'ऑफिसमध्ये आज फार गडबड चालू होती. न्यू प्रोजेक्ट लॉन्चिंग त्यामुळे बरेचसे नवीन लोक आले होते. न्यू प्रोजेक्ट्ची अक्खी टीम खूपच बिझी दिसत होती.
एवढ्या सकाळी सकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थितपने हॅण्डल करण्यात रिसिप्शनिस्टची दमछाक झाली होती. भूमीने एंट्री केली तेव्हा 'आपण?' असा चेहेरा करून तिने भुवया उंचावल्या होत्या. नवीन जॉइनिंग तीही सावंत सरांनी डायरेक्ट अपॉईंट केलेली एम्प्लोइ. हे समजल्यावर तर ती अजूनच शॉक झाली. अवधी सुंदर दिसत होती ती कि, तिच्याबरोबर त्या एरियात आजूबाजूला असणारे इतर लोकही शॉक्ड होते. भूमीला बघून... कित्त्येकांच्या नजरा तिथे उंचावल्या होत्या. '' मोस्ट वेलकम मॅम.'' असं म्हणत रिसिप्शनिस्टने भूमीला तिच्या केबिनच्या रूट सांगितलं आणि भूमी आतमध्ये वळली. खरतरं तिला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. घरात साडी घालून वावरायची सवय नव्हती. इथे ऑफिस मध्ये तर शक्यच नव्हतं. त्यात पहिला दिवस, कित्त्येक एम्प्लॉई तिच्याकडे निरखून बघत होते, हे जाणवल्याने तर ती अजूनच अस्वस्थ झाली. ती कोणाशी काहीही न बोलता सरळ केबिनमध्ये घुसली. 'मॅम तुम्ही बसा,
सावंत सर अजून मीटिंगमध्ये आहेत, ते स्वतः तुम्हाला पुढच्या इंस्ट्रक्शन्स देतील,' असं म्हणून एक माणूस निघून गेला.
बऱ्यापैकी मोठी केबिन होती ती. एक मध्यम आकाराचे काचेचे टेबल त्यावर PC बाजूला लागणाऱ्या स्टेशनरीच्या साहित्य आणि काही फाइल्स अगदी व्यवस्थितपणे लावून ठेवण्यात आल्या होत्या. समोर असणाऱ्या चेअरवर बसत भूमी प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करत होती. पण अजूनही कोणीही तिथे आलेले नव्हते. बाहेर मात्र फार गडबड आणि माणसांचे आवाज ऐकू तेय होते. त्यावरून तिने अंदाज बांधला कि, अजून न्यू प्रोजेक्ट च्या कामामध्ये सगळे बिझी असणार. शेवटी कंटाळून तिने बाजूच्या मोठ्या काचेच्या खिडकीमधून खाली नजर टाकली. तेव्हा आपण फारच उंचीवर असल्याची जाणीव तिला झाली. बाहेर बऱ्यापैकी पाऊस सुरु होता. आज सकाळपासूनच पावसाने जोर लावला होता. सगळीकडे पाणी पाणी झाले होते.
''हाय भूमी .'' बाहेरून अचानक आलेल्या आवाजाने तिने मागे वळून पहिले. सावंत सर आणि एक लेडी एम्प्लॉई केबिनमध्ये आले होते. ''हॅलो सर.'' म्हणत तिने त्यांच्याकडे पहिले.
''भूमी, आज तुझा पहिला दिवस आणि न्यू प्रोजेक्ट्स लॉन्च असा योग आहे. मी खूप बिझी आहे, सो तुला या कादंबरी मॅम तुझ्या कामाचे डिटेल्स आणि बाकी गोष्टी समजावतील . आज रिलॅक्स हो, इथल्या बाकीच्या एम्प्लॉईना भेट, इंट्रो झाला कि मग आपण मेन हॉलमध्ये भेटू. हॅव अ गुड डे, ओक.'' एक वाक्यात सगळं सांगून सर निघूनही गेले.
''ओक सर.'' म्हणत भूमी कादंबरी मॅम बरोबर कामाचे डिस्कशन करायला बसली. सर आज बिझी असणार हे तिला अपेक्षित होतेच, पण कोणीतरी आपल्याला गाईड करायला आलं आहे, हे पाहून तिला फर बर वाटलं.
कादंबरी मॅम कडून बेसिक गोष्टी समजल्यावर भूमी बाहेर निघाली, दुपारी बाहेर सगळ्यांबरोबर इंट्रो करून झाली होती. लंच वगैरे आवरलं होत. टेबलवर असलेल्या फोनवर फोनकरून पलीकडून तिला कोणीतरी कंपनीच्या मेन हॉलमध्ये यायला संगितले. ती विचारत विचारत त्या ठिकाणी पोहोचली . त्या प्रशस्त सभागृहात बरेच लोक उपस्थितीत होते. राउंड टेबल अरेंजमेंट होती, समोर स्टेजवर मिस्टर सावंत आणि त्यांचा सिलेक्टिव्ह स्टाफ तसेच इतरही मोजकी मंडळी बसलेली होती. न्यू प्रोजेक्ट रिलेटेड काहीतरी अनाउन्समेंट सुरु असल्याने उगाच डिस्टरब नको, म्हणून भूमी दाराजवळील एका रिकाम्या टेबलाकडे वळली, तेथील बाजूची एक चेअर ओढून ती बसणार एवढ्यात स्टेजवरून अजून एक अनाउन्समेंट झाली होती. कोणीतरी आपली नाव घेते आहे, हे लक्षात आल्यावर भूमीने त्या दिशेने पहिले, तो मिस्टर सावंतांचा PA असावा, स्टेजवरून त्याने 'न्यू प्रोजेक्ट लीगल हेड म्हणून, भूमी साठे.' असे नाव अनाऊन्स केले होते. ऐकून भूमीला घाम फुटला. काय बोलावं तिला कळेना. तिथे काय विचारल तर? काय? या प्रोजेक्ट बद्दल तर तिच्याकडे अगदीच थोडी माहिती होती. आधीच गोंधळलेली भूमी आता फार घाबरली. तरीही उठून ती कशीबशी स्टेजवर पोहोचली होती. पण काहीही प्रॉब्लेम झाला नाही. मिस्टर सावंत स्वतः उठून तिच्या इथे आले. त्यांनी तिच्या बाजूला उभे राहून सगळ्यांना स्वतः माहिती दिली कि, आजपासून न्यू जॉईन झालेल्या या भूमी साठे आपल्या नवीन प्रोजेक्ट्सच्या लिजलचे सगळे काम पाहणार आहेत. आणि सगळ्यांनी तिचे स्वागतही केली. हे सगळं अवाक होऊन बघत स्टेजच्या खाली उभा असलेला क्षितीज मात्र शॉकमध्ये होता. आपल्याला कुणी काहीच कल्पना कशी दिली नाही, हे त्याला कळेना. इकडेतिकडे लक्ष टाकताना भूमिच्याही लक्षात आलं होत, कि क्षितिजपण इथे उपस्थित आहे आणि त्याला आपल्या जॉईन बद्दल आश्चर्य वाटणे साहजिक आहे. त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हेच तिला कळेना.'
'हॉलमधला कार्यक्रम आवरला आणि सगळे आपल्या केबिनच्या दिशेने निघाले. क्षितीज समोरच उभा आहे हे आव्हान भूमीच्या तिच्या लक्षात आलं होत. तिने त्याला बघून प्रसन्न मुद्रेने हाय केले. अगदी थंड नजरेने तिच्याकडे बघत तोही हसला. तो काहीतरी बोलणार एवढ्यात बाजूला उभे असलेले ,'काँग्रॅज्युलेशन मॅम अँड वेलकम .'' असं म्हणत त्या दोघांच्या मध्ये हजार झाले होते. ''थँक्स.'' म्हणत भूमी क्षितिजला काहीतरी सांगणार तर, वेदांत तिथे आला होता. ''हाय... हाय.'' म्हणून त्याने हात हलवत भूमीला अभिनंदन केलं. खरतर मुखर्जी आणि वेदांतसाठी भूमीच जॉइनिंग एक आश्चर्याचा धक्काच होता. पण नेहमीप्रमाणे तोंडावर उसण हसू आणून ते दोघे भूमीशी अगदी गोडं-गोड गप्पा मारत बसले होते, आणि आधीच चिडलेला क्षितीज तिथून कंटाळून निघून गेला, बोर होऊन शेवटी काहीतरी खोट काम सांगून भूमीही तेथून निघाली. क्षितिजचा गैरसमज झाला असावा हे तिला जाणवत होत. त्यात कंपनीचे मालक असणारे सावंत सर तिला पर्सनली इंट्रो करत होते, या आधी असे केव्हाही झाले नव्हते. हा काय प्रकार आहे. हि नक्की कोण आहे? का विचारात बाकीचा स्टाफ तिला अजूनच निरखून बघत होता.’
आजचा ऑफिसचा दिवस संपला होता. क्षितिजबरोबर काहीच बोलणं झालं नाही. याच भूमीला वाईट वाटत होत. त्याच विचारात सगळं आवरून ती घरी जायला निघाली.
क्रमश
https://siddhic.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा