‘बारीक नेट फ्रॅब्रिक असलेली पार्टी विअर ब्ल्यू-गोल्ड साडी आणि त्यावर मॅचिंग असे कानात हिऱ्याचे हँगिंग हुक, असा तिचा लूक अगदीच उठून दिसत हित. हातात छोटास स्टाइलिश पाकीट घेऊन ती निघाली. ती नको नको म्हणत असताना निधीने तिला आडवले आणि तिच्या केसांचा हाफ क्लच काढला, केस थोडे सेट करून ते असेच खुले सोडले. तिच्या लेअर कट मुळे काही सिल्की केस कपाळावरून पुढे कानावर रुळले होते, वाऱ्याच्या वेगाबरोबर ते मागे पुढे करत होते, बाकीचे मस्त मागे कमरेपर्यंत हेलकावे घेत होते. तिच्या ओठावर हलकीशी चेरी लिपस्टिक लावून निधी तिला घेऊन पार्टीसाठी निघाली.
निधी मात्र फारच अपसेट होती. भूमीसाठी ती तयार झाली, नाहीतर त्या पार्टीला जायचा तिचा अज्जीबात मूड नव्हता. ती निल आणि संजनाच्या लग्नाला सुद्धा भूमीच्या आग्रहमुळे गेली होती. भूमीला काहीही समजणार नाही असे वागत असली तरीही ती आतून खूपच नर्व्हस होती. गाडी चालवताना तिच्या मनात कायकाय चालू होतं, हे तिलाच माहित.’
******
आलिशान हॉटेलच्या मस्त ओपन टेरेसवर पार्टी रंगात आली होती. चमचम करणाऱ्या कलरफून लाइट्स, महागडे शोपिसेस आणि फुलांचे डेकोरेशन होते. संजना खूपच खुश होती. निल येणाऱ्या जाणाऱ्याकडे लक्ष देत होता. सगळे दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव करत होते. सगळंच हाय प्रोफाइल. क्षितीज आज्जो आणि आई बरोबर जाऊन निल अँड फॅमिलीला भेटून आला. शुभेच्छाही देऊन झाल्या. बिझनेसमन द संजय सावंत यांचा मुलगा त्यामुळे काही मुलींच्या नजरा त्याच्याकडे होत्या, हे लक्षात आल्यावर त्याला थोडं ऑकवर्ड फील झालं. नेहमीप्रमाणे आज्जो आपल्या समवइ मित्रांशी बोलण्यात गुंतलेली होती. आणि मेघाताई नीलच्या फॅमिलीशी बोलत होत्या.
भूमी कुठे दिसत नव्हती मग थोडं कॉर्नरला जाऊन त्याने निधी ला मेसेज केला. पण काहीही रिप्लाय आला नाही. थोड्याच वेळात मॅडमची एंट्री झाली होती आणि सोबत त्यांची सगळी गॅंग स्टेजवर आली. निल संजना आणि बाकी मित्र मैत्रिणी तिथे मस्ती आणि धमाल करत होत्या. दोन मिनिट त्याची नजर भूमीवर स्थिर झाली. अगदी साधीसुधी पण फार सुंदर दिसत होती ती. मेघाताईंची तर नजर हटेना.'' किती गोड दिसते हि, निव्वळ अप्रतिम.'' म्हणत त्यांनी क्षितिजकडे पहिले आणि त्या हसल्या. तो हि त्यांच्याकडे बघून हसला. एवढ्यात बाजूने येऊन कोणीतरी त्याला 'हॅलो.' केले होते. ती निधी होती.
''हॅलो, नाइस तू मीट यु.'' क्षितीज
''सेम या...'' निधी
''कसा आहेस?'' निधी
''मस्त... तू?'' क्षितीज
''मी पण.'' निधी
''तू स्टेजवर नाही गेली?'' क्षितीज
''मूड नाही, आमच्या भूमी मॅडम बघा कशा गळा भेट घेत आहेत. सगळी कॉलेज गॅंग आहे ना.'' निधी
''थँक्स निधी, तिला घेऊन आल्याबद्दल.'' क्षितीज
''दोस्तीमें नो थँक्स नो सॉरी. बाय द वे... मॅटर काय आहे? यु लाइक शी?'' निधी
''नॉट ओन्ली लाईक, आय लव्ह हर.'' क्षणाचाही विचार न करत तो बोलून गेला होता. आणि निधी अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिली.
''माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. तू सिरिअस आहेस कि नुसतं असच?'' निधी तिने परत प्रश्न केला.
''अगदी सिरिअस. मनापासून... तिच्याशी बोलायचं होत. पण माहित नाही वेळ नाही मिळत.'' क्षितीज
''ओह, तिचा काही पास्ट वगैरे असेल तर?'' निधी
''डझन्ट मॅटर. प्रेसेंट काही नाहीय, कदाचित मी सोडून. '' क्षितीज
''तुला कस माहित?'' निधी
''बऱ्यापैकी ओळखायला लागलोय तिला. डोळेझाकुन विश्वास ठेवू शकतो.'' क्षितीज अगदी ठाम विश्वासाने बोलत होता.
''गुड, आय लाइक इट. काय हेल्प पाहिजे सांग?'' निधी
''काही गोष्टी सांगायच्या आहेत. लवकरात लवकर आमची एक भेट अरेंज कर ना... प्लिज..'' क्षितीज
''आजच करते. त्याबदल्यात मला काय मिळणार ? '' निधी
''आजच, रिअली... बोल ना काय पाहिजे? आय एम रेडी.'' क्षितीज
''पार्टी द्यायची...'' निधी
''तिघे मिळून पार्टी करू, चालेल.'' क्षितीज
''पळेल... मी फोन करेन, आणि पुढचं प्लॅनिंग सांगेन. पार्टी नंतर तू घरी जाऊ नको, रेडी राहा. ओके ?'' निधी
''ओके बॉस.'' क्षितीज
निधीने प्लॅनींग करायला सुरुवात केली होती. आणि आज फायनली तो दिवस आला आहे, म्हणून क्षितीज खूप खुश होता.
*****
बरीच रात्र झाली होती, क्षितीज इथे रमलाय हे मेघाताईंच्या लक्षात आलं. भूमी आणि त्याच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या होत्या. त्याचे सुद्धा काही जुने मित्र मिळाले होते, त्यामुळे त्या आज्जोसोबत घरी निघून गेल्या. क्षितीज निधीच्या फोनची वाट बघत होता. पण निधी कुठे गायब झाली काही कळेना. भूमी निघण्याच्या तयारीत होती. ती सुद्धा निधीला शोधत होती.
''मी निघते, खूप उशीर झालाय. निधी कुठे दिसत नाही.'' भूमी
''मी सुद्धा तिलाच शोधतोय.'' क्षितीज
''का?'' भूमी
''दोघी एकत्र जाणार ना? म्हणून.'' क्षितीजने काहीतरी बोलून वेळ टाळून नेली. तरीही तिचा अजूनही मेसेज किंवा फोन कसा आला नाही? याचे त्याला नवल वाटले.
''मी बघून येते. असेल ती इथेच कुठे...'' म्हणत भूमी उठून तिला शोधायला लागली.
''ओके, मी सुद्धा येतो...'' क्षितीज
निधी जवळपास कुठे दिसलीच नाही. तिला शोधत-शोधत भूमी पार्टी हॉलच्या बाहेर आली. हि गेली कुठे तिला कळेना. दोघी सोबत आलोय, जायचंच होत तर न सांगता का बर गेली? फोन करते तर तोही उचलत नाही? भूमीला काही कळेना. गाडी तरी जागेवर आहे का? कि घरी गेली, हे बघण्यासाठी ते दोघे पार्किंगमध्ये आले. तर गाडी जागच्या जागीच होती. तिला काही कळेना. पुन्हा फोन ट्राय करून बघूया म्हणत क्षितिजने तिचा नंबर डायल केला. जवळपास कुठूनतरी रिंग वाजल्याचा आवाज आला. तिच्याच फोनची रिंग वाजत होती, म्हणजे ती इथेच कुठेतरी आहे हे भूमीने ओळखले. ''ट्राय अगेन.''म्हणत तिने क्षितिजला पुन्हा फोन लावायला सांगितले. आणि ती आवाजाच्या जाऊ लागली. थोड्याच अंतरावर पुढे फोन वाजत होता. एक झटका लागावा तशी ती मागच्यामागे वळली. २०-२५ पावलावर निधी-नीलच्या गळ्यात पडून ओक्सबोकसी रडताना तिने पहिले. निल सुद्दा रडत होता. निधीला समजावत होता. क्षितिजसाठी सुद्दा हा जबरदस्त झटका होता. निल ज्याच्या लग्नाचं वरती रिसेप्शन सुरु आहे, संजना वरती मस्त एन्जॉय करतेय, तो इथे निधी बरोबर...का? हे समजण्याच्या पलीकडचे होते.
'त्या दोघांच्या बोलण्यावरून तरी भूमी आणि क्षितिजने ओळखले कि त्यांचे अफेअर होते आणि आत्ताही त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. घरच्यांनी पैशासाठी संजनाशी जबरदस्तीने लावून दिलेले लग्न आता नीलच्या पचनी पडत नाही. त्यामुळे तो हवालदिल होऊन निधीची माफ़ी मागत होता. यात तो किती खरं बोलतोय, हा तर एक प्रश्नच होता.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा