मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

नक्षत्रांचे देणे- ५



 'निघण्यासाठी तर तो उठला, पण पाय जागीच थिजले होते. काय करावं त्याला कळेना. रूमच्या चाव्या टीपॉय वर ठेवून तो निघाला, तेवढ्यात फोनची रिंग वाजली. त्याच्या आईचा फोन होता. या सगळ्या गडबडीत खूप वेळा रिंग वाजून गेली होती. ती काळजी करत बसली असेल, हे त्याच्या लक्षात आले. त्याने फोन कानाला लावला. पलीकडून मेघाताईंचा चिंताग्रस्त आवाज येत होता. क्षितिजने घडलेली घटना थोडक्यात सांगितली. तो ठीक आहे आणि ती मुलगी देखील ठीक आहे, हे ऐकून मेघाताईंना हायसे वाटले. त्या ऍक्सिडेंटच्या वेळी क्षितीज पुन्हा भूतकाळात शिरला असावा. आणि मैथिलीचा ऍक्सिडेंट झाला असे समजून त्याने भूमीसाठे या मुलीला वाचवले होते. हे लक्षात यायला त्यांना वेळ लागला नाही. कारण असे काहीतरी विचित्र क्षितिजच्या बाबतीत अधूनमधून घडत असे.  त्या मुलीला अश्या अवस्थेत एकट ठेवणं बर नाही,  हे ओळखून कर्तव्यदक्षपणा दाखवत त्यांनी क्षितिजला त्याच हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगितली. तसही त्याचा ऑफिस मीटच डेस्टिनेशन तिथून फार लांब नसल्याने क्षितिजलाही काही प्रॉब्लेम होणार नव्हता. "काळजी घे. आणि त्या मुलीची मैत्रीण येईपर्यंत तिची विचारपूस करत राहा."   बजावून त्यांनी फोन ठेवला.


 

आपण कोणत्याही पेचात सापडलो तर आपली आई सदैव आपल्याला मार्गदर्शन करते, क्षितिजला याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली होती. ‘खरतर ती पप्पांची दुसरी बायको. पण जन्मदात्या आईने जेवढी माया लावली नाही त्याच्या दुप्पट प्रेम, माया मेघाताई आणि क्षितीज याच्या नात्यात होती. आईच्या सांगण्याप्रमाणे ऑफिसमध्ये फोन लावून क्षितिजने आपले आधीचे बुकिंग कॅन्सल करून भूमीच्या शेजारच्याच रूममध्ये बुकिंग करवून घेतले. थकल्यामुळे आणि डोक्याच्या दुखण्यामुळे तिला आजूबाजूला काय चाललंय याचा अंदाज लागत न्हवता. मेघाताई आणि क्षितिजच फोनवरच बोलणं सुरु असताना भूमी जागच्या जागी झोपी गेली होती. ‘तिच्याकडे पाहून क्षितिजला वाटले. ' हाय-बाय म्हणण्याच्या अवस्थेत ती नाहीय. आपण इथे थांबण्याचा डिसिजन बरोबरच होता.'  वेटर्सना खाण्यापिण्याची थोडी माहिती देऊन,  भूमीसाठी सगळी सोय करून तो त्याचा रूममध्ये निघून गेला.
 

'विभासबरोबर बोलणं झालं, भूमी पोहोचल्याच समजल्यावर माई निर्धास्त झाल्या. त्यांचा सगळा जीव आपल्या मुलापेक्षा भूमीमध्ये गुंतलेला असायचा. ती नाही म्हंटल्यावर सगळं घर खायला उठलं होतं.  नानांचं  तर जेवणातही मन लागेना.  ते तासंतास पेपर्सचे गठ्ठे चाळत  बसायचे.  भूमी आणि विभासच्या आयुष्यात नक्की काय चाललत,  याची त्यांना थोडी भनक लागलेली होती. भूमी सांगत नसली तरीही काहीतरी गडबड आहे हे त्यांना समजलं होत. विभासपेक्षा काजळी होती ती भूमीची. 'आईबाप विना वाढलेली मुलगी, स्वतःच्या हिमतीवर शिकून डिग्री घेतली. लग्न देखील स्वकमाईतून केलं. आता कुठे तिच्या आयुष्यात चांगले दिवस यायला लागलेत. पण विभास?  तो अस का वागतोय? का तिच्याकडे लक्ष देत नाही.? '  याचा विचार ते करत बसलेले होते.

 

"अहो | भूमीचा फोन आहे,  या..." म्हणत माई फोन घेऊन त्यांच्या जवळ आल्या. आणि त्या तिघांचं बोलणं सुरु झालं. नेहमीप्रमाणेच अर्धातास चालणारी पण जिव्हाळ्याची बडबड सुरु झाली.'

 

“ शेवटी बोलता-बोलता माई म्हणाल्या, "अगं विभासला देना त्याच्याशीपण बोलून घेते."

"माई विभास आत्ता बाहेर गेलाय.  आल्यावर सांगते फोन करायला. "  म्हणत भूमीने फोन ठेवला.

अजून कित्ती दिवस खोट बोलणार आपण ? आणि का म्हणून ? हेच भूमीला समजत नव्हते. ही सारी  कोडी आणि तिची होणारी कोंडी काही केल्या सुटेना. जेव्हा माई-नानांना कळेल की,  'मी त्यांची सून कधीच नव्हते, आमचं लग्न व्हायच्या आधीच विभासने परदेशी लग्न केलं होतं. एक फॅशनेबल गोरी फॉरेनर बाई त्यांची सून आहे. त्यामुळे आमचं रजिस्टर मॅरेज तर अवैध ठरलेल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माझी शुद्ध फसवणूक करून आपल्या आईबाबांच्याही भावनांशी तो खेळतोय. आजही खरं काय ते सांगत नाही.' काय करावं ?

 

"कशी आहे तब्ब्येत?" आपल्याच तंद्रीत बडबड करणाऱ्या भूमीने दरवाज्याकडे पहिले.  क्षितिज तिला आतमध्ये येताना दिसला.  वेटर नाश्ता ठेवून गेला तेव्हा निष्काळजीपणे दरवाजा उघडाच राहिलेला होता.

 

"हो मस्त." म्हणत ती दाराकडे वळली.

 

"असा दरवाजा उघडा ठेवत जाऊ नका. " त्याने तो हलकेच बंद केला.

 

"चुकून राहिला. माईंची आठवण आली,  फोन करण्याच्या गडबडीत विसरले." भुमी

 

"अक्चुअली एक काम होत.  याचं हॉटेल मध्ये शेवटच्या मजल्यावर...उद्या हे लग्न आहे. तुम्ही याच लग्नासाठी आला आहेत का?  "  हातातली पत्रिका तिच्या समोर धरत तो म्हणाला.

 

"अरे, होय. तुम्ही सुद्धा ?" भूमीने ती पत्रिका बघत आश्चर्याने विचारले.

 

"नाही. मी बिझनेस मिटसाठी आलोय, पण हा मुलगा माझ्या आजीचा दुरच नातलग आहे. इथे आलोच आहे, तर प्रेझेंट पाकीट तरी दिल पाहिजे. तुम्ही जातं आहातच, तर द्याल का? ."

 

" तुम्ही हेल्प केली त्यासाठी थँक्स अगेन. नाहीतर माझं काही खरं नव्हतं. सो त्या बदल्यात मी एवढं तरी नक्कीच करू शकते. पण तुम्ही स्वतः का नाही येत? " भूमी.

 

"थँक्स. माझं थोडं काम आहे, सो नाही येऊ शकत."

 

"ओके." 

 

म्हणत भूमीने बाजूच्या ड्रॉवर मधून आपली पर्स बाहेर काढली.  "तुम्ही हॉस्पिटलचे पैसे दिलेत, किती झालेत काही सांगता का?"

 

"फाइन. नंतर केव्हातरी बघू ते."

 

"पुन्हा केव्हा भेटू माहित नाही. आणि उद्याच लग्न झालं कि मी इथून निघेन. सो प्लोज सांगा?"  भूमी त्याच्याकडे बघत म्हणाली.

 

‘’ सध्या मी एका वेगळ्याच फेज मध्ये सापडलोय, सो ते पैसे वगैरेच नंतर बघू.'' क्षितिज.

 

"मी इथे आहे तोपर्यंत, दुसरं काही करण्यासारखं असेल तर नक्की सांगा.''  भूमी.

 

हातातल्या मोबाइलवर आलेले नोटिफिकेशन चाळत नाराजीच्या सुरत क्षितिज म्हणाला. 

''सध्यातरी एका legal counsellor च्या शोधात आहे मी." क्षितिज

 

"म्हणजे? काही केस वगैरे चालू आहे का?" भुमी

 

"नाही. मी एका कंपनीमध्ये लीगल हेड आहे,  आम्हाला प्रोसेस रिलेटेड काही लीगल इश्युज येतायत, सो तिथे अजून एका legal counsellor ची गरज आहे." 

 

''मग जाहिरात वगैरे दिली नाही का?" भुमी

 

''आमच्या कंपनीचा एक legal counsellor आहे, बट त्यांने ऐन वेळेस इकडे यायला नकार दिलाय. आणि त्याच्याशिवाय मी मीटिंगला जाऊ शकत नाही. आज माझी इथे मिटिंग होती. कॅन्सल झाली. उद्या काहीही करून मिटिंग घ्यावीच लागणार. एका दिवसात legal counsellor कुठून आणणार? ते ही इथे चंदिगढ मध्ये.''

 

''एका दिवसासाठी व्हेकन्सी आहे का... ओके, काम झालं म्हणून समजा.''

 

'' म्हणजे?'' क्षितिज जरा गोंधळलाच होता.

 

'' काय योगायोग आहे बघा. मी सुद्धा कायदा पदवीधर आहे, थोडं बॅकग्राऊंड आणि केसची सिचवेशन काय आहे ते सांगितलं, तर मी तुम्हाला हेल्प करू शकते. पण ते तात्पुरतं हा.''  भूमी हसत हसत म्हणाली.

 

''ओह,  thats great... चालेल, पण एका दिवसात प्रिपरेशन करणे तुम्हाला शक्य आहे का? आय मिन सध्यातरी तुम्हाला आरामाची गरज आहे."

 

''डोन्ट वरी आय एम ओके .''

 

'खरतरं क्षितिज थोडा साशंक होता. पण या परिस्थितीत त्याला दुसऱ्या कोणाचीही मदत मिळण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे तो बेसिक माहिती आणि पेपर्स आपल्या रूममधून घेऊन आला. थोडं डिस्कशन झालं आणि तो परत त्याच्या रूममध्ये निघूनही गेला.

क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...