस्थित असलेले मुखर्जी बाहेरून  नॉक करून आत आले. लिगलच्या फाइल्स गायब असल्याची गोष्ट किर्लोस्करांना कानावर घालण्याची आयतीच संधी मिळाली होती. त्या गाडी अपघातामुळे किर्लोस्कर आणि सावंत यांचे संबंध बिघडलेले आहेत.  हे देखील त्यांना माहित होते, आगीत तेल ओतण्याची त्यांची जुनी सवय. सर्वांसमोर  मिस्टर सावंत आणि क्षितीज यांची फजिती बघण्याचा मोह त्यांना आवरेना. त्यांनी फाइल गायब असल्याची गोष्ट सर्वांसमोर उघड केली. आणि सगळ्यांचे चेहेरे पाहण्यासारखे झाले होते.'

नक्षत्रांचे देणे ८



 'एक मारुती भरधाव वेगात निघाली होती. मागोमाग एक काळी ह्युंदाई कार तिचा पाठलाग करत होती.  पाठलाग जवळजवळ संपणारच होता एवढ्यात भरधाव वेगाने दुरून येणाऱ्या लाल-निळ्या ट्रकने मारुतीला खोल दरीत उडवून लावले.  तो आपली ह्युंदाई जागीच थांबवून विद्युत वेगाने धावत सुटला, तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत  फार उशीर झाला होता.  कारमधून बाहेर रस्त्यावर फेकली गेलेली ती मात्र रक्ताच्या धारोळयात गतप्राण झाली होती. त्याही अवस्थेत तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलून तो गदागदा हलवू लागला होता. मैथिली, मैथिली ... मैथिली डोळे उघड प्लिज.'


अंगातील शर्ट पूर्णपणे घामाने भिजला होता. बाजूला असणाऱ्या फोनची रिंग वाजली आणि क्षितिज शुद्धीवर आला. तसाच फोन कानाला लावत त्याने, आजूबाजूला लक्ष दिले.

''हैलो किर्लोकार बोलतोय. मैथिलीची तब्ब्येत अचानक बिघडली आहे, ताबडतोब मुंबईला निघून ये.''

मैथिलीच्या बाबा आणि S. K. ग्रुप ऑफ कंपनीज चे पार्टनर किर्लोस्कर यांनी उत्तराची वाट न बघता पलीकडून रागारागाने फोन ठेवला होता.

तोपर्यंत क्षितिजच्या लक्षात आले होते, की मगाशी आपण स्वप्नात होतो. बेडवरुन उठून त्याने हॉटेल रूमच्या खिडकीचा पडदा दूर केला. घड्याळात रात्रीचे तीन वाजले होते. कपाळावर जमा झालेला घाम पुसत तो तयारीला लागला. सकाळच्या सहाच्या पहिल्या फ्लाईटने मुंबई गाठायची. इमर्जन्सी बुकिंग करण्याचा मेसेज  स्टाफला पाठवून तो बाथरूमच्या दिशेने निघाला.

*****

 

हॉस्पिटल मध्ये मैथिलीची तब्ब्येत फारच बिघडली होती. इमर्जन्सी वॊर्डमध्ये तिला दाखल करण्यात आले आणि तातडीची ट्रीटमेंट सुरु झाली. खरंतर सारं आहे-नाही मध्ये जमा झालं होत. फक्त एक वेडी आशा होती. तिने जगावं म्हणून, त्या आशेवरच मिस्टर अँड मिसेस किरलोस्कर रात्रभर हॉस्पिटल बाहेर डोळे लावून उभे होते. एवढी वर्षे फक्त तिच्या जगण्याची आस लावून बसलेले ते आईबाबा आतून मात्र आपल्या लेकीच्या भयंकर आकस्मित अपघाताने पार नाउमेद झाले होते.

 

*****

 

'भूमीला सांगून निघावे म्हणून क्षितिज तिच्या रूमकडे निघाला. खरंतर एवढ्या पहाटे तिला उठवावे हे त्याला पटत नव्हते. पण न सांगता तरी कसे जाणार? कंपनीच्या लीगल कागद्परांची ओरिजनल फाइल तिच्याकडे होती. ती सोबत घेणे गरजेचे होते, म्हणून त्याने बेल वाजवली. पलीकडून दरवाजा उघडला होता, पण भूमी आणि निधी तिथून एक तास आधीच चेक आऊट करून गेली होती. असे आतल्या वेटर्सने सांगितले. क्षितिजचा विश्वास बसेना. अशी अचानक का गेली? आधीच मैथिली सिरिअस असल्याची बातमी आणि आता भूमीचे असे न सांगता जाणे, त्याला काही पटले नाही. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तो एअरपोर्ट कडे निघाला. निघताना फोन लावून त्याने मेघाताई म्हणजेच आपल्या आईला फोन लावला.'

'' बोल क्षितिज. एवढ्या पहाटे फोन? ऑल ओक ना?'' झोपेतून उठून त्यांनी फोन घेतला असला तरीही त्यांच्या आवाजात काळजी जाणवत होती.

 

''आई कोर्लोस्कर अंकलचा फोन होता. मैथिलीची तब्ब्येत बिघडली आहे. शी इज सिरिअस.'' त्याने पटकन गोष्ट त्यांच्या कानावर घातली.

 

''ओह, मी निघते आणि हॉस्पिटलमध्ये जाते. तू निघ आधी तिथून. लवकरात लवकर मुंबई गाठ.''  मेघाताईंनी बेडवरुन उठत उठत हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी सुरु केली.

 

''मी निघालो, दुपारी पोहोचतो. तू आत्ताच निघ. प्लिज.'' टॅक्सी गाठून तो एरपोर्टकडे रवाना झाला.

 

'' हो निघते. बाय. नंतर फोन करते.'' म्हणत फोन ठेवून त्या गडबडीने तयार होऊ लागल्या होत्या.

 

*****

'रात्रीच निघाल्याने भूमी घरी पोहोचली सुध्या होती. निधीला तिच्या घरी ड्रॉप करून भूमी आपल्या घरी आली. माईंची तब्येत कशी काय बिघडली आणि अचानक? हेच तिला कळेना. गावावरून फोन येताच, तातडीने भूमी चंदिगढ वरून निघाली होती. 'क्षितिजला आपण सांगायला हवं होत. पण एवढ्या रात्री कसं  सांगणार? तरीही त्याच्या रूमची बेल वाजवली होती आपण पण त्याने दरवाजा उघडलेच नाही. तेव्हा तो कदाचित झोपेत असावा.' तो स्वतःच्याच विचारात असताना समोर माई आणि नाना उभे असलेले तिने पहिले. तिच्याच प्रतीक्षेत होते ते दोघे. तिने सरळ जाऊन माईना मिठी मारली आणि नानांच्या पाय पडून ती त्या दोघांच्या बरोबर घरात आली. खरतर माई अगदी व्यवस्थित दिसत होत्या आणि नाना देखील. काहीतरी नक्कीच गडबड आहे हे तिने ओळखले होते. त्याशिवाय एवढ्या तातडीने तिला बोलावून घेतला होत. थोडं फ्रेश होऊन ती हॉलमध्ये आली.  नाना तिचीच वाट बघत बसले होते. न राहवून तिने विचारले.

'' माई काय होतंय तुम्हाला? आता कशी आहे तब्येत?'' .

माईंना काय बोलावे ते कळेना. त्या अगदी ठणठणीत होत्या हे दिसताच होते.  ''मी बरी आहे.'' एवढंच त्या बोलल्या.

 

'' ती अगदी बारी आहे गं. पण तुझं काय? तू आणि विभास एवढे दिवस काय लपवत आहात आमच्या पासून?'' नानांनी अगदी विषयाला हात घातला होता.

 

अचानक नानांनी विचारलेल्या प्रश्नाने भांबावलेल्या भूमीला काय बोलावे कळेना.  ''कुठे काय नाना. काही तर नाही.''  एवढेच बोलून तिने मन खाली घातली.

 

''आपल्या बाजूचा समीर कालच आला आहे लंडनवरून. विभासच्या बरोबर काम करतो तो. त्याने सार काही सांगितलं आहे आम्हाला.''   नाना तिच्या शेजारी  बसत म्हणाले.

 

''होय गं, खरं आहे का हे? आणि तुझी यात काय चूक म्हणा.'' माई तिला समजावत बोलत होत्या. 

 

''हे बघ तू आम्हाला आमच्या मुलासारखी आहेस. तुझी तरी यात काहीही चूक नाही हे आम्हाला माहित आहे, त्यामुळे  सारं काही खरंखरं सांग.''

माई आणि नानांचे बोलणे ऐकल्यावर भूमीने ओळखलं की याना समीरकडून सार काही समजलं आहे. आपण तरी का लपवून ठेवायचं. तिने देखील झाली घटना आणि त्यामुळे तिच्या आयुष्याची झालेली फसवणूक त्यांना सांगून टाकली.

'लंडनमध्ये असताना विभासने तेथील एक मुलीबरोबर गुपचूप लग्न केले होते. माई-नाना त्याला विरोध करतील या भीतीने त्यांना देखील त्याने काहीही कळू दिले नाही. एवढेच नाही तर दोन-तीन वर्षांपूर्वी इथे आल्यावर माई-नानांनी ठरवलेली मुलगी म्हणजेच भूमी तिच्याशी देखील लग्न करून तो सरळ लंडनला निघून गेला. इथे आईबाबांना सांभाळण्याचा प्रश्न आपोआप सुटणार होता. त्यामुळे त्याने भूमीची फसगत करताना मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही. वैदिक पद्धतीने लग्न झाले, त्याच दिवशी भूमीला त्याच्या पहिल्या लग्नाची गोष्ट समजली होती. माई त्यावेळी आपल्या दम्याच्या आजारावर ओषधोपचार घेत होत्या त्यामुळे नाना आणि माईंना काहीही न सांगता भूमीने शांत राहण्याचा निर्णय घेतला. आईच्या मागे अनाथाश्रमात वाढलेल्या भूमीवर माईंचा फार जीव होता. लग्न ठरल्यापासूनच त्या तिची मुलीप्रमाणे काळजी घेत होत्या. अनाथ असलेली भूमी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून त्या घरी घेऊन आल्या. त्यामुळे आईबाबांचे अर्धवट राहिलेले  प्रेम भूमीला इथे मिळाले होते. विभासच्या फसवणुकीपेक्षा ते कितीतरी पटीने मोठे होते. त्यामुळे  खरी गोष्ट सांगून त्या मायेला आणि आपुलकीला मुकण्यापेक्षा भूमीने थोडं शांत राहून, उचित वेळेची वाट बघण्याचे ठरवले.'

नक्षत्रांचे देणे ७



 'लग्नामध्ये विशेष कोणी ओळखीचे नसल्याने क्षितिजला भूमीची सोबत मिळाली. भूमीला मात्र इथे बहुतांशी लोक ओळखतात हे क्षितिजच्या लक्षात आले होते. नवरीची ती बेस्ट फ्रेंड होती त्यामुळे वधूपक्षातील इतरही घराचे लोक तिला ओळखत होते. तिची निधी ही एक महाराष्ट्रीयन फ्रेंड लग्नासाठी आली होती. त्यामुळे क्षितिजच्या तिच्याशी देखील गप्पा रंगल्या. बऱ्याच गोष्टी ज्या माहित नव्हत्या त्या माहित झाल्या. आपण का एवढे उत्सुक असतो तिच्या बद्दल जाणून घायला? हेच त्याला समजत नव्हते. तिच्या नकळत तो तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. लग्नाच्या गडबडीत वेदांतचा फोन येऊन गेला होता. त्याने भूमीला कंपनीत साइन करण्यासाठी प्रपोजल पाठवले होते. त्यावर काय रिप्लाय द्यावा या विचारात क्षितिज रूममध्ये आला, कारण भूमीशी या बाबतीत काहीही डिस्कशन झालेले नव्हते. आणि ती आता जॉब करण्यात इंटरेस्टेड नाही, हे देखील क्षितिजला माहित होते. आज तिच्याशी बोलून काय ते फायनल करावे, असे त्याने ठरवले.'

*****


वेदांत आणि मुखर्जींचे फोन संभाषण चालू होते. आपल्या कंपनीसाठी भूमी ही अगदी योग्य legal counsellor आहे. खरंतर ती केस कंपनीच्या आगेन्स होती. आणि कंपनीच्या काही कामगारांची त्यामध्ये चुक होती. अश्याही परिस्थितीत अर्ध्या तासात ती केस मीटिंगमध्ये क्लिअर झाली. आधीची काहीही पार्श्वभूमी माहित नसताना हे भूमीने कसे काय शक्य करुण दाखवले याचेच मुखर्जींना नवल वाटत होते.
'' सर, भूमी यांना आपण काहीही करून साइन करूया. आपल्याला अश्या सल्लागाराची खरोखर गरज आहे आणि क्षितीजवर थोडं प्रेशर टाकलं तर हे अशक्य नाही.'' पलीकडून वेदांत बोलत होता.

''येस वेदांत. तपासणीमध्ये जर आपल्या कंपनीचा तो घोटाळा उघडकीस आला तर आपण दोघे आधी पकडले जाऊ. डू समथिंग.'' मुखर्जी काळजीच्या स्वरात बोलत होते.

''सर तो तर केव्हाच उघडकीस आला असता. मैथिली मॅडम counsellor होत्या तेव्हाच, पण आपण तसे होऊ दिले नाही. यावेळी देखील काहीतरी करू.'' वेदांत

''मैथिली कूछ अलगही अटीट्युड वाली लाडकी थी. अगर उसको इस बात का पता नहीं चलता, तो आज मैं इस कंपनीका हेड होता.'' मुखर्जी रागारागात बोलत होते.

''जाऊदे ना सर. आपण वेळेत तिला बाजूला केलं, त्यामुळे ती तो घोटाळा उघडकीस आणू शकली नाही. पण आता क्षितिजचे हात तिथपर्यंत पोहोचले आहेत. सो बी अलर्ट.''

''येस, म्हणूनच सांगतोय. आपली खोटी केस जर खरी होऊ शकते, वर निर्दोष सुटून एक नवीन टेंडर आपल्याला मिळत आहे. उसको कंपनी की कोई हिस्ट्री मालूम नही हैं. उपरासे इस मामलेने एकदम न्यू है. तो उस भूमी मॅडम को कंपनीमें लाना पडेगा.'' मुखर्जी एकदम शुअर होऊन बोलत होते.

''आपला कंपनीचा घोटाळा लक्षात आल्यावर आपले आधीचे आर्थिक सल्लागार सुध्या राजीनामा देऊन निघून जाता आहेत, वर नवीन माणूस टाकताना मुश्किल, त्यामुळे खूप दिवस हे टेंडर अडकून पडले आहे. अश्या परिस्थितीत आपल्याला भूमी मॅडम तारक ठरतील. सर अजून एक, क्षितिज सुध्या भूमींना जास्त ओळखत नाही. त्यांची ओळख वाढण्याआधी आपण भूमींना इकडे अडकून घेऊ. एकदा का तो बॉण्ड साइन झाला की, त्यांना आपल्या म्हणण्याप्रमाणे काम करावे लागेल.'' वेदांत बोलत होता.

''दिल कि बात बोली तुने. इस बार कोई गलती नही. पहेले वो बॉण्ड साइन कर के लेंगे.'' आपले मोडकेतोडके मराठी आणि इंग्लिश-हिंदीला एकत्र करत मुखर्जी खुश होऊन टाळी वाजवत खुर्चीवरून उठले.

''येस सर. एकदा का सगळे लीगल मामले मिटले, की मग पाहिजे ते टेंडर खिशात घालू. S. K. ग्रुप ऑफ कंपनीज ची दाणादाण करूनच इथून निघायचं.''

''दिल की बात... कॅरी ऑन बॉय. काही लागले तर मी आहेच.''

नेहमीप्रमाणे खुश होत मुखर्जींनी फोन ठेवला आणि वेदांतने किर्लोस्करांना फोन लावण्यासाठी नंबर डायल केला. क्षितिजच्या तोंडावर स्तुती करणारा वेदांत मागे मात्र त्याच्या आणि कंपनीच्या विरोधी कारस्थानात माहीर होता. साथीला मुखर्जी साहेब होतेच. कंपनीचे अधिकारी असली तरीही कंपनीच्या वाईटात त्यांचा सिहांचा वाटा. चार-पाच वर्षांपासून अडकलेली टेंडर आणि मोठमोठी बिसनेस डील आतल्या आत गायब करून नफा कमवायचा, हा त्यांचा वर्षानुवर्षे चालत आलेला कारभार होता. बुडत्याला काठीचा आधार तसे भूमीचा आधार घेऊन त्यांनी आपापले लीगलचे घोटाळे क्लीअर करण्याचे ठरविले. पण भूमीला दुर्बल समजण्याची चूक किती महागात जाणार हे त्यांना माहित नव्हते.
*********

सावंतांच्या घरी साठे काका आले होते. मेघाताई आणि आज्जो क्षितिजची पत्रिका पाहून झाल्यावर चिंताग्रस्त झाल्या. 'काळयोगाची शांती करण्याची गरज आहे, एक पूजा करून घ्या.'असे सांगून काका निघून गेले. आज्जोला हे काळयोग, पत्रिका आणि ज्योतिषचे प्रकार काही मान्य नसले तरीही एवढ्या दिवसांनी घरात कार्यक्रम होणार या गोष्टीचा मात्र त्यांना आनंद झाला होता. तेवढीच नटण्याची संधी म्हणून त्या तयारीला लागल्या. मेघाताईंनी क्षितिजच्या पप्पांना फोन करून कळवले. क्षितीज आल्यावर काळयोग शांती आणि पूजा करून घेऊ, असा विचार करून त्या देखील तयारीला लागल्या.

'सकाळी भूमीला भेटण्याचे ठरवून क्षितीज ऑफिसच्या कामाची तयारी करू लागला. खरंतर अर्धवट लग्न सोडून आल्याने त्याला वाईट वाटत होते. पण त्या लग्नात त्याचे मन लागेना, आपल्याला मैथिलीच्या सुद्धा विसर पडला होता आणि भूमीकडे वाढणारी ओढ या पेचात अडकल्याने, लग्न अर्धवट सोडून तो रूममध्ये जाऊन ऑफिसच्या कामाला लागला. रुग्णालयात फोन लावून चोकशी करून झाल्यावर तो थोडा निर्धास्त झाला. एवढे दिवस मैथिलीची विचारपूस नाही. किंबहुना आपल्याला तिची आठवण सुद्धा कशी झाली नाही? याचेच त्याला नवल वाटत होते.

निधी आणि भूमी लग्नानंतर रुमवरती परतल्या. क्षितीजवरून त्यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. एकंदरीत लग्नामध्ये क्षितिजचे वागणे बोलणे आणि नकळत भूमीला शोधणारी त्याची नजर, हे पाहून निधीने त्याच्या मनातील भूमीविषयीचे भाव ओळखले होते. भूमीच्या आधीच्या खोट्या लग्नाचे सत्य माहित असूनही क्षितिज सारखा कोणी आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात यावा असे तिला वाटत होते. शेवटी न राहवून तिने भूमीला विचारले.
''भूमी जर तुझ्या मनातल्या राजकुमाराप्रमाणे एखादा प्रेमळ मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार असेल तर?''

'' मस्करी पुरे, आणि खर प्रेम वगैरे काही नसत ग. मुळात आता लग्न आणि संसार या गोष्टीची चीड येते मला. प्रेम वगैरे तर स्वप्नातही नको. झाली तेवढी फसवणूक पुरे.'' म्हणत निधीचे वाक्य अर्धवट तोडत भूमी तिच्यावरती रागावली.

''एखादा विश्वासघात झाला म्हणून तू संपूर्ण आयुष्य एकटीने जगायच असं ठरवलं आहेस का?'' निधी तिला समजावत होती. पण ऐकेल ती भूमी कुठली.

''या पुढे हा विषय नको. तू फ्रेश हो, मग बाहेर जेवायला जाऊया.'' असं सांगून ती फ्रेश व्हायला निघून गेली.

कस होणार आपल्या जिवलग मैत्रिणीचं, या विचारात निधी देखील आवरायला लागली.

नक्षत्रांचे देणे ६

 


‘कायदा वगैरे सोडून अगदी दोन वर्ष उलटली होती. स्वतःला न्याय मिळवून न देऊ शकलेली भूमी... कायदा आणि न्याय या गोष्टी जवळजवळ विसरून बसली होती. क्षिजीतला मदत करायची म्हणून का असेना तिला पुन्हा एकदा आर्टिकल्स आणि सेक्शन पाहावे लागणार होते. विभासकडून फसवणूक झाल्यावर भूमीने काम वैगरे सगळं सोडलं होतं. माई-नाना यांची देखभाल करणे यापलिकडे तिला काही करावंस वाटेना, त्यांना विभास बद्दल सार काही खरं सांगावं असं तिला नेहमी वाटे,पण त्यांना सोडून या जगात तिचं असं दुसरं कोणीही नाही. त्यांनी एवढं प्रेम तिला दिला होत. कि त्यांना गमावण्याच्या भीतीपोटी आहे ती परिस्थिती सांभाळून आला दिवस जगायचं, एवढंच तिने ठरवलं होत.’


'चला चार दिवस बाहेर आहोत, नंतर पुन्हा जैसे थे. सो ना ओळख ना नातं तरीही त्या मुलाने मदत केली. आपल्या उपकाराची परतफेड म्हणून करावी क्षितिजला मदत.' असे म्हणत ती हातातील पेपर्स चाळायला लागली.


''अगदी फॉर्मल ट्राऊजर आणि व्हाईट शर्ट मधली भूमी आज अगदी जबरदस्त दिसत होती. मीटिंगवर तर तिने आपली पकड कायम ठेवलीच, पण संपूर्ण मिटिंगमध्ये क्षितीज तिच्याकडेच बघत होता. ऍक्सिडंट झाला तेव्हाची ती व्हाईट अम्ब्रेला ड्रेस मधली भूमी आणि आज चक्क फॉर्मल… तशी तिची छबी कोणाच्या मनाचा ठाव घेईल अशीच होती. पण तिच्याकडे असलेले कायद्याचे ज्ञान देखील अचंबित करणारे होते. रात्रभर केसचा चांगलाच अभ्यास केला आहे, हे क्षितिजने ओळखले. मिटिंग सक्सेसजुल झालीच, आणि नवीन प्रेसेस सेट करण्याची जबाबदारी क्षितिजचा कंपनीवर आली होती. त्यामुळे कंपनीला चांगल प्रॉफिट मिळणार होतं. भूमीला ऐनवेळेस legal counsellor म्हणून उभं केलं म्हणून नाराज असणारे कंपनीचे मोठे अधिकारी मिस्टर मुखर्जी देखील आता क्षितिज आणि भूमीच कौतुक करत होते.
सगळ्यांनी येऊन दोघांचेही अभिनंदन केले. आणि भूमीचे आभारही मानले. क्षितीजने केलेल्या उपकाराची अंशतः परतफेड झाली होती, त्यामुळे भूमीला देखील बरं वाटतं.

क्षिजीतला बाजूला घेऊन मुखर्जी काहीतरी कुजबुजले आणि निघून गेले. सगळं आवरल्या नंतर क्षितिज भूमीला भेटला आणि म्हणाला. ''थँक्स. ''

----------------------
'योगायोग म्हणावा की काय? मैथिलीच्या ऍक्सिडेंट जिथे झाला त्याच ठिकाणी भूमीचा ऍक्सिडेंट झाला होता. विशेष म्हणजे दोघींचाही व्यवसाय एकाच as a legal counsellor, मैथिली बरोबर शेवटचा प्रवास शेवटची भेट म्हणा आणि त्याच ठिकाणी भूमी बरोबर झालेली पहिली भेट... क्षितीज च्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊन गेली होती.ना काळात का होईना, पण आपण भूमीकडे ओढले जातोय आणि तिच्याबरोबर जास्त वेळ घालवायला आपल्याला आवडत हे क्षितिजला देखील लक्षात आलं होत. नाहीतर अश्या परक्या मुलीशी एका भेटीत जवळीक निर्माण होणं, अशक्य गोष्ट होती.'

'क्षितिज आपल्या विचारात असताना, दोन वेळा वेदांत चा फोन येऊन गेला होता. क्षितिजचा जिवलग मित्र. मार्केटिंग टीमच्या वतीने तो देखील मिटींगच्या वेळेस उपस्थित होता. भूमीच्या टॅलेंटची त्यानेही दखल घेती होती. 'लीगल टीमच्या सेकेंड सल्ल्यागर पदी भूमीची नेमणूक करावी अशी चर्चा कंपमानीचे हेड करत होते. आणि भूमीला कन्व्हेन्स करवे,' असे क्षितिजला कळवण्यासाठी वेदांतने फोन केला होता. थोडाफार प्रॅक्टिकली विचार करून क्षितीज भूमीला भेटायला आला पण तिच्या रूमला लॉक होते. ती लास्ट फ्लोअरला लग्नाला गेली असणार, मिटिंगमुळे आधीच उशीर झाला होता. त्यामुळे क्षितीज पुन्हा आपल्या रूमकडे निघाला.'
---------------------------

' वेलवेट ब्ल्यू रंगाच्या बारीक फुलांची नक्षी असलेल्या मॉटिकलरच्या हेवी कुर्त्या-पायजमा, हातात एक ब्रँडेड घड्याळ अश्या डिसेंट लूक मध्ये क्षितिजने हॉलमध्ये एंट्री केली. भूमीकडे प्रेझेंट पाकीट द्यायचे राहून गेल्याने त्याला स्वतःलाच लग्नाला यावे लागले होते.

हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावर धुमधाम चालू होती. जागोजागी फुलांची आरास, रंगीबेरंगी तोरणे, महागडे झुंबर, डेकोरेटिव्ह स्टेज, रांगोळ्या अशी सुरेख सजावट केली गेली होती. रात्रीच्या अंधारातही झगमगणारे असे वातावरण, आणि सुमधुर संगीत याने प्रसन्न झाले होते. नटूनथटून आलेल्या स्त्रिया-पुरुष, लहान मुलं, उगाचच तसेच इकडे-तिकडे ठुमकणाऱ्या सुंदर मुली आणि त्यांच्या मागून फिरणारी तरुण मूल असा सगळं लवाजमा जमलेला दिसत होता. मेहेंदी, हळदी सगळं आटोपलं होतं आता फेरे झाले की काही महत्वाचे विधी मग लग्न सोहळा संपन्न होणार होता. 'निल आणि क्षितीज शाळेत एकत्र होते, नातलग असल्याने घरची ओळख होती. पण निल अतिशय वाह्यात मुलगा त्यामुळे त्याचा गृप वेगळा होता आणि हुशार पण दंगेखोर म्हणून असलेल्या क्षितिजचा गृप वेगळा होता.  आजोचा आदेश त्यामुळे आपण इथे आलोय. बास त्यामुळे तो आपल्याला ओळखतो की नाही, याच्याशी लक्षितिजला काही देणे घेणे नव्हते.  स्टेजच्या अगदी समोर एक रंगीत आसनावर बसत त्याने चौफेर नजर फिरवली. हजार एक लोकांचा लवाजमा असणाऱ्या प्रशस्त मग्न मंडपातही आपल्याला एकटं वाटावं याचंच त्याला नवल वाटत होतं. एकटाच बसलेला होता, त्यात आजीबाजूने जाणाऱ्या काही सुंदर मुली त्याच्याकडे वळून वळून पाहत कुजबुजत होत्या, हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. तो होताच मुळात हँडसम.

एवढ्या झगमगाटातही क्षितिजची नजर आपसूकच भूमीचा ठाव घेत होती. कदाचित इथे कोणी ओळखत नसल्याने, किंवा अजून काहीतरी कारण असावे...

एकदा लग्न लागलं की मग पाकीट देऊन इथून निघायचं, याचीच वाट बघत तो बसला होता. अचानक थोडी शांतात पसरली सभागृहाच्या एका टोकाकडून सजलेल्या नवरीची एंट्री झाली होती. आजूबाजूला असणाऱ्या करवल्या आणि नातेवाईक मंडळीनी फुलांची चादर तिच्या डोक्यावरून ओढून घेतली होती. सगळे पंजाबी रीतिरिवाज त्यात काय चाललंय हे बघण्यात क्षितिजच लक्ष नव्हतं. सभागृहाच्या एका दुसऱ्या साईडने नवरदेवही हजर झाले होते.

थोड्यावेळात त्यांच्या विधींना सुरुवात झाली. तसे वर-वधूच्या आजू-बाजूने जमलेले बहुतांश लोक स्टेजवरून खाली उतरले. मिनिटात क्षितिजची नजर समोर स्थिरावली. वधूच्या बाजूला फुलांचा एक मोठा गुच्छ घेऊन भूमी उभी होती. हलक्या निळसर नेटच्या लेहेंग्यावर बारीक फुलांची लालसर डिझाइन असलेले ब्लाउज आणि वरून दोन्ही खांद्यावरून सरळ खाली ओघळणारी निळ्यालाल फुलांची नेटची ओढणी तिच्या गोऱ्या रंगला अगदी शोभेल असाच पेहेराव. तसेच मॅटचिंग स्टोन्सचे मोठे कानातले आणि त्याभोवती फेर धरणे तिचे सिल्की केस अगदी तिच्या कानाभोवती घुटमळत होते जणू. त्यांना सावरत तिने समोर पहिले, समोर तिच्या नजरेच्या टप्प्यातच क्षितिज बसला होता. आश्चर्याने क्षितिजकडे बघत तिने हलकेच लांबून स्माईल केली. तो अजूनही तिच्या त्या मोठ्या पाणीदार डोळ्यात बघतच राहिला होता. त्याला ते जाणवलं असावं, हलकेच हात वरून करून त्याने भूमीला हाय केले. त्याच्या मनातून कुठूनतरी शब्द येत होते, 'सावर स्वतःला, असा कोठेही घसरण्यातले आपण नाही. ' पण हृदय ऐकायला तयार नव्हते. त्याला समजावे पर्यंत भूमी स्टेजवरून उतरून खाली त्याच्याबाजूला येऊन उभी राहिली होती. खरतरं हॉलमधली बहुतेक तरुण तरुणी त्यांच्याकडे डोळे लावून होती, हे क्षितिजच्या लक्षात आले होते, आत्तापर्यंत स्वतःकडे पाहणाऱ्या मुलींकडे त्याने दुर्लक्ष केले, पण काही पंजाबी मूलं भूमीकडे टक लावून बघत आहेत, हे त्याला फारसे रुचले नव्हते.


"तुम्ही कसे काय इथे? आय मिन यायला जमणार नाही म्हणालात ला?"
भूमीने त्याच्याकडे बघत विचारले.


'' होय, तुम्हाला प्रेसंट पाकीट द्यायला आलो होतो. रूमला लॉक दिसले, मग मलाच यावं लागलं.'' जणू आपण पुढे सुरु असणारे लग्न पाहतोय असे दाखवत. क्षितीज तिच्याकडे न पाहताच म्हणा.


''नाइस ड्रेसअप हा.'' भूमी

'' थँक्स. जस्ट जवळच्या मार्केट मधून जाऊन घेऊन आलो. नाहीतर ऑफिस च्या कोट वर इथे यावं लागलं असत.'' क्षितीज

'' आणि मला मीटिंगला आल्यासारखं फील आलं असतं.'' तिच्या या वाक्यावर दोघेही खळखळून हसले.

नक्षत्रांचे देणे- ५



 'निघण्यासाठी तर तो उठला, पण पाय जागीच थिजले होते. काय करावं त्याला कळेना. रूमच्या चाव्या टीपॉय वर ठेवून तो निघाला, तेवढ्यात फोनची रिंग वाजली. त्याच्या आईचा फोन होता. या सगळ्या गडबडीत खूप वेळा रिंग वाजून गेली होती. ती काळजी करत बसली असेल, हे त्याच्या लक्षात आले. त्याने फोन कानाला लावला. पलीकडून मेघाताईंचा चिंताग्रस्त आवाज येत होता. क्षितिजने घडलेली घटना थोडक्यात सांगितली. तो ठीक आहे आणि ती मुलगी देखील ठीक आहे, हे ऐकून मेघाताईंना हायसे वाटले. त्या ऍक्सिडेंटच्या वेळी क्षितीज पुन्हा भूतकाळात शिरला असावा. आणि मैथिलीचा ऍक्सिडेंट झाला असे समजून त्याने भूमीसाठे या मुलीला वाचवले होते. हे लक्षात यायला त्यांना वेळ लागला नाही. कारण असे काहीतरी विचित्र क्षितिजच्या बाबतीत अधूनमधून घडत असे.  त्या मुलीला अश्या अवस्थेत एकट ठेवणं बर नाही,  हे ओळखून कर्तव्यदक्षपणा दाखवत त्यांनी क्षितिजला त्याच हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगितली. तसही त्याचा ऑफिस मीटच डेस्टिनेशन तिथून फार लांब नसल्याने क्षितिजलाही काही प्रॉब्लेम होणार नव्हता. "काळजी घे. आणि त्या मुलीची मैत्रीण येईपर्यंत तिची विचारपूस करत राहा."   बजावून त्यांनी फोन ठेवला.


 

आपण कोणत्याही पेचात सापडलो तर आपली आई सदैव आपल्याला मार्गदर्शन करते, क्षितिजला याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली होती. ‘खरतर ती पप्पांची दुसरी बायको. पण जन्मदात्या आईने जेवढी माया लावली नाही त्याच्या दुप्पट प्रेम, माया मेघाताई आणि क्षितीज याच्या नात्यात होती. आईच्या सांगण्याप्रमाणे ऑफिसमध्ये फोन लावून क्षितिजने आपले आधीचे बुकिंग कॅन्सल करून भूमीच्या शेजारच्याच रूममध्ये बुकिंग करवून घेतले. थकल्यामुळे आणि डोक्याच्या दुखण्यामुळे तिला आजूबाजूला काय चाललंय याचा अंदाज लागत न्हवता. मेघाताई आणि क्षितिजच फोनवरच बोलणं सुरु असताना भूमी जागच्या जागी झोपी गेली होती. ‘तिच्याकडे पाहून क्षितिजला वाटले. ' हाय-बाय म्हणण्याच्या अवस्थेत ती नाहीय. आपण इथे थांबण्याचा डिसिजन बरोबरच होता.'  वेटर्सना खाण्यापिण्याची थोडी माहिती देऊन,  भूमीसाठी सगळी सोय करून तो त्याचा रूममध्ये निघून गेला.
 

'विभासबरोबर बोलणं झालं, भूमी पोहोचल्याच समजल्यावर माई निर्धास्त झाल्या. त्यांचा सगळा जीव आपल्या मुलापेक्षा भूमीमध्ये गुंतलेला असायचा. ती नाही म्हंटल्यावर सगळं घर खायला उठलं होतं.  नानांचं  तर जेवणातही मन लागेना.  ते तासंतास पेपर्सचे गठ्ठे चाळत  बसायचे.  भूमी आणि विभासच्या आयुष्यात नक्की काय चाललत,  याची त्यांना थोडी भनक लागलेली होती. भूमी सांगत नसली तरीही काहीतरी गडबड आहे हे त्यांना समजलं होत. विभासपेक्षा काजळी होती ती भूमीची. 'आईबाप विना वाढलेली मुलगी, स्वतःच्या हिमतीवर शिकून डिग्री घेतली. लग्न देखील स्वकमाईतून केलं. आता कुठे तिच्या आयुष्यात चांगले दिवस यायला लागलेत. पण विभास?  तो अस का वागतोय? का तिच्याकडे लक्ष देत नाही.? '  याचा विचार ते करत बसलेले होते.

 

"अहो | भूमीचा फोन आहे,  या..." म्हणत माई फोन घेऊन त्यांच्या जवळ आल्या. आणि त्या तिघांचं बोलणं सुरु झालं. नेहमीप्रमाणेच अर्धातास चालणारी पण जिव्हाळ्याची बडबड सुरु झाली.'

 

“ शेवटी बोलता-बोलता माई म्हणाल्या, "अगं विभासला देना त्याच्याशीपण बोलून घेते."

"माई विभास आत्ता बाहेर गेलाय.  आल्यावर सांगते फोन करायला. "  म्हणत भूमीने फोन ठेवला.

अजून कित्ती दिवस खोट बोलणार आपण ? आणि का म्हणून ? हेच भूमीला समजत नव्हते. ही सारी  कोडी आणि तिची होणारी कोंडी काही केल्या सुटेना. जेव्हा माई-नानांना कळेल की,  'मी त्यांची सून कधीच नव्हते, आमचं लग्न व्हायच्या आधीच विभासने परदेशी लग्न केलं होतं. एक फॅशनेबल गोरी फॉरेनर बाई त्यांची सून आहे. त्यामुळे आमचं रजिस्टर मॅरेज तर अवैध ठरलेल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माझी शुद्ध फसवणूक करून आपल्या आईबाबांच्याही भावनांशी तो खेळतोय. आजही खरं काय ते सांगत नाही.' काय करावं ?

 

"कशी आहे तब्ब्येत?" आपल्याच तंद्रीत बडबड करणाऱ्या भूमीने दरवाज्याकडे पहिले.  क्षितिज तिला आतमध्ये येताना दिसला.  वेटर नाश्ता ठेवून गेला तेव्हा निष्काळजीपणे दरवाजा उघडाच राहिलेला होता.

 

"हो मस्त." म्हणत ती दाराकडे वळली.

 

"असा दरवाजा उघडा ठेवत जाऊ नका. " त्याने तो हलकेच बंद केला.

 

"चुकून राहिला. माईंची आठवण आली,  फोन करण्याच्या गडबडीत विसरले." भुमी

 

"अक्चुअली एक काम होत.  याचं हॉटेल मध्ये शेवटच्या मजल्यावर...उद्या हे लग्न आहे. तुम्ही याच लग्नासाठी आला आहेत का?  "  हातातली पत्रिका तिच्या समोर धरत तो म्हणाला.

 

"अरे, होय. तुम्ही सुद्धा ?" भूमीने ती पत्रिका बघत आश्चर्याने विचारले.

 

"नाही. मी बिझनेस मिटसाठी आलोय, पण हा मुलगा माझ्या आजीचा दुरच नातलग आहे. इथे आलोच आहे, तर प्रेझेंट पाकीट तरी दिल पाहिजे. तुम्ही जातं आहातच, तर द्याल का? ."

 

" तुम्ही हेल्प केली त्यासाठी थँक्स अगेन. नाहीतर माझं काही खरं नव्हतं. सो त्या बदल्यात मी एवढं तरी नक्कीच करू शकते. पण तुम्ही स्वतः का नाही येत? " भूमी.

 

"थँक्स. माझं थोडं काम आहे, सो नाही येऊ शकत."

 

"ओके." 

 

म्हणत भूमीने बाजूच्या ड्रॉवर मधून आपली पर्स बाहेर काढली.  "तुम्ही हॉस्पिटलचे पैसे दिलेत, किती झालेत काही सांगता का?"

 

"फाइन. नंतर केव्हातरी बघू ते."

 

"पुन्हा केव्हा भेटू माहित नाही. आणि उद्याच लग्न झालं कि मी इथून निघेन. सो प्लोज सांगा?"  भूमी त्याच्याकडे बघत म्हणाली.

 

‘’ सध्या मी एका वेगळ्याच फेज मध्ये सापडलोय, सो ते पैसे वगैरेच नंतर बघू.'' क्षितिज.

 

"मी इथे आहे तोपर्यंत, दुसरं काही करण्यासारखं असेल तर नक्की सांगा.''  भूमी.

 

हातातल्या मोबाइलवर आलेले नोटिफिकेशन चाळत नाराजीच्या सुरत क्षितिज म्हणाला. 

''सध्यातरी एका legal counsellor च्या शोधात आहे मी." क्षितिज

 

"म्हणजे? काही केस वगैरे चालू आहे का?" भुमी

 

"नाही. मी एका कंपनीमध्ये लीगल हेड आहे,  आम्हाला प्रोसेस रिलेटेड काही लीगल इश्युज येतायत, सो तिथे अजून एका legal counsellor ची गरज आहे." 

 

''मग जाहिरात वगैरे दिली नाही का?" भुमी

 

''आमच्या कंपनीचा एक legal counsellor आहे, बट त्यांने ऐन वेळेस इकडे यायला नकार दिलाय. आणि त्याच्याशिवाय मी मीटिंगला जाऊ शकत नाही. आज माझी इथे मिटिंग होती. कॅन्सल झाली. उद्या काहीही करून मिटिंग घ्यावीच लागणार. एका दिवसात legal counsellor कुठून आणणार? ते ही इथे चंदिगढ मध्ये.''

 

''एका दिवसासाठी व्हेकन्सी आहे का... ओके, काम झालं म्हणून समजा.''

 

'' म्हणजे?'' क्षितिज जरा गोंधळलाच होता.

 

'' काय योगायोग आहे बघा. मी सुद्धा कायदा पदवीधर आहे, थोडं बॅकग्राऊंड आणि केसची सिचवेशन काय आहे ते सांगितलं, तर मी तुम्हाला हेल्प करू शकते. पण ते तात्पुरतं हा.''  भूमी हसत हसत म्हणाली.

 

''ओह,  thats great... चालेल, पण एका दिवसात प्रिपरेशन करणे तुम्हाला शक्य आहे का? आय मिन सध्यातरी तुम्हाला आरामाची गरज आहे."

 

''डोन्ट वरी आय एम ओके .''

 

'खरतरं क्षितिज थोडा साशंक होता. पण या परिस्थितीत त्याला दुसऱ्या कोणाचीही मदत मिळण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे तो बेसिक माहिती आणि पेपर्स आपल्या रूममधून घेऊन आला. थोडं डिस्कशन झालं आणि तो परत त्याच्या रूममध्ये निघूनही गेला.

नक्षत्रांचे देणे ४



 (या भागात घडून येते, क्षितीज आणि भूमी यांची पहिली भेट, भेट म्हणावे कि अपघात. पण हि भेट देखील त्यांच्या नक्षत्रांन कडून मिळालेले देणे आहे. नाहीतर असा योगायोग जुळून येणे निव्वळ दुर्मिळ गोष्ट ना. कथा नायक आणि नायिका यांची खरी कहाणी आता सुरु होतेय पुढच्या भागापासून. वाचा आणि तुमचे सजेशन देत रहा. पुढील भाग दोन दिवसांनी. 

कथेला देत असलेल्या प्रतिसादासाठी सगळ्यांचे मनापासून आभार.)

नक्षत्रांचे देणे ३


 

पासपोर्ट, कपडे, खाण्याच्या वस्तू वगैरे वगैरे सगळं भरून झालं.  भूमी परत परत चेक करून बघत होती.


"भूमी हा फराळ आणि गोडाधोडाचे डब्बे घेऊन जायला परवानगी आहे ना? नाहीतर सगळं काढून घेतील चेकिंगच्या वेळेस..."  माईंनी तिच्यासाठी बनवलेला फराळ, काही स्वीट्स सुद्धा बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिले होते.

 

"सगळं चालत हो माई. " आवराआवर करत भूमी एकेक सामान चेक करत होती.

 

"माझ्या लेकाला पण दे हो थोडं. स्वतःच नको खाऊ..." माई हसत-हसत म्हणाल्या.

 

"हो माई."  एवढंच बोलून भूमी अंगणात आली.  तुळशी वृंदावनासमोर हात जोडून ती आता घराचा निरोप घेणार होती.  खरं तर असं खोट सांगून निघणं तिच्या तत्वात बसत नव्हतं, नाना आणि माईंना खऱ्या गोष्टी सांगण्याची हिम्मतही कुठून येणार.  त्यांना ते सहन होणार नाही.  आणि कमीतकमी या वयात आपल्याकडून तरी त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, याची ती पुरेपूर काळजी घेत असे. दोघांचाही निरोप घेऊन भूमी बाहेर पडली. एअरपोर्टसाठी टॅक्सी दारात उभी होती. एवढंच कि परदेशी जाणाऱ्या फ्लाईटने विभासला भेटायला जाणार नसून भूमी आपल्या स्वप्नांच्या मागोव्यावरती निघाली होती. आयुष्याला कलाटणी देणारा एक मोठा गिअर टाकून...

 

माईंना बाहेर येण्याचे धाडस होईना.  नानांचे डोळे अश्रू धारांनी भरून वाहत होते. एवढ्या वर्षात त्यांचा एकमेव आधार म्हणजे भूमी.  घर आणि माई-नानांना सोडून ती कुठे जात नसे. आता एवढ्या लांब, ते पण अनिच्छित काळासाठी जाणार, एकटी… हे त्यांना पटतचं नव्हते.  आपल्याजवळ अजून किती दिवस त्या तरुण मुलीला ठेवणार?  ही सल नानांच्या मनात टोचत होतीच आणि एकाएकी विभासचे बोलावणे आले. यामुळे अजिबात आढेवेढे न घेता दोघांनीही भूमीला परदेशी जाण्यास परवानगी दिली.

 

'भूमी या घरात आल्यापासूनचा एकेक दिवस माईंच्या आठवणीत होता. बघताच क्षणी कोणाच्याही ह्रदयात स्थान निर्माण करणार व्यक्तिमत्व.  उंची जेमजेम पण टपोरे पाणीदार डोळे, नाजूक सडपातळ बांध्याची गोरीपान भूमी, चेहऱ्यावर सदैव हास्याची छटा घेऊनच घरात वावरायची. सळसळणाऱ्या लांब केसांप्रमाणेच सदैव सळसळणारे चैतन्य होते तिच्या रूपात. विभासाठी तिची निवड करताना माईंना आपल्या मुलाचा हेवा वाटाला होता. सुलक्षणी सून घरी येणार म्हणून आजूबाजूच्या लोकांनाही त्यांचे कौतुक होते.'

 गॅसवरचा चहा आटायला आला होता, याची  जाणीव झाल्यावर आपल्याच विचारात गढलेला माई उठल्या.

"जाऊ दे तिला विभासकडे. तिने तरी तिची हॊसमौज कधी करायची. आमच्या म्हाताऱ्याचं काय, आज आहोत, उद्या नसू. आणि मुलगा परदेशी आहे तर काय करणार."  म्हणत नाना देखील आपल्या आराम खुर्चीवर डोकं टेकून पेपर चाळू लागले.

 

*****

 

आज मेघाताईंना राहून राहून काहीतरी चुकल्या सारखं वाटत होत. साठे काकांचा फोन येऊन गेला होता. 

काका असं का म्हणाले?  'क्षितिजचे नक्षत्र त्याला फिरवत आहेत, योग चांगला आहे, पण नवीन गाठीभेटी होतील आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना घडू लागतील. सुरुवात आजपासूनच होणार.’ 

देवाने त्याच्या नशिबात अजून काय-काय वाढून ठेवलय तेच कळत नाही. आपल्या आयुष्यात कोणाला डोकावू देईल तर शपथ. एकटा पडलाय तो. मैथिली त्याच्या आयुष्यात आली तो एक अपघातच. तिथून त्याचे ग्रह बदलत गेले. पैसे, प्रसिद्धी हे सगळं जरी मिळालं, तरीही त्यात त्याच सुख गेलं. हसरा खेळता क्षितिज त्यानंतर काही पाहायला मिळाला नाही. फक्त मैथिलीच्या शुद्धीवर येण्याचा आशेवर जगतोय तो. ती शुद्धीवर आली तरीही शारीरिक अपंगत्व घेऊनच, मग काय? तो ते सहन करू शकेल का?  तिच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत, असं वाटत त्याला.  कोणीतरी अशी त्याच्या आयुष्यात येउदे की मला माझा  जुना क्षितिज ती पुन्हा मिळवून देईल.'

 

"बसली का शून्यात जाऊन? दुनियादारी आटोपली वाटतं!"
७०-८० च्या घरात असणार पण स्वतःला १६ वर्षाची तरुण मुलगी समजणारी आजो, म्हणजेच मेघाताईंच्या आई आणि क्षितिजची आज्जी, आपला बॉबकट नीटनेटका करत मेघाताईंच्या रूममध्ये शिरल्या आणि तडक टेबल उघडून आपल्या फंकी पीच वनपीसवर मॅच अश्या काही ऍक्सेसरीज मिळतायत का पाहू लागल्या होत्या.

 

"हो झाली दुनियादारी. तुला काय पाहिजे? आणि हा काय ड्रेस घातलास गं?" मेघाताई उठून त्यांच्या मदतीला आल्या.

 

"हा काय ड्रेस म्हणजे, वनपीस आहे माझा. पार्टीला जातेय, मेघे मॅचिंग नेकपीस असेल तर दे ग."  एव्हाना ड्रॉव्हर मधला पसारा बाहेर काढून त्यांनी हवा तो नेकलेस घातला सुद्धा. आपल्या लेकीकडे एक लाडिक कटाक्ष टाकत, त्यांनी नजरेनेच विचारले. 'कशी दिसतेय?'

 

आपली आई या वयातही अल्लडपणाच उत्तम उदाहरण, मेघाताई तरी काय बोलणार, 'फारच सेक्सी म्हातारी, ' म्हणत त्यांनी बाहेर काढलेले सगळे सामान ड्रॉव्हरमध्ये ढकलले आणि पुन्हा येऊन पलंगावर बसल्या.

"बरं, माझ्या नातवाला सारखा त्रास देत जाऊ नकोस. त्याला मर्जीप्रमाणे जगुदे त्याचं आयुष्य. कोणीतरी माझ्यासारखी सेक्सी भेटली की बघचं, कसा उड्या मारत लग्नाला तयार होतो."

बाहेर पडत त्या मेघाताईंना बजावत होत्या. आणि अचानक काही तरी आठववल्या सारखं परत माघारी फिरून त्यांनी एक लिफाफा मेघाताईंचा हातात ठेवला. " याचा पीक पाठव त्याला, चंदीगड ला गेलाय तर दोन दिवसांनी हे फंशन पण अटेंड कर म्हणावं. माझ्या नात्यातल लग्न आहे. "

ऑर्डर सोडून त्या निघूनही गेल्या.

---------------------------------------------

हातातील लग्न पत्रिका बघून मेघाताईंनी नकारार्थी मान डोलावली. 'निलचे लग्न, ते पण एका पंजाबी मुलीशी, एक साधारण घरातला मुलगा, पण गडगंज पैसेवाल्याची मुलगी पटवून लग्न करतोय. या आधी किती अफेअर्स केलेत त्याच गणित नाही. नाहीतर माझा क्षितिज, नको त्या मुलीच्या मागे लागून पुरताच फसला. जवळजवळ सगळ्याच नातेवाईकांच्या मुलामुलींची लग्न झाली. याच्या समवायच्या मित्र मैत्रिणींची लग्न झाली. आता याची आजी तिसर्या लग्नाची तयारी करेल. पण याच्या लग्नाचा योग नाही.'  आज  स्वतःशीच बडबड करत बसल्या होत्या त्या. विचारांच्या तंद्रीत त्यांनी फोन डाईल केला.

 

"पोहोचला का रे?"

 

"जस्ट फ्लाईटमधून उतरलो, कारमध्ये बसलोय." क्षितिज एक दिर्घ श्वास घेऊन खिडकीबाहेर बघत होता.

 

"काही खाल्लं का?"

 

"हॉटेल वर जाऊन फ्रेश होतो, मग नाश्ता करून घेईन, तू ? "

 

"मी बसते आहेच, तुला फोन करावं म्हंटल. तू घरी नसला कि काळजी लागून राहते रे. " मेघाताईंच्या आवाजात खरोखरच काळजी जाणवत होती.  जणू क्षितिज खूप दिवसांसाठी बाहेर पडला असावा.

 

"आई मी आता लहान आहे का? का काळजी करतेस एवढी?”

 

"साठे काकांचा फोन येऊन गेला रे. 'तुझे ग्रह तुला फिरवत आहेत’ म्हणाले. तेव्हापासून मला थोडं अस्वस्थ वाटतंय."

 

"तुला माहित आहे ना, अश्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, ते काहीही सांगतात.  बरं ते जाऊ दे, आज्जो म्हणत होती, 'नीलचं लग्न आहे चंदिगढला' मला जायला सांगितलं आहे, जाऊ?"

 

"बघ जमेल का. मला माहित आहे, अर्थात तुला असे प्रोग्रॅम्स अटेंड करायला नाही आवडत, सो  जावंस वाटलं तर जा."

 

"ओके आई, आज्जोला वाईट वाटायला नको. मी ट्राय  करतो."  क्षितिज

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...