'काही दिवस भूमी केसही रिलेटेड माहिती गोळाकरत होती. संबंधित माणसांना आणि स्टाफला भेटत होती. चंदीगढच्या कम्प्युटर सिस्टीममधील काही डेटा मागवून तिने त्यावरही काम केले. बरेचसे कागद चाळून झाले होते. आणि आज अचानक तिने एका खाजगी मीटिंगचा मेल टाकला.'
'मिटिंग रूममध्ये राउंड टेबलजवळ सगळे उपस्थित होते. मिस्टर सावंत आणि क्षितीज, आधीच येऊन बसले होते. लीगल टीमचे काही मेम्बर आणि मुखर्जीना मेल पाठवला होता. सगळे त्यांची वाट बघत बसले होते. बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे भूमी देखील प्रोजेक्टर जवळ उभी राहून मुखर्जींची वाट बघत होती. तिने मांडलेल्या डायग्राम वरून बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या.'
''भूमी तुम्ही कन्टीन्यु करा. मुखर्जीची वाट बघत बसण्यात काही पॉईंट नाही. ते आल्यावर जॉईन होतील.'' मिस्टर सावंत
''ते आल्याशिवाय पुढे जात येणे शक्य नाही. सर काही गोष्टी फक्त तेच एक्सप्लेन करू शकतात.'' भूमी
''एक्झाम्पल?'' मिस्टर सावंत
''चंदिगढ प्रोजेक्ट्च्या प्रोसेस रिलेटेड जे इश्यू आले होते, आणि त्यानंतर कंपनीवर फसवणुकीची केस झाली. या सेम प्रोजेक्ट्चे टेंडर बजेट आणि प्रपोजल बजेट दोन्ही वेगवेगळे आहे. असं का? आणि या दोन्ही फिगर वेगळ्या असूनही अप्रूव्हल साइन कोणी केली होती? यात जवळपास कोटी रूपयांचा फरक आहे.''
म्हणत भूमीने हातातले पेपर्स त्यांच्यापुढे सरकवले.
दोन मिनिट पेपर्स पाहुन त्यांनी लगबगीने फोन डाइल केला. 'हॅलो, मुखर्जींना सांगा मिटिंग पोस्पोनेड केली आहे. उद्या मेल मिळेल.'
म्हणत त्यांनी फोन कट केला. भूमी आणि क्षितीज त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते. शेवटी क्षितिजने विचारले.
''पप्पा? का ?''
''मिटिंग आजच होणार. पण मुखर्जीच्या अनुपस्थितीत. आणि यापुढे चंदिगढ प्रोजेक्त इशूज च्या मिटिंग मध्ये मुखर्जींना बोलवायचं नाही. मिटिंग पूर्ण झाल्यावर यातील काही गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या. इस इट ओक.''मिस्टर सावंत
आता भूमीच्या लक्षात आलं. कि मुखर्जींवरती संशयाची सुई वळललेली आहे. तिने पुढचे काही पेपर्स दाखवले.
''सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यावेळी तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टसाठी लंडनला गेला होतात. इथे नॉमिनी म्हणून कोणी होते का? कि किर्लोस्कर सर हे सगळं बघत होते?''
''हो किर्लोस्कर आणि त्यांची मुलगी मैथिली हे काम बघत होते. क्षितीज येऊन जाऊन असायचा.'' मिस्टर सावंत
''ओरिजनल पेपर्स मी बसत असलेल्या केबिनमध्ये सापडलेलं, तिथे आधी मैथिली मॅडम बसायच्या असं समजलंय. त्यांच्या काही चिट्स आणि डायरीज मध्ये हे सापडलं आहे.'' भूमी
''काय आहे... एक्सप्लेन करू शकता?'' क्षितीज
''बजेटमध्ये काहीतरी गडबड आहे, आणि लीगल प्रॉब्लेम्स त्यामुळेच येत आहेत. हे त्यांना समजलं होत. तेव्हा त्यांनी या प्रॉजेक्टच्या रिलेटेड स्टडी केला. यात त्यांनी एक्झॅक्ट्ली मिसिंग फिगर किती आहे ते दाखवलं आहे. मी यावर स्टडी केला, तर असं समजलं कि हि सेम अमाउंट काही बिलांशी जुळतेय, जे बिल्स फेक बिल्स म्हणून जाहीर करून काही कंपनीनी आपल्यावर लीगल फ्रॉड ची केस केली आहे.'' भूमी
''एस, आणि त्यांचं असं म्हणणं आहे कि, हे फेक बिल दाखवून कंपनीने एक्सपेन्सेस वाढलेला दाखवला आहे. आणि ती अमाउंट परस्पर गायब करण्यात आलेली आहे.'' क्षितीज
''पण आपल्याला अशी कोणतीही रक्कम मिळालेली नाही. उलट हा आपला टोटल लॉस मध्ये अडकलेला प्रोजेक्ट म्हणून अजूनही अपूर्ण आहे. '' मिस्टर सावंत
''सर महत्वाची बाब हि आहे, कि तो प्रोजेक्ट नफ्यात होता. जवळपास १ कोटी नफ्याचा प्रोजेक्ट तेवढ्याच रकमेने तोट्यात दाखवून २ कोटी रूपये गायब केले गेले आहेत. तेथील कामकाज मुखर्जी बघू लागले आणि तिथे प्रॉब्लेम्स येऊ लागले. जस कि गुणवत्ता, कायदेशीर बाबी, स्टाफ मेम्बर्स वरच्यावर सोडून जाऊ लागले.'' भूमी
''क्षितीज आणि मैथिली यांचा अपघात तिथेच झाला होता. सुदैवाने क्षितीज वाचला. आणि मैथिली अजून कोमामध्ये आहे.'' मिस्टर सावंत अचानक बोलून गेले आणि भूमी सावध झाली.
''सर मला मिळालेल्या माहितीनुसार मैथिली मॅडम इथून तिथे त्याच प्रोजेक्टच्या डिस्कशनसाठी गेल्या होत्या.'' भूमी
''होय. पण त्याच इथे काय?'' मध्येच क्षितीज तिला म्हणाला.
''अचानक जाणं झालं होत कि, प्लानेड मीट होती?'' भूमी
''प्लानेड. आम्ही दोघेही सोबतच गेलो होते. त्याचा इथे काय संबंध आहे का?'' क्षितिज जवळजवळ ओरडलाच. त्याला कसला राग आला आहे हे भूमीला कळेना. असा चिडका चेहेरा बघून भूमी शांत झाली. तिने पुढे काहीही विचाराले नाही.
हे पाहून मिस्टर सावंत म्हणाले.''भूमी नक्की काय विचारायचं आहे? या प्रोजेक्ट संबंधी महत्वाची काही गोष्ट आहे का?''
''इट्स ओक सर. काही नाही. '' म्हणत तिने मान खाली घातली. क्षितिजच हे वागणं तिच्यासाठी नवीन होत. काही दिवस ऑफिसमध्ये मैथिली आणि त्याच्या बद्दल कानावर पडत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत, असं तिला वाटू लागलं. ती थोडी नर्व्हस झाली होती. हि गोष्ट क्षितिजच्या लक्षात आल्यावर त्याला वाईट वाटले, बी प्रोफेशनल असं स्वतःला समजावत तो म्हणाल.
'सॉरी, काय माहिती हवे?''
''गुड, मी इथे प्रोफेशनल वागण्याची अपेक्षा ठेवेन. एकमेकाला कॉपरेट करा.'' मिस्टर सावंत
''इफ तू डोन्ट माइंड, या मिटचा थोडा पास्ट कळू शकतो का?'' भूमी
''मैथिलीने अचानक हि मिट अरेंज केली, इमर्जनी तिकीट बुक करून आम्ही चंदीगढला गेलो. तिथे आम्ही जात असल्याची कोणालाही काहीही कल्पना द्यायची नाही असं ठरलं होत. त्याच्या आधी काही दिवस मैथिलीने अकाउंट्स आणि बजेटच्या काही लोकांना मेल पाठवला होता. कोणत्याही परिस्थिती चंदीगढला उपस्थित राहायला सांगितले होते. एअरपोर्ट वरून आम्ही सरळ टॅक्सी करून कंपनीत पोहोचणार होतो. पण मध्येच आमची टॅक्सी बिघडली, आणि चंदिगढच्या कंपनीने अरेंज केलेली गाडी घेऊन आम्ही पुढे जायला निघालो.'' क्षितिजने सगळी माहिती सांगितली होती.
''त्यानंतर त्यांचा कार अपघात झाला आणि ती मिट रद्द झाली.'' मिस्टर सावंत
'' त्या आधी मैथिली मॅडमनी तुम्हाला या प्रॉजेक्ट काही सांगितली होते? काही विशेष... नेहेमीपेक्षा वेगळे.'' भूमी
'' तिथे काय काम आहे?’’ असं मी तिला खूपदा विचारलं होत. सगळ्याच गोष्टी इतरांशी शेअर करायला तिला नाही आवडायचं. ' पोहोचल्यावर सांगते. असे विषय गाडीमध्ये बोलता नाही येत.’या पलीकडे तिने काहीही सांगितले नाही. ' पण '२ कोटींचा प्रश्न आहे. आजच त्याला नोकरी सोडायला नाही लावली तर बघ.' असं काहीतरी ती सारखं बोलत होती. तिची डायरी आणि काही फोल्डर्स तिने सोबत घेतले होते.'' क्षितीज
''२ कोटींचा प्रश्न... म्हणजे नक्कीच त्यांनी या फ्रॉड करणाऱ्या टीमला पकडलं असणार. त्यांच्याकडे त्याच वेळी पुरावे उपलब्ध होते. म्णून तर त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला.'' भूमी डॅम शुअर होत म्हणाली.
''खून?'' क्षितीज ताडकन उठून बसला.
''एस खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. that was not an अक्ससिडेन्ट.'' मिस्टर सावंत भूमीच वाक्य रिपीट करत म्हणाले.
''होय सर. आपली लीगल टीम शोध घेते त्यानुसार चंदिगढ कंपनीने अशी कोणतीही पर्सनल कार पाठवलेली नव्हती. आपल्याकडे सगळ्या ट्रॅव्हल एक्सपेन्ससच सिस्टीम बुकींग होत. जी कार मैथिली आणि क्षितिजसाठी बुक केली गेली होती. तो कोणीतरी मुद्दामहून पाठवली होती. सिस्टीममध्ये असे कुठेही काहीही रेकॉर्ड आढळलेले नाही.'' भूमी
'' यु मिन मैथिलीने फ्रॉडला शोधून काढला हे चंदिगढ ऑफिसमध्ये त्या लोकांना माहित झालं होत. आणि त्यामुळे त्यांनी ऑफिसमध्ये पोहोचण्याआधीच आमच्यावर हल्ला केला.'' क्षितीज
थोड्यावेळासाठी संपूर्ण मिटिंगरूममध्ये शांतता पसरली. आत्ता क्षितिजच्या लक्षात आलं होता. कि काही दिवसांपूर्वी पप्पा असं का म्हणाले, ' तिच्या सेप्टीसाठी भूमीला लाइमलाइटमध्ये आणू नकोस, पडद्याआड राहून तिला काम करू दे.'
''म्हणजे 'पप्पा हे तुम्हाला आधीपासूनच माहित हो?'' त्याने मिस्टर सावंतांना प्रसन्न केला.
''नाही, मला फक्त संशय होता. भूमीने पुरावे सादर केले त्यामुळे आत्ता खात्री झाली.'' मिस्टर सावंत म्हणाले.
थोडं डिस्कशन होऊन मिटिंग संपली. त्यानंतर भूमी तडक आपल्या केबिनमध्ये निघून गेली. क्षितिजने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती थोडी नाराज होती.
क्रमश
https://siddhic.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा