(या भागात घडून येते, क्षितीज आणि भूमी यांची पहिली भेट, भेट म्हणावे कि अपघात. पण हि भेट देखील त्यांच्या नक्षत्रांन कडून मिळालेले देणे आहे. नाहीतर असा योगायोग जुळून येणे निव्वळ दुर्मिळ गोष्ट ना. कथा नायक आणि नायिका यांची खरी कहाणी आता सुरु होतेय पुढच्या भागापासून. वाचा आणि तुमचे सजेशन देत रहा. पुढील भाग दोन दिवसांनी. कथेला देत असलेल्या प्रतिसादासाठी सगळ्यांचे मनापासून आभार.)
'मेघाताई आणि क्षितिज यांचे संभाषण चालू असताना त्याची कार अचानक जागीच थांबली होती. बाहेरच्या एकंदरीत परिस्थिती वरून नक्की काय झालं याचा थोडासा अंदाज क्षितिजला आला होता. हायवेला लागून असणाऱ्या छोट्या रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या एका ट्रँकरने समोरच्या टॅक्सिला उडवल होत. रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता. टॅक्सी ड्राइव्हरचा तर आतापता नव्हता, पण आत? आत असणारे प्रवासी ? त्यांचं काय?
"आई... आई... एक मिनिट. एकच मिनिट. इथे एक ऍक्सिडंट झालाय. अगदी माझ्या गाडीच्या समोरच." म्हणत त्याने कारचा दरवाजा उघडला.
"क्षितिज अजिबात गाडीतून खाली उतरू नको." मेघाताई पलीकडून ओरडून ओरडून सांगत होत्या. पण काही फायदा नाही. पलीकडून 'मैथिली ' अशी मोठी आरोळी त्यांच्या कानावर पडली आणि फोन कट झाला.
मागे ट्राफिक जॅम झालं होत. कोणी गाडीतून बाहेर पडायला मागेन. हॉर्न वाजू लागले आणि सगळेच 'चलो, गाडी आगे लो.'असा आरडा ओरडा करू लागले. डोक, मेंदू सुन्न झालेला क्षितिज त्या टॅक्सीच्या जवळ गेला. 'मैथिली, मैथिली करत त्याने एका तरुण मुलीला त्या टॅक्सितून बाहेर काढले. मेंदू आणि हातापायाला जबरी मार लागल्याने तिची शुद्ध जवळजवळ हरपली होती. तोपर्यंत क्षितिजच्या कारच्या ड्रायव्हरने टॅक्सी च्या बाहेर अस्थाव्यस्थ पडलेले त्या तरुणीचे सामान एकत्र करून गाडीत भरले होते. तिला आपल्या कारमध्ये घेऊन क्षितिजने सरळ जवळचे रुग्णालय गाठले. अक्खा रस्ता तो फक्त 'मैथिली' एवढ्याच नावाचा जप करत होता.
---------------------------------------------
'गुडवीन हॉस्पिटल, नर्सेस, डॉक्टर्स आणि पेशन्ट्स त्यांचे नातेवाईक यांची नुसती मांदीआळी, बाहेरून येणारे रॉ रॉ रॉ असे ऍम्ब्युलन्सचे आवाज कानात गुंजत होते, "डॉक्टर पेशन्टला जाग आली, प्लिज इकडे या." ओरडत एक सिस्टर रूमबाहेर पडली आणि डॉक्टर त्या दिशेने धावू लागले. दुसरी सिस्टर सांगत होती. "अब ठीक लाग रहा है ना मैथिली जी ? उठो मत, बस आराम करो, वो आपके रिश्तेदार बाहरही है. ॲक्सिडन्टका मामला. पोलीस पुछताछ चालू है." एवढे बोलेपर्यंत डॉक्टर आणि क्षितीज दोघेही आतमध्ये आले होते. मागोमाग पोलीस होतेच. थोडं चेकअप करून डॉक्टर ओक सांगून निघून गेले. आणि पोलीस शिपाई बाजूला बसून रिपोर्ट लिहू लागला. तो मैथिलीजी आपला ॲक्सिडेन्ट हुवा था. आपको कुछ याद है, कौन था वो आदमी. किसका ट्रॅकर, कुछ जानपेहचान है? "
आधीच गोंधळलेल्या त्या तरुणीने नकारार्थी मान डोलावली. जास्त बोलता येणे तिला शक्य नव्हते, त्यामुळे थोडी चौकशी करून समोर ठेवलेल्या रिपोर्ट वरती तिची साइन घेऊन पोलीस निघून गेले. तेव्हा तिला हायसे वाटले. "थँक्स." एवढा शब्द बोलून तिने जाणाऱ्या क्षितिजला थांबवले. तो थोडा गोंधळलाच होता. प्रश्नार्थक चेहरा करून त्याने तिच्याकडे पहिले.
" माझं नाव मैथिली असं सांगितलंत आणि आपली आधी ओळखही असल्याचं सांगितलंत त्यासाठी थँक्स."
"म्हणजे तुमचं नाव वेगळं आहे तर? पण तुम्ही पोलिसांना हेच नाव सांगितलं ना. " तो जरा आश्चर्याने पाहू लागला.
"होय. म्हणजे तुम्ही सिस्टर्सशी बोलत होतात तेव्हा मी ऐकलं होत. त्या सिस्टर्स देखील मला मैथिली अश्या नावाने आवाज देत होत्या. आणि खरं तर, माझं खरं नाव सांगून माझ्यासाठी आणखी नवीन संकट ओढवण्यापेक्षा मी मुद्दामहून तेच नाव पुढे केलं.'' कसतरी उठण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.
'' म्हणजे तुमचं खर नाव?'' क्षितिजच्या मनातील गोंधळ अजून संपला नव्हता.
'' मी भूमी साठे. ॲक्सिडन्ट नंतर तुम्ही मला ओळखत असल्याचं सांगितलं म्हणून थोडक्यात निभावलं. नाहीतर पोलीस घरच्या लोकांशी संपर्क करत बसले असते. घरी कळायला नको की मी इथे आहे, आणि माझा ॲक्सिडन्ट झालाय. ''
'' तुम्ही घरून न सांगता निघालात का?'' भूमीच बोलणं ऐकून क्षितिजला आश्चर्याचे धक्के बसत होते.
'' घरून सांगूनच निघाले, पण इथे आहे हे कोणाला माहित नाही. एक सांगून आले आणि आहे भलतीकडे, असं समजा.'' भूमी त्रासिक मुद्रेने त्याच्याकडे पाहत म्हणाली.
'' ओके. आता ठीक आहात ना? काही त्रास?''
'' नाही. मी ठीक आहे.''
'' डोक्याला बऱ्यापैकी मार लागलाय. काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. पण डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय. कुठे सोडायचं असेल तर सांगा.''
''हो प्लिज. मला हॉटेल फ्लोरामध्ये जायचं होत. आयमीन, मी तिथेच माझं राहण्याचं बुकिंग केलं आहे.''
'' ओक निघूया मग.'' म्हणत क्षितिज उठला.
''तुम्ही पण महाराष्ट्रीयन आहात ना?'' भूमी त्याच्याकडे निरखून पाहत विचारू लागली.
''अ... होय.'' म्हणत क्षितिजही हसला.
------------------------------------------------------
एक मोठं प्रशस्त आणि आलिशान हॉटेल फ्लोरा...सातव्या मजल्यावर भूमीच राहण्याचं बुकिंग होत. क्षितिज आणि त्याच्या ड्राइव्हरने तिचे सामान आणि इतर वस्तू तिथे सुपूर्त केल्या. रूममध्ये शिरल्या शिरल्या भूमीने समोरच्या सोफ्यावर अंग टाकलं होत. कदाचित तिला चक्कर येत असावं. किंवा थकवा जाणवत असावा. एकटी मुलगी आणि सोबतीलाही कोणीही नाही. आपण काय करावं हे क्षितिजला कळेना.
"आर यु ओके?" म्हणत त्याने पाण्याचा एक ग्लास तिच्यासमोर धरला.
"माहित नाही. थोडं गरगरतंय. पण ओके आहे. तुम्हाला लेट होत असेल ना. निघालात तरी चालेल."
"तुम्हाला एकटीला असं इथे सोडायचं, मला काही ठीक वाटत नाही. कोणी तुमच्या सोबतीला येऊ शकतं का?" थकलेल्या भूमीकडे एकटक पाहत क्षितिज विचारात होता.
"डोन्ट वरी, फक्त आजचा प्रश्न, उद्या एक मैत्रीण येईल इथे. दोन दिवसांनी याच हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावर माझ्या एका पंजाबी मैत्रिणीचं लग्न आहे. सो माझे काही फ्रेंड्स येणार आहेत. त्यामुळे मी नंतर वरती गेस्टरुममध्ये शिफ्ट होईन."
"ओके. गुड." क्षितिजला ऐकून थोडे हायसे वाटले होते. नाहीतर ही एकटी इथे का आली? त्यात घरी माहित नाही. वर ॲक्सिडन्ट झालाय. या सगळ्या विचाराने त्याचं डोकं भंडावून सोडल होतं. आता कुठे त्याला तिच्याबद्दल थोडी माहिती मिळाली होती.
''ओके , टेक केअर.''
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा